Wednesday, 11 October 2023

मैत्री

 ,*मैत्री*   

🌹🌹🌹🌹🌹🌹


         *बुद्धाच्या सामाजिक तत्त्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्त्व आहे. मानवी समाजात जिवंतपणा व* *संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी, व्यक्ति व्यक्ति मध्ये मैत्रीभाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते. यांत्रिकपणा येतो.*

 *समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे. सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहीजे. मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख दुःखात समरस होऊ शकु. परस्पररांप्रती मैत्रीभाव,  स्नेहभाव असणे अगत्याचे आहे. राग, द्वेष, मत्सर,  घृणा, वैर,  वैमनस्य या सर्व मनोविकारावर मैत्री हे मोठेच गुणकारी औषध होय.* 

*दयायुक्त प्रेम,  म्हणजे मैत्री होय. मैत्री म्हणजे समस्त प्राणीमात्राप्रती स्नेहभाव,  दयाभाव,  असणे होय. सर्वाप्रती स्नेहभाव,  मैत्रीभाव माणसाला शुध्द बनवतो. मनातील विकृती घालवतो. मानसिकदृष्टया बलशाली बनवतो.* 

*वैऱ्यालाही जिंकण्याची शक्ती मैत्रीत असते. मैत्री केवळ मनुष्यप्राण्यासाठीच असणे पुरेशे नाही तर सर्वच सजीव प्राणीमात्रांप्रती मैत्रीभाव आवश्यक आहे. मैत्रीभावाने चित्त स्थिर व अविचल राहते. मैत्री ही करुणेच्या पुढची पायरी होय.*

     *आपल्या विरोधकाप्रती सुध्दा मैत्रीभाव बाळगला पाहीजे,  असे बुद्ध सांगतात.* 

 *आपला आजचा दिवस मैत्री  पूर्ण जाओ* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi