Friday, 13 October 2023

कौशल्य विकासाद्वारे युवकांची भविष्याकडे वाटचाल

 कौशल्य विकासाद्वारे युवकांची भविष्याकडे वाटचाल

- राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा घेतला आढावा

 

            नाशिकदि. 12 (विमाका नाशिक) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात यशाची शिखरे गाठत आहेत. कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमातून अनेक युवकांना रोजगार मिळतोय. या शिक्षणाद्वारे तरुण पिढी तयार होत असून आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्य शिक्षण हे पारंपरिक पदवीधरांपेक्षा अधिक रोजगारक्षमता निर्माण करतेअसे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आज झालेल्या आढावा बैठकीत राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी आमदार तथा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्य सरोज अहिरेराज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघलउपसचिव रवींद्र धुर्जडविभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणेकुलसचिव  भटू प्रसाद पाटीलव्यवस्थापक मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकमअनिल कुलकर्णीविद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटेअंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर उपस्थित होते.

मुक्त आणि दूरस्थ शिक्षण वंचितांसाठी आशेचा किरण

            राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकासाचा संदेश दिला आहे. झपाट्याने बदलणाऱ्या जगात मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवरील राज्य आहे. विद्यापीठाने राज्यभरातील आणि त्यापलीकडील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम कार्यक्रम आणि कौशल्ये प्रदान करून उच्च शिक्षणातील वारसा कायम ठेवला पाहिजे. यासाठी आपण सर्व एकत्र येऊन असे भविष्य घडवू जिथे शिक्षण ही अमर्याद शक्यता उघडण्याची गुरुकिल्ली असेल. भाषेच्या अडचणी मुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सर्व अभ्यासक्रम मराठी भाषेतून आणावाअशा सूचना सर्व विद्यापीठांना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुक्त विद्यापीठाने वंचित घटकापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवावी

            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने 48 विविध कौशल्य कार्यक्रम सुरू केले आहेत. ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी 61 हजार तरुणांना कुशल केले आहे. जे कौतुकास्पद आहे.  गृहिणीदुकानदारशाळा सोडलेल्या आणि तुरुंगातील लोकांमध्येही उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आणि क्षमता असते. इतर समुदायांच्या तुलनेत आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाची नोंदणी खूपच कमी आहे. येथेही विद्यापीठाने उपयुक्त भूमिका बजावावी. त्यासाठी विद्यापीठाने त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेतअसेही श्री.बैस यांनी सांगितले.

            उच्च शिक्षणाचा खर्च वाढत असला तरीविद्यार्थ्यांची संख्या सध्याच्या 5 लाखांवरून 10 लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2035 पर्यंत उच्च शिक्षण साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या चळवळीत आघाडीवर रहावे. याशिवाययशस्वी अभियंतेवास्तूविशारदसरकारी अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांसोबत मजबूत भागीदारी निर्माण केली पाहिजे. तसेच विद्यापीठाने दूरदर्शी विचाराने  तयार केलेला 25 वर्षांचा आराखडा कौतुकास्पद असून त्याबद्दल श्री बैस यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

विद्यापीठ निर्माण करणार प्रत्येक जिल्ह्यात मधमाश्यांचे गाव

            विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू प्रा. राम ताकवले यांच्या नावाने विद्यापीठाने एक संशोधन केंद्र उभारले आहेही अतिशय चांगली बाब आहे. विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र सुरू करण्याची योजना आखली आहे. विद्यापीठ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मधमाश्यांचे गाव (मधुमाक्षी गाव) निर्माण करणार आहे. विद्यापीठाचा हा निर्णय स्वागतार्ह असून विद्यापीठाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवल्याबद्दल कुलगुरू डॉ. सोनवणे यांचे अभिनंदन राज्यपाल श्री. बैस यांनी केले.

            कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली.

            यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी रेड क्रॉस सोसायटी नाशिकच्या कार्याची माहिती सदस्यांकडून जाणून घेत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी रेड क्रॉस सोसायटी सदस्य डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

0000


 


🤪🤣😇🤔👌 दुरूस्ती केली हो, हे काय कागदपत्र

 🤪🤣😇🤔👌 दुरूस्ती केली हो, हे काय कागदपत्र


भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..

 भारुड: कळणारी भाषा आणि पेलणारे तत्त्वज्ञान..


काट्याच्या अणीवर वसले तीन गाव ।

दोन ओसाड एक वसेचिना ॥


वसेचिना तिथे आले तीन कुंभार ।

दोन थोटे एका घडेचिना ॥


घडेचिना त्याने घडली तीन मडकी ।

दोन कच्ची एक भाजेचिना ॥


भाजेचिना त्यांत रांधले तीन मूग ।

दोन हिरवे एक शिजेचिना ||


शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे ।

दोन रुसले एक जेवेचिना ॥


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||


एक बारीकसा बाभळीसारखा काटा.. त्याचं अणुकुचीदार टोक ते केवढंसं.. त्यावर तीन गावं वसली म्हणे..! त्या गावांची नावं सत्त्व,रज,तम.. किंवा त्रिगुणात्मक प्रकृती. खरं पाहिलं तर एका वेळी, एका ठिकाणी या तिघांपैकी एकच गुण राहू शकतो. तिघांचं असं गुण्यागोविंदाने एकत्र राहणं केवळ अशक्य. त्यामुळे खरं तर ही गावं वसणं केवळ अशक्य! 


माउली म्हणतात.. या गावात पुढे तीन कुंभार आले, मडकी घडवायला! त्या कुंभारांची नावं… ब्रह्मा, विष्णू आणि महेश! हे तीन देव म्हणजे सृष्टी घडवणारे कुंभार! पण उत्पत्ती करणाऱ्याकडे पालनाचा विषय नाही आणि पालन, संहार करणाऱ्याला उत्पत्तीचं ज्ञान नाही. दोन थोटे आहेत आणि एक काही घडवत नाही म्हणून मातीला घटाचा आकार मिळण्याची शक्यताच नाही. 


या न वसलेल्या गावात, न आलेल्या कुंभारांकडून न घडलेल्या मडक्यात तीन मूग रांधले....दोन कच्चे, एक शिजेचिना…स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह रूपी तीन मूग रांधले. त्यापैकी विषयसुख आणि काम क्रोधाने लिंपलेले रज-तम हे कायमच हिरवे, अपरिपक्व राहणार आणि सत्व मूळचा परिपक्व असल्याने शिजण्याचा प्रश्नच येत नाही. 


काहीच शिजत नाही अशा गावात तीन पाहुणे आले… म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य असे तीन काळ आले.

भूतकाळ हा नेहमीच असमाधानी, वर्तमान हव्यासात मग्न आणि भविष्य नेहमीच अनिश्चित.. म्हणून हे पाहुणे जेवलेच नाहीत.. त्यांचं समाधान कधी झालंच नाही.


थोडक्यात, न वसलेली गावं, थोटे कुंभार, न घडलेली मडकी, त्यात न शिजलेले मूग, आणि न जेवलेले पाहुणे या सगळ्या अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी रंगवत रंगवत ही कथा पुढे जाते. 


सुजनहो!

मग, प्रश्न असा येतो, की कशा कळाव्यात या गोष्टी? सर्वसामान्य बुद्धीला न पेलणाऱ्या, न झेपणाऱ्या गोष्टी अशक्य म्हणून सोडून देता येतीलही. 

पण आत्मज्ञान ही अशीच अशक्य वाटणारी गोष्ट मात्र सद्गुरुकृपा असेल तर शक्य होऊ शकते असं माउलींना अखेरीस सांगायचंय. 


ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव ।

सद्गुरूवाचुनि कळेचिना ||


‘आत्मज्ञान ही सहजसाध्य गोष्ट नव्हे; आणि म्हणून हे आत्मज्ञान गुरुकृपेशिवाय मिळणं केवळ अशक्य..’ अध्यात्मशास्त्रातील हा महत्वाचा सिद्धांत मांडण्यासाठी माउली हे भारुड रचतात; सर्वसामान्यांना ‘पेलणारे’ तत्त्वज्ञान ‘कळणाऱ्या’ भाषेत सांगतात...

 

भारुड शब्दाची व्युत्पत्ती:


भारूड या शब्दाच्या दोन व्युत्पत्ती सांगतात. भारुंड नावाचा दोन तोंडांचा पक्षी आहे. भारुड देखील असे ‘द्विमुखी’ असते. सध्या सोप्या लोकवाणीतून बोलणारे, पण वस्तुतः काही शाश्वत सत्य सांगणारे! त्याच्या या द्व्यर्थी स्वभावामुळे, त्याला या दुतोंडी भारुंड पक्षावरून ‘भारुड’ हे नाव मिळालं असावं असं म्हटलं जातं. 

भारुड हा शब्द ‘बहु-रूढ’ या शब्दाचा अपभ्रंश असावा असंही म्हणतात. ’बहुजनांमध्ये रूढ’ असणाऱ्या विषयांवर आधारित रचना किंवा ‘जनसमुदायावर आरूढ असणारे लोकगीत’ म्हणजे भारुड अशीही या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते.


भारूडांचा उगम आणि लोकभूमिका:


गावगाड्यात रुजलेल्या परंपरागत सर्वमान्य व्यक्तिरेखा हे भारुडाचे उगमस्थान आहे. गावात पहाटेच्या प्रहरी ‘वासुदेव’ येतो. हा वासुदेव ‘जागे व्हा’ असे सांगताना नुसतेच डोळे उघडा असे सांगत नाही, तर ज्ञानदृष्टीने जगाकडे पाहण्यास शिकवतो. ‘बये दार उघड’ म्हणणारा ‘पोतराज’ देवीकडे प्रार्थना करतो, हातातल्या पट्ट्याने जणू विकारांवर फटके मारतो. ‘गोंधळी’ हातात संबळ घेऊन जगदंबेचा भक्तिमार्ग रुजवतो. ‘जागल्या’ रात्री गस्त घालतो तेंव्हा नेहमी जागृत राहा, सतर्क रहा याचीच आठवण करून देत असतो. ज्ञानाची दिवटी पेटवणारा आणि अज्ञानाचा अंध:कार नाहीसा करणारा ‘भुत्या’ लोकभाषेत काही सांगत असतो....


मध्ययुगीन काळात, यासारख्या असंख्य लोकभूमिका महाराष्ट्रात वावरत होत्या. जोशी, वाघ्या मुरळी, कोल्हाटी, पांगुळ, सरवदा, दरवेशी, मलंग, भालदार, चोपदार....अशा असंख्य...! महाराष्ट्रीय संतानी या लोकभूमिकांचा समाज प्रबोधनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. या प्रतीकात्मक भूमिकातून रूपकात्मक काव्याची पेरणी केली...यातूनच ‘भारुड’ ही फार मोठी लोकपरंपरा उभी राहिली.


भारूड म्हटल्यावर सर्वात प्रथम आठवतात नाथमहाराज आणि त्यांचं हे भारूड...


‘अग ग ग ग ग विंचू चावला...

विंचू चावला हो…

काम क्रोध विंचू चावला..

तेणे माझा प्राण चालला..’


माणसाला विंचू चावला, तर अत्यंतिक वेदना होतात, हा झाला या ओळीचा सरळ आणि समाजमान्य अर्थ. 

पण, काम क्रोध आदी षड्रिपूंनी विंचवाप्रमाणे दंश केला, तर त्या वेळेपुरती वेदना तर होईलच,  पण आयुष्यभर या विंचवाची नांगी यातना देत राहिल… असा मूळ अर्थाला बाधा न आणता अधिक अर्थ पुढे उलगडत जातो. 

एकनाथ महाराज पुढे म्हणतात, 

‘...या विंचवाला उतारा.. सत्वगुण लावा अंगारा…’

विंचू म्हणजे भौतिक लालसा! यात गुंतलेल्या जीवाला सत्त्वगुणाचा अंगारा लावा, म्हणजेच त्याला परमार्थाकडे न्या.. असे सूचित करणारी, मूळ शब्दाचा केवळ वाच्यार्थ नाही, तर त्यापलीकडील गूढार्थ सांगणारी.. अशी ही बहुअर्थ प्रसवणारी भारुडं!


भारुडात संतकवींची काव्यप्रतिभा खरोखरच बहरला येते. मुळातच, संतकाव्याला मराठी सारस्वतात अभिजात काव्याचा मान आहे. त्यात, संतांनी रचलेली भारुडे म्हणजे, या अभिजात काव्याला नृत्य, नाट्य, संवाद, विनोद, संगीत, निरुपण या सर्वांची कलात्मक आणि रसात्मक जोड! या सर्वामुळे भारुड हा काव्यप्रकार संतकाव्यात एखाद्या मानबिंदूप्रमाणे शोभून दिसला. 


‘आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक..’

सेना महाराजांच्या भारूडातील न्हावी म्हणतोय...अशी हजामत करू, की अविवेकाची शेंडी खुडून टाकलीच समजा…!


‘त्रिगुणाची मूस केली, ज्ञानाग्नीने चेतविली..’

समर्थांच्या भारूडातील जातिवंत सोनाराने, चार पुरुषार्थांच्या विटा लावल्यात, त्रिगुणांची मूस केलीय. सोनार ज्याप्रमाणे अशुद्ध सोने मुशीत घालून तापवतो, त्याप्रमाणे, समर्थांच्या या सोनाराने सर्व कर्मे ब्रह्मार्पण करून मुशीत घातली… ती ज्ञानाग्नीने चेतविली.. लौकिक रुपकाला अलौकिकाचा स्पर्श झाला....


‘सासरा माझा गावी गेला, तिकडंच खपवी त्याला 

भवानीआई रोडगा वाहीन तुला….’

एकनाथ महाराजांच्या भारुडात जीवरूप नारी साकडं घालते भवानीआईला.. तो अहंकाररूपी सासरा खपूदे तिकडेच.. त्या कल्पनारूपी सासूलाही मूठमाती दे. ममतारुपी नणंदेचं द्वेष नावाचं कार्टं किरकिर करतंय...खरुज होऊदे त्याला.. भवानीआई सोडव मला.. रोडगा वाहीन…


हे वाचतांना सहज मनात आलं, श्रीखंड पुरीचा श्रीमंती नैवेद्य नाही अर्पण केला आपल्या लोककवींनी… सर्वसामान्य जनांची जाडी भाकरी, रोडगा... तोच दिला आपल्या आईला…. खरंच … भारूड अभिजनांपेक्षा, बहुजनांच्या सोबत अधिक राहिलं...अधिक रमलं...


किती लिहावं भारुडाबद्दल..? एकट्या नाथांचेच भारुडाचे दीडशे विषय आणि भारुडांची संख्या साडेतीनशे! यावरून आपल्याला संतसाहित्यातील या अमोलिक काव्यप्रकाराची व्याप्ती समजून यावी! 


पेलणारं तत्वज्ञान कळणाऱ्या भाषेत रुजवणाऱ्या सर्व संतकवींचे, विशेषतः एकनाथ महाराजांचे आणि त्यांच्या भारुडांचे स्मरण.. आजच्या नाथषष्ठीच्या पुण्यदिनी!


डॉ अपर्णा बेडेकर..

दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्यसुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

 दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्यसुविधांसह रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


दांडियात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार

            मुंबई, दि. 12 : मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.  


            राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचे आयोजन करण्यात येते. त्यात आयोजकांच्या वतीने अनेकदा प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही आयोजक त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दांडियाचे आयोजन करताना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि आयोजनाच्या जागी सर्व सुविधांनी सुसज्ज, अशी रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांना बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.


            रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक भान विसरून नाचतात. काही वेळेस हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी काही वेळेस घडल्या आहेत. तसेच अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी, अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.


            याबाबत मुंबईतील 'गुजरात समाचार' या वृत्तपत्राचे संपादक नीलेश दवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदन दिले होते. या निवेदनाला अनुसरून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हे निर्देश दिले आहेत.


००००


दांडिया आयोजकों को प्राथमिक स्वास्थ्य


सुविधाओं समेत एम्बुलेंस रखना अनिवार्य


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने राज्य के सभी जिलाधिकारियों को दिए निर्देश


आयोजकों को रखना होगा दांडिया में शामिल होनेवाले नागरिकों के स्वास्थ का ध्यान


           


            मुंबई, दि. 12 :- मुंबई समेत राज्यभर के नवरात्रि के औचित्य पर रास दांडिया का आयोजन करनेवाले आयोजकों को इसमें शामिल होनेवाले लोगों के स्वास्थ का ध्यान रखना होगा. चूँकि राज्य के सभी दांडिया आयोजकों को इस साल आयोजन स्थल पर प्राथमिक स्वास्थ्य सुविधा और एम्बुलेंस तैनात रखना अनिवार्य करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिए है.


            राज्य में नवरात्रि नौं दिन बड़े पैमाने पर रास दांडिया का आयोजन किया जाता है. कई बार राजनितिक दलों के द्वारा भी बड़े पैमाने पर कार्यक्रमों का आयोजन किया जाता है. उसमें आयोजकों की ओर से कई बार प्राथमिक स्वास्थ्य सुविधा भले ही उपलब्ध कराई जाती हो, लेकिन इस ओर कुछ आयोजक अनदेखी करते है तथा ध्यान नहीं देते. इसीलिए दांडिया का आयोजन करते समय प्राथमिक स्वास्थ्य सुविधा और आयोजन स्थल पर सभी सुविधाओं से सुसज्ज, ऐसी एम्बुलेंस तैनात रखना अनिवार्य करने के निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे ने दिए है.


            कई बार लोग रास दांडिया खेलते समय उसी में पूरी तरह से डूब जाते है. कभी-कभी दिल पर अतिरिक्त तनाव आकर दिल का दौरा पड़ने जैसी घटनाएं भी इसके पहले हुई है. साथ ही अनेक जीवनशैली संबंधित विकारों के मरीजों की संख्या में भी वृद्धि हुई है. इसीलिए किसी भी प्रकार की चिकित्सा या आणीबाणी की स्थिति निर्माण होने पर उक्त व्यक्ति को तुरंत चिकित्सा सुविधा उपलब्ध होना जरुरी है. इसी जरुरत को ध्यान में रखते हुए इस बार मुख्यमंत्री ने ऐसी सुविधा सभी आयोजकों को उपलब्ध कराने के निर्देश राज्य के सभी जिलाधिकारियों को दिए है.


           इस संदर्भ में मुंबई के 'गुजरात समाचार' इस समाचार-पत्र के संपादक नीलेश दवे ने मुख्यमंत्री से मुलाकात कर उन्हें इस विषय पर ज्ञापन सौंपा था, इस ज्ञापन के आधार से ही मुख्यमंत्री श्री. शिंदे ने यह निर्देश दिए है.


००००



 


Dandiya Organizers Mandated to Provide Primary Healthcare Facilities


CM Eknath Shinde's directives to all District Collectors


Organisers have to take care of participants


 


      Mumbai, Date 12 : Chief Minister Eknath Shinde on Thursday has instructed all district heads in the state to ensure that dandiya event organizers provide primary healthcare facilities.


            As Mumbai and the rest of the state gear up for the Navratri celebrations, dandiya events are a central attraction. These festive dance events often witness participants losing themselves to the rhythm, sometimes leading to medical emergencies due to excessive exertion. With lifestyle-related ailments on the rise, instant medical attention becomes crucial during such events. Recognizing this need, Chief Minister Shinde has emphasized the importance of equipped ambulances at the venue.


            Dandiya event, which are a hallmark of the Navratri celebrations in Mumbai and across the state, often witness large turnouts. While many organizers, in the past, have provided basic medical facilities, some have overlooked this crucial aspect.


            To ensure the well-being of the participants, Chief Minister Mr. Shinde has now made it mandatory for all dandiya organizer to have primary healthcare facilities, including fully-equipped ambulances, at their venues. This move comes after Nilesh Dave, Editor of the 'Gujarat Samachar newspaper in Mumbai, met t

he Chief Minister and put forth this suggestion.


0000

भरली ओंजळ...एक गृहप्रवेश*स्तुत्य कार्यक्रम

 *भरली ओंजळ...एक गृहप्रवेश*


 एका मराठी सिरयल मध्ये नवरीची गृहप्रवेशाची बदलेली पध्दत पाहिली. 


      ती नवी पध्दत अशी की

धान्याने भरलेल माप हे पायानी न सांडता हाताने त्यातिल चार दाणे घरात टाकायचे.


           हा विचार ज्यांनी मांडला आणि ज्यांनी खरच अशी कृती केली असेल त्या साऱ्यांचे खूप खूप कौतुक.


        जुन्या गृहप्रवेशाच्या पध्दती मध्ये  अन्नाचा अपमान होतो

 धान्याच्या मापट्याला आपण पाय लावतो

 आणि धान्य खाली सांडल्या मुळे वापरले जात नाही


 नवीन पध्दती मध्ये 

      *भावना तीच असणार आहे फक्त कृती बदलणार आहे.* त्या मुळे सर्वाना नविन पध्दत स्विकारण्यात हरकत नसावी 


 ही ओळ खास करून त्या लोकांसाठी आहे जे आजही जुन्या रीतीरीवाजांना कवटाळून बसले आहेत


      याच नव्या पध्दतीमध्ये मी अजून थोडा पुढचा विचार करतो

बघा तुम्हाला पटतो का


चार दाणे तरी का टाकायचे ?

नका टाकू चार दाणे पण 

त्याऐवजी त्या नवरीने भरलेल्या ओंजळीने घरात पाऊल टाकले तर....


नाही समजले ना, थांबा सांगतो सविस्तर


आपल्याकडे धान्याने किंवा फुलांनी भरलेली ओंजळ हे शुभ मानले जाते.

धान्याने भरलेली ओंजळ म्हणजे समृध्दी,भरभराटी चे प्रतिक मानले जाते.

त्यामुळे जर घरात येणाऱ्या नवरीने धान्याने भरलेली ओंजळ घेऊन घरात प्रवेश केला तर तिच्या हाताने घरात समृध्दी आली . 

जे लोक देव मानतात त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर

धान्याने भरलेली ओंजळ घेऊन तुमच्या घरी लक्ष्मी , अन्नपूर्णा आली.


आणि सासू-सासऱ्यांनी ते धान्य नव्या सुनेच्या ओंजळीत टाकावे आणि ती ओंजळ सांडू नये म्हणून  नवरदेवाने त्या हाताखाली ( ओंजळीखाली) आपल्या हाताने आधार द्यावा.

आणि दोघांनी मिळून गृहप्रवेश करावा.


सासू-सासऱ्यांनी धान्य ओंजळीत टाकणे याचा अर्थ असा की घरातील असलेला ,जपलेला समृध्दीचा, भरभराटीचा वारसा सासू- सासरे किंवा मुलांचे आई-वडील हे पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत.

आणि इतका मोठा वारसा ( घराची जबाबदारी) एकट्या सुनेने पेलवण्यापेक्षा दोघानी मिळून पेलावे म्हणून नवरदेवाने खाली आपला हात लावून आधार द्यावा.


    *गृहप्रवेशाच्या पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भावनेला धक्का न लावता  त्याच भावनेने हा नवा विचार मी मांडला आहे, बघा पटतंय का*


*कोणी लिहिलं माहित नाही पण छान वाटले वाचुन.*

Thursday, 12 October 2023

राज्य अधिकारी कर्मचारी यांनी ओळखपत्र दर्शनी भागावर लावणेबाबत


 

पितृपक्ष* 🌸

 🌸   *पितृपक्ष*  🌸


🍱🦅

वडीलांचं रूप घेऊन

कावळा घरी आला

ताटातील मेनू पाहून

बोलाव वाटलं त्याला

🍱🦅

बरं नव्हतं तेव्हा कधीच

आणली नाहीस गोळी, 

आज कशाला वाढतोस रे

ताटात पुरणाची पोळी! 

🍱🦅

विनाकारण भांडत होता

 दिसले खरे रूप, 

कशाला वाढतो मला

आता गावरान तूप! 

🍱🦅

चटणी वर तेलासाठी

 होत नव्हता राजी, 

कशाला वाढतो पात्रावर

वडे आणि भजी!! 

🍱🦅

प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता

नाही दिलीस साथ,

आज कशाला वाढतो रे

पात्रावर वरण भात!!

🍱🦅

जबरदस्ती अंगठा घेऊन

केली घराची वाटणी,

कशाला वाढतो पात्रावर

आज लोणचं चटणी!! 

🍱🦅

हिस्सा वाटणीसाठी केली

 बहिणी संगे दूरी,

आता काय उपयोग वाढून

पात्रावरती पुरी!! 

🍱🦅

आयुष्याभर ठेवली रे

माझ्या बद्दल अढी, 

आता कोण पिणार ती

द्रोणामधली कढी!! 

🍱🦅

वेगळा राह्यलो तेव्हा नाही

दिलास मला धिर, 

आज कशाला वाढतो तू

पात्रावरती खिर!! 

🍱🦅

सणासुदीला आणलं नाही

मला नवं कापड, 

आता कशाला वाढतोय

कुरडई अन् पापड़!! 

🍱🦅

आजारी असताना तू

धुतली ना सतरंजी, 

आता कशाला वाढतो रे

पात्रावर करंजी!! 

🍱🦅

जिवंत असतांना पोरा

दिले असतेस लक्ष, 

तृप्त झाले असते पुर्वज

नसता  पितृपक्ष!! 

🍱🦅

पितरांचा मिळून तयार

होतो  पितृपक्ष, 

बऱ्याच घरात आज मात्र

झाला विरोधी पक्ष!! 

🍱🦅

सांगतोय तू रहा सदैव

जेष्ठांप्रती दक्ष, 

करावं तसं भरावं लागेल

इतिहास देईल साक्ष!! 

🍱🦅

🌸🌸मातृपितृ देवोभव्🌸🌸🙏

👏🌹

Featured post

Lakshvedhi