Sunday, 15 October 2023

सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ मानी, अलिबाग रायगड


 सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ मानी

Shwasachi किंमत

 


आरक्षण को लेकर क्यूरेटिव पिटीशन दाखिल करने को सुप्रीम कोर्ट राजी मराठा समाज को आरक्षण दिलाने के राज्य सरकार के प्रयासों को मिला बल

 मराठा आरक्षण को लेकर क्यूरेटिव पिटीशन दाखिल करने को सुप्रीम कोर्ट राजी

मराठा समाज को आरक्षण दिलाने के राज्य सरकार के प्रयासों को मिला बल


             मुंबईदि. 14: मराठा समाज को आरक्षण दिलाने के लिए राज्य सरकार द्वारा सुप्रीम कोर्ट में दायर की गई क्यूरेटिव याचिका को सुप्रीम कोर्ट ने दाखिल करने पर सहमति जताई है। यह मराठा समाज को आरक्षण दिलाने के राज्य सरकार के प्रयासों की सफलता है। राज्य सरकार की ओर से दायर की गई क्यूरेटिव याचिका पर मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ ने सुनवाई करने पर सहमति जताई है. ऐसे में मराठा समाज को आरक्षण दिलाने की राज्य सरकार की कोशिशों को बल मिला है।


             कल राज्य सरकार के सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ वकील मनिंदर सिंह ने यह क्यूरेटिव पिटीशन दायर कर सुप्रीम कोर्ट से इस पर सुनवाई करने का अनुरोध किया। इस पर सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ ने कहा कि हम यह याचिका दायर करने और इस पर सुनवाई करने के लिए तैयार हैं।


             मई 2021 में सुप्रीम कोर्ट की पांच जजों की बेंच द्वारा सुनाए गए फैसले के कारण मराठा आरक्षण रद्द हो गया था। पांच सदस्यों ने मराठा समाज के आरक्षण संबंधी मामले को सुनने के बाद अपने आदेश में आरक्षण को रद्द करते हुए स्पष्ट कर दिया था कि मराठा समाज को आरक्षण देना संभव नहीं है। उसी फैसले पर पुनर्विचार हो इसलिए यह क्यूरेटिव याचिका दायर की गई है।


             राज्य सरकार ने वर्ष 2018 में एसईबीसी अधिनियम के तहत मराठा समाज को आरक्षण दिया था। लेकिन मई 2021 में सुप्रीम कोर्ट ने इसे रद्द कर दिया था। उस समय राज्य सरकार द्वारा मराठा समाज को शिक्षा और रोजगार में दिया गया आरक्षण इस फैसले के कारण रद्द हो गया था।  मराठा समाज सामाजिकशैक्षणिकआर्थिक रूप से पिछड़ा हैयह साबित न हो पाने के कारण कोर्ट ने इस आरक्षण को रद्द घोषित कर दिया था। लेकिन अब सुप्रीम कोर्ट ने  क्यूरेटिव पिटीशन पर सुनवाई के लिए तैयार हो गया हैतो मराठा समाज को आरक्षण दिलाने की राज्य सरकार की कोशिशों को बल मिल गया है।

भारत 2036 च्या ऑलिंपिक साठी सज्ज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2029 मधील युवा ऑलिंपिकच्या संयोजनाची तयारी चार दशकानंतर भारतात होणाऱ्या 141 व्या अधिवेशनाचे उद्घाटन

 



भारत 2036 च्या ऑलिंपिक साठी सज्ज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

2029 मधील युवा ऑलिंपिकच्या संयोजनाची तयारी

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या 141 व्या अधिवेशनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 14:-  'खेळ हे पदक जिंकण्यासाठी नसतात. तर खेळातून हृदय जिंकले जाते. खेळात जगाला जोडण्याची क्षमता असते असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत 2036 मधील ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनासाठी सज्ज असल्याची निःसंदिग्ध ग्वाही दिली. त्यांनी 2029 मध्ये होऊ घातलेल्या युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची तयारी दर्शवली. 

 

            आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या 141 व्या अधिवेशनाचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय प्राचीनत्वाच्या खुणा आणि वैविध्यपूर्ण परंपरा आणि कलानृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देणारा नजराणाच जगभरातील प्रतिनिधीसमोर सादर करण्यात आला. या सादरीकरणाने बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर दुमदुमून गेले. 

 

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणालेभारत वेगाने वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. आमच्याकडे उत्तम पायाभूत सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे संयोजन केले आहे. भारताला जी-20 चे अध्यक्षपद मिळाले. या काळात आम्ही भारतातील विविध शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. आता कोट्यवधी भारतीय जनतेला ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची संधी मिळावी अशी आस लागून राहिली आहे. आम्ही 2036 मधील ऑलिंपिकचे यशस्वीपणे संयोजन करू शकतो असा विश्वास आहे. या दरम्यान होऊ घातलेल्या 2029 मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेच्या संयोजनाची देखील आमची तयारी आहे. भारतीयांच्या या आकांक्षेचीस्वप्नाची आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती दखल घेईल असा विश्वासही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

 

            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भारतातील प्राचीन क्रीडा परंपरेचा देखील आढावा घेतला. ते म्हणालेभारतातील गावागावांत विविध खेळांची परंपरा आहे.  या गावात प्रत्येक सणाला वेगवेगळ्या खेळ खेळण्यांची प्रथा आहे. आमची क्रीडा परंपरा समृद्ध आहे. प्राचीन ग्रंथामध्ये 64 विद्यांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये अश्वारोहणधनुर्विद्याजलतरण आणि मल्लविद्या यांचा समावेश आहे. धनुर्वेद अशी स्वतंत्र संहिता आहे. कच्छ येथील उत्खननात धौलाविरा परिसरात पाच हजार वर्षांपूर्वीचे प्रेक्षागृह आढळले आहे. राक्षीगढी येथेही असे जुने अवशेष सापडले आहेत. खेळात कुणी हारणारा नसतो. तर खेळाडू हा विजेता आणि शेवटपर्यंत शिकणारा असतो याचा उल्लेख करून आणि भारत  हा वसुधैव कुटुंबकम् ची संकल्पना मांडणारा देश असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. 

 

            भाषणाच्या सुरुवातीलाच प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाचा उल्लेख केला. तसेच 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने क्रिकेटचा ऑलिंपिक मध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही त्याबाबत लवकरच सकारात्मक बातमी ऐकण्याची आशा करत आहोत असा आशावाद प्रकट केला. याचवेळी त्यांनी अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करतभारतीय संघाचे अभिनंदन केले. 

 

भारताला 40 वर्षांनंतर दुसऱ्यांदा तर मुंबईला पहिल्यांदाच या अधिवेशनाच्या संयोजनाची संधी मिळाली आहे. 15 ते 17 ऑक्टोबर2023 या कालावधीत हे अधिवेशन होत आहे. 

 

            अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकरक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. 

 

            आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यासह जगभरातील ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारीसदस्य आदी उपस्थित होते. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा,  आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती नीता अंबानी तसेच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह तसेच क्रीडा तसेच कला व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

            आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष श्री. बाख यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून खेळ आणि क्रीडा क्षेत्राच्या योगदानाबद्दल भाष्य केले. ते म्हणालेपॅरीसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक 2024 मध्ये शांतीसलोखा आणि संवाद यासाठी प्रयत्न करण्यासाठी जी -20 च्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या पुढाकाराचे स्वागत करायला हवे'

श्री. बाख यांनी क्रीडा क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयच्या परिणामकारक वापराबाबतही मांडणी केली. 

 

            सुरवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती अंबानी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, 'एक मुंबईकर म्हणून या अधिवेशनासाठी जगभरातील क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे.  'वसुधैव कुटुंबकम्हे ब्रीद घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जी-20 च्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सहकार्याने भारतात मुलांसाठी शिक्षण आणि क्रीडा यांचा मेळ साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. जगभरातील कोट्यवधी आणि भारतातील 2 कोटीहून अधिक मुलांपर्यंत ऑलिंपिक व्ह्यॅल्यु एज्युकेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून क्रीडा कौशल्य पोहचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

            तत्पूर्वीयाच ठिकाणी 12 ते 14 ऑक्टोबर2023 दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न झाली.

 

0000

 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य







वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांची भावना

 

ब्रिटनवरून परतल्यानंतर चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत

नागपूरपासून जामवरोराभद्रावतीपडोली या ठिकाणी नागरिकांचा जल्लोष

 

चंद्रपूरदि.१४- छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय कार्य आहेअशी भावना राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. महाराजांच्या वाघनखांना भारतात आणण्यासाठी ब्रिटन सरकारसोबत करार झाल्यानंतर ना. श्री. मुनगंटीवार प्रथमच चंद्रपुरात दाखल झाले. त्यानिमित्ताने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदनाचा सोहळा आयोजित करण्यात आला.

 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यापासून तर चंद्रपूरला येईपर्यंत नागपूरजामवरोराभद्रावतीपडोली आदी ठिकाणी नागरिकांनी जल्लोष केला. अनेकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर चंद्रपुरात भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हरीश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,राहुल पावडे भाजपा महानगर अध्यक्ष ,चंदन सिंग चंदेल माजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष,देवराव भोंगळे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष,अतुल देशकर माजी आमदार माजी आमदार संजय धोटेमाजी आमदार सुदर्शन निमकर,विजय राऊत,नामदेव डाहुले,रामपाल सिंगसंध्याताई गुरनुले,अल्काताई आत्राम,रेणुकाताई दुधे,विवेक बोढे,आशिष देवतळे,रमेश राजुरकरअंजलीताई घोटेकर,सुभाष कासनगोटूवार,ब्रिजभुषण पाझारे आणि अनेक सामाजिक संस्थांनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

चंद्रपूर येथील विश्रामगृहात जिल्हाधिकारी विनय गौडा,पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशीजी. प .मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सनउपविभागीय अधिकारी मुरुगनंथम यांनी स्वागत केले.

 

कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेले स्वागत आपल्या निरंतर स्मरणात राहणार आहेअशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मनातील स्नेहभाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेला आदर दर्शवित होता. चंद्रपूर जिल्हा भाजपातर्फे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी सत्कार व स्वागतासाठी आभार मानले. ‘तुमच्यासारखे कार्यकर्तेउत्साहाने शुभेच्छा देणारे शिवभक्त माझ्या जिल्ह्यात आहेतयाचा मला मनापासून आनंद आहे. हा उत्साह मी बघू शकतो यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो,’ या शब्दांत त्यांनी आभार मानले.

 

त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आता ब्रिटनमधील संग्रहालयासोबत करार झाला आहे. तीन वर्षांसाठी आपल्याला वाघनखे मिळणार आहेत. चंद्रपूरकराच्या हातून हे कार्य घडले याचा मला अभिमान आहे. लंडनला गेल्यावर मला आपल्याच देशात असल्यासारखे वाटले. तेथील सर्व शिवभक्त प्रेमाने एकत्र आले होते. सामंजस्य करार करण्यासाठी जात असताना ढोल ताशे वाजत होते. महिलांचा उत्साह बघायला मिळाला. भगव्या फेट्यांमधील शिवभक्त बघून तर मनात अभिमानाचे भाव होते. हे संपूर्ण वातावरण बघितल्यावर आपले जीवन सार्थकी लागल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली.

 

’ ते पुढे म्हणाले, ‘ब्रिटनवरून जपानला गेलो. तिथे कोबे नावाच्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारताच्या वीर पुरुषांची ऐतिहासिक वारसा व पराक्रम बघून खूप अभिमान वाटत असल्याची भावना जपानी लोकांनी व्यक्त केली.’

 

हे तर चंद्रपूरचे भाग्य

आपल्याला अनेक चांगले निर्णय आणि उपक्रम करण्याची संधी मिळाली हे चंद्रपूरचे भाग्य आहे. गेल्यावर्षी खातेवाटप होताच सर्वांत पहिले आपण हॅलो ऐवजी वंदे मातरम् चा आदेश काढला आणि तो सर्वांनी आनंदाने स्वीकारला. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच आपण महाराष्ट्राला राज्य गीत दिले. अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्रांच्या मंदिरातील मुख्य प्रवेश दारासाठी आणि खिडकीसाठी आपल्या जिल्ह्यातील सागवान काष्ठ पाठविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा या संसद भवनाच्या इमारतीतील प्रत्येक दार चंद्रपूरच्या सागवन काष्ठाने तयार झाला आहेही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

धर्माचा नव्हे विचारांचा विरोध

५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहेअसे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीदमाजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही. अफजलखानाला आम्ही अत्याचाराच्या थर्मामीटरमध्येच मोजतो,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले.

 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘सुधीरभाऊ आगे बढो’

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी पाठपुरावा सुरू केला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी अतिशय आनंदाने प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘सुधीरभाऊ आप आगे बढो… सरकार तुमच्या पाठिशी आहे.’ त्यानंतर ब्रिटीश एअरवेजने निघालो तेव्हा एका ईश्वरीय कार्यासाठी जात असल्याची भावना माझ्या मनात होती. कारण वाघनखाने एका व्यक्तिला मारले नव्हते तर हिंदवी स्वराज्य संपविण्यासाठी आलेला एक विचार संपवला होता,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

रत्नजडित छत्रपालखी अन् पुतळा

राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांच्या हातून पोंभूर्णातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणार असल्याचेही सांगितले.

 

अभी तो सिर्फ झाकी है!

मी भाजपचे काम करत येथवर पोहोचलो. पक्षाने जे दिले ते आनंदाने स्वीकारले. प्रदेशाध्यक्ष झालोमंत्री झालो. पण पदासाठी नेत्यांना कधीच भेटलो नाही. पक्षाने मला सांस्कृतिक कार्य विभाग दिल्याचा खूप आनंद आहे. त्यामुळे आज अनेक निर्णय करता येत आहे. मात्र एवढ्यावर काम थांबलेले नाही. अजून महाराष्ट्रात जगातील सर्वांत सुंदर असे संग्रहालय करण्याचा विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवारही भारतात आणायची आहे. अभी तो सिर्फ झाकी है… अभी पुरा काम बाकी है,’ असा निर्धार ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

 

लंडनमध्ये महाराजांचा पुतळा

ना. श्री. मुनगंटीवार यांनी लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘लंडनमधील भारतीय नागरिकांनी त्याठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झाला पाहिजे अशी मागणी केली. मी म्हणालो जागा द्यालगेच कामाला लागू. लंडनमध्ये १६ खासदार भारतीय वंशाचे आहेत. पुतळ्यासोबत  लाईट-साऊंड कार्यक्रम सुद्धा करण्याची तयारी केली आहे. आता तेथील खासदार पुढाकार घेऊन कामाला लागले आहेत.’

 

'त्यावेळी मला मनापासून आनंद झाला’

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रिटनमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमातील आठवण सांगितली. ते म्हणाले, ‘तेथील शिवभक्तांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग होता. या भेटीत महाराज वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचाही प्रसंग होता. पण ज्यावेळी अफजलखानाची भूमिका साकारणारा कलावंत ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा द्यायला लागलात्यावेळी मला कमालीचा आनंद झाला.’

 

For Sudhir Mungantiwar Media Team

- Rajesh Prabhu Salgaonkar

Media Advisor

कोहळा आणि महत्वाच्या गोष्टी -

 कोहळा आणि महत्वाच्या गोष्टी

-


*कोहळा आणि महत्वाच्या गोष्टी* 


*कोहळा*( *माहिती* )


------------------------------

घरात दुकानात अथवा व्यवसायाचे ठिकाणी असणाऱ्या , येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो.

------------------------------------------------

*कोहळा लावण्याची योग्य पध्दत*

-----------------------------------------

कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा धुवावा.

त्याच्या 2 समोरासमोरच्या बाजुला ऊँ व स्वस्तिक काढ़ायचे असते. स्वस्तिक कुंकवाने काढावे. व ऊँ अष्टगंधाने काढावे.

त्यानंतर खालपासुन वर पर्यंत काजळाने एक रेघ ओढ़ावी. त्यानंतर कोहळा देवाजवळ ठवुन त्याची पूजा करावी.( हळद, कुंकू, अक्षदा, दिवा ,अगरबत्ती ) त्यानंतर प्रार्थना करताना घरात असणाऱ्या ,

येणाऱ्या वाईट शक्ति व नजरदोष यापासुन सगळयांचे रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. आणि घरात व घराबाहेर ते कोहळे शिंकाळयात टांगावे.

कोहळा टांगल्यानंतर कधी कधी आठ दिवसाच्या आत खराब होतो. कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशा वेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते. असे ज्या वेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा.

पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचीत सुरवातिला लवकर लवकर खराब होतो ( जर अशुभ ऊर्जा जास्त साठली असेल तर....)

नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो.

तरी पण जर सोमवती किंवा शनिअमावस्या किंवा दिवाळी अमावस्या हया वेळी कोहळा खराब नाही झाला तरी बदलावा .

एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा. व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरुन आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ति त्याच्या खालुन आली पाहिजे.

कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ति रहात नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ति जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्या बद्दल जर ईर्षा बाळगून असेल तर ते मनातले भाव निगेटीविटि मधे बदलतात व त्याचा परिणाम घरात व्यक्तिवर होतो

चिडचिड वाढते,व्यवसायात अडचणी येतात. प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा परिणाम करत नाही.

एक कोहळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ति त्या खालुन आली पाहिजे त्यामुळे कोहळा तिथेच त्या व्यक्तीच्या वाईट विचारावर परिणाम करतो

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ

 मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ

 

            मुंबईदि. 14 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. 

 

            काल राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंह यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेऊन त्यावर सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. त्यावर 'आम्ही ही याचिका दाखल करून त्यावर सुनावणी घ्यायला तयार आहोतअसे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले. 

 

            मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. सदस्यांनी याबाबत सुनावणी घेऊन मराठा समाजासाठीचे आरक्षण रद्द करत मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. त्याच निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

            राज्य शासनाने 2018 साली एसईबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले होते. त्यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये राज्य शासनाने दिलेले आरक्षण या निर्णयामुळे रद्द झाले होते. मराठा समाज सामाजिकशैक्षणिकआर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होऊ न शकल्यामुळे न्यायालयाने हे आरक्षण  रद्दबातल ठरवले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका ऐकून घेण्यास होकार दिल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

 

००००

 


Featured post

Lakshvedhi