Thursday, 19 October 2023

तळेगावच्या जनरल मोटर्स प्रकल्पातील कामगारांच्या ठामपणे पाठिशी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 तळेगावच्या जनरल मोटर्स प्रकल्पातील कामगारांच्या ठामपणे पाठिशी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनरल मोटर्सला वाढीव भरपाईबाबत निर्देशह्युंदाई कडे रोजगार संधीबाबत पाठपुरावा

 

            मुंबईदि. 17 : तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील जनरल मोटर्सच्या बंद झालेल्या प्रकल्पातील कामगारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे राहील. तसेच हा प्रकल्प घेणाऱ्या ह्युंदाई कंपनीकडे रोजगार संधीसाठी पाठपुरावा केला जाईलअसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  आज येथे सांगितले.

            जनरल मोटर्सचा हा प्रकल्प ह्युंदाई कंपनीने खरेदी केला आहे. यातील कामगारांना जनरल मोटर्सने समाधानकारक भरपाई द्यावी तसेच काही कामगारांना ह्युंदाई कंपनीने सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

            वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंतकामगार मंत्री डॉ. सुरेश खाडेखासदार श्रीरंग बारणेआमदार सुनील शेळकेमाजी आमदार बाळा भेगडेकामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघलउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा तसेच जनरल मोटर्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारीकामगार संघटनेचे पदाधिकारीकामगार आदी उपस्थित होते. 

            जनरल मोटर्सच्या प्रकल्पातील १ हजार ५७८ कामगारांपैकी सुमारे ६९६ कामगारांनी भरपाईची रक्कम स्वीकारून स्वेच्छेने काम सोडल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित कामगारांची वाढीव भरपाई, तर काहींची ह्युंदाईंने सेवेत घ्यावी, अशी मागणी आहे. त्यावर उर्वरित कामगारांच्या वाढीव भरपाईच्या मागणीबाबत जनरल मोटर्सच्या व्यवस्थापनाने फेरविचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            ह्युंदाईं हा प्रकल्प २०२५ मध्ये सुरू करणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी शासन म्हणून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. हा प्रकल्प देखील मोठ्या रोजगार संधी उपलब्ध करून देणारा आहे. त्यामुळे भरपाई मान्य नसलेल्या आणि कुशलअर्धकुशल अशा कामगारांना प्राधान्याने सेवेत घ्यावे यासाठी आवश्यक असा पाठपुरावा केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

0000

आतापर्यंत 23 हजाराहून अधिकांना 25 कोटी रुपयांपेक्षा व्याज परतावा लाभार्थ्यांना 7 दिवसांत व्याज परतावा देण्याचे नियोजन करावे

 आतापर्यंत 23 हजाराहून अधिकांना 25 कोटी रुपयांपेक्षा व्याज परतावा

लाभार्थ्यांना 7 दिवसांत व्याज परतावा देण्याचे नियोजन करावे

            - मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

            मुंबईदि. १८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत 23 हजारांहून अधिक  लाभार्थ्यांना 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढील काळात लाभार्थ्यानी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसांच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी महामंडळांनी कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.

            आज सकाळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाविषयी आढावा घेऊन सविस्तर चर्चा केली. आज सकाळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते 6 हजार लाभार्थ्यांना 4.65 कोटी रुपयांचा व्याज परतावा ऑनलाईल स्वरुपात वितरीत करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमहामंडळाकडे १७ ऑक्टोबर २०२३ पर्यत व्याज परताव्यासाठी दाखल झालेली सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आतापर्यत  554 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मराठा समाजाकरिता देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत महामंडळाकडे व्याज परताव्याचे एकही प्रकरण प्रलंबित नाही.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजनांना सर्वोत्तम प्रतिसाद मिळत असून या योजनांच्या माध्यमातून राज्यभरात जवळपास 70 हजारांपेक्षा अधिक मराठा उद्योजक तयार झाले आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीस चालना मिळत आहे.  या योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

 सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना

राज्य शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य

- मंत्री संजय बनसोडे

 

            मुंबईदि. 17 : राज्याने महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये सागरी क्षेत्राचे जवळपास सर्व पैलू समाविष्ट आहेत. उद्योगासाठी अतिशय चांगले वातावरण राज्यात आहे. राज्यात सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आवश्यक ते सहकार्य व पाठबळ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहेअसे प्रतिपादन राज्याचे बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.

            जागतिक सागरी शिखर परिषदेत आज महाराष्ट्रातील बंदरेपरिवहनउद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. बनसोडे बोलत होते. बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक आणि पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोजमुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटामहाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माणिक गुरसळपर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीदेशाच्या आर्थिक विकासात सागरी उद्योगाचा मोठा वाटा आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ आणि रोजगार निर्मितीचे काम सागरी उद्योगाच्या माध्यमातून होत आहे. या परिषदेच्या आयोजनामुळे जागतिक सागरी उद्योगातील गुंतवणूकनावीन्यपूर्ण तंत्रज्ञानधोरणात्मक उपक्रम आणि सहकार्य यासाठी व्यासपीठ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

            महाराष्ट्र हे पश्चिम भारतातील सागरी व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे केंद्र असल्याचे सांगून मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या सागरी मार्गाचे महत्व आहे. आजही मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर ही दोन प्रमुख बंदरे अनेक वर्षांपासून देशाच्या सागरी व्यापारात मोठे योगदान देत आहेत. याशिवाय जेएसडब्लू जयगडआंग्रेदिघीकारंजा टर्मिनल बंदरेही चांगली प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रधान सचिव श्री. नैनुटिया म्हणाले कीराज्याला लाभलेल्या सागरी किनाऱ्यामुळे या क्षेत्राच्या विकासाच्या अनेक संधी येथे उपलब्ध आहेत. मालवाहतूकप्रवासी वाहतूक याबरोबरच विविध पर्यटन संधी विकसित करत आहोत. त्यासाठी येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक सहकार्य करण्याची भूमिका बंदरे विभागाची आहे.

            पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती भोज म्हणाल्या कीदेशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६ टक्क्यांहून अधिक वाटा पर्यटन क्षेत्राचा आहे. सागरी पर्यटनास यापुढील काळात अधिक संधी आहे. येथील सागरी किनारेआयलंड्सक्रूझवॉटर स्पोर्टस् यामध्ये संधी आहे. मुंबईच्या बाहेर कोकण किनारपट्टीत पर्यटन वाढत असल्याचे त्या म्हणाल्या.

            या चर्चासत्रात कारंजा टर्मिनलचे के. व्ही. नटराजनजेएसडब्लू जयगड पोर्टचे के.के. दवेयोगायतन पोर्टचे अमेय प्रताप सिंगवेस्ट कोस्ट मरीन याक सर्व्हिसेसचे आशिम मोंगियाअदानी पोर्टचे नीरज बन्सल आणि कपिल खंडेलवालपोर्ट ऑथोरिटी ऑफ बार्सिलोनाच्या कार्ला सल्व्हाडो यांनीही सहभाग घेतला. चर्चासत्राच्या सुरुवातीला डॉ. गुरसळ यांनी सहभागी मान्यवरांचे स्वागत केले.

. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा

-पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 

दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

चंद्रपूरदि. 17 : ‘नागपूर आणि चंद्रपूर हा परिसर जगात ‘टायगर कॅपीटल’ म्हणून ओळखला जात असला तरी या दोन्ही जिल्ह्यांत बाबासाहेबांनी 1956 सालीच वाघाची डरकाळी दिली आणि संपूर्ण देशाने ही डरकाळी ऐकली आहे. या महामानवाने दिलेल्या संविधानात स्वातंत्र्यअधिकारजबाबदारी आणि कर्तव्याचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा व त्यातून जगण्याची प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन राज्याचे वनेसांस्कृतिक कार्यमत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल ट्रस्टच्यावतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार सुधाकर अडबालेकिशोर जोरगेवारसुभाष धोटेप्रतिभा धानोरकरसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकरसचिव वामनराव मोडकगोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

 

देशात आज 750 पेक्षा जास्त जिल्हे आहेतमात्र नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचे विशेष महत्त्व आहेअसे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तर दोन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हे दोन्ही जिल्हे आज वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. पण 1956 मध्येच बाबासाहेबांची डरकाळी संपूर्ण देशाने ऐकली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसारच देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू आहे. संविधानात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला आहे. व्यक्ती स्वातंत्र्यअधिकार यासोबतच प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची आणि कर्तव्याचीसुध्दा जाणीव करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे केवळ स्मरण करून थांबू नये तरत्यांच्या विचारांवर अंमल करावे लागेल. आणि त्यासाठी प्रत्येकाला संविधानाचे वाचनही करावे लागेल.’

 

महापुरुषांना भारतापुरता मर्यादित समजू नये

भगवान गौतम बुध्दछत्रपती शिवाजी महाराजमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर संपूर्ण जगाला वैचारीक प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘शिकासंघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा जीवन जगण्याचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. गौतम बुद्धांचा शांततेचा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगात पोहचला आहे. केंद्र शासन आज बुद्धगयानालंदाविक्रमशिलासारनाथकपिलवस्तूराजगीरवैशालीश्रावस्ती या ठिकाणांना जोडणारे बुद्ध सर्किट तयार करीत आहे,’ असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

एस.एन.डी.टी. विद्यापीठ आणि चंद्रपूर फ्लाईंग क्लब ठरणार विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर

कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी चंद्रपूरमध्ये एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. तसेच आगामी काही महिन्यातच चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनुसूचित जातीअनुसूचित जमातीइतर मागास प्रवर्ग आदी विद्यार्थी–विद्यार्थीनींसाठी या बाबी गेमचेंजर ठरणार आहेतअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे स्थापण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्यपालांच्या हस्ते पूजन करून शुक्रवारी होणार रवाना मुंबई, दि. १८ ऑक्टोबर २०२३ :

 जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे स्थापण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्यपालांच्या हस्ते पूजन करून शुक्रवारी होणार रवाना

मुंबईदि. १८ ऑक्टोबर २०२३ :

जम्मू काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा येथे स्थापण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. रमेश बैंस यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी दि. २० ऑक्टोबर रोजी राजभवन येथे करून हा पुतळा कुपवाडाच्या दिशेने रवाना करण्यात येणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित असणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून “आम्ही पुणेकर” या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात येत आहे. राजभवनात होणाऱ्या कार्यक्रमात “आम्ही पुणेकर” संस्थेचे अध्यक्ष श्री हेमंत जाधव आणि विश्वस्त श्री अभयराज शिरोळे हे या उपक्रमाविषयी माहिती देणार आहेत. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहाय्य केले जाईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी पार पडले आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे. सदर संस्थेतर्फे कुपवाडा येथे भारतीय सैन्यासोबत विविध दीर्घकालीन उपक्रम प्रस्तावित असून त्याची माहिती संस्थेतर्फे पत्रकारांना दिली जाईल. मुंबईतील राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदादिल्ली मार्गे रस्त्याने प्रवास करून साधारण दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल. वाटेत बडोदा येथे आणि नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात या पुतळ्याचे स्वागत – पूजन स्थानिक नागरिकांतर्फे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वाटेत ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे स्वागत विविध संस्था व स्थानिक नागरिक करणार आहेत.

 

मिनाक्षी देवी वर फुलांचा वर्षाव ..एक अद्भुत नजारा मदुराई .👌 pl share


 

यह है मां शारदा देवी का सेश मे मंदिर पल शेअर, अद्भुत, आलोकिक,pl share



 

Featured post

Lakshvedhi