Saturday, 30 September 2023

हृदय विकार? प्राथमिक उपचार


 

पर्यटन, तिर्थ क्षेत्रं सावधगिरी बाळगा

 



रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’

 रविवार को प्रदेश भर में स्वच्छता के लिए ‘एक तारीख एक घंटा’


मुख्यमंत्री ने सभी से इस गतिविधि में भाग लेने की अपील की


 


            मुंबई, दि. 30 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपील की है कि हम स्वच्छता के लिए रविवार 1 अक्टूबर को ‘एक तारीख एक तास’ पहल में स्वस्फूर्त रूप से भाग लें और महाराष्ट्र को देश में स्वच्छता में शीर्ष स्थान पर लायें।


            राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के अवसर पर केंद्र सरकार ने प्रदेश के शहरों और ग्रामीण क्षेत्रों में ‘एक दिन एक घंटा’ गतिविधि का आयोजन किया है और नागरिकों को सफाई कर इस अभियान में भाग लेना है. यह सफाई अभियान सुबह 10 बजे से गांव के साथ-साथ शहर के हर वार्ड में शुरू होगा. इसमें सफाई मित्र भाग लेंगे।


            अपनी अपील में मुख्यमंत्री ने कहा है कि 'एक तारीख एक घंटा' पहल को स्वच्छता आंदोलन का रूप देना है. इसके लिए सभी को अपना एक घंटा स्वच्छता के लिए देना होगा। आप, आपका परिवार या सहकर्मी जहां भी हों, आपको इस अभियान में योगदान देना है। मुख्यमंत्री ने कहा कि नगर निगम, नगर पालिका, नगर पंचायत के साथ-साथ ग्राम पंचायतें अपने-अपने क्षेत्रों में स्वच्छता अभियान चलाएंगे और स्थानीय स्व-शासन निकाय, राजस्व और जिला प्रशासन मदद के लिए तैयार रहेंगे।


            इस अभियान के बाद 15 दिसंबर 2023 तक मुख्यमंत्री सक्षम शहर प्रतियोगिता और मुख्यमंत्री सक्षम वार्ड प्रतियोगिता को भी सफल बनाने की योजना है। मुख्यमंत्री भी अपनी अपील में कहते हैं, आइए महाराष्ट्र को कचरा मुक्त बनाएं। आइए इसे स्वच्छ और सुंदर बनाएं। आओ स्वच्छता के लिए जागरण क

रें.


0 0 0


रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

 

            मुंबईदि. 30 : - स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार 1 ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊयाअसे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा  उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून  नागरिकांनी  स्वच्छतासाफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वार्डात  सकाळी 10 वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील.

 

            मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की,  की ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपणआपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असालतिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. आपआपल्या परिसरात महापालिकानगरपालिकानगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची असून स्थानिक स्वराज्य संस्थामहसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असेही मुख्यमंत्री म्हणतात.

 

            या अभियानानंतर 15 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छसुंदर करूया. स्वच्छतेचा जागर करूयाअसेही मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात.

0 0 0

                                         


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती

 

            मुंबई, दि. 30 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रकाश  अण्णा महानवर यांची नियुक्ती  करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. प्रकाश  महानवर यांची नियुक्ती केली.

 

            डॉ. प्रकाश महानवर (जन्म : 01.06.1967) सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक व संचालक पदावर कार्यरत आहेत.

 

            डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचा कार्यकाळ 5 मे 2023 रोजी संपल्यामुळे सदर पद रिक्त झाले होते.  त्यानंतर डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

 

            पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

 

            विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. सुरेशकुमार  (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते.

 

            समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

0 0 0

  

कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -केंद्रीय वाणिज्य मंत्री, पियुष गोयल

 कांदा उत्पादनखरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

-केंद्रीय वाणिज्य मंत्रीपियुष गोयल

 

कांदा उत्पादक शेतकरीगरीब व मध्यमवर्ग सगळ्यांच्या

हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न

                                                                 -पणनमंत्री अब्दुल सत्तार

 

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

 

 

 

            नवी दिल्ली,29: कांदा उत्पादनखरेदी तसेच विक्री दराविषयी 140 कोटी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिल्याची माहिती  राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

 

            नाशिक जिल्ह्यातील व्यापारांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठीकृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयलकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारराज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तारनाफेड संस्थेचे अपर व्यवस्थापकीय संचालक  एस.के.सिंगएनसीसीएफ चे व्यवस्थापकीय संचालक ॲनीस जोसेफ चंद्राकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजाग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे आर्थिक सल्लागार डॉ कामखेथेंग गुईटे उपस्थित होते.  

 

            गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापारांच्या समस्या सुरु आहेत. या समस्येच्या निदानासाठी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्यासमवेत मुंबई येथे बैठकाही पार पडल्या होत्या.  यासंदर्भात कृषी भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र सदन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 

            यावेळी पणन मंत्री श्री सत्तार यांनी व्यापारांच्या समस्या संदर्भात तातडीने लक्ष घालून हा विषय सोडविण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल केंद्रीय मंत्री श्री गोयल यांचे आभार मानले. कांदा उत्पादक शेतक-यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नयेयासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी  प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने हजार 410 रूपये प्रतिक्विंटल दराने नाफेड  आणि एनसीसीएफ मार्फत लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही संस्थांकडून अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून,नाफेड तसेच एनसीसीएफ या संस्थांनी प्रत्येकी एक-एक लाख टन कांदा आणखी खरेदी करण्याबाबत केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती मंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिली. आता 400 कोटी रूपयांची आणखी कांदा खरेदी करण्यात येईल. कुठल्याही परिस्थिती मध्ये गरीब शेतक-यांचे नुकसान होऊ देणार नाहीअसे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

            सरकारच्या मागणीप्रमाणे ज्या ज्या भागात कांदा शिल्लक असेल तिथे माल खरेदीला परवानगी दिली जाणार. तसेच नवीन कांदा खरेदी केंद्र उभारले जातील. याबाबत मार्केटिंग फेडरेशनने देखील सहमती दर्शवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कांदा खरेदी व खरेदी केंद्रांबाबत शासनाकडून दररोज वर्तमानपत्रात जाहिरातीव्दारे माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

 

            केंद्र शासनाने कांद्यासाठी ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे आणि ते कमी करण्याबाबत व्यापाऱ्यांची मागणी होती. याबाबत केंद्र शासनाकडून उच्चस्तरीय समितीने दिलेल्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.सत्तार यांनी दिली. तसेच कांदा उत्पादन शेतकरी व ग्राहकांची गैरसोय  टाळण्यासाठी व्यापारांनी लिलाव बंदी चा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी केद्र सुरु करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

 

            यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या कीकेंद्र सरकार देशातील जनतेचा विचार करुन  निर्णय घेत असते. ज्यावेळी कांद्याचे दर वाढतात किंवा कमी होतात त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी नाफेड संस्थेची मदत घेण्यात येते. १४० कोटी जनतेचा विचार करुन निर्णय घेतले जातात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ग्राहक हित आणि शेतकरी हित ही पाहिले जाते.

 

00000000000

 

 

 

 

 

 

 

 


मराठवाडा मुक्तीसंग्राम या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1.30 वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

 मराठवाडा मुक्तीसंग्राम या माहिती नाट्यपटाचे १ ऑक्टोबर 2023 रोजी

दुपारी 1.30 वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

 

            मुंबई दि. 29 : राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि सांस्कृतिक कार्य विभागमहाराष्ट्र शासन निर्मित मुक्तीसंग्राम (कथा मराठवाडयाच्या संघर्षाची) या माहिती नाट्यपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

       या नाट्यमाहितीपटाचे प्रसारण सह्याद्री वाहिनीवर दिनांक १ ऑक्टोबर२०२३ रोजीदुपारी १.३० वाजता करण्यात येणार आहे.

        पहिल्यांदाच मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षगाथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत असुन या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तसेच या नाट्य माहितीपटात सुप्रसिध्द अभिनेते अजय पुरकरसमीर धर्माधिकारीआदिनाथ कोठारेसमीर विद्वांसविक्रम गायकवाडअभिनेत्री स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांनी भुमिका साकारली आहे. त्याचबरोबर केदार दिवेकर यांनी संगीत दिग्दर्शननिखिल लांजेकर यांनी ध्वनी संयोजन आणि प्रतीक रेडीज यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

       मराठवाडा मुक्तीसंग्रामावरती उपलब्ध पुस्तके आणि संदर्भग्रंथ यांचा सखोल अभ्यास करून ७५ मिनिटांचा हा नाट्य माहितीपट अवघ्या १२ दिवसात तयार करण्यात आला आहे. 

         तरी या नाट्य माहितीपटाचा आस्वाद राज्यातील प्रेक्षकांनी घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांनी केले आहे.

000000

 


Featured post

Lakshvedhi