Friday, 22 September 2023

मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्तअभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’मध्ये मुलाखत

 मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्तअभय देशपांडे यांची ‘दिलखुलास’मध्ये मुलाखत


 


            मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात मत्सव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अभय देशपांडे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची राज्य शासनामार्फत कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमार व मत्स्यशेतकरी यांनी कुठे व कसा अर्ज करावा, या योजनेच्या माध्यमातून किती प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा महत्वपूर्ण विषयावर प्रादेशिक उपायुक्त श्री. देशपांडे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रम शनिवार दि. 23 आणि सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली 

आहे.


०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi