Wednesday, 11 October 2023

सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !

 सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासापंचनामा करण्याचे शासनाचे आदेश !

 

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

 

राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश

 

 

चंद्रपूरदि. 10 : अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्याआणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केलेया शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वनेसांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार धावून आलेना. मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची वस्तुस्थिती मा. मुख्यमंत्रीमा. कृषिमंत्री यांना अवगत करूनविशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती केली. तसेच राज्याचे मा. कृषिमंत्री व कृषीसचिवांना राज्यातील इतर जिल्ह्यातही अशाप्रकारे नुकसान झाले असल्यास त्या बाबत स्वतः लक्ष देवून आढावा घेण्याबाबत विनंती केली. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलीत म्हणून शासनाने आता राज्यातील सोयाबीनच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे मदत व पुनर्वसन विभागाचे आदेश सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाले आहेत.

या शासन निर्णयामुळे चंद्रपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

जिल्ह्यातील सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत असताना पडलेला पावसाचा खंड व अनियमित हवामान यामुळे जिल्हयात भात सोयाबीन व कापूस या मुख्य पिकांवर किड व रोगाचा प्रादुर्भाव  आढळून आला होता. कृषि विभागामार्फत नियमीतपणे पिकांचे किड व रोगांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक ते तांत्रीक मार्गदर्शन करुन किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.

सोयाबीन पिकावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होवून पिक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर  राज्याचे वने,सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे  पालकमंत्री ना. श्री . सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोनापांढरपौनीहरदोना (खु) येथे तातडीने जाऊन नुकसानग्रस्त क्षेत्राची  प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर यासंदर्भात ना. मुनगंटीवार यांनी  यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले व मंत्रालयात यासंदर्भात पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

 

सोयाबीन पिकावर मुळकूजखोडकूजव रायझेक्टानिया एरीयल ब्लाईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला.  त्याची तातडीने दखल घेत प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत तातडीने मदत देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. त्या अनुषंगाने  प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या जोखिमेच्या बाबींतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा सरंक्षणाच्या 25 % रक्कम तातडीने देण्याबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यात आली व तशा सुचना ओरीयंटल ईन्शूरंस कंपनीस देण्यात आल्या. मा. पालकमंत्र्यांनी सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची कारणमीमांसा तसेच भविष्यातील व उपाययोजना आखण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञाची चमू पाचारण करून वस्तूस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याबाबत सुचित केले. त्या अनुषंगाने डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांनी संयुक्त सर्व्हेक्षण करून शासनास अहवाल सादर केला.

जिल्हयात पावसाची सुरुवात 22 जून पासून झाली असल्याने  हंगामातील पेरण्या उशिराने म्हणजेच जूनच्या शेवटच्या आठवडयात सुरु झाल्या . जून महिन्यात सरासरीच्या 47.9 टक्के जुलै महिन्यात सरासरीच्या 153.8 टक्केऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 52 टक्के व  सप्टेंबर 2023 महिन्यात सरासरीच्या 113.6 टक्के अशाप्रकारे अनियमीत स्वरुपाचा पाऊस पडलेला आहे.

 

            जिल्ह्यामध्ये पावसाचे २ ते ३ मोठे खंड पडल्यामुळे तसेच वातावरणातील व जमिनीतील वाढलेले तापमान व त्यानंतर आलेल्या पावसामुळे प्रामुख्याने चारकोल रॉट व रायझोक्टोनिया करपा या रोगाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले.

अश्या आकस्मिक वातावरण बदलामुळे जास्त कालावधीचेवरील रोगांना संवेदनशील वाण जसे फुले संगम व फुले किमया हे वाण जास्त प्रमाणात बळी पडले.

तसेच काही भागात सुरवातीच्या अवस्थेत खोडमाशी व चक्रभुंगा या किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे मुख्य खोड पोखरल्या जावून जमिनीतील अन्नद्रव्याचे वहन कमी झाले व झाडे अशक्त होवून शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाने पिवळी पडलीत्यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला.

पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणेबाबत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तथा कृषि मंत्री श्री.धनंजय मुंडे यांना पत्राद्वारे विनंती केली होती.

त्यामूळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील सोयाबीन पिकाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर पंचनामे होवून दिलासा मिळणार आहे.

एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

 एअर मिसाईलपॅराग्लाईडर्समायक्रोलाईट

एअर क्राफ्टड्रोनच्या वापरावर बंदी

 

            मुंबईदि. 11 : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या एअर मिसाईलपॅराग्लाईडर्सरिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअरक्राफ्ट,  ड्रोनपॅरा मोटर्सहँण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलूनच्या उड्डाण क्रियांना बृहन्मुंबई हद्दीत 17 ऑक्टोबर पर्यंत बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

            मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाहीसामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाहीअति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाहीसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत. तथापिज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल आहे.

            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

 आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना

आर्थिक मोबदला देण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबई दि. ११ : कोल्हापूरमधील आंबे-ओहोळ प्रकल्पग्रस्त पात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने आर्थिक मोबदला मिळण्यासाठीच्या प्रक्रियेस गती द्यावी.  क्षेत्रातील इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणे मोबदला देण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानेराज्य पुनर्वसन प्राधिकरणासमोर अहवाल सादर करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

            कोल्हापूर जिल्ह्यातील आंबे-ओहोळ मध्यम प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रलंबित विषयासंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

            यावेळी अतिरिक्त उपसचिव श्री. खटवालउपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा शिंगणउपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शक्ती कदम यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीप्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेतप्रकल्पही पूर्ण करण्यात आला आहे.   प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला तातडीने मिळावा यासाठी  सकारात्मक कार्यवाही करावी.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीपात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागल्यास ती करण्यात येईल. नैसर्गिक न्याय तत्वाचा आधार घेऊन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेतअशा पात्र शेतकऱ्यांना तातडीने मोबदला मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी.

भाडेकरूंच्या तपशिलाची सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 भाडेकरूंच्या तपशिलाची सिटीझन पोर्टलवर

ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

 

             मुंबईदि. 11 : समाजविरोधी घटकांकडून सार्वजनिक शांततामानवी जीवनाला गंभीर धोका आणि त्या कारणास्तव खाजगीसार्वजनिक मालमत्तेला इजा होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे. दहशतवादीसमाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्येदंगलीभांडणे आदी घडू नयेत म्हणून घरमालकभाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घरमालमत्ताहॉटेललॉजगेस्ट हाऊसमुसाफीर खाना  हा व्यवसाय करणाऱ्या  जागा मालकाने कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली असेल, अशा भाडेकरूंचे सर्व तपशील त्वरित www.mumbaipolice.gov.in/ TenantForm?ps_id=0 या सिटीझन पोर्टलवर ऑनलाईन नोंद करण्यात यावाअसे आवाहन पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आदेशान्वये केले आहे. 

            भाडेकरू व्यक्ती परदेशी असेलतर मालक आणि परदेशी व्यक्ती यांनी त्याचे नावराष्ट्रीयत्वपासपोर्ट तपशीलठिकाणजारी करण्याची तारिखवैधता सादर करावी. व्हिसाबाबत व्हिसा क्रमांकश्रेणीठिकाण आणि जारी करण्याची तारिखवैधतानोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहेअसेही आदेशात स्पष्ट केले आहे.  हा आदेश 7 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू असणार आहे.

            या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जपानमध्ये आयोजित 'भारत मेळ्यामध्ये' राज्यातील सांस्कृतिक, पारंपरिक वारशाचे दर्शन

 जपानमध्ये आयोजित 'भारत मेळ्यामध्येराज्यातील

सांस्कृतिक, पारंपरिक वारशाचे दर्शन

-पर्यटन मंत्री गिरीश महाजन

            मुंबई, दि. ११ : जपान येथे नुकताच झालेला 'भारत मेळा'  राज्याच्या पर्यटनाला चालना देणारा ठरेल असे मत पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी व्यक्त केले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या क्षेत्रातील  संधी तसेच सांस्कृतिक आणि पारंपरिक वारशाची ओळख जगाला करून देण्यात आली.

           जपान येथे ७ ते ११ ऑक्टोबर रोजी 'भारत मेळ्याचेआयोजन केले होते.  यामध्ये पर्यटन विभागाचा सहभाग होता या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पर्यटन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

          मंत्री श्री.महाजन म्हणाले की, 'भारत मेळाहा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली आणि समृद्ध पर्यटनाचा जागतिक स्तरावर  प्रचार करण्यासाठीचे  अत्यंत महत्वाचे  पाऊल ठरेल. 'भारत मेळा'मधील आपल्या राज्याचा सहभाग म्हणजे जपानमधील आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या राज्याचे पर्यटन विषयक नाते संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. जपानमधून राज्यात येणा-या पर्यटकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमंत्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            रोड शोच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत पर्यटकांना  देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि राज्याच्या सांस्कृतिकऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचे दर्शन घडविण्यात आले असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

         पर्यटनमंत्री श्री.महाजन  म्हणाले कीगड ,किल्लेऐतिहासिक वारसासमृद्ध समुद्रकिनारेमुंबई आणि बॉलीवूडच्या गजबजाट असलेल्या ऊर्जेपासून ते पश्चिम घाटांच्या शांततेपर्यंत आणि अपरिमित बौद्धमय ऐतिहासिक स्थळांपर्यंत महाराष्ट्र कला आणि परंपरेचा वारसा जपतो आहे.  अजिंठावेरुळ लेणीएलिफंटा गुफाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईच्या व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको  यासारखी युनेस्को जागतिक वारसा स्थळे. ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देणेकोकणच्या सुंदर किनाऱ्यावर मनसोक्त बागडणे आणि राज्याच्या विविधतेचे आरस्पानी दर्शन देणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यान्नांचा आस्वाद घेणेकधीही विसरता न येणाऱ्या प्रवासी अनुभवाची ग्वाही  देणाऱ्या महाराष्ट्राला एकदा तरी भेट द्यावे, असे आवाहनही पर्यटनमंत्री श्री. महाजन यांनी केले.

            प्रधान सचिव श्रीमती रस्तोगी म्हणाल्या कीकोबे येथील 'भारत मेळाहा राज्यातील पर्यटन वाढीसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. ओसाका येथील 'रोड शो', जपानमधील हिरोशिमा आणि ओकायामा येथे पर्यटन क्षेत्रातील महत्वाच्या संस्था आणि प्रवासी व्यापारी यांच्यासोबत  पर्यटनाच्या संधी याबद्दल चर्चा करण्यात आली.  जपानमधील पर्यटनप्रेमींनी महाराष्ट्राचे वैभव पाहण्यासाठी महाराष्ट्राला नक्की भेट द्यावी.  महाराष्ट्र पर्यटन याबाबत अधिक सविस्तर माहितीकरिता कृपया www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

0000

नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी

 नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी

- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

 

            मुंबई दि. 11 : नाशिक विभागातील जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबित कामाना गती देऊन ती कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

                नाशिक विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाबाबतीत आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेमहाराष्ट्र जीवन प्रधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजलजीवन मिशनचे संचालक अमित सैनीमुख्य अभियंता मनीषा पलांडेअधीक्षक अभियंता अजय सिंहनाशिक विभागातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

               मंत्री श्री.पाटील म्हणालेनाशिक विभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या पाणी पुरवठा योजनाच्या कामाला कार्यारंभ आदेश दिला नसेल अशा कामांना तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात यावा. ज्या गावातील पाणी पुरवठा योजनाना अडचणी असतील त्यासाठी तेथील ग्रामसभेचा ठराव घेऊन निर्णय घ्यावा. यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य घ्यावे तसेच जे ठेकेदार काम करत नाही त्यांच्यावर कारवाई करावी.

           त्रयस्थ तपासणी संस्थांनी पाणी पुरवठा योजनाच्या कामाची काटेकोरपणे तपासणी करावी आणि तपासणी अहवाल हा दर पंधरा दिवसांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करावे. आदिवासी गावातील घरगुती नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. हर घर जलकामाची उदिष्टे 26 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यासाठी ग्रामसभा घेऊन उद्दिष्ट पूर्ण करावीत. तसेच शिल्लक निधी लवकरात लवकर खर्च करण्याचे निर्देशही श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

            यावेळी त्यांनी जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचाही आढावा घेतला.

नागरिकांना वैद्यकीय कारणासाठी आवश्यकअसलेले दाखले तातडीने द्यावेत

 नागरिकांना वैद्यकीय कारणासाठी आवश्यकअसलेले दाखले तातडीने द्यावेत


- पालकमंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 11 : नागरिकांना वैद्यकीय कारणांसाठी उत्पन्नाचा दाखला हवा असल्यास तो तातडीने देण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.


            पालकमंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी मुंबईतील नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत. त्याअंतर्गत बुधवारी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे संवाद साधताना, ज्यांना वैद्यकीय कारणासाठी उत्पन्नाचा दाखला हवा असेल त्यांना तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, नागरिकांची कामे तातडीने व्हावीत, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी प्रत्येक बुधवारी सुसंवाद साधला जात आहे. येथे येणाऱ्या विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा यावे लागू नये, याची दक्षता घ्यावी. त्यांचे दाखले घरपोच देण्यात यावेत. त्याचप्रमाणे जे दाखले तातडीने देणे शक्य आहेत ते निश्चित कालावधीत द्यावेत. यासाठी नागरिकांना फेऱ्या मारण्याची आवश्यकता पडू नये, असे त्यांनी सांगितले.


            आज प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मालमत्ता पत्रावर नाव लावणे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळणे आदींसाठी नागरिकांनी अर्ज केले होते. मंत्री श्री.केसरकर यांनी त्यांची दखल घेऊन निश्चित वेळेत दाखले देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले. यावेळी तयार असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यांचे तसेच तात्पुरत्या गौण खनिज परवान्यांचे श्री.केसरकर यांच्या हस्ते वाटप

 करण्यात आले.


Featured post

Lakshvedhi