Monday, 18 September 2023

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;

 वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;


श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले


छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्री. शिंदे श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली

महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात

 महाराष्ट्र आणि काश्मिरच्या नव्या मैत्री पर्वाला सुरूवात


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर


मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे श्रीनगर येथे आगमन झाले. सरहद संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हम सब एक है या कार्यक्रमासह कारगिल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन, युद्ध स्मारकाला भेट, जवानांशी आणि काश्मीर मधील मराठी कुटुंबियांशी संवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र-काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठक, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण आदी कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी काश्मिरकडे प्रयाण केले. त्यांच्या समवेत प्रधान सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित आहेत.


            पुणे येथील 'सरहद' संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम करणाऱ्या 'हम सब एक है' या विशेष कार्यक्रमासह महाराष्ट्र काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात म्हणून काश्मिर मधील 73 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रविवारी श्रीनगर येथे हा कार्यक्रम होत आहे. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे काश्मीर मधील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत.


कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन


सोमवार दि. 18 सप्टेंबरला कारगिल येथे सकाळी सहाव्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. अली इराणी तसेच फिजिओथेरपी डॉक्टरांद्वारे कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त आयोजित वैद्यकीय शिबीराचे उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. छानीगुंड येथे सरहद संस्थेच्या माध्यमातून भारतीय लष्करासाठीच्या 72 फुटी तिरंगा झेंड्याचे अनावरण देखील मुख्यमंत्री करणार आहेत.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे द्रास येथील युद्ध स्मारकाला देखील भेट देणार असून यावेळी ते लष्कराचे अधिकारी आणि जवानांशी संवाद साधणार आहेत. जनरल वेद प्रकाश मलिक यांच्या कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. या दोन दिवसांच्या या काश्मीर दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र- काश्मीर मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


००००

Sunday, 17 September 2023

किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....*

 *किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....*


*१) तुळस. तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशीची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.*


*२)  कुळीथ.  रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळीथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून  २-३ महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.*


*३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर  विरघळतात.*


*४) काकडीचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून  बाहेर पडतात.*


*५)  हळद व एक वर्षापूर्वीचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.*


*६)  कडुलिंबाच्या पानाची राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.*


*७)  जर खडा लहान असेल तर मेहंदीचे साल वाटून चूर्ण करावे व  सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.*


*८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.*


*९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज  एक वेळ सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.*

 *त्यानंतर ४-५  तास काही खाऊ पिऊ नये.*


(बरेच लोक घरगुती उपाय करत नाहीत सध्या च्य बिझी वेळेत शक्य होत नाही त्यामुळे आपल्याकडे आपण एक औषध बनवलेले आहे मुतखडा यावर या औषध चे सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात सेवन केलात की ८ दिवसात मुतखडा पूर्णपणे निघून जातो) 


*मुतखडा(किडनी स्टोन) वरील औषध ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा*

*प्रणय गंगाधर मोहिते*

 8928767165


*अधिक माहितीसाठी खाली लिंक जॉईन करा आणि भरपूर लोकांना शेअर करा*

https://chat.whatsapp.com/DnDQeceqFMf2vZvkKQ6omV

विभागसिल्लोड येथे दिवाणी न्यायालय

 विधी व न्याय विभागसिल्लोड येथे दिवाणी न्यायालय

सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या न्यायालयासाठी 16 नियमित पदे आणि 4 बाह्य यंत्रणेद्वारे पदे उपलब्ध करून देण्यात येतील.

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

 परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय

कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय

परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाबैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतेयासाठी 132 कोटी 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मौजे जिरेवाडी येथे 60 विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय सुरु करण्यात येईलयासाठी 16 शिक्षक आणि 24 शिक्षकेत्तर पदे निर्माण करण्यात येतीलयासाठी एकूण 132 कोटी 89 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्रसोयाबीन उत्पादनास गती येणार

 परळी वैजनाथला सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्रसोयाबीन उत्पादनास गती येणार


परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे सोयाबीन उत्पादनास गती येईल.


मौजे जिरेवाडी येथील शासकीय जमिनीवर हे प्रशिक्षण व प्रक्रीया उपकेंद्र सुरु करण्यात येईल. या उपकेंद्रामध्ये एकूण 15 पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी 24 कोटी 5 लाख रुपये निधीस मान्यता देण्यात आली. सोयाबीन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे पीक असून देशात 120.90 लाख हेक्टर क्षेत्रावर तर महाराष्ट्रात 49.09 लाख हेक्टर आणि मराठवाड्यात 24.87 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची लागवड होते. बीड जिल्ह्यात सोयाबीनखाली 3 लाख हेक्टर जमीन आहे. या उपकेंद्राच्याद्धारे सोयाबीनच्या विविध वाणांची निर्मिती करण्यात येईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात येतील.


-----0-----

देशी गायी-म्हशींमध्ये भृणप्रत्यारोपणासाठी फिरती प्रयोगशाळा स्थापन करणार

 देशी गायी-म्हशींमध्ये भृणप्रत्यारोपणासाठी

फिरती प्रयोगशाळा स्थापन करणार

            गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी गायी-म्हशींमध्ये भृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात निर्माण करण्याकरीता फिरती प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            विदर्भमराठवाडापुणे विभाग आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी अनुक्रमे अकोलाऔरंगाबादपुणे आणि अहमदनगर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार OPU-IVF & ET प्रयोगशाळा स्थापन करण्यात येतील. या तीन प्रयोगशाळांसाठी एकूण रु.1802.72  लक्ष इतका निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास येईल.

Featured post

Lakshvedhi