Tuesday, 7 November 2023

भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन

 





भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन


       मुंबई दि. ७ :  भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.

            उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,  कौशल्य विकास व पर्यटन  मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजे वांगचुक यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.             यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय टूथब्रश दिवस’ निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

 राष्ट्रीय टूथब्रश दिवस निमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते

मौखिक आरोग्य जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन

 

          मुंबईदि.७ : स्वच्छ मुख आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय टूथब्रश दिवस- ०७ नोव्हेंबर रोजी जनमानसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन आज करण्यात आले.

            राष्ट्रीय टूथब्रश दिवसाचे औचित्य साधून स्वच्छ मुख अभियानांतर्गत संचालनालयवैद्यकीय शिक्षण व संचालनालयमुंबई व शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयमुंबईतर्फे तयार केलेल्या जनजागृतीपर पत्रिकेचे प्रकाशन मंत्रालयात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

            राष्ट्रीय टूथब्रश दिवस जनमाणसांमध्ये मौखिक आरोग्यविषयक जनजागृती तसेच दिवसांतून दोन वेळा टूथ ब्रशिंगविषयी जागरुकता व्हावीया उद्देशाने साजरा केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दातांच्या किडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या वयातच लहान मुलांना टूथब्रशिंगविषयी जागरुकता व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जनजागृतीसाठी विविध दंत महाविद्यालयेसामाजिक संस्था हिरिरीने पुढाकार घेऊन पोस्टर्सबॅनर्सरॅलीपथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करतात.

            यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते पर्यावरणपूरक दंत ब्रश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसहसंचालक (वैद्य) अजय चंदनवालेडॉ. पाखमोडे (दंत),अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड, डॉ. संध्या चव्हाणडॉ. राजेश गायकवाडडॉ. सूर्यकांत पोवार, आशिष जळमकर यांची उपस्थिती होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेआयुक्त राजीव द. निवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

0000

मंत्रालयात दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे







 मंत्रालयात दिवाळी फराळ व सजावट साहित्याच्या स्टॉलचे

मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 

       मुंबई, दि.७ : महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळीसाठीचे सजावट साहित्य, फराळ, सेंद्रिय शेतमाल उत्पादनाच्या साहित्यांच्या विविध स्टॉलचे मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले.

            महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सहकार्य करण्यासाठी राज्य शासन महिला बचत गटांना प्रोत्साहन देत असल्याचे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले. कु. तटकरे यांनी यावेळी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला आणि महिलांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

            मंत्रालय त्रिमुर्ती प्रांगणात दिवाळी  निमित्त महिला व बालविकास विभागातंर्गत  ६ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील विविध महिला बचतगटांमार्फत बनविण्यात आलेल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक इंदू जाखड उपस्थित होत्या.

 

            क्षितीज सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा दिवाळी फराळस्वाभिमान प्रोजेक्ट सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा दिवाळी सजावट साहित्यदीपिका गृह उद्योगठाणे जिल्ह्याचा रुरल मार्ट, तनिष्का सीएमआरसी मुंबई जिल्ह्याचा लोकरीच्या हस्तकला तोरणलेदर वर्क आणि बुक, घे भरारी सीएमआरसीमुंबई जिल्ह्याचा ज्वेलरी आणि दिवाळी फराळउन्नती बचत गटमुंबई जिल्ह्याचा चॉकलेट आणि पणत्यानवतेजस्विनी कला दालनपुणे जिल्ह्याचा ज्यूट प्रोडक्ट,  संकल्प आणि खुशिया सीएमआरसीचंद्रपूर जिल्ह्याचे कार्पेट व बांबू आर्ट, चेतना सीएमआरसी आणि राणीकाजल सीएमआरसी, नंदुरबार जिल्ह्याचे मिलेटधूपबत्ती उत्पादनेओवी शेतकरी उत्पादक कंपनीजालना जिल्ह्याचे सेंद्रिय शेतमाल उत्पादने प्रदर्शन व विक्रीसाठी मंत्रालयात उपलब्ध आहेत.

सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद

 सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानाची गिनीज बुकमध्ये नोंद

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. ६ : देशासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या वीरांना श्रध्दांजली अपर्ण करण्याच्या उद्देशाने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देशमिटटी को नमनवीरो को वंदन हे अभियान जाहीर केले होते. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून "सेल्फी विथ मेरी माटी अभियान राबविले. या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विश्वविक्रम अभियान  प्रमाणपत्र वितरण सोहळा पूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीप्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेशस्वधर्म आणि स्वाभिमान असलाच पाहिजे. बलिदानाचे स्मरण करुन नव्हे तर त्यांची निष्ठा तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजेयाच उद्देशाने गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सेल्फी विथ मेरी माटी राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालयेउच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीपालक व इतर सर्व संबंधितांनी हे अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे. ही अभिमानाची बाब आहे.

            या उपक्रमाचा  प्रमाणपत्र वितरण सोहळा राज्य संपर्क कार्यालय राष्ट्रीय सेवा योजनाउच्च व तंत्र शिक्षण विभागमहाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१.०० वाजता सर कावसजी जहांगीर दिक्षांत सभागृह येथे होणार आहे.

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

 मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. ६ : रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठासाठी विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजूर करून पुढील वर्षीच्या जूनपासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईलअसे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणवस्त्रोद्योगसंसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            रिद्धपूर (जि.अमरावती) येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मंत्री श्री. पाटील यांच्या दालनात मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेसदस्य प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगेडॉ. रमेश वरखेडेडॉ. अविनाश आवलगावकरश्री. कारंजेकरउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर आदी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावेअशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे. हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे ऐतिहासिक काम मार्गी लावल्याबद्दल त्यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले. तसेच या मसुदा समितीचे रूपांतर मराठी भाषा विद्यापीठाच्या सल्लागार समितीत करावे.

            मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समितीचे यापुढेही सहकार्य राहीलअसा विश्वास व्यक्त करीत मंत्री श्री. पाटील म्हणाले कीऋद्धिपूर येथे लीळा चरित्र लिहिण्याबरोबरच मराठी भाषेतील ग्रंथ निर्मितीचे केंद्रही राहिले आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होईलअसेही त्यांनी सांगितले.

            मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखाशिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृतीपरंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईलअसे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

जंगल का राजा कहा जाने वाला शेर शिकार के

 जंगल का राजा कहा जाने वाला शेर शिकार के लिए किए गए अपने 75% आक्रमणों में असफल हो जाता है। मतलब वह सौ में 75 बार फेल होता है। अब आप इससे अपने जीवन की तुलना कीजिये, क्या हम 75% असफलता झेल पाते हैं ? नहीं ! इतनी असफलता तो मनुष्य को अवसाद में धकेल देती है। पर शेर अवसाद में नहीं जाता है। वह 25% मार्क्स के साथ ही जंगल का राजा है।


इसी घटना को दूसरे एंगल से देखिये ! शेर अपने 75% आक्रमणों में असफल हो जाता है, इसका सीधा अर्थ है कि हिरण 75% हमलों में खुद को बचा ले जाते हैं। जंगल का सबसे मासूम पशु शेर जैसे बर्बर और प्रबल शत्रु को बार बार पराजित करता है और तभी लाखों वर्षों से जी रहा है। उसका शत्रु केवल शेर ही नहीं है, बल्कि बाघ, चीता, तेंदुआ आदि पशुओं के अलावा मनुष्य भी उसका शत्रु है और सब उसे मारना ही चाहते हैं। फिर भी वह बना हुआ है। कैसे ?


वह जी रहा है, क्योंकि वह जीना चाहता है। हिरणों का झुंड रोज ही अपने सामने अपने कुछ साथियों को मार दिए जाते देखते हैं, पर हार नहीं मानते। वे दुख भरी कविताएं नहीं लिखते, हिरनवाद का रोना नहीं रोते। वे अवसाद में नहीं जाते, पर लड़ना नहीं छोड़ते। उन्हें पूरे जीवन में एक क्षण के लिए भी मनुष्य की तरह चादर तान कर सोने का सौभाग्य नहीं मिलता, बल्कि वे हर क्षण मृत्यु से संघर्ष करते हैं। यह संघर्ष ही उनकी रक्षा कर रहा है।


जंगल में स्वतंत्र जी रहे हर पशु का जीवन आज के मनुष्य से हजार गुना कठिन और संघर्षपूर्ण है। मनुष्य के सामने बस अधिक पैसा कमाने का संघर्ष है, पर शेष जातियां जीवित रहने का संघर्ष करती हैं। फिर भी वे मस्त जी रहे होते हैं, और हममें से अधिकांश अपनी स्थिति से असंतुष्ट हो कर रो रहे हैं।


मनुष्य को अभी पशुओं से बहुत कुछ सीखने की आवश्यकता है।।

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ ची ९.३७ टक्के दराने परतफेड

 

            मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३७ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज,२०२३ ची परतफेड ४ डिसेंबर २०२३ रोजी आहे. वित्त विभागाच्या अधिसूचना क्र.एलएनएफ-१०.१३/प्र.क्र.३४/अर्थोपाय २९ नोव्हेंबर२०१३ अनुसार ९.३७ टक्के दराने महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२३ अदत्त शिल्लक रकमेची ३ डिसेंबर२०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह ४ डिसेंबर२०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाच्या शैला ए. सचिव (वित्तीय सुधारणा) यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

             "परक्राम्य संलेख अधिनियम१८८१" अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान: कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी असेल. या कर्जावर ४ डिसेंबर२०२३ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धीपत्रात नमूद आहे.

            सरकारी प्रतिभूती विनियम२००७ च्या उप-विनियम २४(२) व २४ (३) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्याच्या दुय्यम बँकाकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडेत्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

             तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावेयासाठी९.३७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज२०२३ च्या धारकांनीलोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस  "प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे      यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेतयाची विशेष नोंद घ्यावी.

             रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांनारक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

Featured post

Lakshvedhi