Saturday, 28 October 2023

जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षेसाठी

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांच्याशी संलग्न असलेल्या जीसीसी टीबीसी संगणकीय टंकलेखन परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. यासाठी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त संस्थांमधून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थांनी नियमबाह्य कामे केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईलअसेही यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

            इच्छुक विद्यार्थ्यांनी www.mscepune.in/CT_INST_MUMBAI.aspx या लिंकवर आपल्या जवळच्या मान्यता प्राप्त टायपिंग संस्थांची यादी तपासून पाहावी. त्यानंतर त्या संस्थेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या प्रमाणपत्रावरील त्याच संस्थेचे नाव व पत्ता बरोबर असल्याची खातरजमा करूनच प्रवेश घ्यावाअसे आवाहन परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यात वर्षातून दोन वेळा जीसीसी टीबीसी संगणकीय टायपिंग परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयासाठी सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून याची प्रती विषय ,५०० रुपये इतके शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर लघुलेखन परीक्षा देखील घेतल्या जातात. त्यासाठी देखील प्रवेश सुरू झाले असल्याची माहिती परिषदेमार्फत देण्यात आली आहे.

            संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच परीक्षेचा प्राथमिक अर्ज ऑनलाईन भरून घेतला जाणार आहे. यामुळे ऐनवेळी परीक्षा अर्ज भरून घेणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरणे या गैरप्रकारांना आळा बसेलअसेही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

00000

निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन दुष्काळी भाग होणार सुजलाम् - सुफलाम्

 निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन

दुष्काळी भाग होणार सुजलाम् - सुफलाम्

67 हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली


 


            अहमदनगर, दि. 26 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् - सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाइप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (जि. नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरण स्थानावर कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेने कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.


निळवंडे धरणाची प्रमुख वैशिष्टे


● उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) हा महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला आहे.


● धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व महत्तम उंची ७४.५० मीटर इतकी आहे. धरणाचा सांडवा ओगी प्रकारचा असून त्यावर १२ मीटर x ६.५ मीटर आकाराच्या ५ वक्राकार द्वारांची उभारणी केली आहे. धरणाचा एकूण जलसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे.


● प्रकल्पाच्या ८५ कि.मी. लांबीच्या डाव्या व ९२.५० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाइप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर, श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील 21 गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.


****

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85.60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले 1712 कोटी रुपये सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यात

 नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील 85.60 लाख

शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले 1712 कोटी रुपये

सर्वाधिक लाभार्थी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यात

जीवनातील अविस्मरणीय क्षण - कृषीमंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 26 : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यानहा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

            नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

            ‘नमो शेतकरी सन्मान योजने’तून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना आनंद झाला. खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम खालील प्रमाणे-

अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी

अकोला -1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी

अमरावती 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी

संभाजीनगर (औरंगाबाद) 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी

बीड 3,89,527 शेतकऱ्यांना 77.91 कोटी

भंडारा 186031 शेतकऱ्यांना 37.21 कोटी

बुलढाणा 331894 शेतकऱ्यांना 66.38 कोटी

चंद्रपूर 216613 शेतकऱ्यांना 43.32 कोटी

धुळे 142441 शेतकऱ्यांना 28.40 कोटी

गडचिरोली 129639 शेतकऱ्यांना 25.93 कोटी

गोंदिया 212418 शेतकऱ्यांना 42.48 कोटी

हिंगोली 180576 शेतकऱ्यांना 36.12 कोटी

जळगाव 379549 शेतकऱ्यांना 75.91 कोटी

जालना 289771 शेतकऱ्यांना 57.95 कोटी

कोल्हापूर 406240 शेतकऱ्यांना 81.25 कोटी

लातूर 267300 शेतकऱ्यांना 53.46 कोटी

नागपूर 150414 शेतकऱ्यांना 30.08 कोटी

नांदेड 377415 शेतकऱ्यांना 75.48 कोटी

नंदुरबार 96585 शेतकऱ्यांना 29.32 कोटी

नाशिक 385347 शेतकऱ्यांना 77.07 कोटी

धाराशिव (उस्मानाबाद)- 211409 शेतकऱ्यांना 42.28 कोटी

पालघर 80336 शेतकऱ्यांना 16.07 कोटी

परभणी 267107 शेतकऱ्यांना 53.42 कोटी

पुणे 389842 शेतकऱ्यांना 77.97 कोटी

रायगड 98264 शेतकऱ्यांना 19.65 कोटी

रत्नागिरी 127600 शेतकऱ्यांना 25.52 कोटी

सांगली 367179 शेतकऱ्यांना 73.44 कोटी

सातारा 393334 शेतकऱ्यांना 78.67 कोटी

सिंधुदुर्ग 108103 शेतकऱ्यांना 21.62 कोटी

सोलापूर 454040 शेतकऱ्यांना 90.81 कोटी

ठाणे 68367 शेतकऱ्यांना 13.67 कोटी

वर्धा 123376 शेतकऱ्यांना 24.68 कोटी

वाशीम 154052 शेतकऱ्यांना 30.81कोटी

यवतमाळ 277130 शेतकऱ्यांना 55.43को

दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत

 दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज

 शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत

- मुंबई विभागीय मंडळ सचिव डॉ.सुभाष बोरसे

            मुंबईदि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून सोमवार 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेतअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

            दहावीसाठी प्रवीष्ट होणारे नियमित विद्यार्थीपुनर्परीक्षार्थीयापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

            कोणताही विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाहीयाची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावीअसे आवाहन मंडळाचे सचिव डॉ.बोरसे यांनी केले आहे

मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी

 मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नाव नोंदणी करावी

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

            मुंबईदि.२७ :- लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून मताधिकार बजावावाअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यानी केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

            निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात होण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणशुद्धीकरण महत्त्वपूर्ण असते. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे. १ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेले नागरिक यांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच २०२४ च्या एप्रिलजुलैऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही ही कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल. मात्र, त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. २०२४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी.

            प्रारुप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारानी खात्री करणे आवश्यक आहे. बहुतांशवेळी मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाहीअशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच नावपत्तालिंगजन्म दिनांकवय, ओळखपत्र क्रमाक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील, त्यांनी अर्ज क्रमांक  आठ भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावांसंबधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेलतर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये तथ्य आढळून आले, तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी, अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

            समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्याच्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीमहिला व दिव्यांग व्यक्ती याच्यासाठी विशेष शिबिरे राबविली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळांचे  सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.  दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीत्याची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. तृतीयपंथी व्यक्तीशरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रियाभटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

            ही शिबिरे सामाजिक संस्थाच्या सहकार्याने या समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे. त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत

            ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिकलग्न होऊन गावात आलेल्या स्त्रियागावात कायमस्वरूपी वास्तव्यास आलेले नागरिकांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावमृत व्यक्ती गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तीलग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रियांच्या नावाची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

            ५ जानेवारी २०२३ च्या रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या नऊ कोटी दोन लाख चौसष्ठ हजार आठशे चौऱ्याहत्तर (९,०२,६४,८७४) इतकी होती. ही मतदारसंख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४५ टक्के इतकी होती. त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणीनाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आता २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या नऊ कोटी आठ लाख बत्तीस हजार दोनशे त्रेसष्ट (९,०८,३२,२६३) एवढी आहे, आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७१.४१ इतकी आहे. यामध्ये सतरा लाख तीन हजार एकशे (१७.०३.१९३) इतकी नवीन मतदार नोंदणी आहेतर अकरा लाख पत्तीस हजार आठशे चार (११,३५,८०४) एवढ्या मतदाराची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबारमृत कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदाराची होती.

            तसेच २०२३च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या चार कोटी एकाहत्तर लाख सव्वीस हजार पाचशे दोन (४,७१,२६,५०२ ) इतकी होती, तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या चार कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार सहाशे चौसष्ठ (४,७३,६९,६६४) एवढी आहे, तर स्त्री मतदारांची जानेवारी २०२३ मधील संख्या चार कोटी एकतीस लाख तेहतीस हजार सहाशे पंचावन्न (४,३१,३३,६५५) इतकी आहे. ऑक्टोबर २०२३ मधील संख्या चार कोटी चौतीस लाख सतावन्न हजार सहाशे एकोणऐशी (४,३४,५७,६७९) एवढी आहे. जानेवारी २०२३ मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९१५ स्त्रिया होत्यातर यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९१७ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी २०२३ मधील संख्या चार हजार सातशे सतरा (४७१७) होती, तर ऑक्टोबर २०२३ मध्ये चार हजार नऊशे वीस (४९२०) इतकी आहे.

            राज्याच्या लोकसंख्येत १८-१९ वर्षे वयोगटाची टक्केवारी ३.७६ (४७.८३.०७०) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त ०.२७ (३.४८.६९१ ) एवढी आहे, तर २०-२९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी २०.३८ (२,५९,२९,२०६ ) इतकी आहे. ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १२.१९ (१,५५,११,३७६) एवढी आहे. मतदार यादीतील तरुणांची आकडेवारी वाढवण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 'उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारा'चे आयोजनही करण्यात आले आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित

 मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रासंदर्भात गठित

न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. 27 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस शाश्वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहितीसामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे यांनी दिली.

            मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावेवंशावळीशैक्षणिक पुरावेमहसुली पुरावेनिजामकाळात झालेले करारनिजामकालिन संस्थानिकांना दिलेल्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्‍याची जबाबदारी सोपविलेली आहे.

या समितीचे अध्‍यक्ष न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) असून विभागीय आयुक्‍तछत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्‍य सचिव आहेत आणि अपर मुख्‍य सचिव (महसूल) व प्रधान सचिवविधी व न्‍याय विभागमंत्रालयमुंबई यांच्यासह मराठवाड्यातील आठ जिल्‍ह्यांचे जिल्‍हाधिकारी हे या समितीचे सदस्‍य आहेत.

समितीची पहिली बैठक दि. 11 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत झाली.

            या बैठकीमध्‍ये समितीच्‍या कार्यकक्षेबाबत सविस्‍तर चर्चा होऊन समितीच्‍या पुढील कामकाजाची दिशा ठरविण्‍यात आली. तसेच या पूर्वीच्‍या समितीने या विषयासंबंधाने निजामकालिन जुने महसुली अभिलेखे तपासण्‍यासाठी राज्‍य शासनाचे एक पथक हैदराबाद येथे अभिलेखांचा शोध व तपासाबाबत पाठविले होते. या पथकास निजामकालिन जुन्‍या अभिलेखातील सनदामूंतखबकरारजनगणनेचे अभिलेखे इत्‍यादी तपासण्‍याबाबत सूचना देण्‍यात आल्‍या होत्‍या. त्‍यानुसार महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या जमाबंदी आयुक्‍तांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या कार्यालयातील काही अधिकारी व विभागीय आयुक्‍त कार्यालयछत्रपती संभाजीनगर कार्यालयातील अधिकारी यांच्‍या पथकाने हैदराबाद येथे भेट दिली. त्‍यांच्‍या सोबत मोडी लिपी व ऊर्दू भाषा जाणकार व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍यात आला होता. या पथकाने दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी हैदराबाद येथे भेट देऊन जुने निजामकालिन महसुली अभिलेखेजनगणना अभिलेखेअबकारी विभागाचे अभिलेखे व पुरातत्‍व विभागाकडील अभिलेखेमूंतखब इत्‍यादींची पाहणी केली व पथकाने उपलब्‍ध मूंतखब अभिलेख्‍यांच्‍या प्रती स्‍कॅन करुन सोबत आणल्‍या. याबाबतची माहिती समितीच्‍या पहिल्‍या बैठकीत देण्‍यात आली.

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची दुसरी बैठक 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये मराठवाड्यातील जुने महसुली अभिलेखेजन्‍म-मृत्‍यू नोंदीचे अभिलेखे1967 पूर्वीचे शैक्षणिक अभिलेखेपोलिसांकडील गुन्‍हा नोंद रजिस्‍टरअबकारी विभागाकडील अभिलेखेवक्‍फ बोर्डाकडील अभिलेखेसैनिक कल्‍याण विभागाचे अभिलेखेकारागृह विभागाकडील नोंदी इत्‍यादींची तपासणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले. तसेच यापूर्वी कुणबी जातीची दिलेली प्रमाणपत्रेनाकारलेले अर्जजात वैधता पडताळणी समितीकडून वैध ठरविण्‍यात आलेली प्रकरणेअवैध ठरविलेली प्रकरणे व अवैध ठरविण्‍याचे कारण याबाबत जिल्‍हानिहाय तपासणी करुन जिल्हाधिकारी यांनी अहवाल सादर करण्‍याचे बैठकीत निर्देश देण्‍यात आले.

            समितीच्‍या 15 सप्टेंबर 2023 रोजीच्‍या बैठकीतील निर्देश विचारात घेऊन सर्व विभागांचा समन्‍वयन होऊन अभिलेखांची तपासणी सुलभतेने होण्‍याच्‍या दृष्‍टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्‍ये निवासी उपजिल्‍हाधिकारी यांच्या नियंत्रणात विशेष कक्ष स्‍थापन करण्‍यात आला. या कक्षामध्‍ये विविध 12 विभागांचे जिल्‍हास्‍तरीय अधिकारी नेमण्‍यात आले. जुन्‍या  अभिलेखांपैकी काही अभिलेखे मोडी लिपीऊर्दू भाषेत असल्‍यामुळे तपासणीसाठी ऊर्दू शाळेतील शिक्षक व मोडी लिपी जाणकारांची मदत घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या. 

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची तिसरी बैठक 22 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍हानिहाय अभिलेख तपासणी कामाचा आढावा घेण्‍यात आला. तसेच तपासलेल्‍या नोंदी बाबत अहवाल सादर करण्‍यासाठी व त्‍यात सारखेपणा राहण्‍यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी एक नमुना तयार करण्‍याचे निर्देश समितीने दिले. त्‍यानुसार पुढीलप्रमाणे विभागनिहाय अभिलेख्‍यांची तपासणी करण्‍याचे निर्देश दिले.

1)         महसुली अभिलेखेखसरा पत्रकपाहणी पत्रकक-पत्रककूळ नोंदवहीनागरिकांचे राष्‍ट्रीय रजिस्‍टर सन 1951नमुना नं.1 हक्‍क नोंदपत्रकनमुना नं.2 हक्‍क नोंदपत्रक व 7/12 उतारे,

2)        जन्‍म-मृत्‍यू रजिस्‍टर (गाव नमुना नं.14)

3)        शैक्षणिक अभिलेखे-  प्रवेश निर्गम नोंदवही / जनरल रजिस्‍टर,

4)        राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाकडील अभिलेखे- अनुज्ञप्‍ती नोंदवह्यामळी नोंदवहीताडी नोंदवहीआस्‍थापना अभिलेख,

5)        कारागृह विभागाचे अभिलेखे- रजिस्‍टर ऑफ अंडर ट्रायल प्रीझनरकच्‍चा कैद्यांची नोंदवही,

6)        पोलीस विभाग- गाववारीगोपनीय रजिस्‍टर सी-1सी-2क्राइम रजिस्‍टरअटक पंचनामे व एफआयआर रजिस्‍टर

7)        सहजिल्‍हा निबंधक तथा मुद्रांक जिल्‍हाधिकारी- खरेदी खत नोंदणी रजिस्‍टरडे बुककरारखतसाठेखतइसार पावतीभाडे चिठ्ठीठोकेपत्रकबटाई पत्रकदत्‍तक विधानपत्रकमृत्‍यूपत्रकइच्‍छापत्रकतडजोडपत्रकइतर दस्‍त,

8)        भूमी अभिलेख विभाग- पक्‍काबुकशेतवारपत्रकवसुली बाकीऊल्‍ला प्रतीबुकरिव्हीजन प्रतीबुकक्‍लासर रजिस्‍टर व हक्‍क नोंदणीपत्रक,

9)        जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी- माजी सैनिकांच्‍या नोंदी,

10)       जिल्‍हा वफ्क अधिकारी- मूंतखब

11)       शासकीय कर्मचा-यांचा सेवा तपशील- सन 1967 पूर्वीचे कर्मचा-यांचा सेवा तपशील.

12)       जात प्रमाणपत्र पडताळणी समिती- वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे. 

            याशिवाय हैदराबाद येथून प्राप्त करुन आणलेल्‍या ऊर्दू भाषेतील मूंतखब अभिलेखांच्‍या मराठी भाषेत भाषांतरीत नमुना दाखल प्रती पाठविण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्‍या जात प्रमाणपत्रांबाबत व जात पडताळणी समितीने घेतलेल्‍या निर्णयांच्‍या अनुषंगाने चर्चा होऊन जात पडताळणी समितीकडील वैध व अवैध प्रकरणांच्‍या नमुना दाखल आदेशाच्‍या प्रती सादर करण्‍याच्‍या समितीने सूचना दिल्‍या.

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची चौथी बैठक 30 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे झाली. या बैठकीमध्‍ये जिल्ह्यांनी त्‍यांना विहित करुन दिलेल्‍या विवरणपत्रातील माहितीच्‍या अनुषंगाने माहिती सादर केली. प्रत्‍येक जिल्ह्याने त्‍यांच्‍या जिल्ह्यातील बारा विभागांच्‍या 46 अभिलेख प्रकारांची तपासणी बाबतची प्रगती समिती मांडली. हा अभिलेख प्रकार कोणत्‍या कायद्याच्‍या / नियमांच्‍या तरतुदीनुसार ठेवले जात होतेयाबाबत त्‍यांचे नमुना दाखल प्रतीसह समितीस माहिती दिली. या बैठकीत अध्‍यक्षांनी तपासलेल्‍या अभिलेखांचे 1948 पूर्वीचे (निजामकालिन) व 1948 ते 1967 (इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र देण्‍यासाठीचा अधिसूचित दि. 13 ऑक्टोबर 1967 असल्‍याने) अशा दोन कालावधीमध्‍ये माहिती देण्‍याचे निर्देश दिले व त्‍याची नोंद सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेऊन त्‍याप्रमाणे त्‍या कालावधीची सर्व विभागांची अभिलेख तपासण्‍याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली व त्‍यामध्‍ये आढळलेल्‍या कुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी नोंदीची माहिती शासनास व समितीस देण्‍यात आली.

            यानंतर समितीने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आठ जिल्‍ह्यांमध्‍ये जिल्‍हानिहाय बैठका घेण्‍याचे व सर्वसामान्य नागरिकांकडून कुणबी नोंदीसंबंधी पुरावे स्वीकारण्‍याचे ठरवून तसा समितीचा जिल्‍हानिहाय दौरा कार्यक्रम सर्व जिल्‍ह्यांना कळविण्‍यात आला. नागरिकांनाही याबाबत माहिती होण्‍यासाठी या कार्यक्रमास वर्तमानपत्रातून व्‍यापक प्रसिध्‍दी देण्‍यात आली. 

            न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची पाचवी बैठक 11 ऑक्टोबर 2023 रोजी विभागीय आयुक्‍त कार्यालयछत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्‍तालय व छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्याच्‍या कामकाजाबाबत झाली. या बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याच्‍या अहवालाबाबत अभिलेख प्रकार व विभागनिहाय सविस्‍तर आढावा घेण्‍यात आला. या आढाव्‍यात निदर्शनास आल्‍याप्रमाणे या बैठकीत भूमी अभिलेख विभागाकडील नमुना 33 व 34छत्रपती संभाजीनगर येथील सैन्‍य भरती कार्यालयाकडील सैन्‍य भरतीचे वेळी घेतलेल्‍या नोंदीनगरपालिकेकडील जुने शेतवार तक्‍ता वसुली व आमदनी (अॅसेसमेंट रजिस्‍टर) हे अभिलेख प्रकार नव्‍याने समाविष्ट करण्‍याचे निर्देश दिले. समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत 18 नागरिक / शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे / निवेदने सादर केली.

            याप्रमाणे न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची सहावी बैठक 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना येथे झाली. या बैठकीसाठी शासन पत्र 3 ऑक्टोबर 2023 व 6 ऑक्टोबर 2023 रोजी कळविल्‍यानुसार आंदोलनकर्त्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  त्‍यांनी बैठकीच्‍या कामकाजात सहभाग घेऊन आपल्‍या सूचना समिती समोर मांडल्‍या. समितीची सातवी बैठक 17 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगोली येथेआठवी बैठक 18 ऑक्टोबर 2023 रोजी नांदेड येथे व नववी बैठक 19 ऑक्टोबर 2023 रोजी परभणी येथे झाली. या वेळी  समितीने ठरवून दिलेल्‍या दुपारी 2 ते 4 या वेळेत अनुक्रमे 632964 व 83 नागरिक /शिष्‍टमंडळांनी समितीस पुरावे /निवेदने सादर केली. अशाप्रकारे समितीने केलेल्‍या आवाहनास नागरिकांकडून या कार्यक्रमादरम्‍यान मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व संबंधितांनी मा. अध्‍यक्ष व समिती सदस्‍यांच्‍या भेटी घेऊनपुरावे / कागदपत्रे देऊन म्‍हणणे मांडले. 

न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) समितीची लातूर येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी व धाराशिव येथे दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडली. समितीची पुढील बैठक बीड येथे 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.  या दौऱ्यामध्‍ये समिती जिल्‍हा बैठका घेऊन नागरिकांकडून पुरावे स्वीकारण्‍याचे पूर्वीप्रमाणे कामकाज करणार आहे.

            आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्‍ये विविध विभागांच्‍या अभिलेखांतील सुमारे दीड कोटी नोंदीची तपासणी करण्‍यात आली असून हे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. जुने अभिलेखे अत्‍यंत जीर्ण अवस्‍थेत असून त्‍यांचे वाचन करुन नोंदी शोधणे जिकरीचे होत आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागत आहे. जुन्‍या अभिलेख्‍यातील बहुतांश नोंदी मोडी लिपी अथवा ऊर्दू भाषेतील आहेत व नोंदींचे प्रमाणिकरण फारशी भाषेतीलही आहे. त्‍याबाबतचे भाषा जाणकार सहजतेने उपलब्‍ध होत नसल्‍याचे निदर्शनास येते. त्‍याशिवाय मोडी लिपी जाणकार व्‍यक्‍तींची उपलब्‍धताही मर्यादित असून ऊर्दू व मोडीतील पुरावे / कागदपत्रे मोठ्या प्रमाणात भाषांतरीत करून घ्‍यावी लागत आहेत. त्‍यामुळे या अभिलेख्‍यांच्‍या तपासणीसाठी वेळ लागत आहे. याप्रमाणे कुणबी जातीच्‍या नोंदी शोधण्‍याची कार्यवाही पूर्ण करून अशा नोंदी असलेले अभिलेखे व्यवस्थित जतन करुन त्‍याच्‍या प्रती सार्वजनिक संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून देण्‍याचे नियोजित आहे. यामुळे मराठा समाजातील संबंधितांना या अभिलेखांच्‍या प्रमाणित प्रती संबंधित कार्यालयातून सुलभतेने उपलब्‍ध होऊ शकतील. 

            नागरिकांनी आतापर्यंत समितीस सादर केलेल्‍या व आगामी दौरा कार्यक्रमात सादर होणाऱ्या पुराव्‍यांचे भाषांतर करुन अभ्‍यास करणेकायदेशीर आधाराशी पडताळणी करणे व त्‍यावर उचित निर्णय घेणे यासाठी देखील मोठा अवधी लागणार आहे. जिल्‍हानिहाय अभिलेखे तपासणी पूर्ण झाल्‍यानंतर प्राप्‍त होणाऱ्या अहवालाचे विश्‍लेषण करुन निष्‍कर्षापर्यंत पोहचणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हानिहाय अंतिम अहवाल प्राप्‍त झाल्‍यानंतर काही कालावधी लागणार आहे. तसेच समितीस हैदराबाद येथे भेट देऊन आणखी काही पुरातन अभिलेख्‍यांची तपासणी करावयाची आहे. सद्यःस्थितीत तेलगंणा राज्‍य विधानसभेच्‍या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. तेलगंणा राज्‍य शासनाचे अधिकारी निवडणूक विषयक कामकाजात व्‍यस्‍त असून त्‍यांच्‍या उपलब्‍धतेनुसार हा दौरा आयोजित करावा लागणार आहे. अपर मुख्य सचिव (महसूल)महाराष्ट्र शासन यांनी तेलंगणा राज्याचे प्रधान सचिव (महसूल) यांना पत्र पाठवून निजामकालिन अभिलेखे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केलेली आहे.

            मराठवाड्यातील आतापर्यंतच्या 7 जिल्ह्यात घेतलेल्या बैठका त्या अनुषंगाने नागरिकांकडून समितीस सादर करण्यात आलेल्या विविध अनुषंगिक पुराव्यांचा विचार करता समितीच्या कुणबी-मराठामराठा-कुणबी यांचे प्रमाणिकरण करण्याच्या अनुषंगाने नागरिकांचे सहकार्य चांगल्या पद्धतीने मिळत आहे. याबाबत शासनाच्या ज्या विविध यंत्रणा आपल्याकडील जुनी कागदपत्रे ज्यामध्ये कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा अशा प्रकारचे नोंदी तपासण्याचे काम करत आहेतत्यांचीही तपासणी प्रगतीपथावर आहे. बहुतांशी कागदपत्रे 1967 च्या पूर्वीचे आहेत. कागदपत्रांचे स्वरुप आणि तपासणीमधील विद्यमान अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा अनुभव यामध्ये तसेचकागदपत्रे ही मोडीऊर्दू आणि फारशी भाषेमध्ये आहेत. मोडी लिपी करिता पुराभिलेख विभागाने शासनाचे चार कर्मचारी आणि ज्यांनी मोडीचे प्रशिक्षण घेतलेली आहेत. असे काही पुणेछत्रपती संभाजीनगर परिसरातील जाणकार यांच्या सेवा उपलब्ध करून देण्याबद्दल आदेश काढलेले आहेत. ज्या मोडी आणि उर्दू कागदपत्रांचा शोध घेणे गरजेचे आहेत्याबद्दल या जाणकारांकडून तपासून घेण्याचे काम सुरू आहे. या नोंदी ऊर्दू आणि मोडी मध्ये अधिक चांगल्या प्रमाणात मिळत आहेत आणि तशी कुणबी जातीच्या नोंदींची आकडेवारी वाढत आहे

            समितीस समाजातील विचारवंतांसोबत विचारविनिमय करावयाचा असून अभ्‍यासकविधिज्ञ व तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सूचना व मते जाणून घेऊन त्‍याचा उपयोग समिती अहवाल तयार करताना करणार आहे.

समितीस निश्चित करुन दिलेल्‍या कार्यकक्षेनुसार परिपूर्ण व सविस्‍तर अहवाल तयार करण्‍यासाठी या सर्व बाबींचा विचार करता अधिकचा कालावधी कदाचित आणखी दोन महिन्‍यांचा लागणार आहे आणि याशिवाय आजू-बाजूंच्‍या राज्‍यात मराठा समाजाच्‍या आरक्षणाबाबत काय संविधानिक/कायदेशीर तरतुदींचे आधार घेण्‍यात आलेले आहेत त्‍याचे संदर्भ उपलब्‍ध करुन घेणे व या संबंधाने त्‍याची तपासणी करणे तसेच जुन्‍या हैदराबाद संस्‍थानातून स्टेट गॅझेटिअरचे उपलब्‍ध असलेले आधारभूत अभिलेखे व तेथे उपलब्‍ध असलेल्‍या तेव्‍हाच्‍या जातनिहाय जनगणनेचे आधारभूत अभिलेखे प्राप्‍त करणे व अभ्‍यासणे आवश्‍यक ठरत असल्‍याने समितीने पार पाडत असलेल्‍या कामकाजास भविष्‍यातील कोणत्‍याही आव्‍हांनाच्‍या संभाव्‍यतेचा विचार करुन शाश्‍वत व आधारभूत कामकाज प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी समितीस  दि.24 डिसेंबर2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहेअशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव श्री. भांगे यांनी दिली आहे.

०००००

काशीबाई थोरात/विसंअ


इस्रोच्या यशाचं रहस्य काय?"

 काही महिन्यांपूर्वी इस्रोची एक टीम आमच्या कंपनीत अधिकृत दौऱ्यावर आली होती. अधिकृत काम संपल्यावर आम्ही त्यांचा सत्कार आणि एक छोटासा संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 


त्यांच्या टीम लीडरचं भाषण संपल्यावर मी एक प्रश्न विचारला, 

"इस्रोच्या यशाचं रहस्य काय?" 


त्यांनी उत्तर दिलं, "आमचं टीमवर्क..! समजा, एक प्यून टेबल शिफ्ट करतोय आणि वाटेत तो अडखळला. त्याच वेळेस इस्रोचे चेअरमन जवळून जात आहेत. तर ते लगेच त्याच्या मदतीसाठी धावून येतात . ते असा विचार करत नाहीत की मी चेअरमन आहे, शिपायाला मदत कशी करू? 

समजा झाडूवाला फरशी साफ करतोय. आणि GM साहेब समोरून येतायत. तर ते फरशी सुकेपर्यंत थांबतात. ओल्या फरशीवर पाय ठेवत नाहीत. 

आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर करतो." 


भव्य दिव्य यश असं एका रात्रीत मिळत नाही. कठोर परिश्रमांच्या जोडीने आपल्या सहकाऱ्यांमध्ये प्रेम आणि विश्वासाची भावना रूजवावी लागते. अहंकाराची शिरस्त्राणे दूर उतरून ठेवावी लागतात. मग चंद्र सहजपणे जवळ येतो.

🌹🎊✨🌈🌙🌔🌟

-

Featured post

Lakshvedhi