Thursday, 19 October 2023

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचित समाविष्ट असलेल्या जातींना राष्ट्रीय सूचित समाविष्ट करण्यासाठी जलद शिफारस करावी

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचित समाविष्ट असलेल्या जातींना

राष्ट्रीय सूचित समाविष्ट करण्यासाठी जलद शिफारस करावी

- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर

 

            मुंबई, दि. 17 : राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस केली आहेअशा जातींच्या कागदपत्रांची पूर्तता करून अहवाल राष्ट्रीय आयोगाकडे सादर करावा.  तसेचनव्याने आलेल्या अर्जासंदर्भातील शैक्षणिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून  शिफारस तातडीने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठविण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिल्या.

            आज सह्याद्री अतिथीगृहमुंबई येथे राष्ट्रीय सूचित समाविष्ट होण्यासाठी ज्या जातींचे अर्ज प्रलंबित आहेतत्या अर्जाबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

            श्री. अहिर म्हणाले कीलोधीबडगुजरवीरशैव लिंगायतसलमानीभोयर पवारसुर्यवंशी गुर्जरबेलदरझाडेडांगरी व कलवारशेगर-धनगर या जातींचा राज्य मागास यादीत समावेशाबाबत कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे १५ दिवसांत यादी पाठविण्यात यावी. तसेवनव्याने आलेल्या शिफारशींवर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या परिस्थिती आणि अडचणी तपासाव्यात. ही कार्यवाही जलदगतीने करण्यासंदर्भात त्यांनी सांगितले.

            यावेळी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमलसचिव राजीव रंजनसल्लागार राजेश कुमारमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्रामॲङ बी.एल. सगर किल्लीकरसदस्य सचिव श्रीमती आशाराणी पाटीलआमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीयामाजी आमदार संजय धोटेमाजी आमदार आशिष देशमुख,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगेइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव विरेंद्र सिंगइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह विविध जाती समुहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण ६४,१९८ शाळांमधून ५९ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

 स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण

६४,१९८ शाळांमधून ५९ लाख ३१ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

 

            मुंबईदि. १७ : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या 'स्वच्छता मॉनिटरप्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. यात ६४,१९८ शाळांमधून ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. या अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रभावी १०० शाळांचा लवकरच मुंबई येथे सत्कार केला जाणार असल्याची माहिती, शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

            प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा होता. या प्रकल्पात विद्यार्थी कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर ६४ हजार शाळांच्या सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीरपणे थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देऊ लागले.

            या टप्प्यात विद्यार्थ्यांनी घाण करणाऱ्याला ती साफ करायला विनंती करणे अपेक्षित होते. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येऊ लागली आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हीडिओ तयार करून समाज माध्यमांवर शेअर करणेही त्यांना आवडू लागले. पहिल्या टप्प्यात असे १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या या संकल्पनेला गती मिळाली आहे.

            यापुढील दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची आणि वर्ग शिक्षकांना रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केल्याबाबत विद्यार्थ्यांना विचारणा करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी दाखवून दिल्याने सगळेच नागरिक जागरूक राहतील आणि महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी मुक्त बनेलअशी अपेक्षा या प्रकल्पाचे संचालक रोहित आर्या यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

            या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बुलढाणाजालनासातारामुंबई आणि यवतमाळ जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली असून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलअंकुशनगरजि.जालनामत्स्योदरी विद्यालयअंबडजि.जालनायुगधर्म पब्लिक स्कूलबुलढाणाआदर्श जि.प. स्कूलबोरखेडीजि.बुलढाणाएन.व्ही. चिन्मया विद्यालयशेगाव आणि जनता हायस्कूलजालना या शाळांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

00000

पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार

 पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार

- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई दि. 17 : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठनागपूरच्या कामकाजाबाबत मंत्री श्री. विखे पाटील यांनी आज मंत्रालयात आढावा घेतलात्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडेविद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटीलविद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य भगवान सटाले यांच्यासह विभागाचे अधिकारी व विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री श्री . विखे पाटील म्हणालेविद्यापीठांतर्गत  खाजगी  पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची नियमावली तयार करण्यात येत आहे. या नियमावलीच्या प्रारुपास पुढील विद्यापीठ स्तरीय विद्या परिषद समिती आणि कार्यकारी परिषदेची मान्यता प्राप्त झाल्यानंतर व त्यानुसार प्रस्ताव शासनास प्राप्त झाल्यानंतर शासन मान्यतेसाठी  सादर करण्यात येईल.

            सहयोगी प्राध्यापक पदे भरतांना नियमात आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी. विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयातील रिक्त पदे मंजूर आकृतीबंधानुसार भरण्याची कार्यवाही सुरू ठेवावी. विविध महाविद्यालयातील प्रक्षेत्र विकसित करणे आणि मुला मुलींसाठी नवीन  वसतीगृह बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती  व देखभालीकरिता निधी मिळण्याबाबतही चर्चा करण्यात आली.तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर प्रश्नांबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

००००

राज्यभरात 'इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणाली' सुरळीत एस टी महामंडळाचे स्पष्टीकरण

 राज्यभरात 'इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणालीसुरळीत

एस टी महामंडळाचे स्पष्टीकरण

            मुंबईदि. १७ : ई बिक्स कॅश इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक आगारात बसेस जागेवरच उभ्या असल्याचे व राज्यातील एसटीची सेवा विस्कळीत झाल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.  एसटीच्या राज्यभरातील २५० आगारामध्ये ई-बीक्स कॅश या नव्या संस्थेमार्फत इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन प्रणाली नव्याने बसविण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत अत्याधुनिक आणि कार्यक्षम असून प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तसेच आरक्षण करण्यासाठी या प्रणालीचा चांगला वापर होत आहे. तथापिदिनांक १७.१०.२०२३ रोजी सकाळी ७:३० ते ९:४५ दरम्यान ही प्रणाली काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती. त्यात दुरुस्ती करून सकाळी ९:४५ वाजता ही प्रणाली पूर्वरत सुरू झाली आहे. या काळात आगारातून वाहकांना जुन्या पध्दतीची मॅन्युअल तिकीट ट्रे देऊन बसेस मार्गस्थ करण्यात आल्या. कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही अथवा बस फेऱ्या रदद झाल्या नाहीतअसे स्पष्टीकरणही एस टी महामंडळाने दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.

             तरीसदर ई-बीक्स कॅश इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिन प्रणाली व्यवस्थित काम करीत असल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट प्रणाली सुरळीत सुरू आहेअसे एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी खुलासाद्वारे कळविले आहे.

आपत्ती निवारण कामांना गती द्यावी

 आपत्ती निवारण कामांना गती द्यावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबई, दि. 17 : राज्यातील आपत्ती निवारण विषयक सुरू असलेली सार्वजनिक बांधकाम, जलसंपदाखारभूमी विकास आणि ऊर्जा या विभागांची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

         उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक झाली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मानियोजन विभागाचे सचिव सौरभ विजयमदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठीसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव एस. एस.साळुंखे, जलसंपदाचे सचिव राजेंद्र मोहिते, राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासो धुळाजमहावितरणचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रामहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आर.पी. नि. घटे यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत.

           उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपत्तींची तीव्रता कमी होवून  मनुष्य व जिवित हानी होवू नये यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. पावसाळा संपल्यानंतर जी कामे होणे अपेक्षित आहे ती कामे गतीने करण्यासाठी यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. धूप प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड प्रतिबंधात्मक कामे ही कामे केली जावीत. कोकणामध्ये करण्यात येणारी आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाची कामे, आपत्ती प्रतिबंधक कामे वेळेत पूर्ण करावीत. काही खाजगी संस्था देखील आपत्ती निवारण क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा.कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या कामांचे तांत्रिक  व प्रशासकीय मंजूरी तपासून पहा आणि गुणवत्तापूर्ण कामे करा. पावसाळी हंगामात झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना देण्यात येणारी मदत देखील वेळेत वितरीत करावी. यंदा काही ठिकाणी गोगलगायीमुळे झालेले पिकांचे नुकसान देखील झाले आहे त्याचेही पंचनामे काटेकोरपणे करा. न्यायालयाच्या आदेशानुसार भुकंप ग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला देणे, कोयना भुकंप पुनर्वसन आणि पुनर्वसन विषयक कामेही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

आपत्तीची सूचना देणारी अद्यावत यंत्रणा उभारणार : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

           मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षात जागतिक हवामान बदलामुळे राज्यात विविध ठिकाणी वादळे, अतिवृष्टीपूरपरिस्थीती, दरड खचणे अशा आपत्ती घडत आहेत. या आपत्तींचा सामना करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग विविध उपाययोजना करत आहे. आपत्ती पूर्व आणि आपत्ती नंतर काय काळजी घ्यावी यासाठी विविध प्रशिक्षण, राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना, जी.आ.एस.चा वापर करून आपत्तीची तीव्रता मोजणे, विभागाचा स्वतंत्र उपग्रह असावा का याबाबतची सविस्तर आराखडा तयार करणे,आपत्ती पूर्व सूचना प्रणाली देणे राज्यातील ६ हजार ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार आहोत ही कामे प्राधान्याने पूर्ण करणार आहे, असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली

 मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत

मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक

कर्ज व्याज परतावा योजनेतील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली

उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

            मुंबईदि. 17 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतची व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती उपसमितीचे अध्यक्ष तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.

            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनआमदार प्रवीण दरेकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षमाजी आमदार नरेंद्र पाटील,महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,विधी व न्याय परामर्शी नितीन धोटे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगेविधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोलेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहितेछत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणालेमहामंडळाकडे भविष्यात व्याज परतावा योजनेतील  प्रकरणे  थकीत राहणार नाहीत या दृष्टिने कालबद्ध पद्धतीने नियोजन करून त्या त्या महिन्याला तातडीने निकाली काढावीत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

            आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाच्या ला

एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 ‘एकदा काय झालं’ चित्रपटाला सर्वोत्तम मराठी  चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार द कश्मीर फाइल्स ला प्रदान

                सामाजिक विषयासाठी  थ्री टू वन ला पुरस्कार

वहिदा रेहमान दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

                     ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मानित

 

            नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार, द कश्मीर फाइल्स या चित्रपटास, तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या श्रेणीत थ्री टू वन या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

        विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरकेंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगनमाहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2021 चे आहेत. कोरोना महामारीमुळे वर्ष 2021 मधील पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले.

‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच ‘गोदावरी’, ‘थ्री टू वन’, ‘रेखा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्ममध्ये विविध 32 श्रेणीत पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा सरदार उधम

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा सरदार उधम ठरला. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, 'सरदार उधमचित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरसर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: री-रेकॉर्डिंग या श्रेणींत राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पुष्पा  या तेलुगु चित्रपटासाठी अल्लू अर्जुन यांना प्रदान करण्यात आला.

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यावेळी दोन अभिनेत्रींना प्रदान करण्यात आला. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट, तर मिमी या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिमी या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना द कश्मीर  फाइल्स या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार रॉकेट्री : द नांबी इफेक्ट अंतराळ वैज्ञानिकावर आधारित चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तर, शेरशाह चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार आरआरआर या तेलुगु सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता श्रेणीतील पुरस्कार द कश्म‍ीर फाइल्स या हिंदी सिनेमाला सन्मानित करण्यात आले.

एकदा काय झालं - सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान

प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यात मराठी भाषेसाठी ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून रजत कमल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वडील आणि मुलाच्या नात्यातील नितांत सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

निखिल महाजन यांना ‘गोदावरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

'गोदावरी या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक व आघाडीचे सिने-दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ 2 लाख 50 हजार रोख असे आहे. याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरीसिनेमाला गौरवण्यात आले आहे. 

'गोदावरीहा कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा असा हा सिनेमा आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरारूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आले आहे. नाशकातील गोदावरी नदी हा या सिनेमाचा मुख्य दुवा आहे.

नॉनफिचर मध्येही मराठी चित्रपटांची मोहर

नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली. नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटला  प्रदान करण्यात आला.  थ्री टू वन या सिनेमाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.

 रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापु रणखांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

एंडेन्जर्ड  हेरिटेज वर्ली आर्टला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी चित्रपटाचा पुरस्कार

एंडेन्जर्ड  हेरिटेज वर्ली आर्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रमोशनल डॉक्युमेंटरी फिल्मचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक  हेमंत वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ व  50 हजार रोख असे आहे. वारली  महाराष्ट्रातील एक जमात आहेजी डहाणू आणि जव्हारच्या आसपासच्या भागात राहते. लग्नाच्या निमित्ताने हे लोक आपल्या घराच्या भिंतींना गेरूने प्लास्टर करतात आणि तांदळाच्या पिठाने चित्रे काढतात. या चित्रांवर आधारित हा चित्रपट आहे. याचे निर्मातादिग्दर्शकलेखक आणि संपादक हेमंत वर्मा आहेत. हेमंत वर्मा हे हरियाणातील भिवानी शहरातील रहिवासी असून गेल्या 35 वर्षांपासून ते मुंबईत राहत आहेत.

      वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

भारतीय चित्रपटसुष्टीला 66 वर्षे दिलेल्या अतुलनीय योगदानबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना  53 व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

सहा दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रेहमान यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्यासा, कागज़ के फूल, चौदवी का चाँद , साहेब बीबी और गुलाम, गाईड, खामोशी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे समीक्षकांनी कौतुक केले. आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. गाइड (1965) आणि कमलमधील (1968) भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. रेश्मा आणि शेरा (1971) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. वर्ष 1972 मध्ये त्यांना पद्मश्री, तर वर्ष 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, रुपये 10 लाख, शाल व प्रशस्ती पत्र असे आहे.

गाईड’, ‘बीस साल बाद’, प्यासा’, ‘कागज के फूल’ चित्रपटांचा आनंद घेण्याची प्रेक्षकांना संधी

    ज्येष्ठ अभिनेत्री, वहिदा रेहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराचे औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय) यांच्या मार्फत वहिदा रहमान रेट्रोस्पेक्टिव्ह’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या महादेव मार्ग येथील फिल्म डिव्हिजन ऑडिटोरियम येथे 18 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. यामध्ये बुधवार, 18 ऑक्टोबर रोजी गाइड (1965), गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी बीस साल बाद (1962), शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी प्यासा (1957), तर शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी कागज के फूल (1959) या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेशिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

0000000

Featured post

Lakshvedhi