सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 27 September 2023
नकारात्मक प्रभाव*
*नकारात्मक प्रभाव*
असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?
*तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,*
*आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..*
तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
*उदा.* माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं,
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...
*ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.*
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
13) मी निरोगी आहे,
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.
*याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल*
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्या आज्ञा पाळेल आणि खर्या करुन दाखवेल.
आणि हीच एका दृष्टीने
*“लॉ ऑफ अट्रॅक्शन”*
ची दणदणीत सुरुवात असेल!..
*ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो.*
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत
कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही,
यासाठी कडक पावले उचलावीत
– मंत्री सुधीर मुनगंटीवार
कांदळवन संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रजातींचे उद्यान विकसित करणार
मुंबई, दि. 26 : केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनांच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करावे. त्यातून जनजागृती करावी. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्यावी, असे निर्देश आज वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक वन मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश कदम, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक एस. व्ही. रामाराव, सहसचिव (वित्त) विवेक दहिफळे, उपवनसंरक्षक अनिता पाटील, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या पर्यावरण अभियंता ज्योती पाटील, संचालक (पर्यावरण) अभय पिंपरकर, सहआयुक्त (मत्स्य) युवराज चौगले, दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे भिका कोळी याशिवाय, भारतीय तटरक्षक दल, कोकण विभागीय आयुक्तांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात एकूण 20 प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवाय, गोराई, दहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करावे. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईल, याबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्य पालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्था, चेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्य पालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजुरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी. कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआर सॅक यंत्रणेकडून अद्ययावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावी, बहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. रामाराव यांनी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
0000
केंद्र शासन प्रधानमंत्री स्वानिधी योजना
केंद्र शासन प्रधानमंत्री स्वानिधी योजना आपल्या परिक्षेत्रातील महानगर पालिका कार्यालयाशी संपर्क साधावा
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी 143.04 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी143.04 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई दि. 26 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत – पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143.04 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
मंत्री श्री .राठोड म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण – केंद्र : राज्य (60 : 40) असून, योजनेचे प्रकल्पमूल्य रु.1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे रु.143.04 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
उपजीविका घटक अंतर्गत प्रत्येक पाणलोट प्रकल्पात फिरता निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु. 30 हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु.60 हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार असून, प्रत्येक प्रकल्प क्षेत्रात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत प्रभाग संघ व स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून पात्र स्वयं सहाय्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.
00000
. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावा
. चिंतामणराव देशमुख वनउद्यानाचा आराखडा सादर करावाडॉ
- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राचे सुपूत्र तथा देशाचे माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख (डॉ. सी.डी. देशमुख) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. डॉ. सी. डी. देशमुख यांच्या कर्तृत्वाला साजेसा वन उद्यानाचा आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या प्रस्तावित वनउद्यानाच्या आराखड्याचे वन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील जामगाव (ता. रोहा) येथे डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर (व्हिसीद्वारे), रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (व्हिसीद्वारे) मुख्य वनसंरक्षक ठाणे के. प्रदिपा, रोहा-रायगडचे उपवनसंरक्षक अप्पासाहेब निकत आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, माजी केंद्रीय अर्थमंत्री, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ आणि कुशल प्रशासक, वनस्पती शास्त्रज्ञ अशा अनेक आघाड्यांवर चिंतामणराव द्वारकानाथ ऊर्फ सी. डी. देशमुख यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्राच्या या थोर सुपूत्राच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या औचित्याने त्यांच्या नावाने रायगड जिल्ह्यातील जामगाव येथे ‘डॉ. चिंतामणराव देशमुख जैव विविधता, वन व वनस्पती उद्यान’ उभारण्यात येणार आहे. त्यांची स्मृती जतन करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या वनउद्यानाची उभारणी त्यांच्या नावाला आणि कर्तृत्वाला साजेशी करण्यात यावी, त्यासाठी दर्जेदार आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
*****
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



