Thursday, 28 September 2023

तो क्षणच अनंत चतुर्दशी

 ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

*तो क्षणच अनंत चतुर्दशी!*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

*होतील तीच अनंत चतुर्दशी!*

            

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा.

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा...


थोडा वेळ आहोत इथे

तर थोड जगुन घेऊया.

बाप्पा सारखे थोडे 

लाडु मोदक खाऊन घेऊया...


इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा.

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा...


मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद.

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद...


जातील निघुन सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला.

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला...


बाप्पा सारखं नाचत यायचे 

आणि लळा लावुन जायचे.

दहा दिवसांचे पाहूणे आपण 

असे समजून जगायचे...


किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख.

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख...


*पाहुणा आहे इथे प्रत्येकजण* 

*दीड दिवस अन् दहा दिवसाचा*

*हे जगणे म्हणजे एक उत्सव* 

*हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.*🌹💐

गणपती बाप्पा मोरया 🎊

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi