Friday, 22 September 2023

मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्तअभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’मध्ये मुलाखत

 मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्तअभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’मध्ये मुलाखत


 


            मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची राज्य शासनामार्फत कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांनी कुठे व कसा अर्ज करावा, या योजनेच्या माध्यमातून किती प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा महत्वपूर्ण विषयावर प्रादेशिक उपायुक्त श्री. देशपांडे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रम शनिवार दि. 23 आणि सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली 

आहे.


०००

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ करणार

 मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या

भागभांडवलात भरीव वाढ करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            मुंबईदि. 22 :- महाज्योतीसारथीबार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत सांगितले. मौलाना आझाद महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची सांगड केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या विश्वकर्मा योजनेशी घालता येईल किंवा कसेही बाबही महामंडळाने तपासून घ्यावीअसेही निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिले.

            राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक त्यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी झाली. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमहाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झासंजय खोडकेहाफेज मोहम्मद नदीम सिध्दिकीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरासामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रेकौशल्य विकासउद्योजकतानगरविकासअल्पसंख्याक विकास विभागग्रामविकासनियोजनशालेय शिक्षणविधी व न्यायपाणीपुरवठा व स्वच्छतासामाजिक न्यायमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणया विभागाचे सचिव हे प्रत्यक्ष तर छत्रपती संभाजीनगर व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            या बैठकीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये वाढ करणे व शासनाने द्यावयाच्या हमी संदर्भात देखील चर्चा करण्यात आली.  महामंडळाचे सध्याचे भाग भांडवल 700 कोटी रुपये असून ते टप्प्या-टप्प्याने एक हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईलशासनाने तीस कोटी रुपयांची कर्ज हमी दिलेली आहेत्यात देखील वाढ करुन ती टप्प्या-टप्प्याने पाचशे कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.

            मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून गरजूंना देण्यात येणाऱ्या कर्जासाठी असलेल्या अटींचा पुनर्विचार करुन नव्याने अटी व शर्ती निश्चित कराव्यातअशाही सूचना श्री. पवार यांनी महामंडळाला दिल्या.

            मागासवर्गीय मुस्ल‍िम अल्पसंख्याकांसाठी सामाजिक तसेच शैक्षणिक आरक्षण देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून किमान शैक्षणिक आरक्षण कसे देता येईलहे बघू, असे श्री. पवार यांनी आश्वासित केले. याशिवाय मागासवर्गीय मुस्ल‍िम अल्पसंख्याकांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबतीतही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

            वक्फ मिळकतीसंबंधी महाराष्ट्र राज्यातील गाव नमुना नंबर 7/12 च्या उताऱ्यावर तसेच नागरी भागातील वक्फ मिळकतीच्या अधिकार अभिलेखांमध्ये केवळ संबंधित वक्फ संस्थेच्या नावाची नोंद घेणे व इतर वक्फ सदरी वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेणेबाबत सर्वसमावेशक सूचना शासनाचे सर्व जुने शासन निर्णय अधिक्रमित करून राज्यातील वक्फ संस्थांच्या जमिनीच्याबाबत अधिकार अभिलेखात वक्फ संस्थांचे नाव घेऊन इतर वक्फ सदरी वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार व कायदेशीर वारसांची नोंद घेण्याबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या विषयामधील सर्व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावीया समितीत अल्पसंख्याक विभागाच्या सचिवउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिववक्फ बोर्डाचे सदस्य सचिव यांचा समावेश करावाबैठकीत झालेल्या चर्चेनुसार 7/12  वर अगोदर वक्फ बोर्डत्यानंतर ट्रस्ट आणि इतर अधिकारात मुतलकी यांचे नाव घेता येईल काहेही तपासावेकोणत्याही परिस्थितीत मालमत्तेची मालकी वक्फ बोर्डाकडेच राहिली पाहिजेअसेही निर्देश श्री. पवार यांनी दिले.

            महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या वक्फ संस्थाकडून वक्फ फंडविलंब शुल्कऑडिट फीजीएसटी घेतला जातोही रक्कम जास्त असल्याने कमी करावीअशाप्रकारची मागणी जमियत-ए-उलमा हिंद यांच्याकडून करण्यात आली होती. विलंब शुल्क व व ऑडिट फी  कमी करुन विलंब शुल्क 1 हजार रुपयांऐवजी 500 रुपयेऑडिट फी 500 रुपयांऐवजी 200 रुपये2 हजार रुपयांऐवजी 500 रुपये आणि 5 हजार रुपयांऐवजी 1 हजार रुपये आकारण्यात यावेतअसा निर्णय तत्काळ घेत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जाहीर केले.

            छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस तातडीने सुरु करण्याबाबत निर्णय झाला असून त्याचे लवकरच उद्घाटन केले जाईलअसेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाची जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ताब्यात ठेवली असून ती बोर्डाला परत मिळाली पाहिजेया मागणीबाबत चर्चा करण्यात आलीयासंदर्भात देखील अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या समितीने योग्य तोडगा काढावाअशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

            सोलापूर शहर येथील शैक्षणिक व खेळासाठी आरक्षित असलेल्या शासकीय भूखंडाची मागणी जमियत - उलमा-ए-महाराष्ट्र या संस्थेने केली आहे. या भुखंडासाठी आणखीही काही अल्पसंख्याक संस्थांनी अर्ज केला असल्याची बाब अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांनी निदर्शनास आणून दिली. शासनाच्या नियमानुसार संस्थेची पात्रताभूखंडावर विकास करण्याची संस्थेची आर्थिक क्षमतासंस्थेचे कार्य या बाबी तपासूनच सुयोग्य संस्थेला भूखंड वितरित करण्याचा निर्णय लवकरात लवकर महसूल विभागाने घ्यावाअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

            राज्यात जिल्हा परिषद नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरण्याबाबतउर्दू शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीनुसार आरक्षित जागांवर उमेदवार उपलब्ध न मिळाल्यास ती जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.  आरक्षणातील उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातून पदे भरावीतअशा प्रकारचा शासन निर्णय असल्याची बाब सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी निदर्शनास आणून दिली.  उर्दू शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून ही पदे तातडीने भरण्याबाबत महानगरपालिकानगरपालिका आणि जिल्हा परिषदांना तातडीने कळवावेअसेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

            वक्फ मालमत्तांच्या भूसंपादन करीत असताना मालमत्तांचा मोबदला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला मिळत नाहीही बाब देखील महामंडळाने निदर्शनास आणून दिली. याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीने अभ्यास करावा व शिफारस करावीअशीही सूचना श्री. पवार यांनी केली. अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या निर्मितीबाबतही प्राथमिक चर्चा या बैठकीत करण्यात आली. यावेळी  संजय खोडके यांनी प्रौढ शिक्षण विभागाकडील कामाचा भार कमी झालेला आहे.  प्रौढ शिक्षण विभागाच्या मनुष्यबळाचा वापर करुन घेण्यासाठी या विभागाकडील कर्मचाऱ्यांना प्रस्तावित अल्पसंख्याक आयुक्तालयात समाविष्ट करून घेता येऊ शकेल. त्यामुळे आयुक्तालयासाठी कमी पदे निर्माण करावी लागतील व शासनावरील भार कमी होईलअशी सूचना केली. ही बाब देखील अल्पसंख्याक विभागाने तपासून घ्यावीअशा सूचना श्री. पवार यांनी केल्या. 

००००

दीपक चव्हाण/विसंअ/


 


कोकणासारखे वागून बघा.

 *

कोकणासारखे वागून बघा. 

*गणपती उत्सव कोकण प्रमाणे देशावर आपण केला तर तुमचे कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...* (कोकणातील मंडळी आपणास देशावरली मंडळी संबोधतात. मी तिथे जावून, गणपतीत पाच दिवस कोकणात कुडाळला मित्राकडे राहून हा अनुभवाने लेख लिहलेला आहे.)


कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई-वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई-वडिलाच्या घरात राहतो फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.

    नोकरीच्या निमित्ताने चार भावाची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा-भावात कितीही भांडणे किंवा वैर असले तरी या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा कडक नियम आहे.

   असे गणपतीमुळे एकत्र आल्याने कधी-कधी जुने भावातील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे व्यर्ज असते नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.

    कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात..! 

    गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या-गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं... पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा-गावात, घरा-घरात पहायला मिळते.

    मित्रहो, त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते. सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते. एखाद्या वेळेस रागवत असतील पण आजच्यासारखे डुख धरून रहात नव्हते. ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची, हे त्यांना चांगलं कळत होतं...

     योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व आपल्याकडे प्रेम, माया संपत चालली आहे. *एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई-वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही देशावरची परिस्थिती आहे.*

    दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात. संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही...

   *कोकणासारखे वागून बघा. कोकणात एकाही शेतकऱ्यांने आत्महत्या केली नाही. तिकडे पाच एकर म्हणजे मोठा शेतकरी, नाहीतर एकर, अर्धा एकर क्षेत्र त्यामुळे ते मुंबई पोटासाठी जवळ करतात.* आमचा दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास...

   साधेपण जपा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून एकाच्या घरी दरवर्षी दहा दिवसाचा सण साजरा करा. गौराई बसवता तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करता तसे आपल्याच मातेच्या बहिणीचा पाहुणचार करा. जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा तुम्हाला एकत्र पाहून आनंदीत होईल, ही भोळी अपेक्षा जरी असले तरी प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावा-बहिणीचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही...

    🌹🌹🙏🙏🌹🌹

अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनीउद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

 अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनीउद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत


 


            मुंबई, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.


            अनुसूचित समाजाच्या जातीतील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमां, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी मादगी या १२ पोटजातीतील इच्छुक अर्जदार या कर्जासाठी अर्ज करू शकतात. विहित कालावधीत जिल्हा कार्यालय मुंबई शहर-उपनगर, गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, या पत्त्यावर अर्ज व मूळ दस्तावेजासह स्वत: साक्षांकित करून सादर करावेत. अधिक माहितीसाठी ०२२- २६५91124 अथवा rmslasdcbandra@gmail.com यावर संपर्क साधावा, असे श्री. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


०००

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून

आता ठिबकऐवजी खतांसाठी अनुदान मिळणार

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई दि. 22 : माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत आता ठिबक सिंचनाऐवजी आवश्यक खतांसाठी  अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय कृषी विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे.

            फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येतेत्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी दिली आहे.

            राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मंत्री श्री. मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास 100 कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती देखील दिली आहे.

            राज्य सरकारने 6 जुलै2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यामध्ये 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणेकलमे लागवड करणेपीक संरक्षणनांग्या भरणेठिबक सिंचनाद्वारे पाणी देणेइत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठी देखील वाढीव खर्च देण्यात येईल.

            यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मिळत असल्यानेभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार असूनयाबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/


शेतकऱ्यांना मिळणार 'रासायनिक व सेंद्रीय खते

 शेतकऱ्यांना मिळणार 'रासायनिक व सेंद्रीय खते


- मंत्री संदिपान भुमरे


 


            मुंबई, दि. 22 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.


            मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून देण्यात येत होते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ‘सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी आता ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


            भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे.


             यापुढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसून आल्यास लाभार्थीना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. भुमरे यांनी दिली.


0000

तामिळनाडू मधील हे मंदिर "नाडी गणपती" म्हणून ओळखले जाते,

 तामिळनाडू मधील हे मंदिर "नाडी गणपती" म्हणून ओळखले जाते, त्याच्या नावामागच कारण ही तसच आहे. पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी यांना सिद्धी विनायकाची मोठी मूर्ती स्थापित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यासाठी त्यांना आवश्यक विधी आणि अभिषेक करावा लागणार होता.. पूज्य आदरणीय श्री मौनस्वामींनी प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू केली तेव्हा काही नास्तिकांनी दगडाच्या मूर्तीत जीव कसा आणता येईल असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. मग आदरणीय श्री मौनस्वामींनी त्यांना मूर्ती तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले. सर आर्कबाल्ड एडवर्ड हे त्यावेळच्या प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर व्हीआयपी अतिथी म्हणून कार्यक्रमाला आले होते आणि तेही हे सर्व ऐकत होते आणि पाहत होते. नास्तिकांनी पुतळ्याची नाडी तपासण्यासाठी ब्रिटीश डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मूर्तीची कोणतीही नाडी तपासली असता नाडी आढळली नाही. तेव्हा पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी म्हणाले, आता मी प्राणप्रतिष्ठा करीन आणि मग तुम्ही पुन्हा तपासू शकता. प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आरतीच्या वेळी मूर्ती हलत असल्याचे आणि मूर्तीच्या हालचालीही दिसत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले.. शिवाय, मूर्तीच्या नाडीसह हृदयाचे ठोके देखील मनुष्याप्रमाणेच स्पष्टपणे दिसले. ब्रिटीश वैद्यांनी आणि अगदी नास्तिकांनी देखील कसून तपासणी केली आणि त्यांच्या स्टेथोस्कोपद्वारे नाडीचे ठोके स्पष्टपणे आढळले. हे बघून उपस्थित असलेल्याना आश्चर्याचा धक्का बसला.. तिरुनेलवेली जिल्ह्यातील भूवैज्ञानिकांनी पुतळ्याचे परीक्षण केले आणि विचित्र घटनेची पुष्टी केली. ही नाडी काही तास चालू राहिली आणि नंतर पूज्य आणि आदरणीय श्री मौनस्वामींनी सांगितले की आता थांबेल आणि ती थांबली. पुतळ्याचे परीक्षण करणारे वैद्य किंवा नास्तिक कोणीही त्याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ते विज्ञानाच्या पलीकडचे आहे हे त्यांनी मान्य केले.. उगाच नाही म्हंटले जात सत्य सनातन धर्म..🚩 गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया🙏

Featured post

Lakshvedhi