Friday, 29 September 2023

आज बाप्पा भिजू नये महणून निरागस मुलांनी काय केलं *🌹🙏 गणपती बाप्पा मोरया.. 🙏🌹*


 

माणसाला समज हवी"*

 " *माणसाला समज हवी"* 


 *मित्रांनो नमस्कार,* 


कोणताही माणूस मुळात तो वाईट नसतो. वाईट असतात ते त्याचे "विचार" आणि केवळ या विचारातूनच तो वाईट प्रवृत्तीचा बनतो. या वाईट प्रवृत्ती कशा हाताळायच्या याचेही एक शास्त्र असतं आणि ते शास्त्र म्हणजे माणसाला असणारी 'समज'. माणसाला योग्य वयात योग्य 'समज' यायला लागते म्हणतात, आणि ती समज एकदा का आली की माणसांमधील वाईट प्रवृत्ती नायनाट होण्यास मदत होते. परंतु सगळ्यांमध्येच असं होतं असेही नाही. मानव संसाधन विभागात असल्यामुळे मी आजवर अनेक लोकांना भेटलो व लोकांशी संबंध आला. परंतु सर्वांमध्ये हीच तफावत जाणून येते. वयानुसार याच्यामध्ये फरक पडतो आपण म्हणतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून वयानुसार व्यक्तीला समज येथे असे नाही. एखाद्या व्यक्तीला कमी वयामध्ये खूप चांगली समज येते. आणि एखाद्या व्यक्तीला वयोवृद्ध झाल्यानंतर ही समज येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बालपणापासून आपण स्वतःहून किती गोष्टी समजून व स्पष्ट करून घेतल्या. ही विचाराची स्पष्टता ज्यांना ज्या वयामध्ये झाली, अशा सर्व व्यक्तींना समज ही वेगवेगळ्या प्रसंगामधून व वेगवेगळ्या वयामध्ये आली असे दिसते. आपले विचार प्रगल्भ झाले की, आपल्यामध्ये "प्रगल्भता" येते. आपण ठरवलेल्या दिशांनी जात असताना अचानकपणे रस्ता चुकतो आणि रस्ता चुकलोय हे आपल्याला डोळ्यांनी दिसतो. म्हणून आपण लगेच जागृत अवस्थेत येतो आणि योग्य रस्ता धरतो. तसं विचाराच्या बाबतीत होत नाही. बोलत-बोलत व शब्दा- शब्दातून आपण कोणत्यातरी वेगळ्या दिशेला मार्गक्रमण करतो आणि त्याच्यातून निर्माण होतात ते गैरसमज आणि मतभेद. समज चांगली येण्यासाठी आपल्या मनामध्ये स्पष्ट विचार असायला हवेत. स्पष्ट विचार कोणताही गोंधळ व गैरसमज निर्माण होऊ देत नाहीत. 


खऱ्या अर्थाने ज्यावेळेस व्यक्ती ऐकून घेण्याचे, संयम बाळगण्याचे व समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तन-मन लावून असतो, तेव्हा त्याच्या मधून येणारा परिणाम हा, निश्चितच समजूतदारपणाचा असतो आणि हाच समजूतदारपणा आपल्याला 'समज' नावाची देणगी आयुष्यभरासाठी देऊन जातो. 


"समज" ही जीवनाचा पाया आहे आणि "समज" असणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. "समज" कमी असेल तर आयुष्य हे ताण-तणावाचे व गुंतागुंतीचे होऊन जाते. समोरच्याने हे मुद्दामून माझ्यासाठी केलेला आहे. माझ्यावर तू जळतो आहे. माझी प्रगती झालेली त्यांना आवडत नाही. मी त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे. अशा काही गोष्टींचा त्रास आपण स्वतःला करून घेतो आणि होतो सुद्धा. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्यामध्ये असणारा "समजूतदारपणा" हा खूप कमी व नकारात्मक आहे. याचे परिणाम ही अत्यंत गंभीर स्वरूपाचे आपल्या जीवनावरती आघात करून जातात. म्हणून नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये "सकारात्मक समाज" निर्माण करणे, आपण केलेल्या विचारावरती परत विश्लेषणात्मक विचार करणे, जेणेकरून आपल्या मधल्या समजूतदारपणाचं "दर्शन" आपल्यालाही व समाजालाही होईल व त्याची किंमत कोणालाही चुकवावी लागणार नाही. 


आपल्यामध्ये "समज" असेल तर वादविवाद भांडण तंटे "गैरसमज" असे प्रकार आपल्या जीवनामध्ये होत नाहीत आणि आपण शांततेत संकटात ही मार्ग काढू शकतो.

गौरी गणपतीचे सणाला,महाराष्ट्र लोकधारा


 [शिर्की pen, रायगड] Nilakshi Patil l❤️🥰❤️: सर्व गाण्यांचे संकल्पना - स्मिता गावंड. लेखिका - स्मिता गावंड. मुख्य गायिका - सुनंदा गावंड. सह गायिका - स्मिता गावंड, मनीषा गावंड, निता पाटील, रुपाली पाटील, निलाक्षी पाटील. वाद्य वाजंत्री (ढोल) - पार्थ गावंड.

[ Nilakshi Patil Patil❤️🥰❤️: 1 ला गाणी गौरी घरी घेऊन येताना बहिणी आणा माहेराला आधी आ गौराबाईला

Thursday, 28 September 2023

😂😂😂 आधी फक्त गरब्यात सेटिंग व्हायची. आता गणपतीत पण. व्यय महाराजा


 😂😂😂 आधी फक्त गरब्यात सेटिंग व्हायची. आता गणपतीत पण.

भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला

 भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला


डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली


 


            मुंबई, दि. 28 :- भारताच्या हरित क्रांतीचे जनक ज्येष्ठ शेतीतज्ज्ञ व सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाने भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करणारा महान शास्त्रज्ञ हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.  


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. प्रशासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करतानाही त्यांनी शेतकरी हित जपण्याचे महत्त्वाचे कार्य केले. 2004 साली स्वामीनाथन यांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 2006 मध्ये किमान आधारभूत किंमत (एमएसपी) बाबत त्यांनी काही शिफारसी केल्या होत्या, उत्पादन मूल्याच्या दीड पट हमीभाव देण्याच्या त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये केली. डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना !


0000


 


वृत्त क्र. 3230


 


डॉ. स्वामीनाथन यांच्या निधनाने कृषी क्षेत्राची प्रचंड हानी


- कृषी मंत्री धनंजय मुंडे


कृषी शात्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त


 


            मुंबई दि. 28 : सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ तथा स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनामुळे कृषी क्षेत्राची प्रचंड हानी झाली असल्याची खंत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करून श्री. मुंडे यांनी डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


            कृषी क्षेत्रात क्रांती घडवत डॉ. स्वामीनाथन यांनी गहू, तांदूळ आदी धान्याचे अधिकाधिक उत्पन्न देणारे वाण विकसित केले. त्यांच्या योगदानामुळे अन्नधान्याच्या बाबतीत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व कायमचे संपले. 


            विविध प्रशासकीय पदे भूषवत डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात संशोधन केले. डॉ.स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेले योगदान देश सदैव स्मरणात ठेवेल, असेही धनंजय मुं

डे यांनी म्हटले आहे.


0000


विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरसहशिक्षक मतदारसंघांसाठी मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 विधान परिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधरसहशिक्षक मतदारसंघांसाठी मतदारांनी नोंदणी करण्याचे आवाहन


- मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर


 


            मुंबई, दि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.


               या मतदार नोंदणीसाठी पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईल, वृत्तपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरला, द्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्रमांक १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.


            मुंबई शहर जिल्ह्यामध्ये एकूण १० विधानसभा मतदारसंघ असून सदर मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात मतदारसंघाचे अर्ज स्वीकारले जातील.


             मागील निवडणुकीत सन २०१८ ला मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १८३५३ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.


             पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ( नमुना १८) हा अर्ज असून त्यासाठी पुढील प्रमाणे अर्हता आवश्यक आहे. जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि तो १ नोव्हेंबर, २०२३ पूर्वी किमान ३ वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एक, तर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे.


            मागील निवडणुकीत (सन २०१८) मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १८८९ इतकी मतदारांची अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली होती.


            शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी (नमूना १९) हा अर्ज असून त्यासाठी पुढीलप्रमाणे अर्हता आवश्यक आहे. अर्हता जी व्यक्ती भारताची नागरिक आहे. सर्व सामान्यपणे ज्या मतदारसंघाची रहिवासी आहे व जिने दिनांक १ नोव्हेंबर, २०२३ पूर्वी ६ मागील वर्षामध्ये राज्यातील एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले आहे. अशी व्यक्ती मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाण्यास पात्र राहील. शैक्षणिक संस्थांची यादी पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असेल.


            शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी केलेल्या नमुना १९ मधील अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर, २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये एखाद्या माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत त्या शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.


0000

स्वच्छतेसह श्रमदान उपक्रमातनागरिकांनी उस्फूर्त सहभाग घ्यावा

 स्वच्छतेसह श्रमदान उपक्रमातनागरिकांनी उस्फूर्त सहभाग घ्यावा


‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 27 : राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.


            देशात स्वच्छतेची चळवळ उभी रहावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्वच्छता हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे, यासाठी जन सहभाग अत्यंत गरजेचा आहे. त्याअनुषंगानेच राज्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख- एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम काय आहे, याचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे, याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांनी ‘दिलखुलास’ आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि.29 आणि शनिवार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००

Featured post

Lakshvedhi