सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 2 October 2023
विवाहित मुलींनो तुम्ही सुध्दा अनुकंपा नोकरीसाठी पात्र आहात ,
विवाहित मुलींनो तुम्ही सुध्दा अनुकंपा नोकरीसाठी पात्र आहात , मुंबई उच्च न्याालयाच्या नागपुर खंडपीठाने विवाहित मुलीला अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणे घटनाबाह्य ......
कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मंजूरी
कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मंजूरी
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई 1 :सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
साताऱ्यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे. दोन टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे चार तालुक्यातील 9000 हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे. यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले.
स्वच्छता ही सेवा' अभियानात नागरी भागात
'स्वच्छता ही सेवा' अभियानात नागरी भागात
१६ लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
· 'एक तास' स्वच्छतेतून राज्यात १९४२ टन कचऱ्याची विल्हेवाट
मुंबई, दि. १ - 'स्वच्छता ही सेवा' अभियानाअंतर्गत आज राज्यात 'एक तारीख, एक तास' स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानुसार सकाळी १० ते ११ या कालावधीत राज्यातील सर्व ४११ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण १४५२२ ठिकाणी नागरिकांच्या सहभागाने श्रमदानातून स्वच्छ्ता करण्यात आली. यात मान्यवरांसह १६ लाख ४ हजार ९९५ नागरिकांनी सहभाग घेत सुमारे १९४२ टन कचरा जमा करण्यात आला असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या पंधरवड्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज एक तास विशेष मोहीम राबविण्यात आली. यात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.गोविंदराज आदींनी गिरगाव चौपाटी येथे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी शिवडी किल्ला येथे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे त्याचप्रमाणे केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह कलावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध ठिकाणी या अभियानात सहभाग घेऊन परिसर स्वच्छता केली.
या अभियानात मान्यवरांसोबत विविध सामाजिक संस्था, इंडियन मेडीकल असोशिएशन, क्रेडाई, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, आरबीआय, एसबीआय, आयसीआयसीआय, बॅंक ऑफ इंडिया या बॅंका, इंडियन टुरिझम, लायन्स क्लब, रोटरी क्लब, माउली फाउंडेशन, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन, बचत गटांचे सदस्य आदींनीही उत्फुर्त सहभाग घेऊन स्वच्छता केली.
'स्वच्छता हीच सेवा' अभियानाअंतर्गत नागरीकांच्या सहभागाने जास्त कचरा असलेले क्षेत्र, रेल्वे लाईन, बस स्थानके, राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या शेजारील जागा, नदीघाट, जलस्त्रोत, झोपडपट्ट्या, पुलाखालच्या जागा, बाजारपेठा, गल्ल्या, धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर, पर्यटन स्थळे, टोलनाके, प्राणी संग्रहालय, गो-शाळा, डोंगर, समुद्र किनारे, बंदरे, आरोग्य संस्थाचा परिसर, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय परिसर, इत्यादी ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
जनतेच्या सहभागातून प्रत्यक्ष स्वच्छता करणे व स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवून सर्व नागरिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली दिली आहे. या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य (झाडू, कचरा पेट्या, थैल्या इत्यादी) सबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरविण्यात आले. स्वच्छता उपक्रमादरम्यान गोळा केलेल्या कचऱ्याची नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कचरा प्रक्रिया केंद्रावर योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.
000
मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करामच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार
मुंबईतल्या झोपड़पट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करामच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· मुख्यमंत्र्यांची कुर्ल्याच्या एसआरए वसाहत, मच्छिमार नगर-कोळीवाडा, बाणगंगा येथे अचानक भेट
मुंबई, दि. १: स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. मुंबईतील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची दिवसातून पाच वेळा सफाई झाली पाहिजे. केवळ मुख्य रस्ते, चौक, समुद्र किनारे यांची स्वच्छता न करता गल्ली बोळातील रस्ते, झोपडपट्टीतील परिसर, शौचालये, गटारे यांची साफसफाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी अचानक कुर्ला नेहरू नगर परिसरातील वत्सलाताई नाईक नगर एसआरए वसाहतीला भेट दिली. तेथील शौचालय आणि परिसराच्या साफसफाईची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, उपायुक्त हर्षल काळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील स्थानिकांना तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छता गृहाची पालिकेच्या खर्चाने दुरुस्ती, डागडुजी करावी, दुरूस्ती न होऊ शकणारे शौचालये तोडून नव्याने बांधण्यात यावी. यादरम्यान फिरते शौचालये उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने निधी उपलब्ध करून द्यावा. अस्वच्छता आरोग्यासाठी हानिकारक असून स्वच्छ भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर या मोहिमेची सुरुवात झोपडपट्टीपासून करणे आवश्यक आहे. आपला परिसर स्वच्छ असेल तर लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुंदर आणि निरोगी भारताचे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मच्छिमार-कोळीवाड्याचा पर्यटनस्थळ म्हणुन विकास करणार
L
मच्छिमारनगर येथील जेट्टी आणि परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच दुर्घटनाग्रस्त नौकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिम स्थानिक पातळीवर राबविणे गरजेचे आहे. मच्छिमारांना स्वच्छ रस्ते, पाणी, जेट्टी आणि परिसरात फूड कोर्ट बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कोळीवाड्याचे सुशोभीकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येणार असून कोळीवाडा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
दुर्घटनाग्रस्त चार नौकांची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी या नौकांसाठी नुकसान भरपाई म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यालगत असलेले भंगार उचलणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिकांनी शासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मार्चअखेर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे हे बधवार पार्क, मच्छिमार नगर-कफ परेड, बाणगंगा येथे स्वच्छता मोहिमेस उपस्थित राहिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यावेळी त्यांनी मच्छिमार सर्वोदय सोसायटीस भेट देऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे स्थानिकांनी त्यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले.
Sunday, 1 October 2023
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
