Friday, 13 October 2023

पत्नी नावाची जिवंत देवी....*

 *पत्नी नावाची जिवंत देवी....*


बायको जर नसेल तर

राजवाडा पण सुना आहे

बायकोला नावं ठेवणे हा 🙅‍

खरंच गंभीर गुन्हा आहे !! 🙅


💁 खरं पाहिलं तर तिच्याशिवाय

🍃 पानही हालत नाही.....

घरातलं कोणतंच सुख

बायको शिवाय फुलत नाही !! 💃


💁 नोकरी अन पगाराशिवाय

नवऱ्याजवळ आहे काय ?? 🙆

तुलनाच जर केली तर

सांगा, तुम्हाला येतं काय ?? 🙇


💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡

बायकोमुळेच असतं.....

नवरा नावाचं विचित्र माणूस

तिलाच हसत बसतं !!


वय कमी असून सुद्धा

बायको समजदार असते..... 👩👱

बायकोपेक्षा नवऱ्याचे वय 👴👨

म्हणूनच जास्त असते !!


💁 तिचा दोष काय तर म्हणे

चांगल्या सवयी लावते !!

कुटुंबाच्या कल्याणासाठी 🏃

दिवस रात्र धावते !!


🙅 चिडत असेल अधून मधून

सहनशीलता संपल्यावर;

तुम्हीच सांगा काय होणार

चोवीस तास जुंपल्यावर ??


बायकोची टिंगल करून

फिदी फिदी हसू नका..... 😁

तिच्या यादीत मूर्ख स्थानी

नंबर एक वर बसू नका..... 🙇


💁 बायको म्हणजे अंगणातला

प्राजक्ताचा सडा !! 🌸🌼🌺

बायको म्हणजे पवित्र असा

अमृताचा घडा !!⚱


बायको म्हणजे सप्तरंगी 🌈

इंद्रधनुष्य घरातलं !!

देवासाठी गायलेलं

भजन गोड स्वरातलं !! 🎶


🙎 नवरोजी 💁 बायकोकडे

माणूस म्हणून पहा.....

तिचं मन जपण्यासाठी

थोडं शांत रहा..... 😷🙅‍


कधीतरी कौतुकाचे

दोन शब्द बोलावे 🙋

तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी

आनंदाने झेलावे !! 🙆


🙏🙏 *घरासाठी झटणाऱ्या सर्व देवी समान गृहिणींना मनापासून समर्पित*

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत

विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 12 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषक आहार दिला जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा अंड्यासह पोषक तत्व आणि विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन हा आहार तयार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

            प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीचे नाव शालेय पोषण आहार योजना) सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. बुधवारी (दि.11) सायंकाळी या समितीची बैठक मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य तथा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरकोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकरपुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे डॉ. प्रसाद कुलकर्णीव्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे कार्यवाह नितीन वाळकेप्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना गडचिरोलीचे अधीक्षक वैभव बारेकरप्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे, तर योजनेचे राज्य समन्वय अधिकारी देवीदास कुलाळसहसचिव इम्तियाज काझीअवर सचिव प्रमोद पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीविद्यार्थ्यांना आहारातून पोषक तत्वे मिळावीत. त्याचबरोबर त्यांनी ते पदार्थ आवडीने खावीत हा विचार करून पाककृती निश्चित कराव्यात. यासाठी दररोज वैविध्यपूर्ण आहार निश्चित करून त्यात दाळ-भात आणि खिचडी बरोबरच हिरवा वाटाणाव्हेज पुलावसोया चंक्समसाले भातवांगी भातनाचणी सत्वभगरशेवगा आदींचा समावेश करावा. जे विद्यार्थी अंडे खातात त्यांना आठवड्यातून एकदा अंडे द्यावे. तसेच अन्य विद्यार्थ्यांना केळीचा पर्याय ठेवावा. आहारात या पदार्थांबरोबर एका गोड पदार्थाचा देखील समावेश करावा. शाळांमध्ये परसबाग आवश्यक करण्यात आली आहे. यातील भाज्या आणि सलादचा देखील आहारात समावेश करावाअसे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी दिले. यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेफ विष्णू मनोहर यांनी काही पाककृती तयार केल्या आहेत. त्यापैकी केंद्र शासनाच्या निकषात बसणाऱ्या पदार्थांचा देखील आहारात समावेश करण्यात यावाअसेही त्यांनी सांगितले.

            सध्या जेथे केंद्रीय स्वयंपाकगृह आणि बचत गटांमार्फत आहाराचा पुरवठा करण्यात येतो त्यातील पोषण तत्व आणि दर्जाची तपासणी करण्यासाठी समिती सदस्यांना प्राधिकृत करण्याचे निर्देश मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर सदस्यांनी आहार तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण द्यावेअशी सूचनाही त्यांनी केली.

            प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणेगळती थांबविणेपोषणयुक्त आहार पुरविणेआरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे आणि सामाजिक समानता विकसित करण्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्याखासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळावस्ती शाळाअनुदानित अपंग शाळामहात्मा फुले शिक्षण हमी योजनेअंतर्गत शैक्षणिक केंद्र या ठिकाणी पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत. राज्यातील 85,648 शाळांमधील एक लाख 65 हजार 103 विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती अवर सचिव श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या 60 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता

 बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या

60 कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता

            मुंबई, दि. 12 : बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामाच्या सुमारे 60 कोटी रुपयांच्या आराखड्यास महसूल विभागाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली. याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

            कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. या कामाच्या प्रस्तावास छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. कामाची रक्कम 15 कोटींपेक्षा जास्त असल्याने सदर प्रस्ताव मान्यतेसाठी उच्चस्तरीय समितीकडे पाठवण्यात आला होता. समितीने या स्थापत्य कामाचा दर व अन्य बाबी तपासून 59 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे.

            दरम्यान, एकात्मिक पायाभूत विकास साधत असताना जिल्ह्याची प्रमुख कचेरी म्हणून ओळख असलेले जिल्हाधिकारी कार्यालय सुसज्ज व सर्व सुविधायुक्त असावेया दृष्टीने या इमारतीचे काम पूर्ण केले जावेअसे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

            मागील आठवड्यात बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बीड जिल्ह्यात प्रथमच सोयाबीन संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्यास देखील मान्यता मिळाली आहे. त्याआधी कृषी भवन उभारण्यास 14 कोटी रुपयेपरळी तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालयकृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय उभारणीच्या कामांनाही मान्यतेसोबतच आता गती मिळत आहे.

००००

चाय गरम, हो जाये सावधान जन हितार्थ


 

लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

 लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

निवडणूक आयोगाने घेतला आढावा

 

            मुंबईदि. 12 : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलियावरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोषसचिव, सुमनकुमार दाससचिवभारत निवडणूक आयोग यांचा समावेश होता. 

            या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले.  यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेसहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळामहाविद्यालयविविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणेमतदार साक्षरता मंडळस्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणेइ. उपयायोजना सुचविल्या.

            राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यातअसे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेचमतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईलअसेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

****

बचतगटाच्या उत्पादनांना जलद, परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार

 बचतगटाच्या उत्पादनांना जलद, परवडणाऱ्या

दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार

– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

टपाल खाते व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

 

            मुंबई, दि. 12 : महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर जनरल (मेल्स आणि बीडी) अमिताभ सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

            टपाल खाते व ‘माविम’ यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना देश-विदेशात विना अडथळा व जलदरित्या आपली उत्पादने पाठवणे आता सहज शक्य होणार आहे. या पुढे जाऊन टपाल विभाग महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्रीसाठी मदत करणार आहे. हा उपक्रम प्रथम प्रायोगिक प्रकल्प म्हणून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर जिल्ह्यात विस्तार करण्यात येईल, असे महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

            या करारमुळे करारामुळे सीएमआरसी या टपाल खात्याच्या वाहतूक बीएनपीएल (BNPL Book  Now Pay Later) व्यवस्था म्हणून काम पाहतील. या व्यवस्थेमुळे सीएमआरसी त्यांच्या कार्यक्षेत्रातील महिलांच्या उत्पादनांची कॅशलेस आणि कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने विक्री करू शकणार आहेत. यामुळे महिलांची उत्पादने महाराष्ट्र राज्यातच नव्हे, तर देश विदेशात पोहचविणे शक्य होणार आहे.

            मंत्री कु. तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माविम’ नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. बचतगटांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. टपाल विभागाची देशभरात १ लाख ६० हजार कार्यालये आहेत. ‘माविम’च्या गटांना पिकअप सुविधा देखील टपाल खात्याकडून पुरविण्यात येणार आहे. या गटांना जास्त सेवा वापरल्यास सवलत देखील देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचतगटांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड  यांनी केले.

            या श्री. सिंग यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अजिंक्य काळे यांनी आभार मानले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी

 शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात उन्नती साधावी

- राज्यपाल रमेश बैस

            नाशिकदि. 12 (विमाका नाशिक) : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन  राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित नाशिक जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

            यावेळी बैठकीस राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघलउपसचिव रवींद्र धुर्जडविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेपोलीस महानिरिक्षक बी. जी. शेखर पाटीलजिल्हाधिकारी जलज शर्मा,  पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शहाजी उमापआदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तलउपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरेउपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्गसहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) देवीदास नांदगावकर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागग्राम सडक योजनामहाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालास शेतकरी उत्पादक कंपन्यांची जोड दिल्यास शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. बेघरांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण भागात या योजनेचा लाभ देताना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनासौर उर्जा योजनेचा लाभही अंतर्भूत करावा. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणीशौचालय सुविधा असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन ऑनलाईन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांना एक विदेशी भाषेचे शिक्षण घ्यावे, अशा सूचना राज्यपाल श्री. बैस यांनी दिल्या.

            यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी जिल्हा परिषदकृषी विभागमहानगरपालिकासमाजकल्याण, आदिवासी विकास वनविभागनगरपालिका प्रशासनमहसूल / पुरवठापाटबंधारे विभागरोजगार हमी योजनाविद्युत वितरण कंपनी यांचा आढावा घेतला.

             विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले कीजिल्ह्यात ५६ हजार १०८ वनहक्क दावे प्राप्त असून त्यापैकी ३२ हजार ५४२ दावे पात्र ठरविण्यात आले आहे. उर्वरित दाव्यांवर कार्यवाही सुरू आहे. झोपडपट्टी भागात एस.आर.ए. योजना राबविण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पैठणी उद्योगसाठी लागणारे रेशीम जिल्ह्यातच उत्पादीत होण्याच्या दृष्टीने रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. गमे यांनी सांगितले.

            यावेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमासोब‍त इतर उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण तसेच अतिदुर्गभ भागातील माता व बालमृत्यू टाळण्यासाठी गर्भवती मातांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रसूतीपूर्वीच रुग्णालयांत दाखल करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दिली. ‘मनरेगा’अंतर्गत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात मिशन भगीरथ प्रयास व मॉडेल स्कूल प्रकल्पांची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिली. आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती गुंडे यांनी शासकीयअनुदानित व एकलव्य आश्रमशाळांची माहिती यासोबतच आदिवासी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.

            बैठकीपूर्वी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणेकुलसचिव भटू प्रसाद पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनिल कुलकर्णीजयदीप निकम आदी उपस्थित होते.

०००००००


Featured post

Lakshvedhi