Monday, 20 November 2023

पाहुणा बंगल्यात आलाय ग, बघून जीव घाबरला ग

 बिबट्या वाघाला बेडरूम मधुन पकडले पहा नाशिक मधे डॉक्टर अहिरे यांच्या घरात -- स्वःता जॉगिंगला गेले होते आणि दरवाजा उघडा राहीला आणि एक पाहूणा थेट बेड रूम मधे वॉर्डरोब वरती


गरिबी म्हणजे काय ❓*

 *🌺अत्त दिप भव 🌺*                --------------------

*गरिबी म्हणजे काय ❓*              

*माणूस ज्या कुटुंबांत जन्म घेतो त्या कुटुंबाप्रमाणे त्याला जात धर्म,आर्थिक परिस्थिति राहणीमान,वातावरण प्राप्त होत असतं.जसा तो मोठा होत जातो तसा जीवनाचा अर्थ समजु लागतो गरिब कुटुंबांत जन्म झाला म्हणून तो गरिबच राहिल असे नाही गरिब म्हणजे आर्थिक परिस्थिति कमकुवत.पण शिक्षण,कष्ट,जिज्ञासा, हिम्मत,साहस,कर्तव्य  जबाबदारी स्विकारुन गरिबीवर मात करता येते  आपले जे क्षेत्र असेल त्यात लक्षपूर्वक मेहनत करुन आर्थिक परिस्थिति सुधारु शकते.फक्त मनात निश्चय पाहिजे. काही न करता नशिबावर अवलंबुन राहता कामा नये नशिबाला दोष देण्यापेक्षा योग्यवेळी कर्म करायला पाहिजे अन्यथा गरिबी माजेल.दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे बघून जळण्यापेक्षा स्वत:ची काया झिजवली तरच मंजिल प्राप्त होईल.गरिब असावे पण लाचार होऊन जीवन जगू नये स्वावलंबी,स्वच्छ,टापटिप जीवन जगले तरच समाजात सन्मानाने राहता येईल अन्यथा जनावरात आणि माणसांत काहीच फरक राहणार नाही म्हणून स्वतः आपलं आयुष्य घडवायचे सजवायचे मस्त आनंदी जीवन जगायचं.✒️*            --------------------

*🌺सुंदर दिवसाच्या               मंगलमय  शुभेच्छा 🌺*

टिफीन बॉक्स वापरत असाल तर सावधान. स्वहताही बघा व बाकीच्याना ही पाठवा,हि विंनती


 तुम्ही पण तुमच्या मुलांना शाळेत जातांना डबा द्यायला किंवा स्वतः कामावर जेवण न्यायला  अश्या प्रकारचे टिफीन बॉक्स वापरत असाल तर सावधान. स्वहताही बघा व बाकीच्याना ही पाठवा,हि विंनती

आनंवनभुवनी


 

मी स्वप्नील मेहेंदळे, कर्णबधिर आर्टिस्ट ,





 नमस्कार...

मी स्वप्नील मेहेंदळे. .मी स्वतः कर्णबधिर असून मला ऐकू बोलता येत नाही..

मी कर्वेनगर पुणे येथे राहतो..

मी आर्टिस्ट असून वॉल पेंट, कॅनवस पेंट करतो..

तुम्हाला तुमच्या घरातल्या वॉलवर किंवा गॅलरीत भिंतीवर चित्र काढायचे असतील तर मला नक्की ऑर्डर द्या..

मी वारली आर्ट, आफ्रिकन आर्ट, ट्रायबल आर्ट इतर चित्रे छानपैकी काढतो..

सोबत फोटो जोडलेले आहे हे सर्व मी काढलेले आहे..

तुमच्या customized आर्ट पण काढून देतो.. 


वॉल पेंट 

सिंगल कलर 

1 स्क्वेअर फूट :- 200/- 


कलरफुल कलर

1 स्क्वेअर फूट :- 300/-

(वारली सुद्धा colorful मध्ये करून मिळतील) 


कॅनवस पेंट

कॅनवस बोर्ड + पेंट + फ्रेम सहित चार्जेस घेतो

साईज नुसAर वेगवेगळे किंमत आहे.. 


ऑर्डर साठी मला फक्त व्हाट्सप्पवर  मेसेज करा 

(ऐकू बोलता येत नसल्याने कृपया कॉल करू नका ही विनंती)

माझा व्हाट्सप्प नंबर :- स्वप्निल मेहेंदळे 8329884779

Sunday, 19 November 2023

भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त

 भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी

स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उपयुक्त ठरेल

                                                                                                                   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

ठाणेदि.19(जिमाका) :- आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा आहे. देशाची शान असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारे स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमीपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या "महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास" या योजनेंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंडवर्तकनगरठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) उभारण्याच्या कामाचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका संगीतकार श्रीमती उषा मंगेशकरआमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न झालात्यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्रीमती मीना खडीकरज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकरठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगरजिल्हाधिकारी अशोक शिनगारेअतिरिक्त आयुक्त संदीप माळवीप्रशांत रोडेठाणे महापालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशीराजू मिश्रानगर अभियंता प्रशांत सोनाग्रापूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीसर्व युगांप्रमाणे "लता युग" हे अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज पं. राम मराठेपी.सावळारामश्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) गायन-संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. या वाटचालीत शासन मंगेशकर कुटुंबियांच्या कायम सोबत असेल.

ठाण्यातील इतर विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. ठाण्याचा सर्वांगीण विकास होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभिकरणस्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरु केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू असून 50 कोटी रूपये निधी दिला आहे. “वापरा आणि फेका” ही आपली संस्कृती नाहीजुना अनमोल ठेवा जपायला हवात्याचे संवर्धन करायला हवे. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होतेमी त्यांच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, त्यांच्या विचारधारेवरच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहे.

ग्लोबल वार्मिंग या जागतिक समस्येवर  मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून “अर्बन फॉरेस्ट” ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहेअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीनेझोकून देऊन काम करणे आवश्यक आहेयाची पूर्ण जाणीव असल्यानेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या साथीने सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प सुरू करण्यात आले असून नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहेशेवटपर्यंत त्यांच्या हितासाठीच काम केले जाईलअशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

            याप्रसंगी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना विशेष भेट दिली. मनोगत व्यक्त करताना म्हणाल्याठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व.लता मंगेशकर संगीत विद्यालय (गुरुकुल) ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे व आसपासच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वच वयोगटातील गायन-संगीतप्रेमींनी घ्यावा. हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

            श्री. सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील सुरु असलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. या विकासकामांसाठी भरघोस निधी देवून सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आभार मानले.

            त्यापूर्वीपोखरण रोड नं. 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 3.75 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यातअमृत 2.0 योजनेंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगरघोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभखर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजीटल बोर्ड उभारणी (मूल्य 20 कोटी)ओवळा-माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण (मूल्य 50 कोटी)मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फूटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे (मूल्य 25 कोटी) या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात झाला.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

00000000000000

                                     


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इंदिरा गांधी जयंती पर किया अभिवादन एकता दिवस की दिलाई शपथ मुंबई,

 Chief Minister Eknath Shinde Commemorates Indira Gandhi's Birth Anniversary and National Unity Day

          Mumbai, November 19: Today, Chief Minister Eknath Shinde honored the birth anniversary of former Prime Minister Indira Gandhi by paying floral tributes at his official residence, Varsha.

          The Chief Minister also led the administration of the pledge for National Unity Day, commemorating this significant occasion.

                                                  000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इंदिरा गांधी जयंती पर किया अभिवादन

 एकता दिवस की दिलाई शपथ

          मुंबई


नवंबर १९:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने आज पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी को उनकी जयंती पर श्रद्धांजलि अर्पित की. उन्होंने इसी दिन मनाए जाने वाले राष्ट्रीय एकता दिवस की शपथ भी दिलाई.

          मुख्यमंत्री श्री शिंदे ने अपने अधिकृत आवास वर्षा पर दिवंगत पूर्व प्रधानमंत्री गांधी   को पुष्पांजलि अर्पित की. इस समय उन्होंने वहां पर उपस्थित लोगों को राष्ट्रीय एकता दिवस  की शपथ भी दिलाईइंदिरा गांधी की जयंती को राष्ट्रीय एकता दिवस मनाया जाता है.

000

Featured post

Lakshvedhi