Saturday, 14 October 2023

ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत

 ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागतभारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर

 

 

नागपूरदि १३ : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूरवर्धानागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

 

विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमापेशवेकालीन टोपीशाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकारभाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाटबंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूरविष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावारमाजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटेसुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारेजयंत कावळेराजू मुक्कावार,सचिन बोगावारस्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.

 

यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.

 

लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाहीअसे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

 

भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेलअसे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

भव्य ग्राहक पेठ दीपावली निमिंत्त

 


राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फेमुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फेमुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

 

            मुंबईदि. १३ :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे महाराष्ट्रातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबइतील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या संघटनांच्या पाच ते सहा सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यांसह सुनावणीस उपस्थित रहावे, असे सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी कळविले आहे.

            राज्यातील लोधलोधालोधीबडगुजरवीरशैव लिंगायतसलमानीसैनकिराडभोयर पवारसूर्यवंशी गुर्जरबेलदारझाडेडांगरी व कलवार या जाती समूहांचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

००००

रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.. 😂 😄 😅 😜


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 *कांही लोक whatsapp वर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात....*

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

*असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.*

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

*'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'*

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की, गाड़ी हालवून सांगू शकतात ....

की गाडीत पेट्रोल किती आहे ?

😎😜😜😜😜


🌹 ट्रेनच्या आंतल्या गर्दीच्या 'चक्रव्यूहा' ला भेदण्याचं जे कौशल्य या "नमकीन अथवा शहाळी" विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.

😊😛😖😆😉😄


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, *आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?*

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा *खात्या पित्या घरातला असावा.....*

आणि दूसरी

तो *पिणारा - खाणारा नसावा ....*

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


*गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....*

आणि

*चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,*

😂😜😂😜😂😭😜


*🌹जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।🌹*

🙏🤗🙏🤗🙏🤗🙏

लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.१३ : राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे. सुसज्ज दिव्यांग अद्यावत कार्यशाळा, यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यातील दिव्यांगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मान्यतेने राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात विविध स्वरुपाची तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. औद्योगिक उद्योगांना त्यांच्या मागणीप्रमाणे प्रशिक्षण व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पुरविणारी संस्था म्हणजे आयटीआय अशा संस्थांमध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. दिव्यांगांकरीता भारत सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (आरपीडी अॅक्ट २०१६) निर्माण केला आहे. या प्रमाणे एकूण लोकसंख्येच्या ८ ते १० टक्के दिव्यांगांची संख्या आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांगांकरीता स्वतंत्र आयटीआय सुरु करावयाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे, समाजातील मुख्य प्रवाहामध्ये दिव्यांगांनी यावे याकरीता ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभी करण्यात आली आहे.


            संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ (बु.), जि.लातूर या संस्थेत राज्य तथा केंद्र शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली असून सन २०२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. व्यवसाय निहाय प्रवेशपात्र दिव्यांगाने प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावयाचा आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकींग, कम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) हे व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. संस्थास्तरावर प्रवेश घ्यावयाचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर, २०२३ आहे.


            प्रवेशासाठी टीसी, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉनक्रिमीलेअर सर्टीफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमिसीअल सर्टीफिकेट, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

कोळी समाजाचे प्रश्नसोडविण्यासाठी सहकार्य करणार

 कोळी समाजाचे प्रश्नसोडविण्यासाठी सहकार्य करणार

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील महादेव कोळीटोकरे कोळीमल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेवटोकरे कोळीमल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळणे या विषयाबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली.

            या बैठकीस आमदार रमेश पाटीलआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडमहसूल विभागाचे सहसचिव जमीर शेखसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागूलकोकण विभागीय उपायुक्त अनिल साखरे आदी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याआदिवासी विकास मंत्री यांच्याकडे राज्यातील महादेव कोळीटोकरे कोळीमल्हार कोळी या जमातीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पाठविण्यात येईल. मंत्री आदिवासी विकास विभाग याबाबत बैठक घेतील. त्यांच्या बैठकीतील निर्णयाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविला जाईल. मुख्यमंत्री यांच्याकडे आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व महसूल विभाग यांची याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. या समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय हा धोरणात्मक असेल.

००००

हरविलेल्या 19 हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलीसांच्या प्रयत्नांमुळे यश

 हरविलेल्या 19 हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना

परत मिळविण्यात पोलीसांच्या प्रयत्नांमुळे यश

 

            मुंबईदि. 13  : राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पणपोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेतअशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.

            राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली व महिला हरविल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलामुली हरविल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिलेचा कसून शोध घेतात. तपासासाठी आवश्यक पर्यायांचा उपयोग करीत महिलेला शोधून घरापर्यंत आणण्यात येते.

            राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभाग कटिबध्द आहे.

0000

Featured post

Lakshvedhi