Thursday, 28 September 2023

तो क्षणच अनंत चतुर्दशी

 ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

*तो क्षणच अनंत चतुर्दशी!*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

*होतील तीच अनंत चतुर्दशी!*

            

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा.

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा...


थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगुन घेऊया.

बाप्पा सारखे थोडे 

लाडु मोदक खाऊन घेऊया...


इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा.

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा...


मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद.

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद...


जातील निघुन सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला.

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला...


बाप्पा सारखं नाचत यायचे 

आणि लळा लावुन जायचे.

दहा दिवसांचे पाहूणे आपण 

असे समजून जगायचे...


किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख.

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख...


*पाहुणा आहे इथे प्रत्येकजण* 

*दीड दिवस अन् दहा दिवसाचा*

*हे जगणे म्हणजे एक उत्सव* 

*हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.*🌹💐

गणपती बाप्पा मोरया 🎊

मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

 मुंबई, कोकण विभाग पदवीधरसह नाशिक आणि मुंबई विभाग

शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

            मुंबईदि. 27 : विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच नाशिक आणि मुंबई विभागाच्या शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दि.१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा हा पुनरीक्षण कार्यक्रम असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            ज्या मतदारसंघांची मुदत पुढील वर्षी म्हणजेच जुलै २०२४ ला संपणार आहे. त्यासाठी ही नोंदणी सुरु होईल. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी दरवेळी मतदारांची नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारसंघांकरिता येत्या ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होईल. हा टप्पा ६ नोव्हेंबरला संपेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीतही मतदार नोंदणी केली जाणार आहे.

            पदवीधर मतदारसंघांसाठीत्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ च्या किमान ३ वर्षे आधी भारतातील मान्यतापात्र विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. पदवीधर मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक १८ भरून त्यासोबत निवासाचा आणि पदवीचा पुरावा जोडावा लागेल. पदवीचा पुरावा म्हणून पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकाही ग्राह्य धरली जाईलअसेही  श्री. देशपांडे यांनी सांगितले.

            शिक्षक मतदारसंघासाठी त्या-त्या मतदारसंघातील सर्वसाधारण निवासी असलेले आणि १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेले व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील. शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज क्रमांक १९ भरूनत्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र  द्यावे लागणार आहे.

            मतदारांच्या नावात बदल झाले असतीलतर अर्जासोबत राजपत्रविवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा संबंधित कायदेशीर पुरावादेखील जोडावा लागेल. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जाणार नाहीअसेही  श्री. देशपांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

            राजकीय पक्ष देखील मतदार नोंदणीसाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज स्वतः छापूनत्याचे वितरण करू शकतील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारांची अधिकाधिक नोंदणी व्हावीयासाठी जनजागृती केली जात आहे.  विद्यापीठेमहाविद्यालयेशाळाविविध संस्था संघटनाशासकीयनिमशासकीय कार्यालयबँका या ठिकाणी पोहोचून पदवीधरांना नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज दिले जातीलअशी माहितीही त्यांनी दिली. राजकीय पक्षांनीही मतदार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्यास्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केले.

            या मतदार नोंदणीसाठी येत्या शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईलवर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरलाद्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्र. १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईलअसे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले.

            यासोबतचविधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम – २०२४ अंतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि. १७ ऑक्टोबर ऐवजी २७ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असल्याची माहिती  श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली.

            यावेळी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकरउपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांच्यासह इतर अधिकारी  उपस्थित होते.

0000

बाप्पा मोरया रे, पुढच्या वर्षी लवकर या

 


विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले मुंबईतील गणरायांचे दर्शन

 विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले मुंबईतील गणरायांचे दर्शन.





            मुंबई, दि. 27 : विविध देशांचे महावाणिज्य दूत, वाणिज्य दूत तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन गणरायांचे दर्शन घेतले. हा सण समाजामध्ये एकतेची भावना निर्माण करणारा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.


            महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याबरोबरच पर्यटन उद्योगासाठीही चालना देणारा महोत्सव आहे. धार्मिक सीमा ओलांडून एकात्मता जागवणारा, सांस्कृतिक देवाण-घेवाण घडवणारा आणि आर्थिक वृद्धी साधणारा हा सण आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. आज जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत वाणिज्यदूतांसाठी गणेश दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी दूतावासातील मान्यवरांचे स्वागत करून त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सवाबद्दल माहिती दिली.


            सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, चिली, थाई, मॉरिशस, जपान, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, कुवैत, स्पेन, इटली, मेक्सिको, श्रीलंका, स्वीडन आदी देशांतील सुमारे ४२ मान्यवरांनी यावेळी गणेश गल्ली तसेच वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेश मंडळांसह सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले.


            गणरायांच्या दर्शनानंतर पाहुण्यांनी आंतरराष्ट्रीय गणेश फेस्टिवल २०२३ अंतर्गत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे उभारण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक केंद्रात आयोजित कला प्रदर्शनाला भेट देऊन कलावंतांनी सादर केलेल्या विविध कलांचे कौतुक केले. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित या प्रदर्शनात वाळू शिल्प, मॉझेक, स्क्रॉल आर्ट, वारली कला, हस्तकला, मातीची गणेश मूर्ती बनविण्याचा अनुभव देणारे प्रशिक्षण, लोककला संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, गणेशोत्सव काळात 'घर घर गणेश' आणि 'वेस्ट टू वंडर' संकल्पनेवर आधारित ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धा आदींची रेलचेल होती. या माध्यमातून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनालाही वाणिज्यदूतांनी भेट देऊन चित्रांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


            राज्यातील पर्यटनाला चालना देणे, पारंपरिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देणे तसेच गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी देऊन राज्यात पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करणे या उद्देशाने पर्यटन संचालनालयाद्वारे दि.१९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान विविध राज्यातील पर्यटनाशी निगडित भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार व समाजमाध्यम प्रभावक यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांना परिचय सहलीच्या माध्यमातून मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव दर्शनाची थेट सुविधा तसेच आपल्या सांस्कृतिक वैभव दाखविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईतील विविध देशाच्या वाणिज्य दुतावासांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांना मुंबईतील नामांकित गणेश मंडळांमार्फत थेट दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.


0000

गणेशोत्सव पुढील 10वर्ष तारखा , लक्षात ठेवा



 

एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आवश्यक तिथे साथ दिली तर सर्वोत्तम असे यश गाठता येते.....*🤔

 *एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आवश्यक तिथे साथ दिली तर सर्वोत्तम असे यश गाठता येते.....*🤔


ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना,आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले.


पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो,यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. 


शर्यत पुन्हा सुरू झाली.यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही.परिणामी वेगवान ससा शर्यत जिंकला.हळू चालणारे कासव हरले.


पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.


कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक,आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,


 "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ?

पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .


 शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. 


पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं.


त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली.


 *सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली.* 


हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. 


म्हणाला....

मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.

आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. 


दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'


 प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.


जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. 


अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.

सर्वोत्तम यश गाठता येतं.


एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर उत्तुंग असे काही करता येतं.


वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !


उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्य भावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात.


काही लोकांकडे कल्पना शक्ती असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.


काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमता असते; पण निर्णयक्षमता नसते. 

निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. 


*अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!*

सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

 सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत

पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

 

            नवी दिल्लीदि.27 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.

            नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते  देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवारमहात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशीपाटगावचे सरपंच विलास देसाईमधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.

            शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिकनैसर्गिकआर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी 5 गावांना सुवर्ण10 गावांना रौप्य तर 20 गावांना कांस्य पदक मिळाले आहे.

            युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑरगनायझेशनयुनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमजी -20केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.

                 सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने पाटगाव मध्ये मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला आहे. मध विक्री व मध पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सूक्ष्म नियोजन केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील तसेच नाबार्डखादी व ग्रामोद्योग विभागमहसूलग्रामविकासपर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले आहे. नाबार्डच्या सहकार्यातून पाटगाव मधउत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून मध उत्पादकविक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी व मध निर्मिती व विक्री उद्योगाला चालना देण्यात येत आहे. 

            पाटगावच्या मधाचे ब्रँडींगपॅकेजिंगलेबलिंग व मार्केटींगसाठी प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन सुरु आहे. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणेमधपाळांना मधपेट्या देणेआवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडावअंतुर्लीमठगाव,  तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

            या उपक्रमांतर्गत पाटगाव परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहे. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्थास्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्यामधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.

0 0 0 0 0

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.178  / दिनांक 27.9.2023

 


Featured post

Lakshvedhi