Friday, 24 November 2023

शालेय पोषण आहाराची मंत्री केसरकर यांनी घेतली चव

 शालेय पोषण आहाराची

मंत्री केसरकर यांनी घेतली चव

 

            मुंबईता. 23 : विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून तज्ज्ञांच्या समितीने सुचविल्यानुसार तयार केलेले पदार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (दि. 22 नोव्हेंबर) सायंकाळी स्वत: चाखून बघितले. या पोषक तत्व असलेल्या आणि रूचकर पदार्थांचा लवकरच विद्यार्थ्यांच्या आहारात समावेश केला जाणार आहे.

            राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याअंतर्गत तज्ज्ञांनी सूचविलेले पदार्थ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल किचन चालविणाऱ्या महिलांमार्फत तयार करण्यात आले. या पदार्थांचा मंत्री श्री.केसरकर यांच्यासह प्रधान सचिव रणजित सिंह देओलमराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंडेसहसचिव इम्तियाज काझीप्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्यासह तज्ज्ञांच्या समिती सदस्यांनी बुधवारी आस्वाद घेतला.

            विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याबरोबरच आठवड्यातील प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ द्यावेतअशा सूचना मंत्री श्री.केसरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोषण आहार ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीतील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली नाचणीच्या वड्याभगरीचा उपमाभगरीचा शिराभगरीची खीरमटर पुलावसोया पुलावगोड पुलावअंडा बिर्याणीमूगडाळ खिचडीगोड खिचडीकडधान्यमसाले भाततांदळाची खीर, असे विविध पदार्थ तयार करण्यात आले. या पदार्थांपैकी एक मुख्य पदार्थएक गोड पदार्थ आणि सलाद देण्यात यावाअशी मंत्री श्री.केसरकर यांची संकल्पना आहे.

            ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्याआहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

00000

संविधान दिना’निमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांची मुलाखत

 संविधान दिनानिमित्त दिलखुलास’ कार्यक्रमात

माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 23 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक ई. झेड. खोब्रागडे यांची भारतीय संविधानत्याची पार्श्वभूमी आणि इतिहास या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

            भारतीय संविधानाचे वेगळेपणदेशभरात साजरा केला जात असलेला संविधान दिनसंविधानातील मूलभूत अधिकारांचे वर्णनलोकशाहीच्या तीन प्रमुख स्तंभांची संविधानिक जबाबदारीसंविधानातील मूलभूत कर्तव्यांचा समावेश आदी विषयांची सविस्तर माहिती, श्री.खोब्रागडे यांनी दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

             ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या अॅपवर शुक्रवार दि. २४शनिवार दि. २५ आणि सोमवार दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ

 




 अभियानाच्या अंमलबजावणीतून

लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार

- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन

महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व पुरस्कार वितरण सोहळा

            मुंबईदि. 23 : प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावेहे स्वप्न असते. गरीबसमाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना, तर घरकुल म्हणजे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या विविध योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहेअसे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व सन 2021-22 चे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेग्रामसडक योजनेचे सचिव के. पी. पाटीलकोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकरनागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीराज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक डॉ. राजाराम दिघे उपस्थित होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांसाठी घरे स्वप्न असल्याचे सांगत मंत्री श्री. महाजन म्हणाले कीसमाजातील अंत्योदय पर्यंत योजनांचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गरिबांना गॅस जोडणीनळ जोडणीवीज जोडणीशौचालयाची सुविधा देण्यात येत आहे. शासन समाजातील शेवटच्या घटकाला पुढे आणण्यासाठी विविध योजना राबविते. या योजनांची अंमलबजावणीची जबाबदारी यंत्रणांची आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत 50 हजार रूपयांचे अर्थसहाय्य सध्या देण्यात येते. यामध्ये 1 लाख रूपयापर्यंत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही मागणीही पूर्ण होणार आहे.

            मंत्री श्री. महाजन म्हणाले कीअन्नवस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देण्याचे चांगले काम यंत्रणेतील अधिकारीकर्मचारी यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गंभीरतेने या कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे. घरांचे बांधकाम दर्जेदार करावे. केवळ घरकूलच नाहीतर अन्य योजनांचा लाभसुद्धा घरकुल लाभार्थ्याला देण्यात यावा. स्वच्छतेचा संस्कार हा शालेय जीवनापासूनच रुजायला पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेने 10 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र स्वच्छतेच्या बाबतीत अधिक काम करावे लागणार आहे.

             प्रास्ताविकात प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले कीमहाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटुंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेलीमंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  महाआवास अभियानाबाबत सादरीकरण राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान अभियान पुस्तिकामागील वर्षाची अभियान गौरव गाथा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अभियानाच्या माहिती पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुल मंजुरीपत्र देण्यात आले.

            कार्यक्रमाला विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीउपायुक्त (विकास)ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकगटविकास अधिकारी,  विभागीय प्रोग्रॅमरडाटा एन्ट्री ऑपरेटरग्रामपंचायत सरपंचग्रामसेवक आदी उपस्थित होते.

सन 2021-22 चे महाआवास अभियान पुरस्कार

            विभाग : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम नागपूरद्वितीय नाशिकतृतीय पुणेराज्यपुरस्कृत योजनेत कोकण प्रथमनागपूर द्वितीयपुणे विभागाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हे :  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भंडाराद्वितीय जळगाव व तृतीय गोंदिया हे जिल्हे असून राज्य पुरस्कृत योजनेत सिंधुदुर्ग प्रथमभंडारा द्वितीय व गडचिरोली तृतीय आहे.

            तालुके : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम कुडाळ, जि. सिंधुदुर्गसाकोली जि. भंडारा द्वितीय व गगनबावडा जि. कोल्हापूर तृतीय तसेच राज्य पुरस्कृत योजनेत लाखनी, जि. भंडारा प्रथमकुडाळ, जि. सिंधुदुर्ग द्वितीय व कळवण जि. नाशिक तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे.

            ग्रामपंचायत : राज्य पुरस्कृत योजनेत संयुक्त प्रथम क्रमांक लोरे ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग व जिंती ता. पाटण जि. साताराद्वितीय क्रमांक खलंग्री ता. रेणापूर जि. लातूरतृतीय क्रमांक खोलापूर ता. भातकुली जि. अमरावतीकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यामध्ये प्रथम क्रमांक निंबर्गी ता. द. सोलापूर, जि. सोलापूरद्वितीय गोळवण, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग व तृतीय क्रमांक पोहीता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती.

             बहुमजली इमारत या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये ताडगांव ता. मोहाडी, जि. भंडाराद्वितीय लोणी बु., ता. रिसोड जि. वाशीमतृतीय दीपकनगर ता. तुळजापूर जि. धाराशीव तसेच राज्यपुरस्कृत योजनेत प्रथम येरखेडा ता. कामठी, जि. नागपूरद्वितीय नेवपूर, ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर आणि तृतीय क्रमांक गणेशपूर, ता. रिसोड जि. वाशीम या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. 

            सर्वोत्कृष्ट गृहसंकुले या घटकात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये प्रथम भांबुर्डी, ता. माळशिरस, जि. सेालापूरद्वितीय मजरा (रै), ता. वरोरा जि. चंद्रपूरतृतीय बुधला ता. कळमेश्वर जि. नागपूरराज्यपुरस्कृत योजनेत प्रथम रायताळे, ता. जव्हार जि. पालघरद्वितीय मोहकळ, ता. खेड जि. पुणेतृतीय क्रमांक शेंद्रे, ता. जि. सातारा या ग्रामपंचायतीने पटकाविला आहे.

            अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पुरस्कार : राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणमधील राज्य समन्वयक डॉ. संघरत्न सोनवणेवास्तू विशारद परमेश्वर शेलारलेखा सहायक अंकिता राऊळ यांना मिळाला आहे. 

            विभागीय प्रोग्रॅमर पदासाठी मोहेसीन अहमद अयुब अली, जि अमरावतीजिल्हा प्रोग्रॅमर पदासाठी आशिष चकोले, जि. भंडाराविवेक गोहील, जि. जळगांवचंद्रकांत पाटील, जि. कोल्हापूरजिल्हा डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी प्रफुल्ल मडामे, जि. भंडारासुमीत बोरसे, जि. जळगांवराजेंद्र कवडे जि. कोल्हापूरतालुका डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदासाठी सानिका चव्हाण ता. कुडाळ जि. सिंधुदुर्गहर्षल मेंढे ता. साकोली जि. भंडाराउमाकांत पडवळ ता. गगनबावडा जि. कोल्हापूरसतिश पवार ता. पारोळा जि. जळगांवदीपक शिंगणे ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणाकिसन मांजरमकर ता. भोकर जि. नांदेडग्रामीण गृहनिर्माण अभियंता पदासाठी राकेश चलाख ता. आरमोरी जि. गडचिरोलीकरण पाटील ता. चाळीसगाव जि. जळगांवभूषण ठाकरे ता. मालेगांव जि. नाशिकपरिक्षित चव्हाण, ता. जत, जि. सांगलीउमेश श्रीरामे, ता. मुखेड, जि. नांदेडपवन म्हातारमारे, ता. बाळापूर जि. अकोला यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाआवास अभियानातील विविध घटकांसाठी सर्वोत्कृष्ठ जिल्ह्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.

अनुसूचित जाती घटकांच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर -

अनुसूचित जाती घटकांच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर - केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी मुंबई दि. 23 : राज्यात अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना विशेषत: केंद्रपुरस्कृत राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून यापुढेही या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी केले. अनुसूचित जातींसाठी राज्याच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक केंद्रीय राज्यमंत्री श्री. नारायणस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजना, शिष्यवृत्ती योजना, ॲट्रॉसिटी, निवासी शाळा, वसतिगृहे, सफाई कर्मचारी इ. योजनांबाबत राज्यमंत्री नारायणस्वामी यांनी आढावा घेत समाधान व्यक्त केले. राज्यात सामाजिक न्याय विभाग योजना राबविण्यात अग्रेसर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, अनुसूचित जाती समाज घटकांच्या येाजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीस केंद्रीय केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्र सिंग, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाचे उपसचिव सुंदरसिंग, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) कैसर खालीद, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे तसेच महिला व बाल कल्याण, सहकार, सामान्य प्रशासन, दिव्यांग कल्याण विभाग, पोलीस विभाग या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. *****

विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे

 विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर

कर्मचाऱ्यांना नियमित वेतन द्यावे


- इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे


 


            मुंबई, दि. 23 : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत नियमित वेतन अदा करण्यात यावे, असे निर्देश इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी संबंधित विभागाला दिले.


             राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.


             विजाभज अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी शालेय शिक्षण विभागाप्रमाणे करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच आश्रमशाळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दि.१ ते ५ तारखेपर्यंत नियमित अदा करून वित्त आयोगातील फरक देण्यात यावा. तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.


              या बैठकीला आमदार विक्रम काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव कैलास सोळुंखे, उपसंचालक वासुदेव पाटील, लातूरचे उपसंचालक दि. व. राठोड, अमरावतीचे प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे, नाशिकचे प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष बालाजी मुंडे, राज्य सरचिटणीस किशन पुंड, किरण पाटील, सुकुमार जगताप, कुलदीप जवंजाळ आदी उपस्थित होते.


0000

राज्यातील शाळांमध्ये राबविणार "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" उपक्रम

 राज्यातील शाळांमध्ये राबविणार


"महाराष्ट्रातील वाचन चळवळ" उपक्रम


            मुंबई, दि. 23 : राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमातून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी व आनंददायी वाचनातून 'शिक्षणासाठी वाचू शकेल', अशी चळवळ विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था व घटकांच्या सहभागातून निर्माण करण्यात येणार आहे.


             युनिसेफ, प्रथम बुक्स व रीड इंडिया यांच्यासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी पर्यंत च्या प्रत्येक मुलांमध्ये वाचन कौशल्य निर्माण करतानाच वयोगटांनुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे . यातून त्यांच्यावर चांगले संस्कार होतानाच मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग देखील तयार होईल, मुलांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवण होईल.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या उपक्रमास गती देण्यासाठी ब्रँड अँबेसिडर नेमणूक करणे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, मीडिया प्लॅटफॉर्मचा सहभाग घेणे व लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्ध देण्याचे काम केले जाईल. वाचनासाठी खास 15 ते 20 मिनिटे ठेवत शाळांच्या वेळापत्रकात आनंदाचा तास सुरू करण्यात येणार आहे. यासह रीड इंडिया सेलिब्रेशन, ग्रंथोत्सव व पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित कार्यालय जातील .


            शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शाळांना व शासकीय ग्रंथालयांना यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावयाची असून त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.

मेवाडचे महाराणा राजसिंहांच्या (पहिले...१६५३-१६८०)

 क्रूर, जुलमी, परकीय राज्यकर्त्यांच्या वंशावळी आम्हाला शिकवल्या गेल्या, पण पूज्य हाडा चौहान राणीसाहेब; तुमचं नावही आम्हाला ठाऊक नाही हे आमचंच दुर्दैव आहे...

..


मेवाडचे महाराणा राजसिंहांच्या (पहिले...१६५३-१६८०) राजसभेत रुपनगरचा राजपुरोहीत एक पत्र वाचत होता आणि महाराणा एकाग्रतेनं ते ऐकत होते... ..."शिसोदिया कुलभूषण, क्षत्रिय शिरोमणि महाराणा राजसिंह यांनी रूपनगर राजकन्येचा प्रणाम स्विकार करावा! महाराज; मुगल औरंगजेबानं माझ्याकडे विवाहाचा आदेश पाठवलेला आहे. पण तुम्हीच सांगा की पवित्र कुळातील माझ्यासारखी राजकन्या त्या क्रूर, पापी आणि कपटी म्लेंच्छाशी स्वप्नातदेखील विवाह करेल का? एक राजहंसिनी गिधाडासोबत कशी शोभेल? महाराज! आपणच माझ्याशी विवाह करुन औरंगजेबापासून माझं संरक्षण करावं असं निवेदन मी आपल्याला करते आहे. माझा स्विकार करायचा किंवा नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे. माझ्या रक्षणाची जबाबदारी मात्र आता आपलीच आहे आणि जर आपण माझ्या रक्षणासाठी आला नाहीत तर आत्महत्या करण्याखेरीज माझ्याकडे कोणताच पर्याय नसेल..."


पत्रवाचन पूर्ण होताच राजसभेत उपस्थित सर्वच राजपूत सरदारांच्या तलवारी खणखणत म्यानातून बाहेर पडल्या...


महाराज राजसिंहांचं आता वय झालेलं असल्यानं राजकुमारीचं निवेदन स्विकारणं त्यांना अशक्य होतं. पण प्रत्येक दुबळ्याची पीडा म्हणजे स्वतःची पीडा समजत असलेल्या राजपूत वीरांची ती सभा होती...प्रतिष्ठेसाठी जौहर करणार्‍या मायबहिणींच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि स्वतःचं मस्तकही चढवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या क्षत्रियांची ती सभा होती. असं असताना एका क्षत्रिय बालिकेचं ते समर्पणपूर्ण रक्षणार्थ निवेदन अस्विकार करणंही अशक्यच होतं.


राजसभेत उपस्थित सर्वच वीरांनी एकत्र स्वरात म्हटलं, "महाराज, राजकुमारीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करावंच लगेल, अन्यथा ही राजसभा अपराधीपणानं एका भित्र्यासारखी मान खाली घालून बसेल. आपण सर्वजण लगेचच रूपनगरच्या दिशेनं कूच करुयात!" आणि अश्याप्रकारे महाराणा राजसिंह आपल्या सैन्यासह रूपनगरच्या राजकन्येच्या रक्षणासाठी निघाले.


या युद्धात आपल्या सहाय्यासाठी येण्याचा संदेश महाराणा राजसिंहांनी सलूंबरचे सरदार रतनसिंह चुंडावत यांनाही पाठवला. त्यावेळी रतनसिंह आपल्या घरात आपले कुटूंबिय आणि नवविवाहित पत्नीसोबत विवाहानंतर हिंदू प्रथेनुसार पार पाडल्या जात असलेल्या काही धार्मिक विधींमधे व्यस्त होते. त्यांचा विवाह नुकताच झालेला होता. रतनसिंहांनी जेंव्हा महाराणा राजसिंहांचा संदेश वाचला तेंव्हा ते गप्प गप्प झाले, कारण औरंगजेबाशी युद्ध याचाच अर्थ स्वतःची आहुती देणं आहे याची त्यांना जाणीव होती. सरदार रतनसिंहांना दृष्टीसमोर आपल्या नवविवाहित पत्नीचा सुंदर चेहरा दिसू लागला. त्यांची ही नवविवाहित पत्नी बूंदीच्या हाडा चौहान सरदाराची कन्या होती आणि तिच्यावर परमेश्वरानं स्वर्गीय सौंदर्य अक्षरशः उधळलेलं होतं.


रतनसिंहांनी धार्मिक विधी काही काळ थांबवण्याची विनंती केली आणि एकांकात जाऊन आपल्या नवपरिणित पत्नीला महाराणा राजसिंहांचा संदेश सांगितला. तो संदेश ऐकून दैवी सौंदर्यवती असलेल्या त्या सोळा वर्षाच्या राणीच्या चेहर्‍यावर अपार तेज झळकू लागलं आणि ती अभिमानानं रतनसिंहांना म्हणाली, "एक क्षत्राणी जेंव्हा आपल्या पतीच्या माथ्यावर तिलक लाऊन त्याला युद्धभूमीवर जाण्यासाठी हसत हसत निरोप देते; त्याहून सौभाग्याचा दिवस तिच्या आयुष्यात इतर कोणताही नसतो. मी एवढी भाग्यवान आहे की आपल्या विवाहाच्या एकाच आठवड्यानंतर मला ही महान संधी लाभते आहे. आपण लगेचच निघण्याची तयारी करावी. मी तुमच्या विजयासाठी आणि तुम्ही सुखरुप परत यावे यासाठी प्रार्थना करत तुमची वाट पाहेन."


त्या सोळा वर्षाच्या वीरांगनेने पती रतनसिंहांना भावनेपेक्षा कर्तव्य अधिक श्रेष्ठ असल्याची जाणीव करून दिल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी राणीनं रतनसिंहांच्या माथ्यावर तिलक लावला. पत्नीला आलिंगन देऊन ते आपल्या सैन्यतुकडीसह महाराणा राजसिंहांना युद्धभूमीवर मदत करण्यासाठी निघून गेले.


तिसर्‍या दिवशी रतनसिंहांनी एका विश्वासू दूताद्वारे आपल्या नवपरिणित राणीला पत्र पाठवलं, "युद्धाची पूर्ण तयारी झालेली आहे. आमच्या तलवारी मुघलांच्या सैनिकांचं रक्त पिण्यास आतूर आहेत. हे युद्ध भयंकरच होईल. मी परत येईन किंवा नाही हे नियतीलाच ठाऊक आहे. पण तुझा सुंदर चेहरा माझ्या दृष्टीपुढून हटण्यासच तयार नाहीये. एक मनातलं सांगतो...मी तुझ्याएवढं प्रेम कधीही कोणावर केलं नाही आणि यापुढेही करु शकणार नाही. तुझं स्मरण मला सदैव रहावं यासाठी तुझी एखादी निशाणी या पत्रदूतासोबत पाठव!"


पत्र वाचून ती कोवळ्या वयाची हाडा राणी गंभीर झाली. तिने सरदार रतनसिंहांना एक पत्र लिहीलं आणि पत्रवाहकाला बोलावून घेतलं. पत्रवाहकाने जेंव्हा राणीच्या चेहऱ्याकडे पाहीलं तेंव्हा तो भयानं थरथर कापू लागला. जणूकाही शरीरातील सगळं रक्त राणीच्या मुखावर जमा झालं होतं, तिचे मोकळे केस हवेमधे असे उडत होते की जणू काही एखादं तुफान वादळ चालू आहे. केवळ सोळा वर्षांच्या त्या कोवळ्या राणीच्या ऐवजी साक्षात् दुर्गा प्रकटल्याचा भास होत होता.


राणीनं गंभीर स्वरात पत्रवाहकाला विचारलं, "भैया, माझं एक महत्वाचं काम करशील का? माझं हे पत्र आणि एक वस्तू माझे पती सरदार रतनसिंहांपर्यंत घेऊन जा!"


आपोआप हात जोडले जाऊन पत्रवाहक म्हणाला, "ताई, आदेश दे!"


तेवढ्यात राणी एका झटक्यात पुढे सरसावली आणि पत्रवाहकाच्या कंबरेची तलवार तिने खेचून घेतली. काय होतंय हे कळण्याच्या आतच तिने ती तलवार सर्रकन् स्वतःच्या मानेवरुन सफाईने चालवली आणि एका क्षणातच हाडा राणीचं मस्तक धडावेगळं झालं. पत्रवाहक भयानं ओरडला.


दुसर्‍या दिवशी पत्रवाहक युद्धभूमीवर रतनसिंहांकडे आला आणि त्याने रतनसिंहांना हाडा राणीची पेटी दिली. आत काय आहे, हे ठाऊक नसल्यानं रतनसिंहांनी मोठ्या आनंदानं ती लाकडी पेटी उघडली. पण पेटी उघडताच आत आपल्या प्राणप्रिय पत्नीचं मस्तक पाहून ते दुःखातिशयानं ओरडले. रतनसिंहांनी राणीनं दिलेलं पत्र उघडलं...त्यात लिहिलेलं होतं...


"सरदार रतनसिंहांच्या चरणी त्यांच्या राणीचा प्रणाम! मी तुमची प्रेयसी नाही तर पत्नी आहे. पवित्र अग्नीला साक्षी ठेऊन आपण सात प्रदक्षिणा घेतल्यामुळे तुमचं-माझं नातं केवळ याच जन्मासाठी नाही तर पुढच्या सात जन्मांसाठी आहे. माझ्याविषयी असलेल्या चिंतेमुळे तुमच्या कर्तव्यात कोणतीही त्रूट राहू नये यासाठी मी स्वतःच तुमच्यापासून दूर जात आहे. स्वर्गामधे मी तुमची वाट पाहेन! रूपनगरच्या राजकुमारीच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते पार पाडूनच आपण स्वर्गामधे पुन्हा भेटू! सरदार, एक सांगते...मीही तुमच्यावर अलोट प्रेम केलंय...कदाचित् स्वतःहूनही अधिक...!"


पत्र वाचत असताना रतनसिंहांच्या डोळ्यातून अखंडपणे अश्रू वहात होते...पाण्याबाहेर काढलेल्या एखाद्या मास्याप्रमाणे ते तडफडले. पण त्यांना अचानक काय झालं कोणास ठाऊक...! ते हसू लागले...दुःखानं खाली झुकलेलं त्यांचं मस्तक गर्वानं ताठ झालं, छाती फुलून आली. 


त्यानंतर औरंगजेबासोबत जे युद्ध झालं त्यात रतनसिंहांच्या तळपत्या तलवारीचा भीमपराक्रम पहाण्यास जणू काही काळही येऊन उपस्थित होता. तीन दिवस चाललेल्या त्या युद्धात राजपूतांनी औरंगजेबाच्या सैन्याला हरवलं. आपल्या प्राणप्रिय राणीचं गतप्राण मस्तक एखाद्या अमुल्य रत्नाप्रमाणे गळ्यात बांधून नरवीर  रतनसिंह अखेरच्या श्वासापर्यंत लढले आणि त्यांच्या तलवारीनं शत्रू सैन्याचं सर्वाधिक रक्त प्राशन केलेलं होतं. जेंव्हा जेंव्हा शत्रूचं शस्त्र सरदार रतनसिंहांच्या शरीराला स्पर्श करत असे, तेंव्हा तेंव्हा ते हसू लागत. एखाद्या सिंहासारखा अतुलनीय पराक्रम गाजवत असताना त्यांच्या शरीराचा एक एक अवयव कापला जात होता. अखेरीस सरदार रतनसिंह युद्धभूमीवरच अमर झाले...कर्तव्यपूर्ती करतच आपल्या प्राणप्रिय पत्नीच्या भेटीसाठी त्यांनी स्वर्गारोहण केलं. इकडे रूपनगरच्या राजकुमारीनं अखंड प्रतिष्ठेसह मेवाडच्या महाराणा राजसिंहांची धाकटी राणी होऊन उदयपुरमधे प्रवेश केला.


आपला देश एवढा सौभाग्यशाली आहे की या मातीमधे हाडा राणीसारख्या वीरांगना जन्मास आल्या...परंतु एका अर्थानं आपला देश असा अभागीही आहे की असीम त्याग केलेल्या त्या सोळा वर्षाच्या राणीचं मूळ नावही आपल्याला ठाऊक नाही...


पण मला एक गोष्ट निश्चितच ठाऊक आहे...आपला देश हाडा चौहान सरदाराच्या त्या सोळा वर्षांच्या कन्येचा अर्थात् सरदार रतनसिंहांच्या पत्नीच्या 'न भूतो न भविष्यती' त्यागाबद्दल सदैव ऋणी आहे...


(समीर अनिल थिटे)

Featured post

Lakshvedhi