Tuesday, 26 September 2023

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद

 आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद

कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात

- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

 

            मुंबई, दि. २६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे.  आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र बदलून आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करावीत तसेच त्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत विचार करावाअशी सूचना राज्यपालांनी राज्यातील कुलगुरूंना केली.

            'आदिवासी विकास व संशोधनया विषयावर राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २६) राजभवन मुंबई येथे झालेत्यावेळी राज्यपाल बोलत होते.  परिषदेचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

            परिषदेला राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहानबिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठराजपिपलागुजरात येथील कुलगुरु मधुकरराव पाडवी, 'स्वारातीमविद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले,  डॉ. उपेंद्र कुलकर्णीतसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.   

            आदिवासी समाजाचे अध्ययन व संशोधन कार्यालयात बसून होणार नाही. त्यामुळे कुलगुरुंनी आदिवासी गावांमध्ये समक्ष जाऊन तेथील समस्या समजून घ्याव्यातअशी सूचना राज्यपालांनी केली.   

            नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले असून आदिवासींना त्यांच्या भाषेतून शिक्षण दिल्यास ते त्यांना अधिक चांगले समजेल. या दृष्टीने मातृभाषांमध्ये पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 

            भारतात ७०० पेक्षा अधिक आदिवासी जनजातींचे लोक आहेत. आदिवासी समाज पर्यावरण रक्षक आहेत. आज आदिवासी समाजासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा आहे. त्यांच्यापुढे कर्जबाजारीवेठबिगारीगरिबीउपासमारकुपोषणस्थलांतर यांसारख्या अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडवणेत्यांच्या पारंपरिक ज्ञानाचे रक्षण करणेत्यांची संस्कृती जपणे व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे यासाठी  विद्यापीठांना महत्वाची भूमिका बजवावी लागेल.

            विद्यापीठांनी आदिवासी बहुल गावांशी संपर्क वाढवावाकाही गावे दत्तक घ्यावीत व आदिवासींच्या जीवनस्तर वाढेल अशा योजनांमध्ये गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले. याशिवाय विद्यापीठांनी आदिवासी बांधवांना वन उपजांचे पॅकेजिंगविक्री यामध्ये देखील मदत करावी. आदिवासींच्या कौशल्य शिक्षण तसेच कौशल्य वर्धनाकडे देखील विद्यापीठांनी लक्ष द्यावे, असे सांगताना आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना सरकारी योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.

            आदिवासींच्या बाबतीत देशात आजवर योग्य समज विकसित झाली नाही. भारतीय इतिहासात 'आदिवासीहा शब्दच मुळी नव्हतातर 'नगरवासी', 'ग्रामवासीव 'वनवासीअसे भौगोलिक स्थितीवर आधारित शब्द होते.  इंग्रजांनी 'आदिवासीशब्दाची परिभाषा केली आणि स्वातंत्र्यानंतर तीच परिभाषा आपण स्वीकारली. आदिवासी समाज कमी बोलणारा आहे. त्यामुळे उद्योजक - धोरण निर्माते यांना आदिवासी समाजाची पुरेशी माहिती नाही. या दृष्टीने आदिवासी समाजावर व्यापक संशोधन व डॉक्युमेंटेशन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान यांनी यावेळी केले.

            भारतीय संस्कृती व अध्यात्माचा आदिवासी संस्कृतीशी प्राचीन संबंध आहे. आदिवासी परंपरा अद्भुत असून आदिवासींच्या सणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. जलजमीनजंगल यांच्या सोबतचे त्यांचे नाते पर्यावरण पूरक असे आहे. त्यामुळे सर्व समाजांनी आदिवासींची जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन राजपिपला गुजरात येथील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पाडवी यांनी केले.

००००

ओमेगा-3 के फायदे:*

 *ओमेगा-3 के फायदे:* 


ओमेगा 3 शरीर के लिए एक अच्छा पॉलीअनसैचुरेटेड फैट है। यह दिमाग को सुचारु रूप से चलाने, हृदय को सेहतमंद रखने, आंखों से जुड़ी समस्याओं से निजात पाने, तनाव, डिमेंशिया और कैंसर के इलाज में फायदेमंद है। हमारा शरीर इस फैटी एसिड का निर्माण नहीं कर सकता, इसलिए हमें अपनी डाइट में इसे जरूर शामिल करना चाहिए।


ओमेगा 3 से कण्ट्रोल करे आपकी ऐज।


अगर आप हमेशा जवान (Young) दिखना चाहते है और अपनी बढती उम्र की दर पर काबू पाना चाहते है तो आप ओमेगा 3 (Omega 3) सुप्लिमेंट लेने की आदत डाल सकते है क्योंकि जाहिर है भागती जिन्दगी (life) में कोई भी ऐसा नहीं होगा जो सेहत (Health) के लिए सोचता नहीं होगा लेकिन हाँ जन्हा समय निकालने की बात होती है तो वो हम नहीं कर पाते है | लेकिन फिर भी आप ध्यान रखें की सबसे बड़ी सम्पति जो आपके पास है आपका शरीर और आपकी सेहत (health) जिसके बिना आप दुनिया की किसी भी ख़ुशी को उस तरीके से महसूस नहीं कर पाएंगे जितनी जानदार तरीके से आप कर सकते है |

ओमेगा ३ (omega 3) के नियमित सेवन से inflammation level  लेवल कम होता है | दिल की बीमारिया  (Heart diseases), टाइप 2 वाला मधुमेह आर्थराईटिस जैसे समस्या से भी निपटने में ओमेगा ३ से काफी मदद मिलती है | 


omega 3 health hindi benefits:


अल्जाइमर जैसी उम्र बढ़ने की दर को बढाने वाली बीमारियों से भी काबू पाने में ओमेगा ३ (omega 3) आपकी मदद करता है |

ओमेगा ३ (omega 3) के नियमित सेवन से inflammation level  लेवल कम होता है | दिल की बीमारिया  (Heart diseases), टाइप 2 वाला मधुमेह आर्थराईटिस जैसे समस्या से भी निपटने में ओमेगा ३ से काफी मदद मिलती है | अल्जाइमर जैसी उम्र बढ़ने की दर को बढाने वाली बीमारियों से भी काबू पाने में ओमेगा ३ (omega 3) आपकी मदद करता है | 


 *प्रोटीन पाउडर* 

खाने के 29 फायदे

इसमे 9 आवश्यक अमीनो हैं जो इस धरती पर या तो मां के दूध मे हैं या इस प्रोटीन मे।

1. यह शुगर को नियंत्रित करता है।

2. यह एनर्जी को नियंत्रित करता है।

3. यह मानसिक एकाग्रता बढ़ाता है।

4. यह कैल्शियम अवशोषण मे मदद करता है।

5. यह हारमोन्स बनाता है।

6. यह एन्टीबाडी बनाता है।

9. यह थकान दूर करता है।

10. यह चिड़चिड़ापन दूर करता है।

11. यह एनीमिया ठीक करता है।

12. यह बाल झड़ना रोकता है।

13. यह लीवर से जहरीले तत्वों को बाहर निकालता है।

14. यह लीवर एवं किडनी के ऊतक बनाता है।

15. यह पाचन क्रिया को सुधारता है।

16. यह मसल्स को मजबूत करता है।

17. यह आस्टियोपोरोसिस मे मदद करता है।

18. यह डिप्रेशन को कम करता है।

19. यह याददास्त को बढ़ाता है।

20. यह कोलोजन को बनाता है।

21. यह माइग्रेन ठीक करने मे मदद करता है।

22. यह आथ॔राइटिस मे लाभ पहुचाता है।

23. यह हाइपर एक्टीविटी को कम करता है।

24. यह बजन कम करने मे मदद करता है।

25. यह अनिद्रा दूर करता है।

26. यह ऊतकों की मरम्मत करता है।

27. यह लाल तथा सफेद रक्त कोशिकाओं को बनाता है।

28. यह हदय को मजबूत करता है।

29. यह कोलेस्ट्राल नियंत्रित रखता है।

यानी कि शरीर मे सब कुछ प्रोटीन ही करता है इसे रोज 10-40 ग्राम तक ले सकते हैं।

रोज खाये एवं स्वश्थ रहें।


For more details 

WhatsApp me

पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!*

 *पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* 


अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 


 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 


*वेगाने चालण्याचे फायदे -*


*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 

*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

*8)* चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

*10)* चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत

*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

*13)* वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम

*14)* चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते

*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

*16)* दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

*17)* चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

*18)* झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

*22)* नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

*23)* हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

*24)* नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

*25)* मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.

*27)* नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

*28)* चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

*29)* दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 

*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम

 १ ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम

स्वच्छता अभियान लोकचळवळ’ व्हावी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा

 

            मुंबईदि. 26 : स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावाअसे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असून लोकसहभागातून ते यशस्वी करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            स्वच्छता पंधरवडा – ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी दि. १ ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत आज दुरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवारमुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त यावेळी सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणालेया अभियानासाठी मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपले उद्दिष्ट आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात स्वच्छता पंधरवडा राबवायला सुरुवात केली आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी त्याचे नियोजन कराअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

            महानगरपालिकानगरपालिकानगरपंचायत हद्दीच्या बाहेरच्या भागात नेहमी कचऱ्याचे ढीगडेब्रीज टाकलेले असते. अशा महानगरपालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवावी. त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

            ‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्वाचे आहे. स्वच्छता फक्त कागदावर ठेऊ नका. प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात १ ऑक्टोबरला आपापल्या गावातशहरातप्रत्येक वार्डातप्रत्येक क्षेत्रात सकाळी १० वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावेजिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहेअशा जागा शोधून काढाअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी दिले.

            अभियानांतर्गत सफाई मित्रसुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्यावे. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे. पण, आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे, असे सांगत अभियानानंतर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी करावीअसे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला  क्रमांक  कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन मोडवर काम करावेअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

००००

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य

 महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 


            या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांबाबत माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तत्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.


            त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तटरक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.


0000



 

चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे, उभे, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे, उभे, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्का

                         

                                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


        नागपूर दि.24 : चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


            चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजमेळाव्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री

श्री. फडणवीस बोलत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दीपक गवई, माजी आमदार परिणय फुके, अशोक थोटे, राजेंद्र चौधरी, रोशन माहुरकर, परिणिता फुके आदी मंचावर उपस्थित होते.


            चर्मकार समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. विशेष म्हणजे प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक मुली आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महिलाशक्ती ओळखूनच देशाच्या प्रगतीसाठी महिलांना संधी देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याविषयीचे विधेयक आणल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            चर्मकार महामंडळाच्या कर्ज वितरणात सुलभता आणण्यासाठी मुंबई येथे लवकरच बैठक घेवून जामीन देण्याबाबतच्या व इतर अटी-शर्थी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बारा बलुतेदारमधील चर्मकार समाजाला उद्योग-व्यवसायात नवीन तंत्र, व्यवसायाच्या नवीन संधी, बाजारपेठ आणि कर्जही मिळाले पाहिजे, याकरता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे. समाजात नवीन उद्योजक घडविण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या नवीन दालनाचा चर्मकार समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. चर्मकार समाजाकरिता नागपूर येथे समाज भवन निर्माण करण्यासाठी निधीची उपलब्धता करू, असेही ते म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.


            दहावीचे 230 व बारावीचे 135 असे एकूण 365 विद्यार्थ्यांचा चर्मकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येत असल्याची माहिती प्रास्ताविकेत भैय्यासाहेब बिघाणे यांनी दिली.

Tu मागतो मी आता


 

Featured post

Lakshvedhi