Saturday, 23 September 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन

 




केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत 


 


            मुंबई, दि. २3 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे एक दिवसीय दौऱ्याकरिता आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक,राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

.


 


गणेशोत्सव शिवलकर परिवार,अलिबाग

 


आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा*

 *आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा* 


'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.


वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.


घरात गणपतीची मूर्ती किंवा तसबीर नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे. 


घरातला गणपती जागरूक नाही.....??? 


अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो. जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......??? 


तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका. 


बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य सगळं करतात. 


पण 

तिथे xxxxच्या राजाच्या माजलेल्या कार्यकर्त्यांकडून डोकं आपटून, त्यांचे धक्के खायला आणि अपमान करून घ्यायला का जातात कळत नाही. तो समोरचा वीस फुटी राजा जागरूक असता तर पहिल्यांदा त्याने त्या माजोरी कार्यकर्त्यांना वठणीवर आणलं असतं. 


हे कार्यकर्ते का कोण ते बायकांना ढकलून देतात, पाया पडू देत नाहीत, पुढे चला पुढे चला असं भिकाऱ्यांना हाकलल्यासारखं भक्तांना हाकलतात. तरी लोक तिथे का जातात हा खरच संशोधनाचा विषय आहे.


तुमच्या घरचा गणपती कमी जागरूक समजू नका. त्यावर श्रद्धा ठेवा. पावायचा तर तोही पावेल. उगाच राजाच्या मंडपातली गर्दी, आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा माज वाढवू नका.


शांतपणे हे सारे मुद्दे लक्षात घ्या. विचार करा. 

 

अहो गणपतीचं आपल्या घरी येतो, मग आपण का जायचे बाहेर.

 आमच्या घरचा गणपती बाप्पा आम्हाला पावतो. आमचा विश्वास आहे घरच्या गणपतीवर.


आपल्या घराच्याच गणपतीवर विश्वास ठेऊन,मनोभावे दर्शन घ्यायचे. बघा पावतो का नाहीं. त्याच्यावर अविश्वास दाखवला तर तो कसा पावेल हो.


आवडलं म्हणून पाठवलं ☺️,

Friday, 22 September 2023

राजगड ने दिले बाप्पा चे दर्शन


 

गौरी पूजन

 






अजित गुरव आणि मंडळ, मुरुड रायगड




 

जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

 जलाशयाखालील गाळपेर जमिनीवर चारा पिके घेण्यास मान्यता

दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शासन निर्णय निर्गमित


            मुंबई, दि. २२ : राज्यात चालू वर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या पीक पाहणी आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चारा टंचाईवर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दुष्काळी परिस्थितीत जलाशयाखालील आणि तलावाखालील जमिनीचा विनियोग फक्त चारा पिके घेण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.


            जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या जलाशयातील जलसंचय बाष्पीभवनामुळे कमी झाल्याने, बुडित क्षेत्रातील जमिनी मोकळ्या/उघड्या होणार आहेत. या जमिनीमधील ओलावा आणि अत्यावश्यक परिस्थितीत जलाशयाद्वारे उपलब्ध होणारी सिंचन व्यवस्था विचारात घेऊन अशा जमिनीवर मोठ्या प्रमाणात चारा पिकांची पेरणी करून चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. यास्तव जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील मोठे प्रकल्प, / मध्यम प्रकल्प / लघु प्रकल्पांच्या जलाशयातील गाळपेरा जमीन फक्त चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्यासाठी गाळपेरा जमिनीचे वाटप कार्यपद्धतीचे अवलंबन करून ही जमीन फक्त चारा पिकांसाठी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता समिती गठित


            गाळपेर जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारणाकरिता लाभार्थी निवड, समन्वय आणि सनियंत्रणासाठी समिती गठित करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंचन अधीक्षक अभियंता, मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे या समितीचे सदस्य, तर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असतील.


            राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही वेळेस टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते. कमी झालेले पर्जन्यमान अथवा भविष्यात पुरेसा पाऊस न झाल्यास जमिनीत असलेली ओल कालौघात कमी होईल, यास्तव आगामी काळात उद्भवणाऱ्या चारा टंचाईच्या स्थितीवर मात करण्यासाठी व उपलब्ध ओलीचा फायदा घेण्यासाठी चारा पिकांची लागवड करण्याची हीच योग्य वेळ आहे. मूरघास हा चारा प्रकार इतर चाऱ्यांपेक्षा जास्त पौष्टिक असून, मूरघासाच्या वापरामुळे पशुंची उत्पादन क्षमता व प्रजनन क्षमतेत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय मुरघासाची हवाबंद स्थितीत साठवणूक केल्यास त्याचा वापर दीर्घ काळासाठी होतो व दीर्घ काळानंतरही हिरवा चारा उपलब्ध झाल्यामुळे दूध उत्पादनावर फारसा परिणाम न होता चारा टंचाईवर प्रभावीरित्या मात करणे शक्य होईल यास्तव वाटप करण्यात येणाऱ्या गाळाच्या जमिनीत मका व ज्वारी यासारख्या मूरघासासाठी उपयुक्त असलेल्या चारा पिकांची लागवड करण्यात यावी.


            चारा बियाणे वाटपासाठी केंद्र/राज्य शासनाच्या योजनांद्वारे उपलब्ध होणारा निधी तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वैरण व पशुखाद्य कार्यक्रम शेतकऱ्याच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप या योजनेअंतर्गत मका व ज्वारी या वैरण पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील. भविष्यात टंचाईसदृश्य काळात चारा टंचाई उदभवू नये यासाठी सर्व जिल्हाधिकारी यांनी जलस्त्रोतांचे व चारा निर्मिती स्रोतांचे मॅपिंग करुन तंत्रशुध्द पध्दतीने चारा उत्पादनाचे नियोजन करण्यात यावे. तसेच, जिल्हानिहाय / प्रकल्पनिहाय उपलब्ध गाळपेर क्षेत्र, चारा पिकाखाली घेण्यात आलेले क्षेत्र, चाऱ्याचे होणारे अंदाजित उत्पन्न याची आकडेवारी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी पशुसंवर्धन आयुक्तांना द्यावी, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi