Sunday, 29 October 2023

मॉडर्न कोजागिरी*🔻

 🌝✨🔺 *मॉडर्न कोजागिरी*🔻💫🌕


*पाश्चराईज्ड* दुधामध्ये🍼 *एक्स्पोर्टचा* बदाम🍲 किसला

*कार्बनच्या* काळ्या ढगांआडून चंद्र🌜 *आर्टिफिशियलपणे* हसला,


दूध🍼 आटवायच्या मिनीटाला *गॅसचं लिमिट*🔥 आठवलं

*प्रोपेन-ब्युटेनच्या*🌪 महाग कॉम्बिनेशनने *लॅक्टोजलाही*🍚 बाटवलं,


पुरणपोळीसाठी 🌮आता *मेटॅनिल यलोची* डाळ

*पिवळ्याधम्मक* कच्च्या केळ्यांचा🍌 हा *मॅग्नेशिअमयुक्त* काळ,


*ग्लुकोजवाल्यांच्या* जिभेवरती😋 *शुगर फ्री* चे स्विट

*ब्लडप्रेशरच्या*💉 नाकावर टिच्चून *अजिनोमोटोचे* मीठ,🎎


*फॅक्टरीतले प्रोडक्टस्*🏭 अन् 🌿 *नॅचरल-हर्बल*🍃 नाव

*केमिकल्सच्या* ⚗डुप्लिकेट पदार्थांना *ओरीजिनलचा*💰 भाव,


*चायनाच्या*🇹🇷 युगातसुद्धा *इंडियन*🇮🇳 सत्वाची नांदी व्हावी

*कोजागिरीच्या* 🌕सिल्व्हर डिस्प्लेने तुम्हा सर्वांची *चांदी*🍽 व्हावी.

😜😜😜😜😜😜😜 कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा नियती इंटरप्राईजेस

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे

 मुंबई शहर जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे

- जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबईदि. 27 : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास 9 डिसेंबर 2023 पर्यंत त्या नोंदवाव्यातअसे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. 

            मतदान केंद्र आणि प्रारुप मतदार यादीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य निवडणूक अधिकारी रवींद्र राजपूततहसीलदार अर्चना मुळेविविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

            मतदार यादीबाबत माहिती देताना श्री.क्षीरसागर म्हणाले कीदि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने मुंबई शहर जिल्ह्यातीत 10 विधानसभा मतदारसंघातील एकूण 2509 मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मतदान केंद्रांची यादी तसेच प्रारुप मतदार यादी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदार संघ कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी या मतदार यादीचे अवलोकन करून दावे व हरकती असल्यास विहीत अर्ज नमुना क्रमांक सहासात व आठ भरून दि. 9 डिसेंबर 2023 पर्यंत संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये नोंदवाव्यात.

            या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 24 लाख 50 हजार 355 एवढी आहे. यामध्ये 8920 इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. तर दुबारमृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित अशा 6107 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या 13 लाख 27 हजार 131 तर स्त्री मतदार संख्या 11 लाख 23 हजार 18 इतकी आहे. ऑक्टोबर 2023 मधील यादीमध्ये एक हजार पुरूषांच्या मागे 846 स्त्रिया असून तृतीयपंथी समुदायाची ऑक्टोबर 2023 मधील संख्या 206 इतकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बूथ लेवल ऑफिसर (बीएलओ) यांनी घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत केली आहे. याद्वारे सुमारे 98 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

            लोकसंख्येच्या प्रमाणात 18 ते 19 वर्षे वयोगटाच्या तरुणांचे प्रमाण सुमारे तीन टक्के आहे. तथापि, मतदार यादीतील त्यांचे प्रमाणे अर्धा टक्के आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 'उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा'चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणान्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. महिला मतदारांचे प्रमाण वाढणे देखील आवश्यक असून यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.

            सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत यावीत यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापिमतदारांनी प्रारुप यादी तपासून त्यात नाव असल्याची खात्री करून सहकार्य करावेअसे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

मुद्रित अंक 48 तासात पाठवा याचा पुनर्विचार करावा

 मुद्रित अंक 48 तासात पाठवा याचा पुनर्विचार करावा


खा. श्रीनिवास पाटील यांचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र

कराड  : मुद्रीत अंक प्रकाशित झालेनंतर 48 तासात अंक RNI आणि PIB कार्यालयात पाठवने बंधनकारक हा निर्णय मागे घ्यावा, पुनर्विचार करावा किंवा दुरुस्ती करावी अशा आशियाचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांना असोसिएशन स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष गोरख तावरे, सातारा जिल्हाध्यक्ष खंडू इंगळे, सचिव संतोष शिंदे यांनी दिले.

दरम्यान खा. श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन  सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना लेखी पत्र लिहून सदर प्रश्नाबाबत सकारात्मक विचार करून सातारा जिल्ह्यातील पत्रकार व प्रकाशकांनी केलेल्या मागणीचा विचार करून निर्णय घ्यावा असे सुचित केले आहे.

तसेच मुद्रित माध्यमातील अंक प्रकाशित झालेनंतर 48 तासात अंक RNI आणि PIB कार्यालयात पाठवने बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास 2000 प्रमाणे दंड आणि सातत्याने अंक प्रकाशित न केल्यास अंकाची मान्यता रद्द केली जाणार आहे. मुद्रित मीडियावर  हा अन्याय आहे. कारण दिलेल्या मुदतीत महाराष्ट्रातील कोणत्याही शहरातील, महानगरातील प्रकाशकाला अंक पाठवणे शक्य होणार नाही. याचा पुनर्विचार करून ही अट (नियम) रद्द करावी. असे खा. श्रीनिवास पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

RNI कार्यालयाने 25 सप्टेंबर रोजी नवीन आदेश जारी केला आहे. सर्व प्रकाशकांसाठी RNI ने जारी केलेला निर्णय बदलावा अथवा याचा फेरविचार करावा. अशा आशयाची मागणी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.

RNI चे कार्यालय आणि PIB चे कार्यालय हे देशातील आणि राज्यातील प्रत्येक जिल्हा किंवा तालुका स्तरावर नाहीत. विशेषता मुंबईतील RNI चे कार्यालय यापूर्वीच बंद करण्यात आलेले आहे.  RNI  आणि PIB कार्यालय हे प्रकाशकांच्या पासून दूर अंतरावर आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रकाशाकांना गैरसोयीचे व दूर अंतराचे असल्यामुळे सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करणे शक्य नाही‌.  याचा पुनर्विचार केला जावा. नियमच बदलावा, पुनर्विचार करावा किंवा शिथिल करावा. निवेदनात म्हटले आहे.

संदेशवाहकाद्वारे माध्यमातून पाठवले जाणारे मुद्रित अंकाची प्रत वेळेत मिळेलच याची शाश्वती नाही. तसेच मिळालेला अंक संदर्भात RNI आणि PIB कार्यालयाकडून त्याची कोणतीही अधिकृत माहिती लिखित स्वरूपात प्रकाशाकांना कळवली जात नाही. यामुळे अंक मिळाला किंवा नाही. हा संभ्रम कायम राहतो आहे.सदर निर्णयाचा पुनर्विचार करावा. नियम बदलावा, रद्द करावा, निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली असता खा. श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील पत्रकार आणि प्रकाशकांची असणारे अडचण व यासंबंधीने घ्यावयाच्या निर्णयाबाबत पत्र लिहिले आहे.

व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार उद्योगमंत्री उदय सामंत

 व्यापार, उद्योगप्रश्नी लवकरच बैठक घेणार  उद्योगमंत्री उदय सामंत


पुणे : आमचे सरकार शंभर टक्के उद्योजक आणि व्यापारी बंधूसोबत आहे. विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच त्यांची मुंबईत आवश्यक त्या सर्व खात्याचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीतून उद्योग, व्यापाराचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील, कोणताही घटक नाराज होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्रातून कोणताही उद्योग बाहेर गेलेले नाही. ऊलट हजारो कोटींची परदेशी गुंतवणूक उद्योगात आणली. डायमंड ज्वेलरी पार्कसाठी मुंबईतच २५ एकर जागा दिली आहे. केवळ उद्योग क्षेत्राला बदनाम करण्याचा काहींचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याचाही त्यांना टोला लगाविला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड `मायटेक्स एक्स्पो` या भव्य प्रदर्शनाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज भेट देऊन उद्योजकांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रमुख पाहुण्यांचे मायटेक्सचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. शिवाजीनगरातील सिंचन भवन येथील मैदानावर २९ ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन असून दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत अशी वेळ आहे.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत आहे. महाराष्ट्र चेंबर करत असलेल्या अविरत प्रयत्नामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे. महसूल वाढीचा टक्काही वाढल्याने राज्यात उदयोग, व्यवसायांना मोठे प्रोत्साहन मिळत आहे. मात्र काही जण राजकारणापेक्षा राज्यांची बदनामी करत आहेत. आमच्या सरकारने उद्योग, व्यवसायासाठी काही तत्काळ निर्णय घेतले आहेत. तत्कालीन सरकारच्या काळात २०२१ मध्ये तत्कालीन उद्योमंत्र्याच्या काळात यवतमाळ येथील जागा मिळविण्यासाठी उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तत्कालीन सरकारच्या कार्यपध्दतीमुळेच अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आमच्या सरकारने कधीही उद्योजकांना अँटीचेंबर आणि नेत्यासोबत बैठकीसाठी प्रवृत्त केले नाही. त्यामुळेच उद्योगांचे अनेक प्रश्न आमच्या सरकारकडून मार्गी लागले आहेत आणि उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील. कोणालाही न भेटता ७५०० हजार कोटी रुपये उद्योजकांच्या खात्यात वर्ग केला आहे. तसेच प्रकल्प उभारताना त्या गावातील स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सेमी कंडक्टरचा प्रकल्प उभारण्यासाठी आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप पुढाकार घेत आहे. त्यांच्या उद्योगालाही पाठबळ दिले जाईल.
विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी उद्योग विस्ताराला चालना देण्यासाठी त्यांची धडपड असते. उद्योग विभागाच्या समस्यांबाबत डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात यावी, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले आहे. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांसोबत परिषद ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये उदयोग क्षेत्रातील यशस्वी महिला त्यांना आलेले अनुभव मांडतील. प्रकल्प जातो तेव्हा त्याची जेवढी प्रसिद्धी होते तेवढी तो प्रकल्प येताना झाल्याचे दिसत नाही. तसेच येत्या ३० आँक्टोबरला व्यापार आणि उद्योजकांच्या प्रश्नावर सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. आँनलाइन व्यापाराच्या आव्हांनाला तोंड देण्यासाठी सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत चर्चा करण्यात येईल.


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना देणे, प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे तत्काळ निर्णय घेणारे मंत्री असल्याने उद्योग क्षेत्राला मोठे चैतन्य आले आहे. व्यापार्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या माध्यमातूनच मायटेक्सची संकल्पना रूजली. व्यापार आणि उद्योगांच्या प्रश्नी सरकार दरबारी संयुक्त बैठक घ्यावी.
दरम्यान उद्योग क्षेत्रातील विविध संघटनांनी मागण्यांचे निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिले. मान्यवरांच्या हस्ते आर्यन ग्रुप आँफ कंपनीचे चेअरमन मनोहर जगताप, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी,  महाराष्ट्र चेंबरचे मायटेक्सचे पुणे विभागाचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता,  महाराष्ट्र चेंबरचे सेक्रेटरी जनरल सागर नागरे, एक्स्पो इंडियाचे जावेद शेख आदींचा सत्कार झाला. डाँ. विजयकुमार मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. डाँ. गोविंद पानसरे यांनी आभार मानले.
००
फोटो ओळी-
१) मायटेक्स एक्स्पोमध्ये थेट उद्योगमंत्र्याशी संवाद कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी उपस्थितात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया.
२) दुसया छायाचित्रात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पो मुंबई २०२४ च्या माहितीपत्रिकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थितात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रवींद्र माणगावे, मनोहर जगताप, शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी, राजेंद्र बाठिया, जावेद शेख, सागर नागरे.

विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

  विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे सोमवारी मुंबईत वितरण

            मुंबईदि २८ :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कारकामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार सन 2021-22 चे वितरण सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनसेनापती बापट मार्गप्रभादेवीमुंबई येथे सायंकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

            राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारविधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरकामगार मंत्री सुरेश खाडेशालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरकौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाविधान परिषदेच्या उपसभापती  निलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.  

            मुंबई शहर व जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगलकामगार आयुक्त सतीश देशमुखविकास आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहतील.

            रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्काराने भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांना गौरविण्यात येणार आहे. कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लि.पिंपरी पुणे येथे इलेक्ट्रीशियन पदावर कार्यरत मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात येईलतर 51 कामगारांचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच mahakalyan या युट्यूब चॅनलवर थेट प्रसारण पाहता येणार आहे.

कामगार मित्र पुरस्कारासाठी भारतीय मजदूर संघाची निवड

            रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन 2021 करिता भारतीय मजदूर संघमहाराष्ट्र प्रदेश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी करण्यात आलेली कामे विचारात घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचेकडून संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

            कामगारांच्या कल्याणासाठी किमान २५ वर्ष समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना सन २००० पासून या पुरस्काराने गौरविले जात आहे. रुपये ७५ हजारस्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी टाटा इंजिनियरिंग लोकोमोटिव्ह कंपनी लि. पिंपरी पुणेराष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूरवनाज इंजिनियरिंग पुणेबजाज ऑटो लि.पुणेघरडा केमिकल्स लि. लोटे रत्नागिरीमनुग्राफ इंडिया लि.शिरोली कोल्हापूरहाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या,) मुंबई या संस्थांना देण्यात आला आहेतर व्यक्तींमध्ये डॉ.बाबा आढावराजा कुलकर्णीमनोहर कोतवालएस.आर.कुलकर्णीडॉ.शांती पटेलकॉ.यशवंत चव्हाणदादा सामंतशरद राव या व्यक्तिंना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

कामगार भूषण पुरस्कार

            गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींनी पुढील आयुष्यात अधिक जोमाने कार्य सुरू ठेवावेया उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरुप रु.५० हजार स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे  आहे.

             विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा कंपनीआस्थापनेत काम करतानाच सामाजिकसांस्कृतिकसाहित्यशैक्षणिकक्रीडासंघटन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कामगारांना मंडळाकडून सन १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सन २०२३ पासून हा पुरस्कार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या नावाने प्रदान करण्यात येत आहे. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांमध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कामगारास या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. पुरस्काराचे स्वरुप रु.२५ हजार रुपयेस्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

0000

मनिषा सावळे/विसंअ/ 


डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

 डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

            पुणेदि २८ : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळेल. येथे स्थापित होणा-या उद्योगांना महाराष्ट्र शासनाने काही  सवलती व प्रोत्साहने  सुद्धा जाहीर केली आहेतअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

            मंत्री श्री सामंत म्हणालेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली  महाराष्ट्र आजही थेट परकीय गुंतवणुकीत देशात क्रमांक एकवर आहे.

            रत्ने व आभूषणे क्षेत्रातील केंद्र शासनाची शिखर संस्था म्हणजेच जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलद्वारे इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नवी मुंबई येथे स्थापित करण्यात येत आहे. या पार्कमध्ये सुमारे २ हजार सूक्ष्मलघु व मध्यम उद्योग घटक स्थापित होणार आहेत. तसेच येथे मोठ्या नामांकित कंपन्या सुद्धा गुंतवणूक करतील. अशा प्रकारचा देशातील हा एकमेव प्रकल्प आहे, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्ककरिता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली प्रोत्साहने

            या पार्ककरिता १ मार्च २०१९ रोजी झालेल्या  उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जेम्स अँड ज्वेलरी पार्ककरिता महाराष्ट्र शासनाने महापे येथे मोकळ्या भुखंडाचे औद्योगिक भुखंडात रुपांतर करून ८६ हजार ५३ चौरस मीटर एवढी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र अशा उद्योगांसाठी केवळ जागा उपलब्ध करून होणार नाही तर या उद्योगांना काही प्रोत्साहन आणि सवलती देणे आवश्यक आहे, असा विचार करून उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीने या उद्योगांसाठी २८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकित सवलती जाहीर केल्या आहेत.

            जेम्स अँड ज्वेलरी पार्क करिता मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. या पार्ककरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ३ चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) यापूर्वी दिलेला आहे. अतिरिक्त २ एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. याअतिरिक्त २ एफएसआयपैकी १ एफएसआय लॅब ग्रोन डायमंडस् उद्योगासाठी वापरण्यात येईल. उर्वरीत १ अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरुन विकसित केलेले क्षेत्र एमआयडीसीला विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल.  सदर विकसित क्षेत्र जेम्स ॲण्ड ज्वेलरी तसेच लॅब ग्रोन डायमंड क्षेत्राशी निगडीत अन्य उद्योगांना देण्याकरीता राखीव ठेवण्यात येईल.

            स्थापित होणाऱ्या घटकांकरीता पहिल्या भाडेपट्टा करारावर मुद्रांक शुल्क सवलत असेल. पार्कमधील घटकांना ५० टक्के ढोबळ वस्तू व सेवा कराचा परतावा ५ वर्षेपर्यंत देण्यात येईल. लॅब ग्रोन डायमंडस् उद्योग हा नवीन सेक्टर राज्यात विकसित होण्याकरीता एक विशेष बाब म्हणून या घटकांसाठी २ रुपये प्रति युनिट दराने ५ वर्षांसाठी विद्युत दरात सवलत देण्यात येणार. सुक्ष्मलघु व मध्यम उद्योग घटकांसाठी विद्युत शुल्क माफी ५ वर्षे दिली जाईल. सर्व प्रोत्साहने प्रति घटक पात्र गुंतवणूकीच्या १०० टक्के मर्यादेत देय करण्याचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत

 मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची

तातडीची बैठक सोमवारी मुंबईत

  - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबईदि. 28 : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.

            या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. असेही मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/


 

 

Featured post

Lakshvedhi