Saturday, 7 October 2023

दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी, व्यासपीठ देण्याची गरज

 दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी, व्यासपीठ देण्याची गरज

- राज्यपाल रमेश बैस

            मुंबई, दि. ६ : दिव्यांग व्यक्ती कला - क्रीडा क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक प्रावीण्य मिळवतात. काही कलाकार पायाने पेंटिंग करताततर काही दातांनी ब्रश धरून पेंटिंग करतात. पायाने सुईमध्ये धागा ओवण्याची क्षमता असलेली दिव्यांग व्यक्ती देखील आपण पाहिली आहे. विशेष ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहे. दिव्यांगांना सहानुभूती नकोतर योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            जोगेश्वरी मुंबई येथील 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब) या संस्थेचा उपक्रम असलेल्या 'एम एन बनाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंडया संस्थेतील युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. ६) राज्यपाल श्री. बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

            संसदेमध्ये पारित झालेले दिव्यांग व्यक्तींचे विधेयक आपल्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने तयार केले होतेअसे नमूद करून दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करूअसे राज्यपालांनी सांगितले.

            बस स्थानकरेल्वे स्थानकशासकीय कार्यालयेमहाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्था दिव्यांगांकरिता प्रवेश व प्रवासाच्या दृष्टीने सुलभ असल्या पाहिजेत, असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. 

            यावेळी 'नॅब'च्या कार्यकारी संचालक पल्लवी कदमसमाजसेविका बबिता सिंहक्रीडा प्रशिक्षक चार्ल्स आदींनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

            दिव्यांग व्यक्तींनी यावेळी स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू राज्यपालांना भेट दिल्या.

००००

Governor expresses need to provide proper platform to Divyang persons

            Mumbai, 6 : Stating that Divyang persons do not seek sympathy from society, Maharashtra Governor Ramesh Bais today expressed the need to provide them the right platform and an opportunity to excel in art, sports and other professions and vocations.

            The Governor was speaking to a group of Divyang persons from the M N Banajee Industrial Home for the Blind, an activity of the 'National Association for the Blind' (NAB) at Raj Bhavan on Friday (6th Oct).

            Stating that the the Rights of Persons with Disabilities Bill passed in the Parliament was prepared by the Parliamentary Committee headed by him, the Governor assured that he will do his best to extend all kinds of support to the Divyang persons.

            The Governor expressed the need to make all public places including bus stations, railway stations, government offices, colleges etc accessible for the DIvyang persons. The Governor announced a donation of rupees five lakh rupees to the institution.

            Executive Director of 'NAB' Pallavi Kadam, social worker Babita Singh and sports coach Charles apprised the Governor about the work of the institution.

            The Divyang persons presented gifts prepared by them to the Governor.

0000

रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करावी

 रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करावी

मंत्री दीपक केसरकर यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

            मुंबई, दि. ६ : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी श्री. केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे जुने डबे बदलून मिळावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री श्री.दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यांना रेल्वे प्रवासात यापूर्वी लागू असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे तिरूपती तसेच मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. यासाठी उपलब्ध असलेल्या हरिप्रिया तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने आणि गैरसोयीचे झाले असल्याने ते बदलून मिळण्याबाबत भाविक आणि प्रवाशांकडून विनंती करण्यात येत आहे. हे डबे बदलून नवीन डबे मिळाल्यास प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद होऊ शकणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री श्री.दानवे यांना सांगितले.

मस्त आणि मस्ट !👌🏻 👇🏾 इस्त्री केलेलं म्हातारपण !

 मस्त  आणि मस्ट  !इस्त्री केलेलं म्हातारपण !

ट्रेनमधून लांबच्या प्रवासाला चाललो होतो. 

समोरच्या सीटवर एक काका होते. टी शर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, कानात pods, मनगटावर डिजिटल घड्याळ, पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, तुकतुकीत चेहरा.  

कुतूहल चाळवून मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. प्रवासात आमच्या गप्पा सुरु झाल्या. काका भलतेच गप्पिष्ट होते. आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर बोललो. राजकारण, क्रिकेट, प्रवास…गंमत म्हणजे ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते. 

गप्पांमध्ये मी हळूच काकांना त्यांचं वय विचारलं. त्यांनी सांगितलं. मी उडालोच. 

‘सॉरी ! मी तुम्हाला आजोबा म्हणायला हवं होतं का?’ मी गमतीत म्हणालो. 

काका जोरात हसले. ‘तुम्ही मला रवि म्हटलंत तरी I am fine !’      

आम्ही दोघेही हसलो. 

काकांचं स्टेशन जवळ आलं. एक कडक शेकहॅण्ड करत काकांनी आमच्या दोघांचा एक सेल्फी घेतला. 

गाडी पुढे निघाली. मी ट्रेनमध्ये आजूबाजूला पाहिलं. सगळे म्हातारे खंगलेले ! इस्त्री गेलेल्या कपड्यासारखे. वैभव उडून गेलेल्या एखाद्या राजवाड्यासारखे ! 

योगायोग बघा. मी तेव्हा गुलज़ारच्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकत होतो. 

गाणी ऐकताना आपसूक गुलज़ारसाहेब डोळ्यासमोर येत होते. एका क्षणी एकदम मनात आलं, अरे या माणसाने इतकी वर्षं कशी सांभाळली असेल स्वतःची ‘इस्त्री’? 

आपण स्वतः कशी सांभाळणार आहोत स्वतःची इस्त्री? विचार ट्रेनच्या पुढे धावू लागले. 

एक म्हणजे स्वतःची तब्येत उत्तम ठेवणं. नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप.

सध्याचं माहीत नाही, पण गुलज़ारसाहेब नियमित टेनिस खेळतात. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या एका स्पर्धेत ते जिंकले वगैरे होते. 

दुसरं म्हणजे, कार्यरत असणं. बँकेची पासबुकं भरायला स्टेट बँकेत लाईन लावणं याला मी कार्यरत नाही म्हणणार. आताच्या काळात तो वेळेचा अपव्यय आहे. टाईमपास आहे. कार्यरत म्हणजे तुमच्या आवडीच्या कामात creatively गुंतून राहणं. लिखाण, संगीत, शिकवणं, चित्रकला, स्वतःच्या गाडीचं सर्व्हिसिंग, बागकाम, वाचन… असं काहीही. रोजचं एक रुटीन असणं. रुटीन म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत बिनडोक टीव्ही सिरियल्स बघणे नव्हे. स्वतःला enrich करणारं, बुद्धीला आव्हान देणारं काहीतरी करत राहणं. गुलज़ारसाहेब रोज नियमितपणे लिहितात. ते कोणी वाचो वा न वाचो. 

तिसरं म्हणजे कुतूहल टिकवून कालसुसंगत असणं. टी शर्ट- जीन्स घालून मॉडर्न होता येत नाही. काळाशी सुसंगत राहण्यासाठी बाहेरचा वारा आत येण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवणे पण वाऱ्याने त्या खिडक्या उडून जाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या - वेळी - असं - नव्हतं हे चार शब्द आपल्या डिक्शनरीमधून फाडून टाकणे म्हणजे कालसुसंगत राहणे. बिमल रॉय, सलील चौधरी, हेमंत कुमार यांच्याबरोबर काम केलेले गुलज़ारसाहेब विशाल भारद्वाज, रेहमान, शंकर-एहसान-लॉय यांच्याबरोबर तितक्याच सहजतेने काम करताना दिसतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात. जग बदललं. लोकांच्या sensibilities बदलल्या. तरीसुद्धा ऐंशी उलटून गेल्यावरही स्वतःचा दर्जा जराही घसरू न देता गुलज़ारसाहेब लिहिते राहिलेत. आपण आधुनिक आहोत हे दाखवण्यासाठी ना त्यांनी कधी जीन्स घातली ना त्यांना सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्याची गरज भासली. आधुनिक वाऱ्यांनी त्यांची पिंपळपाने सळसळत राहतात पण त्यांचा सोनेरी पिंपळवृक्ष आपली मुळे मातीत घट्ट पाय रोवून उभा आहे. 

शेवटचं म्हणजे, आर्थिक स्वातंत्र्य. पैशाचा लोभ नव्हे, तर पैशावर प्रेम असणे. उत्तम जगण्यासाठी पैसा हवाच आहे. गुलज़ार  साहेब फाळणीनंतर मुंबईत आले. खिशात पैसे नव्हते, पण स्वप्नं होती. लेखणीच्या आणि बुद्धीच्या बळावर एक कवी, लेखक, दिग्दर्शक पाली हिलमध्ये एका आलिशान बंगल्यात राहतो, याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलंय.    

आपण सगळेच वयाने म्हातारे होण्याच्या मार्गावर आहोत. 

Growing old is mandatory but getting old is optional, असं म्हणतात. 

प्रत्येकाची आयुष्यं वेगवेगळी असतात. Circumstances वेगवेगळे असतात. त्यामुळे इच्छा असूनही काही लोकांच्या आयुष्याची इस्त्री बिघडतही असेल. पण बाकीच्यांनी आपलं म्हातारपण कडक इस्त्रीचं कसं राहील, याचा विचार आजपासूनच करायला काय हरकत आहे !    

गुलज़ार, राकेश मेहरा आणि विशाल भारद्वाज अशा तिघांचा एक कार्यक्रम Youtube वर आहे. कार्यक्रमाचं नाव होतं: 

कल आज और कल ! कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुलज़ारसाहेब हातात माईक घेतात आणि म्हणतात, ‘कल आज और कल में ये दो कौन है पता नहीं, लेकिन वो ‘आज’ मै हूं !’ 

इस्त्री केलेल्या म्हातारपणाची इस्त्री कधीच मोडत नाही, ती अशी !

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती

 मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती

११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

नागरिकांना त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

            मुंबई, दि. ६ :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

            या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे:

            समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक हो

णार आहे.

००००

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी १,४९६ कोटी निधी वितरीत

 संजय गांधी निराधार अनुदान योजना,

श्रावणबाळ योजनेसाठी १,४९६ कोटी निधी वितरीत

            मुंबई दि. ६ : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थीना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ५५६ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ९४० कोटी रुपये असा एकूण १,४९६ कोटी रुपये इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला असून लाभार्थींना तो तत्काळ वाटप करावा अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सर्व जिल्हाधिकान्यांना दिल्या आहेत.

            संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत: चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना

लाभ मिळतो.

            या योजनेमध्ये दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा २१ हजार रुपये पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थींना १५०० रुपये दरमहा अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रयरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व २१ हजार रुपये पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

            संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनांचे स्वरुप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील लाभार्थीना तातडीने अर्थसहाय्य वितरीत होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही सचिव श्री. भांगे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

 मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवरील गाळेधारकांच्या

समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

            मुंबई, दि. 6 : मुंबई बंदर प्राधिकरणाच्या लीजवर देण्यात आलेल्या जमिनीवर सुमारे चार हजार इमारती उभ्या असून 50 हजार कुटुंबांना भाडेपट्टा नूतनीकरण, शुल्क आकारणी याबाबतच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात गाळेधारकांची सुकाणू समिती स्थापन करण्यात येत असून केंद्र सरकारमधील बंदरे आणि जलवाहतूक मंत्री यांच्याकडे या समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा केला जाईल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील समिती सदस्यांसमवेत भेट घेणार आहोत, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

            विधानभवनात मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जमिनीवरील गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई बंदर प्राधिकरण (बीपीए) चेअरमन राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, मकरंद नार्वेकर, प्रेरक चौधरी उपस्थित होते. बीपीएचे क्षेत्र कुलाबा, भायखळा, वडाळा, ट्रॉम्बे, चेंबूर, शिवडी असे काही हजार एकरवर पसरलेले आहे.

            बीपीएचे चेअरमन श्री.जलोटा यांनी सर्व गाळेधारकांच्या समस्या यावेळी काळजीपूर्वक ऐकून घेत त्याची नोंद घेतली. विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा मतदारसंघाचे आमदार ॲड. नार्वेकर यांनी सर्व गाळेधारकांच्यावतीने भाडेपट्टा नूतनीकरण, शुल्क आकारणी यासंदर्भातील अडचणी यावेळी सविस्तरपणे मांडल्या.

            विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, मुंबई बंदर प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे तातडीने अहवाल सादर करावा. तसेच गाळेधारकांच्या मृत्यूनंतर वारसा करारातील विलंब टाळणे, सन 2017 ते २०२२ आणि २०२२ ते २०२७ या कालावधीसाठीचा भाडेपट्टा, शुल्क आकारणी जास्त असल्यामुळे ती कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कारवाई करावी. गेली अनेक वर्षे या विभागात गोरगरीब जनता आणि सामान्य आर्थिक परिस्थिती असलेली अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. जादा भाडेपट्टा कमी करण्यात यावा, याकडे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी लक्ष वेधले. 

            सदर बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या गाळेधारकांनी यावेळी अनेक सूचना, अडचणी मांडल्या. वकील आणि कायदेशीर सल्लागार ॲड प्रेरक चौधरी यांनी प्रास्ताविकात यासंदर्भात करावयाचा कायदेशीर पाठपुरावा आणि उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

००००

Featured post

Lakshvedhi