*🌺अत्त दिप भव 🌺* --------------------
*गरिबी म्हणजे काय ❓*
*माणूस ज्या कुटुंबांत जन्म घेतो त्या कुटुंबाप्रमाणे त्याला जात धर्म,आर्थिक परिस्थिति राहणीमान,वातावरण प्राप्त होत असतं.जसा तो मोठा होत जातो तसा जीवनाचा अर्थ समजु लागतो गरिब कुटुंबांत जन्म झाला म्हणून तो गरिबच राहिल असे नाही गरिब म्हणजे आर्थिक परिस्थिति कमकुवत.पण शिक्षण,कष्ट,जिज्ञासा, हिम्मत,साहस,कर्तव्य जबाबदारी स्विकारुन गरिबीवर मात करता येते आपले जे क्षेत्र असेल त्यात लक्षपूर्वक मेहनत करुन आर्थिक परिस्थिति सुधारु शकते.फक्त मनात निश्चय पाहिजे. काही न करता नशिबावर अवलंबुन राहता कामा नये नशिबाला दोष देण्यापेक्षा योग्यवेळी कर्म करायला पाहिजे अन्यथा गरिबी माजेल.दुसऱ्याच्या श्रीमंतीकडे बघून जळण्यापेक्षा स्वत:ची काया झिजवली तरच मंजिल प्राप्त होईल.गरिब असावे पण लाचार होऊन जीवन जगू नये स्वावलंबी,स्वच्छ,टापटिप जीवन जगले तरच समाजात सन्मानाने राहता येईल अन्यथा जनावरात आणि माणसांत काहीच फरक राहणार नाही म्हणून स्वतः आपलं आयुष्य घडवायचे सजवायचे मस्त आनंदी जीवन जगायचं.✒️* --------------------
*🌺सुंदर दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🌺*
No comments:
Post a Comment