Sunday, 22 October 2023

शिंक आली तर लोकांना SORRY नाही देवाला THANKS म्हणा!*

 *शिंक आली तर लोकांना SORRY नाही देवाला THANKS म्हणा!*


*होय न सांगता येणारी**

*न थांबवता येणारी शिंक*

*ही शिंक आरोग्यास फारच उपयुक्त आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे!*


१. शिंकेमुळे ह्रदयाकडून मेंदुकडे व पोटाकडे अचानक जोराचा दाब दिला जातो या दाबामुळे सर्वांगातील रक्तदाब जोराने झटका देऊन ढकलला जातो. याचा चांगला परिणाम रक्त प्रवाहावर होऊन रक्त वाहिन्या चांगल्याप्रकारे कार्यान्वित होतात व डोके हलके होते.


२. पुर्वी लोक शिंका येण्यासाठी नाकात तपकीर ओढून कृत्रिम प्रकारे शिंका आणत होते व डोके हलके करत होते.


३. आता शिंक येणे चुकीचे समजून लोक 'साॅरी' म्हणतात पण ती नैसर्गिक क्रीया आहे.


४. दैनंदीन जीवनात ह्रदयविकाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी आहे कारण स्त्रिया स्वपांक करतेवेळी किंवा घराची साफ सफाई करतेवेळी शिंकण्याचे कार्य सतत करत असतात. मात्र ज्या स्रियांचे शिंकण्याचे प्रमाण कमी आहे त्यांची तब्येत अकारण स्थूल होते. शिंकेमुळे पोटावर प्रचंड दाब येतो व पोटाचे स्नायू आकुंचित केले जातात व त्यामुळे कपालभातीचा योग पूर्ण होतो.


५. नित्य नियमाने सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना या दोन वेळेस शिंक येण्यासाठी उपाय केले तर शरीर सतत निरोगी तर राहतेच शिवाय पोटाचे व डोक्याचे दुखणे कायमचे बंद होते. 


६. कृत्रिम शिंका येणेसाठी नाकात स्वच्छ धागा फिरवला तर शिंका सहज येतात ह्यासाठी तपकीर वापरणेची गरज नाही. 


७. शिंकेमुळे नाक व घसा सतत स्वच्छ राहतो तसेच मनातील ताणतणाव कमी होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्रदयविकार होऊ नये ह्यावर देखील हा रामबाण उपाय आहे. निसर्ग उपचार पद्धतीमध्ये ही क्रिया दिलेली आहे. 


८. अभ्यास करतांना झोप येत असेल तरीही शिंका काढल्यास पुढील दोन तास डोके तरतरीत राहते व झोप येणे थांबते. 


९. शिंकामुळे चेहरा थोडासा लालसर होतो व डोळ्यात पाणी येते हे सुध्दा आरोग्यवर्धक आहे. चेहरा उजळतो व डोळे स्वच्छ होतात. 


१०. शिंकेमुळे डोक्यातील विचार चक्र खंडित होते व पुन्हा नविन विचारचक्र सुरू होतांना मेंदुला नवचैतन्य निर्माण होते. 


११. सतत सर्दी होत असेल तर ती शिंकांमुळे. काही काळाने अशी सततची सर्दी थांबते. 


अशा अनेक उपयुक्त बाबींशी शिंकांचा संबध आहे...


अचानक येणारी व थांबवता न येणारी शिंक ही सजीवास ईश्वरी देणगीच आहे !!!

!'.. दयाघना

 '' 

तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथशास्त्री नित्यनेमानं रोज विष्णूसहस्त्रनामाचं पठण करीत बसत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते..घरात अठरा विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे फाटलेले असत..शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या..फाटलेल्या लुगडयाला गाठी मारून नेसायची ! रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे..पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्रयाचे हे कांटे त्याना अधिकच रक्तबंबाळ करू लागायचे !..आस-पास..शेजारी-पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घरा-घरातली बायका-मुलं को-या कपडयांत वावरायची..पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपडयात हिंडायची ! संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत..पण..त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथशास्त्रींच्या हृदयाला पिळवटून..भेदून जात असे. त्यांची पत्नीही त्याना एका शब्दानं कधी बोलत नसे..पण आपल्या देहावर असलेल्या लुगडयाच्या गाठीकड़े ती अतीव दयनीयतेनं पहात असे..त्यावेळीही शास्त्रीबुवाना अत्यंत अपराध्यासारखं होई !..

आजचा दिवसही सणाचा..दिवाळीचा होता !

घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथशास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णूसहस्त्रनामाचं एक एक नाम वाचत होते. वाचता वाचता..हळू हळू त्यांचा कंठ दाटून आला..तिन्हीसांज व्हायला आली तरी पुढयातल्या पाटावर फक्त दोन तीन मूठ तांदूळ जमा झाले होते !..मुलं सकाळपासून उपाशी होती..आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती-ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते !

शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला..

''..इतकी वर्षं आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या

नामस्मरणात कधी ना खंड पडू दिला..ना कधीही

आपलं चित्त विचलीत होऊ दिलं ! पण..आज अस्वस्थ का वाटतंय ?...'परमेश्वर दयाळू असतो,'असं म्हणतात..मग त्याला आपली परिस्थिती काकळू नये ?..आपल्यावर दया दाखवावी, असं का वाटू नये ?...की 'परमेश्वर दयाळू आहे' ही अफवाच आहे ?...होय..तसंच असलं पाहिजे !..तसं नसतं तर अनेक वर्षं आपणास एवढे हलाखीचे दिवस

पहावे लागले नसते !...''

विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले.

पुढ्यातल्या पोथीवर अश्रुंचे थेंब टपटप पडत होते..त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला ! शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्याआडून त्या शब्दाकडे निरखून पाहिलं..

...तो शब्द होता ''दयाघन'' !

त्या शब्दाकडे बघून श्रीनाथशास्त्री उपहासानं हसले.

जवळच एक कोळश्याचा तुकडा पडला होता..तो त्यांनी उचलला..आणि त्या ''दयाघन'' शब्दावर फुली मारली !

त्याचवेळी श्रीनाथशास्त्रींच्या घरी कोणती घटना घडत होती, याची त्यांना सूतरामही कल्पना नव्हती !..

त्या तिन्हीसांजेला श्रीनाथशास्त्रींच्या घरासमोर डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला..सतेज चेह-याचा तरूण येऊन उभा राहिला होता. त्यांनं आपल्यासमवेत आठ-दहा बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्वं सामान त्यानं शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यानं एक मखमली कापडाची थैली दिली..त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या !..निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला.

श्रीनाथशास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसलेले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती..

इतक्यात त्यांच्या डोळ्यांसमोर नव्या-को-या कपड्यांतील त्यांची मुलं येऊन उभी राहिलेली दिसली..शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवे..कोरे कपडे कुठून आणले असतील ? ह्या प्रश्नानं ते साशंक होत..

मुलांच्या अंगावर ओरडले..

'' काय रे !..कोणी दिले हे कपडे ? कुठून चोरून-बिरून आणलेत की काय ?''

दरिद्री माणसाला वैभव नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही..असंच वाटत असतं ; त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवे कपडे घालणारच नाहीत..असं क्षणभर का होईना..पण गृहीत धरल्यामुळं श्रीनाथशास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली,

'' बाबा,..इथे काय बसून राहिलात ? लवकर घरी चला !

आपल्या घरी खूप मज्जा मज्जा झालीयं !''

श्रीनाथशास्त्री घाईघाईनं निघाले.

घरी येऊन पहातात तर काय...घरभर दिवे तेजाळत होते..सर्वत्र उदबत्ती-धुपाचा सुवास दरवळत होता..एवढे दिवे लावायला तेल आलं कुठून ?..विचार करत असतानाच, नवं कोरं रेशमी लुगडं नेसलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली..सुवर्णालंकारांनी ती सजली होती..शास्त्रीबुवा तिच्याकडे पहातच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेनंच तिला विचारलं..

'' एवढं सगळं वैभव अचानक आलं कोठून ?''

'' काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता.त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला..आणि आपल्याबरोबर आणलेलं हे सगळं सामान तो ठेवून गेला !..जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय !''

शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं.

'' काय निरोप दिलाय ?''

श्रीनाथशास्त्रींनी अत्यंत उत्कंठतेनं विचारलं.

'' त्यानं निरोप दिलाय की..

'शास्त्रीबुवांना म्हणावं पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका !'...

कुणाला बुक्का लावलाय तुम्ही ?''

पत्नीनं गोंधळून विचारलं.

क्षणार्धात श्रीनाथशास्त्री सदगदीत झाले.

पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता..कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली..हळूवार उघडली..आणि पानावरच्या ''दयाघन'' या शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली !..

पुढच्याच क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथशास्त्रींची पावलं घराच्या दिशेनं सावकाश पडू लागली...


*श्रद्धा !*

*श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते.*. 

        

🙏🏻 *अवधूत चिंतन श्री  गुरुदेव दत्त*

Saturday, 21 October 2023

कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे

 कुष्‍ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे

आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांचे आवाहन

            मुंबईदि. २१ :-  राज्यात घरोघरी सर्वेक्षण करूनकुष्‍ठरुग्ण  शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी.  शोध अभियाना दरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना  हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून  तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे,  असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले.

             राज्यात  २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोग्य विभागाच्या वतीनेकेंद्र सरकारच्या  मार्गदर्शक सूचनेनुसार  कुष्‍ठरुग्ण  शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

             सामाजिक कारणाने  कुष्‍ठरोग लपवण्याकडे  लोकांचाविशेषतः महिलांचा कल असल्याचे सांगत आयुक्त श्री. कुमार म्हणाले,  आरोग्य विभागाने  सोशल मिडियासामाजिक संस्था व इतर  माध्यमाद्वारे लोकांचे  प्रबोधन करूनयोग्य उपचाराने हा आजार बरा होतो असा विश्वास निर्माण करावा. जास्तीतजास्त  संशयित रुग्णांची तपासणी करावी. या मोहिमेसाठी स्थानिक जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घ्यावे, अशा सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.  पंतप्रधान व राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली  सन २०२७ पर्यंत शून्य कुष्‍ठरोग प्रसाराचे  ध्येय  गाठण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावेअसे आवाहनही  त्यांनी यावेळी केले.

            २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या संयुक्त कुष्‍ठरोग व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेसाठी राज्यभरात ६५,८३३  पथके तयार करण्यात आलेली आहेत. एक पथक  एका दिवसात शहरी भागातील २५ आणि ग्रामीण भागातील २० घरांना भेटी देणार आहे.   गृहभेटी अंतर्गत राज्यातील १ कोटी ७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले जाणार असून,  अंदाजे ८ कोटी ६६ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण होईल, अशी  माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी यावेळी दिली.  नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

००००

मुंबई, दि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

शहीद पोलिसांना अभिवादन

 

            मुंबईदि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारीकर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकरपोलीस महासंचालक रजनीश शेठपोलीस आयुक्त विवेक फणसळकरविशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीशहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या १५ पोलीस अधिकारी१७३ पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

            यावेळी पोलीस महासंचालक श्री. शेठआयुक्त श्री. फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारीप्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकरसंतोष कालापहाड यांनी केले.

००००





आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

 आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या

राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

           

            मुंबई, दि. २० : राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीचीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रुपयेमार्गदर्शकास १० लाख रुपयेरौप्य पदक विजत्या खेळाडूसाठी ७५ लाख रुपयेमार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपयेकांस्य पदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपयेमार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार आहे.

            आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स)सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लाखमार्गदर्शकास ७ लाख ५० हजाररौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लाखमार्गदर्शकास ५ लाख तर कास्य पदक विजेत्यास २५ लाखमार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            यापूर्वी सुवर्ण पदकासाठी १० लाख रुपये, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपयेरौप्यपदकासाठी ७.५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख ८७ हजार रुपयेकांस्यपदकासाठी ५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिकस्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात राज्याच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.पवार यांनी आठ दिवसांपूर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाबहरियाणामध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा झालीत्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे  मंत्री श्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

00000

गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे

 गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित

करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे

                                                - राज्यपाल रमेश बैस

कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 20 : छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिकअधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्कीट तयार करावे. यातून आपल्या तरुणांना शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरणा मिळेलच आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आज ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात राजभवन येथून रवाना करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेसंस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळेअध्यक्ष हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते.

            यावेळी राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीजम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी कूपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रेरणास्थान म्हणून उदयास येईल. शिवाजी महाराजांची दृष्टी काळाच्या पुढे होती. त्या काळात त्यांनी सागरी आरमाराचे महत्व ओळखून स्वत:चे नौदल उभारले. मुघल साम्राज्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालेल्या समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले. मुक्त व्यापार आणि उद्योगाचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. एक मजबूत आणि स्वावलंबी राज्य निर्माण करून आपल्या लोकांचे कल्याण सुनिश्चित करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती.  त्यांचा न्याय आणि प्रामाणिक प्रशासनावर भर होता. शिवाजी महाराज हे समाजातील स्त्रियांचे महत्त्व ओळखणारे अग्रेसर होते. त्यांनी महिलांचा आदर केला आणि त्यांना संरक्षण दिलेत्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता सुनिश्चित केलीअसे राज्यपालांनी सांगितले.

            ते म्हणाले कीआपल्या संरक्षण दलांनी राजधानीच्या बाहेर त्यांचे प्रमुख राष्ट्रीय समारंभ आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यानुसार यावर्षी 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मध्ये भारतात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमीतील युवांनी देशासाठी अधिकाधिक पदके जिंकावीतयासाठी त्यांना आतापासून विविध खेळांसाठी तयार केले पाहिजेअसेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

        छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहेही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा मिळेल. हा पुतळा त्यांना मोठे पाठबळ देईल. तेथील स्मारकासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन निश्चितपणे करेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

            छत्रपती शिवाजी महाराज हे आपले रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा आहे. त्यातूनच आपण शिवछत्रपतींच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन वर्षात आग्रा येथे आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.  विविध उपक्रम राबविले. शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार आपण केला. ही अभिमानाची बाब आहे. ती राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील.  आपले सणउत्सव अधिक उत्साहाने साजरे केले. आपली संस्कृतीपरंपरा जोपासण्याचावाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोतअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २२६२ किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडा पर्यंतचा हा प्रवास होणार आहे. राज्याची संस्कृतीवीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. लोकवर्गणीतून लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील स्थानिक मराठी बांधवांना आवश्यक ते सर्व पाठबळ राज्य शासन देईलअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण 20 भाषेत बोलक्या स्वरुपात (टॉकिंग स्टोरी) आणत आहोत. याशिवायशिवाजी महाराजांचा इतिहास अंधांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.  'जय भवानी जय शिवाजीहा चैतन्य आणि ऊर्जेचा हुंकार आहे. हा केवळ एक पुतळा नाही तर त्या माध्यमातून एक विचार आपण पाठवतोय. तो जगभरात जाईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा कुपवाडा येथे उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदादिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

 शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब

दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

 

            मुंबई, दि. 20 : राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.

            यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्तीअध्यक्ष दिलीप दाससचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टरउत्तम शिक्षकउत्तम संगीतकारगायकखेळाडू आणि विचारवंत दिले आहेत.  मुंबई आणि राज्याच्या विकासात  बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            बंगाल क्लबची स्थापन १९२२ साली करण्यात आली तर येथील दुर्गा पूजा १९३५ पासून सुरु असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

०००

 

Maharashtra Governor visits Centurion Bengal Club Durga Puja

 

            Mumbai 20:  Maharashtra Governor Ramesh Bais today visited the Durga Puja organized by the Century old Bengal Club at Shivaji Park in Mumbai on Friday (20 Oct).

Joy Chakraborty, Honorary Advisor of Bengal Club, Dilip Das, President, Mrinal Purkayastha, Secretary and a large number of people were present.

            Speaking on the occasion, the Governor said the Bengali community has given Maharashtra great doctors, teachers, musicians, singers, athletes and intellectuals. He said that the contribution of Bengali speaking people to the progress and development of Mumbai and Maharashtra is of a high order.

            The Governor said that festivals like Durga Puja play an important role in maintaining social harmony and brotherhood. He said efforts should be made to make Durgotsav inclusive by inviting people from various religions and sects. The Governor said, Bengal Club has good infrastructure for sports and games. He expressed the hope that the Club will produce excellent sportspersons for the country in the years to come.

According to the organizers, the Bengal Club was founded in 1922 while Durga Puja was started in 1935.

0000


Featured post

Lakshvedhi