Wednesday, 20 September 2023

केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्तपात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित रहायला नको

 केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्तपात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित रहायला नको


- मंत्री छगन भुजबळ


            मुंबई, दि. 20 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने माहे ऑक्टोबर या महिन्याकरीता गव्हाच्या नियतनामध्ये केंद्र शासनाकडून सुधारित नियतन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर महिन्याकरीता विहीत परिमाणात गहू व तांदूळ वितरीत होणार आहे. तसेच, पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.


            केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक 30069.65 टन तांदूळ व 45972.59 टन गव्हाचे समायोजन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑगस्ट, 2023 च्या अन्नधान्यात करीत असल्याचे कळवले होते. अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीची काही माहिती केंद्र शासनाच्या संचालक, सार्वजनिक वितरण यांनी अद्याप अद्ययावत केला नसल्याने, केंद्र शासन व राज्य शासनाच्या अन्नधान्य वितरणाच्या आकडेवारीमध्ये तफावत आहे. त्या अनुषंगाने ही माहिती अद्ययावत केल्यानंतर त्यानुसार शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 च्या नियतनात करण्यात यावे, याबाबत विभागामार्फत केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती. तथापि, केंद्र शासनाने त्यांच्याकडील उपलब्ध वितरणाच्या आकडेवाडीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 6 व 7 (PMGKAY 6 & 7) योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या वितरणानंतर शिल्लक अन्नधान्याचे समायोजन माहे ऑक्टोबर,2023 मध्ये करण्याकरीता सूचना दिल्या होत्या.


            त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत माहे ऑक्टोबर, 2023 च्या नियतनात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. सद्यस्थितीतील नियतन यामध्ये तांदूळ (टन) 2,45,610.240, गहू (टन) 1,38,155.760 एकूण (टन) 3,83,766 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे, तर केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य यामध्ये तांदूळ में.टन 30069.65, गहू टन 45972.59 तर एकूण टन 76042.24 आहे. उपरोक्त शिल्लक विचारात घेऊन माहे ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियतन टन मध्ये तांदूळ 215540.59, गहू 92183.17 एकूण 307723.76 याप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे. एकूण 76000 टन अन्नधान्यापैकी 30772 टन तांदूळ जिल्ह्यांकडे उपलब्ध असून माहे ऑक्टोबर मधील नियतनात समायोजित करण्यात आलेला आहे.


            45,972.59 टन एवढ्या मोठ्या परिमाणात गव्हाचे समायोजन एका महिन्यात केल्यास लाभार्थ्यांना गहू वितरीत करणे कठीण होऊन पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपरोक्त 45972.59 टन गव्हाचे समायोजन माहे ऑक्टोबर या एका महिन्याऐवजी माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, 2023 या 3 महिन्यांच्या कालावधीत करण्याबाबत केंद्र शासनास लेखी विनंती करण्यात आली होती. या विनंतीस अनुसरुन केंद्र शासनाने पुढीलप्रमाणे सुधारित नियतन कळविले आहे. सद्यस्थितीतील नियतन 1,38,155.760 गहू (टन), केंद्र शासनाच्या पत्रानुसार PMGKAY 6 व 7 अंतर्गत शिल्लक अन्नधान्य 45972.59 आहे, तर ऑक्टोबर, 2023 करिता सुधारित नियत 1,22,831.56 आहे. नोव्हेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56 तर डिसेंबर, 2023 करिता सुधारित नियतन 1,22,831.56 याप्रमाणे केंद्र शासनाने सुधारीत नियतन कळविले आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 आरोग्यदायी राळा पीक‘राळा’ पिकाचे महत्त्व(Foxtail millet) : पिकाची ओळख, महत्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान

 विशेष लेख -:

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

आरोग्यदायी राळा पीक

      यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका  तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. सप्टेंबर महिना ‘राळा’ या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. राळ्याला पारंपारिक महत्त्व असते. या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात. यासाठी ‘राळा’ अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राळा या तृणधान्याला महत्त्च आहे.

‘राळा’ पिकाचे महत्त्व :

            राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. अर्धशिशीनिद्रानाशकॉलराताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो. राळ्याचा अँटिऑक्सिडण्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेऊन मेंदूची कार्यक्षमता वाढवते. मोड आलेले राळा खाल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात. मधुमेह आणि पोटाच्या आजारांवर ‘राळा’ हे पौष्टिक अन्न म्हणून उपयुक्त आहे.

राळा (Foxtail millet) पिकाची ओळखमहत्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान

            राळा (Foxtail millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून या पिकाचे शास्त्रीय नाव [Setaria italica (L). Beauv] असे आहे. या पिकाची धान्य व तसेच चारा म्हणून आशियाआफ्रिका व अमेरिका खंडात लागवड केली जाते. या पिकाचे स्वपरागीभवनकमी पक्वता कालावधी व C4 वर्गीय तृणधान्य हे प्रमुख गुणधर्म आहेत. भारतात या पिकाची आंध्रप्रदेशकर्नाटकतेलंगनाराजस्थानमहाराष्ट्रतामिळनाडूमध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यात लागवड केली जाते.

पौष्टिक भरडधान्य पिकांचे लागवडीच्या दृष्टीने महत्व :

            कमी  पक्वता कालावधी असणारी पिकेहलक्या व जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात,सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिक आहेत. बदलत्या हवामानात तग धरणारी पिक व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर. भविष्यात मागणी वाढणारी पीक आहे.

राळा पिकाचे पौष्टिक गुणधर्म :

अ) प्रथिने व खनिज पदार्थ:  ‘राळा’  आहाराच्या दृष्टिने एक अत्यंत महत्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. पौष्टिक घटकांबरोबरच चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय पदार्थ असल्याने बद्धकोष्टता होत नाही. राळा या पिकाच्या धान्यामध्ये सर्वाधिक प्रथिनांचे प्रमाण  व स्निग्ध पदार्थ आहेत. तसेच कॅल्शियममॅग्नेशियमझिंक  आणि लोह  या खनिजाचे प्रमाण जास्त आहे.  ब) जीवनसत्वे:भरडधान्य पिकांचा आणखी वैशिष्ट्य पूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. राळा धान्यामध्ये थायमिन  बी-१रायबोफ्लेवीन बी-२नियासिन (बी-३)  व फॉलिक असिड  याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

            ‘राळा’ पिकाच्या धान्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने अन्न पचन होण्यास मदत होतेपचनाशी निगडीत व्याधी कमी केले जाऊ शकतात. नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगआतड्यांवरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. धान्यापासून भाकरीमाल्टनुडल्सपापडइडलीबिस्कीटे यासारखे खाद्यपदार्थ तयार करता येतात. तसेच गरोदर माता व लहान मुलांच्या खाद्यामघ्ये वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

सुधारित लागवड तंत्रज्ञान :

            जमीन व हवामान : या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यमपाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. महाराष्ट्रात या पिकाची लागवड अत्यल्प क्षेत्रावर केली जाते. दक्षिणेकडील आंध्रप्रदेशतामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यात लागवड क्षेत्र अधिक आहे. तसेच या पिकाची लागवड  ५०० ते ७०० मि.मी. वार्षिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी करता येऊ शकते.

पुर्वमशागत :

            जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटेकाडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.

सुधारीत वाण :

            राज्यात लागवड केले जाणारे सुधारीत वाण महाराष्ट्रात राळा या पिकाचा पी.डी.के.व्ही. यशश्री’ (BFTM 82) वाण लागवडीसाठी सन २०२३ मध्ये शिफारसित करण्यात आलेला आहे. हा वाण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठअकोला अंतर्गत कृषि संशोधन केंद्रबुलढाणा येथून विकसित करण्यात आलेला आहे.  

पी.डी.के.व्ही. यशश्री’ वाणाची ठळक वैशिष्ठ्ये :

            धान्य उत्पादन क्षमता (२३२४ कि./हे.)कडबा उत्पादन क्षमता (४४८९ कि./हे.), या वाणाचे दाणे  मध्यम टपोरे  असून  रंग आकर्षक  फिक्कट  पिवळसर आहे. हा  वाण ८१-८५ दिवसात पक्व होतो. या वाणाचे कणीस घट्ट असतात. हा  वाण करपा आणि तांबेरा रोगास सहनशील  आहे.

बियाणे व पेरणीची पध्दत पेरणीची/लावणीची वेळ :

             या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. रोपांची लागण रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात मुख्य शेतात ओळीमध्ये करावी.

बियाणे प्रमाण :

            पेरणीद्वारे पिक लागवड करायची असल्यास ओळीमध्ये पेरणी करावी. त्यासाठी ८ ते १० किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे. धान्याचा आकार लहान असल्याने त्यामध्ये २ ते ४ पट माती एकत्र करून पेरणी करावी म्हणजे पेरणी दाट होणार नाही. बियाणे १ ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.

पेरणी अंतर :

            पेरणी करताना दोन ओळीमधील अंतर ३० से.मी. (एक फुट) व दोन रोपामंधील अंतर १० से.मी. ठेवावे.

खत व्यवस्थापन :

            पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे. राळा पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र२० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे. अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.

पाणी व्यवस्थापन :

            या पिकाची लागवड कमी पावसाच्या भागात परंतु पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी करता येते. पावसाळी हंगामात पावसाचा जास्त दिवस खंड पडल्यास  पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले पाणी फुटवे अवस्थेतदुसरे फुलोरा येताना व तिसरे पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत देणे आवश्यक आहे. त्यामुळे दाणे चांगले भरून उत्पादनात वाढ होते.

 

पीक संरक्षण (किड व रोग व्यवस्थापन):

करपा (Blast) रोग :

            ‘राळा’ या पिकामध्ये कणसातील करपा रोगाचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये पानांवर दंडगोलाकार पांढरे ठिपके येतात व नंतर त्याचा आकार वाढून संपूर्ण पानावरखोडावर पसरतात. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम किंवा कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाची २ ग्रॅम/ किलो बियाणे याप्रमाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी अथवा ०.१ % प्रमाणे फवारणी करावी.

            खोडकिड : पेरणीनंतर पिक ६ आठवड्याचे असताना खोडकिडीचा प्रादुर्भाव सुरु होतो. या किडीच्या अळीद्वारे मुख्य खोडाचे नुकसान होऊन मर होते. त्यामुळे  फुटव्यावर परिणाम होतो. सर्वाधिक नुकसान जुलै महिन्याच्या शेवटी व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जाणवते. खोडकिड नियंत्रणासाठी प्रचलित किडनाशकाचा किंवा पद्धतीचा वापर करावा.

        उपाययोजना: पावसाळा सुरु होताच ७ ते १० दिवसाच्या आत पेरणी करावी तसेच पेरणीकरीता जास्त बियाणे वापरावे.

आंतरमशागत :

             आंतरमशागत करताना रोपांची प्रति एकरी योग्य संख्या ठेवण्यासाठी पेरणीनंतर २० दिवसांच्या आत विरळणी करावी. पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात. त्यामुळे तणनियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.

काढणी व मळणी :

            राळा पिकाच्या विविध वाणानुसार पक्वता कालावधी वेगळा असु शकतो. साधारणपणे ८० ते १०० दिवसात पीक काढणीस सुरुवात करावी. काढणीस उशीर झाल्यास कणसातील/बोंडातील दाणे झडण्याची शक्यता असते. पिकाची काढणी करताना कणसे/बोंडे विळ्याने कापून करावी. दोन-तीन दिवस उन्हात चांगली वाळल्यानंतर कणसे बडवून मळणी करावी. धान्य उन्हात चांगले वाळवून हवेशीर जागी साठवण करुन ठेवावे.

उत्पादन :

            हे पीक लागवड करताना वापरण्यात येणाऱ्या निविष्ठा व सुधारित तंत्रज्ञानास उत्तम प्रतिसाद देणारे पिक आहे. या पिकापासून सरासरी हेक्टरी २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर धान्य उत्पादन घेता येते.

 

(संदर्भ:- अ.भा.स,नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषि संशोधन केंद्रकोल्हापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठराहुरी अंतर्गत)

0000

दत्तात्रय कोकरे

वरिष्ठ सहायक संचालक (मा)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमंत्रालय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर!योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर!योजनानिर्णयांची अचूकअधिकृत माहिती मिळणार

 

            मुंबईदि. २० : 'जनसामान्यांचे मुख्यमंत्री', अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनेलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णयमंत्रिमंडळाचे निर्णयशासनाच्या योजना, पाच विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनेलच्या माध्यमातून आता थेट जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

            जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या व्हॉटसॲपने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर काल (19 सप्टेंबर)मुख्यमंत्री सचिवालयाचे स्वतंत्र चॅनेल सुरु करण्यात आले आहे. प्रमाणित असलेल्या या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चॅनेल सुरु केल्यानंतर काही वेळेतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी चॅनेलला फॉलो केले आहे.  

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ही अंमलबजावणी करताना शासनाच्या योजना तसेच निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्यास त्यांना त्याचा लाभ घेता येईल यासाठी लोकाभिमुख योजनाविकास प्रकल्पांची अचूक आणि वस्तूनिष्ठ माहितीजनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार’ असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सदैव जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहेआता हातातील स्मार्ट फोनवर थेट मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचीशासकीय योजनांची माहिती मिळत असल्याने हा संवाद अधिक प्रभावी होणार आहे.

            मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षामार्फत जनतेला माहिती देण्यासाठी सध्या एक्स (ट्विटर)फेसबुकइन्स्टाग्रामयु ट्यूबथ्रेडसकूटेलिग्राम आदी समाजमाध्यम तसेच इनस्टन्ट मेसेजिंग ॲपचा वापर केला जातो. व्हॉटसॲपने गेल्या आठवड्यात चॅनेलची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयाने कंपनीकडे संपर्क केला आणि ‘CMO Maharashtra’ या नावाने स्वतंत्रप्रमाणित चॅनेलचा काल श्रीगणेशा’ करण्यात आला आहे. या चॅनेलला वापरकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काही तासांतच सुमारे ४० हजारांपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या चॅनेलचे अनुसरण केले आहे.

चॅनेलला असे करा फॉलो :

            व्हॉटस ॲपवरील अपडेट्स’ मेनूमध्ये गेल्यावर तिथे चॅनेल सेक्शन असून तिथे ‘Find channels’ मध्ये ‘CMO Maharashtra’ हे टाइप केल्यावर चॅनेलच्या यादीमध्ये हे प्रमाणित चॅनेल दिसेलत्याला क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत. https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक केल्यास ‘CMO Maharashtra’ चॅनेलला फॉलो करता येणार आहे.

००००

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

 महाराष्ट्र सदनात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

 

            नवी दिल्ली, 19: ढोल-ताशांवरील ठेका आणि गणपती बाप्पा मोरया च्या घोषाने कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदन आज निनादले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी जमली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने महाराष्ट्र सदनात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.  तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळांतही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे.

महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आयोजित गणेशोत्सवात सदनाचे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  यांनी गणरायाची पूजा केली. सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी, दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी, आज सकाळी येथील परिसरात जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हे जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर पूजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास 30 मराठी गणेशोत्सव मंडळातही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आज करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांच्यावतीने या काळात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठमोळ्या लावणीसह विविध लोकनृत्य, नाटक, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन येथील गणेशमंडळांनी यावर्षी केले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

 





राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना

 

        मुंबईदि. 19 :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.

            यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.

0000

 

Governor  Ramesh Bais performs Ganesh Aarti

            Mumbai, Date 19: Maharashtra Governor Ramesh Bais  performed the puja and aarti of Lord Ganesh on the occasion of Ganesh Chaturthi at the Governor's Residence, Raj Bhavan, Mumbai on Tue (19 Sept).

            Family members of the Governor, officers and staff of Raj Bhavan joined the Governor in performing the aarti.

0000

वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

 वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

"सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

               मुंबई, दि. 19 – गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले.

से






            दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायांचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा, आरती करुन प्रतिष्ठापना केली.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. या वर्षी देखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करु नये अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आजपासून संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात होणार असून याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. भारताचे नाव जगभरात उज्वल होत असून तो लौकिक अजून वाढविण्यासाठी गणपती बाप्पा प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बळ देतील, आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या जनहिताच्या विविध निर्णयांचे स्वागत केले.


            हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नियम बाजूला ठेवून मदत केली. मदतीची रक्कम दुप्पट केली. शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची मदत, एक रुपयात पिकविमा दिला आहे. संकटकाळात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास

 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 

             मुंबईदि. 20: आरोग्य विभाग अंतर्गत गट 'व गट 'संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.  या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी  29 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास 22 सप्टेंबर 2023 रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण 22 सप्टेंबर रोजी रात्रौ 11.55 वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाहीअसेही  आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

नीलेश तायडे/स.सं


Featured post

Lakshvedhi