Wednesday, 11 October 2023

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?* -जेफ्री ह्आंल (नोबेल विजेते-2017)

 *झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*

                    -जेफ्री ह्आंल

              (नोबेल विजेते-2017)


*झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का?

असे ऐकीवात आहे की *लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे* हे किती खरे आहे?

ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का?

चला पाहूया....


खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.

    *रात्री 11 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या *रात्री 11 ते पहाटे 3* च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे *यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.*

- जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो.

- जर 12 वाजता झोपलात तर *3*तास 

- जर 1 वाजता झोपलात तर *2* तास 

- जर 2 वाजता झोपलात तर फक्त *1* तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....

- आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?

*दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही*

- जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल?


*काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता?*


ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का?

तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल?

ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.

*पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते.* ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.


*सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते.*

आता तुम्ही काय करायला हवे?

तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.


*सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.*

आता तुम्ही काय करायला हवे?

तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.


*असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....*


- अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी  ताजेतवाने होऊन  ऊठा.  

- त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या. 

- आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.


ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.* ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.


शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत  प्रकाश, टी व्ही, आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.


*आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....*

एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला *घड्याळात 7  वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे*. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी *9* च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.


जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.


ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.


लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवल प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.   💪💪चंदन राऊत . पुणे  बोपखेल गाव,

                  

      



*_वाचाल तर वाचाल_*

📚📖📚📖📚📖📚

नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा

 नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसे पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी तसेच त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

मैत्री

 ,*मैत्री*   

🌹🌹🌹🌹🌹🌹


         *बुद्धाच्या सामाजिक तत्त्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्त्व आहे. मानवी समाजात जिवंतपणा व* *संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्ति व्यक्ति मध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो.*

 *समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहीजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख दुःखात समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव,  स्नेहभाव असणे अगत्याचे आहे. राग, द्वेष, मत्सर,  घृणा, वैर,  वैमनस्य या सर्व मनोविकारावर मैत्री हे मोठेच गुणकारी औषध होय.* 

*दयायुक्त प्रेम,  म्हणजे मैत्री होय. मैत्री म्हणजे समस्त प्राणीमात्राप्रती स्नेहभाव,  दयाभाव,  असणे होय. सर्वाप्रती स्नेहभाव,  मैत्रीभाव माणसाला शुध्द बनवतो. मनातील विकृती घालवतो. मानसिकदृष्टया बलशाली बनवतो.* 

*वैऱ्यालाही जिंकण्याची शक्ती मैत्रीत असते. मैत्री केवळ मनुष्यप्राण्यासाठीच असणे पुरेशे नाही तर सर्वच सजीव प्राणीमात्रांप्रती मैत्रीभाव आवश्यक आहे. मैत्रीभावाने चित्त स्थिर व अविचल राहते. मैत्री ही करुणेच्या पुढची पायरी होय.*

     *आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगला पाहीजे,  असे बुद्ध सांगतात.* 

 *आपला आजचा दिवस मैत्री  पूर्ण जाओ* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

कोळकेवाडी येथील नागरी सुविधांची कामे जलदगतीने करावीत

 कोळकेवाडी येथील नागरी सुविधांची कामे जलदगतीने करावीत

- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

             मुंबईदि. १० : चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मदत व  पुनर्वसन मंत्री  अनिल पाटील यांनी दिल्या.

            मंत्रालयातील दालनात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी आणि कोंढण येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, उपसचिव (पुनर्वसन) श्रीनिवास कोतवालकोकण विभागाच्या पुनर्वसन उपायुक्त रिता मेगेवाररत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी श्री.बर्गे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) एम.बी.बोरकुट यासह कोळकेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

            मंत्री श्री.पाटील म्हणाले कीकोळकेवडी येथील नागरी सुविधा पुरविणे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी जमीन देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे नव्याने जागा मागण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. कोंढण ता. संगमेश्वर येथे भूस्खलनामध्ये घरांना नुकसान झालेल्या ग्रामस्थांचे त्यांच्या स्वमालकीच्या जमिनीमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन होण्याबाबतची मागणी लक्षात घेता याबाबत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या.

*****

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी

 मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी

गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

विद्यार्थी वसतिगृह तातडीने सुरू करावीत

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबईदि. १० मराठा समाजाच्या  सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी  सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसेआमदार भरत गोगावलेअण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षमाजी आमदार नरेंद्र पाटीलउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगीसामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगेनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहितेछत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० मुले आणि ५० मुली असे १५० विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध व्हावेत यासाठी वसतिगृहाच्या कामाला अधिक गती द्यावी आणि वसतिगृह लवकर सुरू व्हावेत यासाठी कालबद्ध नियोजन करावे. तसेच ज्या जिल्ह्यात जागा उपलब्ध होण्यास अडचणी आहेत तिथे खासगी संस्थांकडून निविदा प्रक्रिया राबवून तातडीने प्रक्रिया करावी आणि भाडेतत्वावर तातडीने सुरू करावीत.

            आतापर्यत चार ठिकाणी वसतिगृह सुरू झाले असून.  खारघरकोल्हापूरनाशिकछत्रपती संभाजीनगरलातूर, नागपूरपुणेअमरावती याठिकाणी लवकरच सुरू होतील यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मराठा समाजाच्या पी.एचडी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’मार्फत फेलोशिप देण्यात येते. त्या विद्यार्थ्यांची संख्या 200 करण्याची शिफारस करण्याचा निर्णय उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांना निर्वाहभत्ता उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत देण्यात यावा. सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर अनुक्रमे मुंबई शहर / उपनगरठाणे/पुणेइतर महसुली विभागातील शहरे / ‘क’ वर्ग मनपा शहरे व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी रु. ६० हजार५१ हजार ४३ हजार व मुख्य सचिव समितीने तालुकास्तरावर  ३८ हजार इतका निर्वाह भत्ता प्रस्तावित केल्याप्रमाणे देण्यात यावाअशी शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली. हा प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकर मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, अशा सूचना उपसमितीच्या बैठकीत मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

प्रत्येक जिल्ह्यातील सुरू करण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वयकांची नियुक्ती करावी. त्यामुळे कामाला गती मिळेल.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि  सारथी या दोन्ही महामंडळाच्या कामाला गती देण्यासाठी संचालक पद संख्या वाढविण्याबाबत आढावा घेण्यात आला.  मा. सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेसंदर्भात उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत दिल्लीतील ज्येष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

0000

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनासाठी ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाचे स्वागत

 ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन भारतासाठी

ऑलिम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चार दशकानंतर भारतात होणाऱ्या १४१ व्या अधिवेशनासाठी

ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाचे स्वागत

 

            मुंबईदि. १० :- ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिम्पिक  मध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

            आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले. या कार्यकारी मंडळाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे स्वागत केले.

            या दोघांनीही हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेलअसा विश्वास व्यक्त केला. तसेच यातून ऑलिपिंकशी निगडित विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल ,अशी आशाही व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती नीता अंबानीमार्क ॲडम्सख्रिस्टेन क्लाईमरीना बारामियामोनिका श्रेरटीना शर्मा यांचा समावेश होता.

            या कार्यकारी मंडळाचे स्वागत करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीऑलिम्पिक  समितीचे हे अधिवेशन महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसाठी मोठी महत्वाची संधी आहे. यातून या आंतरराष्ट्रीय शहराचा लौकिक आणखी बळकट होईल. समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आणि अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समितीच्या सदस्य म्हणून आणि तेही एका महिलेला नीता अंबानी यांच्या रुपाने स्थान मिळाले आहेहे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतातील दुर्गम आणि वंचित अशा घटकांतील मुलांसाठीच्या शिक्षण आणि क्रीडा कौशल्य पोहोचवण्याची त्यांची बांधिलकी कौतुकास्पद आहे. ऑलिपिंक व्ह्यॅल्यू एज्युकेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून भारतातील २ कोटींहून अधिक मुलांपर्यंत क्रीडा कौशल्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न महत्वपूर्ण आहे. खेळ हा देशाचा विकास आणि बांधणीतील महत्वाचा घटक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया च्या माध्यमातून देशातील खेळाडूंना संधी उपलब्ध करू दिली. गेल्या नऊ वर्षांत क्रीडा क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत तिपटीने वाढ करण्यात आली आली आहे. यामुळेच आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशांत खेळांसाठीच्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अशा पायाभूत सुविधा उभा राहिल्या आहेत. भारतीय युवकांमधील क्षमतांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला आहे. केंद्र सरकारने तरुणांना खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. भारताने या आधीही अशा भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता सिद्ध केल्याचाही पुनरूच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस या दोघांनीही कोट्यवधी भारतीयांच्या क्रिकेट प्रेमींसाठी या खेळाचाही भविष्यात ऑलिम्पिक  मध्ये समावेश केला जाईल अशी आशा व्यक्त केली.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीया अधिवेशनाच्या निमित्ताने भारताचे सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील स्थान आणखी बळकट होईल.आमच्यासाठी ही गौरवास्पद संधी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिपिंक स्पर्धाच्या संयोजनाचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न सत्यात येईलअशी आशा निर्माण झाली आहे. अतिथी देवा भव अशी आमची संस्कृती आहे. यातून खेळ आणि आमच्या राज्याच्या क्रीडा संस्कृतीच्या लौकीकात भर पडेल. महाराष्ट्रात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक अशा क्रीडा आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्हाला आगामी काळात विविध स्पर्धा संयोजनाची संधी मिळेल असा विश्वास आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठीच्या सुविधा आहेत. अर्बन स्पोर्टस पार्क सारख्या संकल्पना येथे यशस्वी झाल्या आहेत. या अधिवेशनाच्या संयोजना करिता महाराष्ट्राकडून सर्व त्या सुविधा तसेच सहकार्य केले जाईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच ऑलिंपिझम या संकल्पनेतून पुणे येथे ऑलिम्पिक म्युझियम साकारण्यात येत असल्याचेही सांगितले. रिलायन्स फाऊंडेशनच्या ओव्हिईपी – ऑलिम्पिक व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्रॅम या कार्यक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले.

            ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष श्री. बाख म्हणाले कीया अधिवेशनाच्या संयोजनाच्या निमित्ताने आम्हाला मुंबई आणि महाराष्ट्राच्या आदरातिथ्याचा अत्यंत आनंददायी अनुभव घेता येत आहे. आपले राज्य आघाडीचे राज्य आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. आपण आर्थिक तसेच व्यावसायिक विकासासोबतच क्रीडा धोरणाबाबतही आग्रही आहात याचे मोठे समाधान आहे. म्हणूनच आज आशियाई क्रीडा स्पर्धात भारत आणि त्यातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची चांगलीच कमाई करून दिले आहेहे लक्षात येते. विशेषत वंचित घटकातील मुलांनी यात लक्षणीय यश मिळवले आहे हे याचे समाधान आहे. आमच्या ऑलिम्पिक  समितीच्या सोशल मीडियाच्या प्रतिसादात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहेहे देखील निष्पन्न झाले आहे. शिक्षण आणि खेळाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा असलेले चांगले जग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ४० वर्षांनंतर भारतात होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास आहे.

            समितीच्या सदस्य तथा रिलायन्स फाऊंडशेनच्या अध्यक्ष श्रीमती अंबानी यांनी समितीचे अधिवेशन मुंबईत होत असल्याचा सर्वाधिक आनंद असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या कीमुलांचे शिक्षण आणि खेळ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्या पर्यंत या गोष्टी पोहचवण्यासाठी करता येतीलते सर्व प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. श्रीमती अंबानी यांनी मराठीतूनही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की मुंबईने मला भरभरून दिले आहे. सर्व काही दिले आहे. माझे शालेय शिक्षण येथेच झाले. लग्न झालेमी आई झाली. आता आजी देखील इथेच झाली. त्यामुळे मला मुंबई शहरासाठी जे काही करता येईल ते करण्याची इच्छा आहे.

            या प्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकरमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणीमुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल,  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रनजितसिंह देओल,  एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जीमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते.

            १५ ते १७ ऑक्टोबर२०२३ दरम्यान होणारे हे अधिवेशन महाराष्ट्राच्या क्रीडा लौकिक आणि आदरातिथ्याला साजेसे भव्य दिव्य राहीलअशी तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन रविवारी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मधील ग्रँड थिएटर येथे होणार आहे. अधिवेशनाच्या आधी १२ ते १४ ऑक्टोबर२०२३ दरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक  समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.

००००


आयुष'चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 आयुष'चे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची

दिलखुलास’ मध्ये मुलाखत

 

            मुंबईदि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

           राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षणऔषधी द्रव्य विभाग आणि आयुष संचालनालयामार्फत राज्यात 15 सप्टेंबर  ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत आयुर्वेद जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष संचालनालयाच्या वतीने विविध उपक्रम अणि शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहेया मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे याबाबतची माहिती आयुष  संचालक डॉ. घुंगराळेकर यांनी 'दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

            दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 11गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. डॉ. प्रज्ञा कापसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

00000

Featured post

Lakshvedhi