Monday, 18 September 2023

वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;

 वयोवृद्ध स्वातंत्र्य सेनानींप्रति मुख्यमंत्र्यांचा आदरभाव;


श्रीमती देशपांडे यांना त्यांच्या जागेवर जाऊन भेटले


छत्रपती संभाजीनगर, दि.17(जिमाका)- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या श्रीमती विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री श्री. शिंदे श्रीमती देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi