Wednesday, 13 December 2023

गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती

 गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

            नागपूर, दि. 13 : गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

            गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

            नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होतीती वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते. यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            सीसीटीव्हीसंदर्भात नियमावली तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक हजार लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जाणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मेणबत्ती कारखाना आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत

 मेणबत्ती कारखाना आगीतील मृत कामगारांच्या

कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत

मंत्री सुरेश खाडे

            नागपूरदि. 13 : पुण्यातील तळवडे येथील शिवराज एंटरप्रायझेस येथे स्पार्कल कॅण्डल बनवित असताना अचानक लागली होती. या आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे सांगितले.

             ८ डिसेंबर रोजी अचानक आग (फ्लॅश फायर) लागली होती. या घटनेत एकूण १५ महिला कामगारांपैकी ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिला कामगारांपैकी ९ जखमी कामगारांवर उपचार सुरु असताना त्यापैकी ३ कामगारांचा मृत्यू झाला. उर्वरित ६ महिला कामगार व एका पुरुष व्यक्तीवर  उपचार सुरु आहेतअसे मंत्री श्री खाडे यांनी सांगितले.

            ही आस्थापना तळवडेपुणे येथील जन्नत नजीर शिकलगार यांच्या मालकीच्या जागेत शिवराज एंटरप्रायझेस या नावाने कार्यरत होती. या आस्थापनेचे बांधकाम हे अनधिकृत असून आवश्यक मान्यता घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या आस्थापनेने कारखाने अधिनियमांतर्गत परवाना घेतला नसल्याचे दिसून आले असल्याचे मंत्री श्री खाडे यांनी निवेदनातून स्पष्ट केले.

            औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. घटनेनंतर या आस्थापनेवर कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत विविध कायद्यांतर्गत निरीक्षण शेरे  नोंदविण्यात आलेले असून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या आस्थापनेस उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहेतअशी माहिती कामगारमंत्री श्री खाडे यांनी सभागृहात दिली.

            या प्रकरणी अग्निशमन विभागाकडून संबंधित पोलीस स्टेशनला आस्थापनेविरुध्द भारतीय दंड संहिताबाल व किशोर कामगार प्रतिबंध व विनियमन अधिनियम१९८६ तसेच स्फोटक अधिनियम१८८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारखान्याच्या जागेचे मालकआस्थापनेचे मालक व उत्पादनासाठी कच्चा माल पुरवविणारे पुरवठादार यांना अटक करण्यात आली असून सद्यस्थितीत ते अटकेत आहेत.

            कंपनीतील मृत व जखमी कामगारांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयुक्तांना कळविण्यात आले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. घटनेच्या अनुषंगाने पुढील चौकशी सुरु असून संबंधिताविरुध्द कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचे कामगारमंत्री श्री खाडे यांनी यावेळी सांगितले.


महसूल व वने, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण

 विधानसभा इतर कामकाज :

महसूल व वनेनगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या

पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे होणार लेखापरीक्षण

- मंत्री उदय सामंत

 

            नागपूरदिनांक १२ - मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराचे लेख परीक्षण करून त्याबाबतची श्वेतपत्रिका पुढील अधिवेशनात मांडण्यात येईलअशी माहिती नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना दिली. नियोजन विभागाचे अपर प्रधान सचिवनगरविकास -१ चे प्रधान सचिव आणि संचालक (वित्त - लेखापरीक्षण) यांची समिती ही चौकशी करेलअसेही त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री.सामंत म्हणाले कीसदस्य योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या २५ वर्षातील आर्थिक कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करण्यात येऊन याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

            याशिवायनगरविकास विभागाच्या अनुषंगाने ठाणे शहरातील घनकचरापाणीपुरवठायाबाबतही तक्रारी नसल्याचे सांगून ठाणे शहराला ५८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. सूरज परमार गुन्हा प्रकरणी तपास सुरू असून याप्रकरणी अतिजलद तपास करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

            दरम्यान, विधानसभेने आज नगरविकास विभागाच्या ५०१५ कोटी ११ लाख ९० हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच महसूल विभागाच्या ६३१ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपयांच्या, तर मदत व पुनर्वसन विभागाच्या ११२ कोटी ८४ लाख १ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. तसेच वन विभागाच्या ४२ कोटी ६१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या.

            वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ३०८० कोटी ७३ लाख रुपयांच्या तर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ५४ लाख ९६ हजार रुपयांचे पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

00000

राज्यातील प्रत्येक रुग्णालयात लोकशाही दिन साजरा करावा; किमान दोन तास महिला रुग्णांसाठी राखीव ठेवावा

 राज्यातील प्रत्येक रुग्णालयात लोकशाही दिन साजरा करावा;

किमान दोन तास महिला रुग्णांसाठी राखीव ठेवावा

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            नागपूर दि.१२: सर्व विभागांप्रमाणेच जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात लोकशाही दिन साजरा केला जावा, तसेच त्यादिवशी दोन तास महिला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. सर्व रुग्णालयांत आवश्यक औषध साठा उपलब्ध करावा. विशेषतः रेबिज व सर्पदंश मधील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत. रेबीज होवू नये म्हणून खाजगी तसेच मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करून घ्यावे. असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

             सिंधुदुर्ग व लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा विधानभवन नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगीदिनेश वाघमारे प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षणराजीव निवतकर आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबईडॉ. समीर जोशी अधिष्ठाता लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयडॉ. सुनीता रामानंद अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गडॉ. विजय कंदेवाड सहसंचालक आरोग्य सेवाडॉ. दिलीप माने उपसंचालक कोल्हापूर मंडळडॉ. श्रीपाद पाटील जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग उपस्थित होते. यावेळी राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यात सुरू करणे व चांगल्या प्रकारे रुग्णसेवा उपलब्ध करणे बाबत आढावा घेणेत आला.

             उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याअँटी रॅगिंग आणि लैगिक अत्याचार विरोधी कायदा या दोन्ही कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना या कायद्याची परिपुर्ण माहिती त्यांच्या वैद्यकीय शिक्षण सुरू होतानाच देण्यात यावी. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याची तसेच जेवणाची सोय करण्याबाबत प्रत्येक जिल्हा रुग्णालय व शासकीय महाविद्यालया जवळ व्यवस्था करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत. यामध्ये विशेषतः गरोदर मातांच्या निवास व्यवस्थेवर विचार व्हावा.

            त्या पुढे म्हणाल्या, नागरिकांना आरोग्य सेवेविषयी काही तक्रारी व सूचना करता याव्यात यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा. विशिष्ट आजार असणारे रुग्णगतिमंद मुलेगर्भवती स्त्रिया यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला एक दिवसाचे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. रुग्णालयांचे व्यवस्थापन चांगले होण्याच्या दृष्टीने डॉक्टर व व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. खाजगी रुग्णालयात राबविण्यात येत असलेल्या चांगल्या व्यवस्था यांचा अभ्यास करावा व त्या शासकीय रुग्णालयात राबवाव्यात. तसेच तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.

000

 आतातरी डोळे उघडा आणि मातृभाषेचं महत्व ओळखा !!!

आतातरी डोळे उघडा आणि मातृभाषेचं महत्व ओळखा !!!

 भारतीयांना इतकी जोरदार चपराक कोणी मारली नसेल ! ती सुद्धा एका ऑस्ट्रेलियन माणसाने आणि खुद्द ऑस्ट्रेलियातच !! आतातरी डोळे उघडा आणि मातृभाषेचं महत्व ओळखा !!!


Tuesday, 12 December 2023

राज्यात १७ ठिकाणी ‘स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग’

 राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            नागपूर दि. १२ : रस्ते अपघात रोखण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येत असून त्याचे दृश्यस्वरूपात बदल दिसून येतीलअशी ग्वाही देतानाच राज्यात १७ ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग२३ ठिकाणी स्वयंचलित वाहनयोग्यता प्रमाणपत्र केंद्र उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

            सदस्य अशोक चव्हाण यांनी राज्यात होत असलेल्या वाहन अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसमृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यत किमान ६० ते ७० लाख वाहनांनी प्रवास केला असून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक दहा किमी अंतरावर रम्बलर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

            वाहन चालक परवाना स्वयंचलित पद्धतीने देण्यासाठी राज्यात १७ ठिकाणी ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. ट्रॅकसाठी दोन महिन्यात कार्यादेश देण्यात येतीलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. २३ ठिकाणी ऑटोमॅटीक फिटनेस सेंटर्स देखील करण्यात येत असून वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्राची मदत संपण्यापूर्वी संबंधितांना पूर्वकल्पना देण्याबाबत यंत्रणा तयार करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती वर्षा गायकवाडदेवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

००००


 

Featured post

Lakshvedhi