Saturday, 21 October 2023

मुंबई, दि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

शहीद पोलिसांना अभिवादन

 

            मुंबईदि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील शहीद अधिकारीकर्मचाऱ्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

            नायगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या हुतात्मा मैदानावर आयोजित कार्यक्रमाला आमदार सदा सरवणकरपोलीस महासंचालक रजनीश शेठपोलीस आयुक्त विवेक फणसळकरविशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीशहिदांचे नातेवाईक उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी देशभरात गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या १५ पोलीस अधिकारी१७३ पोलीस जवानांच्या माहितीच्या संदेशाचे वाचन करून श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहिदांच्या नातेवाईकांची भेट घेवून सांत्वन केले.

            यावेळी पोलीस महासंचालक श्री. शेठआयुक्त श्री. फणसळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारीप्रमुख अतिथी यांनीही शहिदांच्या स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहिदांना अभिवादन करण्यासाठी पोलीस दलातर्फे हवेत तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी विशेष पोलीस कवायतीचे संचलन पोलीस उपायुक्त श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकरसंतोष कालापहाड यांनी केले.

००००





आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

 आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या

राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ

- क्रीडा मंत्री संजय बनसोडे

           

            मुंबई, दि. २० : राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीचीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस १ कोटी रुपयेमार्गदर्शकास १० लाख रुपयेरौप्य पदक विजत्या खेळाडूसाठी ७५ लाख रुपयेमार्गदर्शकास ७ लाख ५० हजार रुपयेकांस्य पदक प्राप्त खेळाडूस ५० लाख रुपयेमार्गदर्शकास ५ लाख रुपये रोख असे बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्यात येणार आहे.

            आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स)सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूस ७५ लाखमार्गदर्शकास ७ लाख ५० हजाररौप्यपदक विजत्या खेळाडूस ५० लाखमार्गदर्शकास ५ लाख तर कास्य पदक विजेत्यास २५ लाखमार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            यापूर्वी सुवर्ण पदकासाठी १० लाख रुपये, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रुपयेरौप्यपदकासाठी ७.५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख ८७ हजार रुपयेकांस्यपदकासाठी ५ लाख रुपयेमार्गदर्शकास १ लाख २५ हजार रुपये दिले जात होते. आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करुन जागतिकस्तरावर पदकांचा इतिहास रचला. त्यात राज्याच्या खेळाडूंचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोख रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री.पवार यांनी आठ दिवसांपूर्वी क्रीडा व युवक कल्याण विभागाचा आढावा घेतला होता. त्या बैठकीत पंजाबहरियाणामध्यप्रदेश राज्याप्रमाणे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या रकमेत वाढ करण्यावर चर्चा झालीत्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचे  मंत्री श्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

00000

गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे

 गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित

करण्यासाठी फोर्ट सर्किट तयार व्हावे

                                                - राज्यपाल रमेश बैस

कुपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबईदि. 20 : छत्रपती शिवाजी महाराजांचा जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे स्थापित करण्यात येणारा पुतळा आपल्या सैनिकअधिकारी आणि नागरिकांना सतत प्रेरणा देईल. याचप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी फोर्ट सर्कीट तयार करावे. यातून आपल्या तरुणांना शिवाजी महाराजांच्या आदर्शाने प्रेरणा मिळेलच आणि आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे उभारण्यासाठी तयार करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आज ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात राजभवन येथून रवाना करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेसंस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळेअध्यक्ष हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते.

            यावेळी राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीजम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी कूपवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रेरणास्थान म्हणून उदयास येईल. शिवाजी महाराजांची दृष्टी काळाच्या पुढे होती. त्या काळात त्यांनी सागरी आरमाराचे महत्व ओळखून स्वत:चे नौदल उभारले. मुघल साम्राज्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त झालेल्या समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न त्यांनी पाहिले. मुक्त व्यापार आणि उद्योगाचे ते खंबीर पुरस्कर्ते होते. एक मजबूत आणि स्वावलंबी राज्य निर्माण करून आपल्या लोकांचे कल्याण सुनिश्चित करणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती.  त्यांचा न्याय आणि प्रामाणिक प्रशासनावर भर होता. शिवाजी महाराज हे समाजातील स्त्रियांचे महत्त्व ओळखणारे अग्रेसर होते. त्यांनी महिलांचा आदर केला आणि त्यांना संरक्षण दिलेत्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता सुनिश्चित केलीअसे राज्यपालांनी सांगितले.

            ते म्हणाले कीआपल्या संरक्षण दलांनी राजधानीच्या बाहेर त्यांचे प्रमुख राष्ट्रीय समारंभ आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यानुसार यावर्षी 4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मध्ये भारतात ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमीतील युवांनी देशासाठी अधिकाधिक पदके जिंकावीतयासाठी त्यांना आतापासून विविध खेळांसाठी तयार केले पाहिजेअसेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

        छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त राज्य शासन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने विविध उपक्रम राबवले. याच कालावधीत कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहेही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा मिळेल. हा पुतळा त्यांना मोठे पाठबळ देईल. तेथील स्मारकासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन निश्चितपणे करेलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

            छत्रपती शिवाजी महाराज हे आपले रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास ही आपली प्रेरणा आहे. त्यातूनच आपण शिवछत्रपतींच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन वर्षात आग्रा येथे आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.  विविध उपक्रम राबविले. शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्याचा करार आपण केला. ही अभिमानाची बाब आहे. ती राज्यात आणल्यानंतर ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवली जातील.  आपले सणउत्सव अधिक उत्साहाने साजरे केले. आपली संस्कृतीपरंपरा जोपासण्याचावाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोतअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत आणणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा २२६२ किलोमीटरचा टप्पा पार करून कुपवाडा पर्यंतचा हा प्रवास होणार आहे. राज्याची संस्कृतीवीरतेचा गौरव जगभर पोहोचवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आपण राज्यात आणत आहोत. लोकवर्गणीतून लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथील स्थानिक मराठी बांधवांना आवश्यक ते सर्व पाठबळ राज्य शासन देईलअसे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

            छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण 20 भाषेत बोलक्या स्वरुपात (टॉकिंग स्टोरी) आणत आहोत. याशिवायशिवाजी महाराजांचा इतिहास अंधांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजांचे चरित्र ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले.  'जय भवानी जय शिवाजीहा चैतन्य आणि ऊर्जेचा हुंकार आहे. हा केवळ एक पुतळा नाही तर त्या माध्यमातून एक विचार आपण पाठवतोय. तो जगभरात जाईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा कुपवाडा येथे उभारण्यात येत आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदादिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

 शतकी परंपरा लाभलेल्या शिवाजी पार्क बंगाल क्लब

दुर्गा पूजा मंडळाला राज्यपालांची भेट

 

            मुंबई, दि. 20 : राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 20) शतकी परंपरा असलेल्या शिवाजी पार्क येथील बंगाल क्लबतर्फे आयोजित दुर्गा पूजा मंडळाला भेट देऊन देवीची पूजा केली.

            यावेळी क्लबचे मानद सल्लागार जॉय चक्रवर्तीअध्यक्ष दिलीप दाससचिव मृणाल पुरकायस्थ व बंगाली भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            बंगाली समाजाने राज्याला उत्तम डॉक्टरउत्तम शिक्षकउत्तम संगीतकारगायकखेळाडू आणि विचारवंत दिले आहेत.  मुंबई आणि राज्याच्या विकासात  बंगाली भाषिक लोकांचे योगदान मोठे आहेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्यासाठी दुर्गा पूजेसारखे सण महत्त्वाचे आहेत. विविध धर्म व पंथाच्या लोकांना निमंत्रित करून दुर्गोत्सव सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला पाहिजेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले. बंगाल क्लब कडे खेळाच्या सुविधा आहेत. या क्लबच्या माध्यमातून देशासाठी उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            बंगाल क्लबची स्थापन १९२२ साली करण्यात आली तर येथील दुर्गा पूजा १९३५ पासून सुरु असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली.

०००

 

Maharashtra Governor visits Centurion Bengal Club Durga Puja

 

            Mumbai 20:  Maharashtra Governor Ramesh Bais today visited the Durga Puja organized by the Century old Bengal Club at Shivaji Park in Mumbai on Friday (20 Oct).

Joy Chakraborty, Honorary Advisor of Bengal Club, Dilip Das, President, Mrinal Purkayastha, Secretary and a large number of people were present.

            Speaking on the occasion, the Governor said the Bengali community has given Maharashtra great doctors, teachers, musicians, singers, athletes and intellectuals. He said that the contribution of Bengali speaking people to the progress and development of Mumbai and Maharashtra is of a high order.

            The Governor said that festivals like Durga Puja play an important role in maintaining social harmony and brotherhood. He said efforts should be made to make Durgotsav inclusive by inviting people from various religions and sects. The Governor said, Bengal Club has good infrastructure for sports and games. He expressed the hope that the Club will produce excellent sportspersons for the country in the years to come.

According to the organizers, the Bengal Club was founded in 1922 while Durga Puja was started in 1935.

0000


*श्री रेणुकादेवीची कथा.*

 *श्री रेणुकादेवीची कथा.*


रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो. दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्हीही शक्तीस्थळ म्हणून प्रसिध्द आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे. वेगळी प्रचीती आहे. कार्ल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिध्द आहे. सर्वत्र देवींची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूपं आहेत. राजा रेणू (कान्यकुब्ज, प्रसेनजित, प्रेसेन) काशीत राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे.

 

राजाराणीला बरेच वर्ष मुल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ म्हणुन त्याला एक मुलगी झाली. ती चैत्र शुध्द पंचमीस शुक्रवारी जन्मंली. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. (रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते.) ती दिसायला फार सुंदर होती. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तीचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरासाठी तिन्हीं लोकांतून अनेक मान्यंवर मंडळी आली. अनेक राजे-महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नि ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली.


रेणुकेला पाच मुलं झाली, त्या पाचांची नावे रूमावंत, सुशेषा, वसु, विश्र्वासु आणि परशुराम अशी आहेत. एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसी सोबत जलक्रीडा करीताना दिसला ते अतिशय मादक दृष्य पाहून माता रेणूका हरवून गेली. तिकडे ऋषी जमदाग्नि रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदाग्निनी आंतर्ज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामूळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले. त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नि ऋषींनी रेणुकेस ठार मारण्याची आज्ञा आपल्या ४ मुलांना केली. चार ही मूले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदाग्नि आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्निने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम (राम) तेथे आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुष झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यानी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचार शक्ती ऋषीना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पुर्ण केली.


मृत बंधू जीवंत झाले. मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न-विछीन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवदान दिले. या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले.


रेणुका आपल्या संसारात पुन्ह मग्न झाली. रेणुकेस एक बहिण होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जगदाग्निने पाठविले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषिनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे. सहस्त्रार्जुनाने लोभाने कामधेनू मागितली. पण ऋषी जमदाग्निनी जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्यांच्या जोरावर युध्द करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनुच्याच शक्तीने आश्रमवासियांनी सहस्त्रार्जुनास पिटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला. पण त्यामुळे राजा खुप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जगदाग्नि ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदाग्निंचा वध केला. नंतर  मेहुणी रेणुकेवर २१ वार केले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परशुराम आल्यावर त्याला जे दृष्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे  प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्दुना माझा पराक्रमी राम एकविस वेळ ही पृथ्वी नि:क्षत्रिय करेल.


परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळता त्यांनी असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पुर्ण करेन. परशुरामाने कावड करून एकाबाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्हात किनवट तालुक्यात पोहचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत विधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे. हे परशुरामाला पाहवेना तो फार दुखी झाला. त्याला तो क्षण आठवला वडिलांच्या सांगण्यावरून आपणं आपल्या आईचे शिरच्छेद केले होते, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जिवीत झाली. पण आताचा प्रसंग वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतके दुख:द प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे तो व्याकुळ झाला. रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खुप उपदेश केले. त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली, नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार  ह्रदयभेदक तो प्रसंग पहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून दुर गेला. सहा दिवसांनी माता-पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला. प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूर गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मुर्ती आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मुर्ती स्थापन केली.


आईला दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र-अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालफेक, परशु चालवण्यात प्रविण्य मिळविले. त्याने स्वबळावर सौन्य ऊभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले. त्याचा नित्पात करून इतर समाजद्रोही २० राजांना त्याने पराभुत केले. आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला. याच वेळी गणपती व परशुरामाचं ही युध्द झालं आहे. परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी-तपस्वी झाले. परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका यज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा. त्या घाटात दोन तांदळा आहेत. एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा.


माहूर येथील डोगंरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे. देवळात जाण्यासाठी १२००-१५०० पायऱ्या चढूनवर जावं लागत. गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंन्दुर चर्चीत मूर्ती आहे. त्यावर चांदीचा टाप लावला आहे. बैठकीवर सिंह कोरला आहे. देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते. मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्रीदत्ताचे स्थान आहे. मंदिरात दत्ताची एकमुखी मुर्ती आहे. बाजूला तिर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई-वडिलांची अंतक्रिया केली असे सांगतात. रेणुका हीच परशुरामाची आई, तिचे दुसरे नाव एकविरा आईच्या आठवणीने उंचबलून आलेल्या मानाने परशुरामाने कडे-कपारीत बाण मारला. त्या ठिकाणी एकविरा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे.


महाभारतात रेणुकेची उत्पती कमलापासून झाली असे दिले आहे. त्यावरुन तिला कामली हे नांव आले असावे. तसेच रेणुका ही विदर्भ राजाची मुलगी असे कालिपुराणात सांगितले आहे.

Friday, 20 October 2023

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

 

            मुंबईदि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआरया ॲपवर सोमवार दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा 'दिलखुलासकार्यक्रम प्रसारित होईल.

            वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील आणि वर्षा आंधळे यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

००००

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ कल्याणकारी योजनांचाही लाभ

 मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे पाठबळ

कल्याणकारी योजनांचाही लाभ

 

            मुंबईदि २०:- चित्रपटमालिकावेब सिरीजजाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतनकामाचा करारनामाबोनसउपदान प्रदानभविष्य निर्वाह निधीभारतीय कर्मचारी विमा योजनाबालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभही दिला जाणार  आहे.

            चित्रपटमालिका व इतर मनोरंजन कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून अनेकदा कलाकारतंत्रज्ञ  व कामगारांचे वेतन थकविण्याचे प्रकार घडत असतात. यासंदर्भात विविध कामगार संघटनांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी कामगार विभागाने २०२१ व २०२२ मध्ये चित्रपट निर्मातेतंत्रज्ञकलाकार दिग्दर्शक आणि मनोरंजन क्षेत्रातील कामगार संघटना यांच्यासोबत चर्चा करून सर्वंकष कार्यप्रणाली तयार केली आहे.

            सदरची मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी चित्रपटसृष्टीतील सर्व मालकनिर्माते,  कामगारसह कलाकारतंत्रज्ञ तसेच कामाच्या स्वरुपानुसार काम  करणाऱ्या सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. 

कार्यप्रणाली कुणाला लागू

            मानक कार्यप्रणाली ही राज्यातील चित्रपटदूरचित्रवाणीदर्शन मालिकाजाहिरात विभागडिजिटल उद्योग व इतर असंघटित करमणूक क्षेत्रातील विभागांमध्ये काम करणारे व्यावसायिकचित्रपट निर्मातेदिग्दर्शकनृत्य दिग्दर्शकसंगीत दिग्दर्शकॲक्शन ॲण्ड स्टंट दिग्दर्शककलावंत (सर्व प्रकारचे अभिनय करणारे कलाकारसह कलाकारनायकनायिकासह नायकसहनायिकागायकव्हाइस एडिटरलेखकबाल कलाकार इ. तंत्रज्ञ ध्वनी मुद्रण करणेएडिटिंग करणेसाऊंड रेकॉर्डिस्टहेड कॅमेरामन इ. कामगार, (रंगमंच उभारणारे कामगार म्हणजेच हेड टेपिस्ट, असिस्टंट टेपिस्ट,  हेड पेंटर,पेंटरकारपेंटरहेड कारपेंटरअसिस्टंट कारपेंटरपॉलिशमनपीस मोल्डरमोल्डरकास्टर, लाईटमनस्पॉट बायप्रॉडक्शन बॉयक्रेन ऑपरेटरइलेक्ट्रिशियनजनरेटर ऑपरेटरहेल्परफोटोग्राफर्ससाऊंड इंजिनिअर्सस्टंट आर्टिस्टसहायक कोरस गायक /गायिकामहिला/ पुरुष सह कलाकारसिने वेशभूषा व मेकअप आर्टिस्टॲक्शन डबिंग इफेक्ट आर्टिस्टनर्तक (देशीपरवानगी धारक विदेशी)ज्युनिअर आर्टिस्टछायाचित्रकार,ड्रेस मनबॅकस्टेज आर्टिस्टतृतीयपंथी भूमिका करणारे कलावंत)  बालकलाकार व इतर तत्सम स्वरूपाचे काम करणारे कामगार,  कर्मचारी,तंत्रज्ञतसेच असंघटित क्षेत्रातील शासनाने घोषित केलेल्या ३०० प्रकारचे उद्योग व्यवसायाच्या यादीमधील क्र. ६५ ते क्र ७७ नुसार करमणूक व संबंधित काम करणारे कामगार जसे की; दृकश्राव्य कामाशी संबंधित कामगार वाजंत्री कॅमेरामन सिनेमाशी संबंधित कामे सिनेमा प्रक्षेपणा संबंधित कामे सर्कस कलाकार नर्तक गोडीस्वारा जादूगार मॉडेल कवी लेखक इत्यादींना लागू राहील त्याचबरोबर दूरदर्शन मालिका निर्मिती, लघुपट निर्मिती, वेब सिरीज निर्मिती, जाहिरात पटनिर्मिती, ऑडिओ व्हिज्युअल अल्बम निर्मितीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील ही मानक प्रणाली लागू राहील. 

कामगारांना मिळणारे लाभ

            किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करणे नियोक्त्यास बंधनकारक. तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वेतन देणे बंधनकारक. सर्व कामगारांचे वेतन त्यांच्या बॅंक खात्यात किंवा धनादेशाद्वारे अदा करणे बंधनकारक. निर्मात्याने कुशल व अकुशल कामगारांशी वैयक्तिक करार केल्यानंतर देय वेतन/ मानधन ३० दिवसांच्या अदा करणे बंधनकारक.

५० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणा-या आस्थापनेत ५ टक्के दराने घरभाडे भत्ता१० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेत २१ हजार रुपयांपर्यंत वेतन असेल अशा कामगारांना सेवा समाप्तीच्यावेळी ८.३३टक्के दराने बोनसकामगाराने राजीनामा दिल्यास किंवा त्याला कामावरून कमी केल्यास १५ दिवसांचे वेतन ‘य’ हिशेबाने उपदान देय आहे. सिने क्षेत्रात २० पेक्षा जास्त आस्थापना असलेल्या आणि कामगारांचा पगार १५ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्या कामगाराला भविष्य निर्वाह निधी योजना लागू होऊन त्याच्या वेतनातून १२ टक्के व व्यवस्थापकाकडून निधी देण्याचा नियम लागू. भारतीय कर्मचारी विमा योजना १० व १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना लागू असून २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणा-या कामगारांच्या वेतनातून ०.७५ टक्के आणि मालकाकडून ३.२५ टक्के रक्कम कपात करण्याचा नियम लागू. यामुळे कामगारांना आरोग्य सुविधाआजारपणअपंगत्वप्रसृती इत्यादीसाठी लाभ घेता येतील. कामगारांना इजा झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास कामगार नुकसान भरपाई अधिनियम १९२३ च्या तरतुदीनुसार कामगारांच्या वारसा नुकसान भरपाई देणे बंधनकारक. सिने क्षेत्रामध्ये चित्रीकरणाच्या दरम्यान स्टंट करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी आणि स्टंट करताना आवश्यक असणारी सर्व सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध करून देणे

            महिलांची सुरक्षा : रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कामगारांसाठी कामाच्या ठिकाणांहून घरापर्यंत तसेच घरापासून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरक्षित व सुस्थितील वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे बंधनकारक. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ संदर्भात तक्रार करण्यासाठी समिती गठित करावी. बाह्य चित्रीकरणावेळी स्वच्छतागृह आणि कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था करणे आवश्यक.

बाल कलाकारांची सुरक्षा:-  कोणत्याही बालकास कलाकार म्हणून एका दिवसामध्ये पाच तासांपेक्षा जास्त काम करता येणार नाही. बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणताही बालक सलग २७ दिवस काम करणार नाही याची खात्री करावी. प्रत्येक बालकाच्या वेतनामधून कमीत कमी २० टक्के रक्कम बालकाच्या नावावर राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव म्हणून जमा करण्यात यावी.

 

Featured post

Lakshvedhi