*आपल्या घरातील गणपतीवर विश्वास ठेवा*
'घरातल्या आणि घरी आणून पूजलेल्या गणपतीला कमी लेखून दुसरे "राजे" पुजायला जाऊ नका.
वाचा आणि सहमत असाल तर अंमलात आणा.
घरात गणपतीची मूर्ती किंवा तसबीर नाही असं आस्तिकाचं एकही घर सापडायचं नाही. पण गणपती जवळ आले की त्या घरातल्या मूर्तीवरचा विश्वास उडतो का काय होतं माहित नाही. पण घरातली मंडळी पहाटे उठून, वशिले लावून, व्हीआयपी दर्शनासाठी पैसे मोजून वगैरे xxxचा राजा, तमुक बादशहा, अमुक सम्राट गणपतीच्या दर्शनाला जातात. का तर म्हणे तो जागरूक आहे.
घरातला गणपती जागरूक नाही.....???
अहो, गणपती म्हणजे देव एकच असतो. जागरूक, निद्रिस्त वगैरे प्रकार का मानता तुम्ही......???
तो एकच आहे. तुमची श्रद्धाही एक असू द्या. जागरूक म्हणून स्पेशल श्रद्धा, घरातला निद्रिस्त म्हणून त्यावरची श्रद्धा गुंडाळायची असं करू नका.
बहुसंख्य मंडळी घरात चांगली मूर्ती आणतात, मनोभावे पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य सगळं करतात.
पण
तिथे xxxxच्या राजाच्या माजलेल्या कार्यकर्त्यांकडून डोकं आपटून, त्यांचे धक्के खायला आणि अपमान करून घ्यायला का जातात कळत नाही. तो समोरचा वीस फुटी राजा जागरूक असता तर पहिल्यांदा त्याने त्या माजोरी कार्यकर्त्यांना वठणीवर आणलं असतं.
हे कार्यकर्ते का कोण ते बायकांना ढकलून देतात, पाया पडू देत नाहीत, पुढे चला पुढे चला असं भिकाऱ्यांना हाकलल्यासारखं भक्तांना हाकलतात. तरी लोक तिथे का जातात हा खरच संशोधनाचा विषय आहे.
तुमच्या घरचा गणपती कमी जागरूक समजू नका. त्यावर श्रद्धा ठेवा. पावायचा तर तोही पावेल. उगाच राजाच्या मंडपातली गर्दी, आणि तिथल्या कार्यकर्त्यांचा माज वाढवू नका.
शांतपणे हे सारे मुद्दे लक्षात घ्या. विचार करा.
अहो गणपतीचं आपल्या घरी येतो, मग आपण का जायचे बाहेर.
आमच्या घरचा गणपती बाप्पा आम्हाला पावतो. आमचा विश्वास आहे घरच्या गणपतीवर.
आपल्या घराच्याच गणपतीवर विश्वास ठेऊन,मनोभावे दर्शन घ्यायचे. बघा पावतो का नाहीं. त्याच्यावर अविश्वास दाखवला तर तो कसा पावेल हो.
आवडलं म्हणून पाठवलं ☺️,
No comments:
Post a Comment