Wednesday, 13 September 2023

पर्यटनाला चालना देण्यासाठी 'आयटो'चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल

 पर्यटनाला चालना देण्यासाठी 'आयटो'चे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल

प्रधान सचिव राधिका रस्तोगी

 

            मुंबईदि. 12 : इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयटो) केंद्र शासनाचा पर्यटन विभाग व पर्यटन विभागमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्ममाने २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयटीसी हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद  येथे ३८ व्या 'आयटोपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेतअशी माहिती पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी दिली.

             कफ परेड येथील हॉटेल ताज प्रेसिडेन्ट येथे 'आयटोपरिषदेबद्दल माहिती देण्यासाठी पर्यटन विभाग व 'आयटो'मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती रस्तोगी बोलत होत्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, 'आयटो'चे अध्यक्ष राजीव मेहरापर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, 'आयटो'चे मानद सचिव संजय रजझदान,'आयटोउपाध्यक्ष रजनीश कैस्था यासह आयटोचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

           श्रीमती रस्तोगी म्हणाल्या कीमहाराष्ट्र हे या परिषदेचे यजमानपद भूषवित असून तीन दिवस चालणा-या या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनाची बलस्थाने पर्यटन क्षेत्रातील  विविध घटकांना समजावून सांगता येतील. महाराष्ट्र राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटन स्थळांची माहिती देखील 'आयटो'च्या माध्यमातून विविध घटकांपर्यत जाईल. या परिषदेत विविध मार्गदर्शपर व्याख्यानांचे आयोजन केले आहेयामध्ये हॉटेल्स आणि टूर ऑपरेटर्स यांच्यातील समन्वय : काळाची गरजतंत्रज्ञानाचा बदलणारा चेहरा : क्रूझ पर्यटननदी पर्यटन आणि  सागरी किनारी पर्यटनमहाराष्ट्रातील पर्यटन संधी आणि आव्हानेऔरंगाबादमधील पर्यटनाच्या संधी या विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या माध्यमातून विविध पर्यटन क्षेत्रातील सहभागीधारकांना पर्यटनवाढीसाठी नक्कीच लाभ होईल.

          'आयटो'चे अध्यक्ष श्री. मेहरा म्हणाले की, 'आंतरराज्य पर्यटन आणि नाविन्यपूर्ण शाश्वत पर्यटनही या 'आयटो'ची थीम असून तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात  'इंडिया ट्रॅव्हल मार्टया प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशभरातून ९०० ते १००० एवढे पर्यटनाशी निगडित संस्थेचे भागधारक उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सहभागी राज्यांना त्यांच्या पर्यटन स्थळांची  माहिती व पर्यटन व्यवसायिकांशी परस्पर संवाद (Interaction) साधण्यास संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिषदेत सहभागी राज्यांना निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) ही भारताची टूर ऑपरेटर्सची राष्ट्रीय सर्वोच्च संस्था आहे ज्याचे देशभरातील सदस्यत्व आहे. या संस्थेच्या सदस्यामध्ये देशाचे इनबाउंड टूर ऑपरेटरट्रॅव्हल एजंटहॉटेल चेनएअरलाइन्सटुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटरट्रॅव्हल प्रेस आणि मीडियापर्यटन शैक्षणिक संस्था आणि राज्य सरकारचे पर्यटन विभाग व राज्य पर्यटन विकास महामंडळे यांचा समावेश आहे. आयटो चे वार्षिक अधिवेशन हे भारतीय पर्यटन दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमांपैकी एक मानले जाते.

             श्री. मेहरा यांनी सांगितले कीमहाराष्ट्राचे दर्शन घडवण्यासाठी टूरचे आयोजन प्रतिनिधींसाठी करण्यात आले आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेणीशिर्डीघृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरलोणार सरोवरशनी शिंगणापूर मंदिरत्र्यंबकेश्वर मंदिरसुशील मंदिर आदींचा समावेश असेल. 1 ऑक्टोबर रोजी आयटो रन फॉर रिस्पॉन्सिबल टुरिझम आयोजित करणार आहोत.

            यावेळी पर्यटन संचालक डॉ. पाटील व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी यांनी महाराष्ट्र राज्यातील पर्यटनास संधी असल्याची माहिती यावेळी दिली.

0000

Rosa Bella womania Group बाई पण भारी ग

 Rosa Bella womania Group


बाईपण भारी ग,काही पण भारी ग

 Share by Priyanka bhagat 


Rosalla womania Group...घोडबंदर,ठाणे

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम

 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ मोहीम


            मुंबई, दि. 12 : देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भव:’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून राज्यस्तरावर या मोहिमेचा कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.   


            धर्मादाय रूग्णालयांविषयीचे आरोग्य आधार ॲप व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲप, आरोग्यवर्धिनी केंद्रामधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता तसेच कामावर आधारित मोबदल्याची अदायगी याचे सनियंत्रण करण्याकरीता समुदाय आरोग्य अधिकारी ॲप यांची राज्यस्तरावर सुरूवात मोहिमेच्या कार्यारंभ सोहळ्यावेळी करण्यात येणार आहे.


            सर्व जिल्ह्यांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असून गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविणे व जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान आयुष्मान आपल्या दारी 3.0, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अयवयदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, वय वर्ष 18 वरील पुरूषांची आरोग्य तपासणी मोहिम उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान ‘आयुष्मान भव:’ सेवा पंधरवाडाही राबविण्यात येईल. ‘आयुष्मान आपल्या दारी’ अंतर्गत पात्र लाभार्थींचे आयुष्मान कार्ड नोंदणी व वितरण, स्वयं नोंदणीसाठी जनतेला प्रोत्साहित करणे, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे संयुक्त कार्डचे वितरण करण्यात येणार आहे.


            आयुष्मान सभेचे 2 ऑक्टोंबर रोजी ग्रामसभेच्या स्वरूपात आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर आयुष्मान मेळाव्याचे आयोजन दर आठवड्याला शनिवारी करण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये पहिल्या आठवड्यात असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, दुसऱ्या आठवड्यात क्षयरोग, कुष्ठरोग व इतर असंसर्गजन्य आजार तपासणी, निदान व उपचार, तिसऱ्या आठवड्यात माता, बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा, चौथ्या आठवड्यात सिकलसेल तपासणी व नेत्र रोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी होईल. या सर्व मेळाव्यांदरम्यान 18 वर्ष व अधिक वयोगटातील पुरूषांची आरोग्यविषयक सर्वंकष तपासणी करण्यात येणार असून ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालय येथे दर आठवड्याला आरोग्य मेळावा पार पडणार आहे

कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’ संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे.


            कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सूचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार

 बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

            मुंबई, दि. 12 : बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरीकृषी तज्ज्ञसामाजिक कार्यकर्तेनिविष्ठा उत्पादक, विक्रेते तसेच संबंधित विविध घटकांकडून सुधारणा व सूचना मागविण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

            बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी गत पावसाळी अधिवेशनात कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निवेष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते. विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहाने हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या 25 सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या संयुक्त समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

            या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधान परिषद सदस्य डॉ. मनीषा कायंदेअमोल मिटकरीरमेश कराडकैलास पाटीलवसंत खंडेलवालविधानसभा सदस्य प्रशांत बंबसंजय रायमुलकरसुरेश वरपुडकरकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी समितीतील विविध सदस्यांनी विधेयकातील तरतुदीबद्दल आपले मत मांडले. तसेच विविध सुधारणा सुचवल्या त्यावर समितीचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीहा कायदा व्यापक जनमानसावर प्रभाव टाकणारा असल्याने विधेयकाच्या प्रारूपाची सूक्ष्म चिकित्सा झाली पाहिजेअसे मत मांडले. तसेच गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजेत्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांकडून 30 दिवसांच्या आत सूचना मागून घेण्यात येतील व त्यानंतर त्यावर सखोल विचार करून समिती निर्णय घेईलअसे त्यांनी जाहीर केले.

0000

आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार

 आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 12 : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पद्धतीमध्ये आजी - आजोबा हे आधारस्तंभ असून त्यांचे नातवंडांवरील प्रेम हे दुधावरच्या सायीसारखे असते. ज्येष्ठ नागरिक ही आपल्या राष्ट्राची अनमोल संपत्ती असून आजी - आजोबांना शाळेतील आपल्या नातवांबरोबर काही क्षण घालवता यावेत यासाठी आजी - आजोबा’ दिवस साजरा करण्यात येत असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

            या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज मुंबईतील सेंट कोलंबा या मुलींच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी - आजोबांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्य शुभदा केदारीमाजी नगरसेवक आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी आशा विचारे मामेडीमुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्यासह शाळेच्या विद्यार्थिनी आणि त्यांचे आजी - आजोबा उपस्थित होते.

            मंत्री श्री.केसरकर म्हणाले कीचांगला समाज घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते. यामुळेच शिक्षण हे गुणवत्तापूर्ण आणि अधिक चांगले व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. त्याचबरोबर शिक्षक आनंदी राहिले, तर ज्ञानदान अधिक चांगले होईल या उद्देशाने विद्यार्थ्यांना घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील शाळांच्या अनुदानवाढीचा निर्णय घेण्यात आला असून याचा लाभ सुमारे 61 हजार शिक्षकांना झाला आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देताना पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केलेआठवीपर्यंत सर्वांना एकसारखा गणवेशकोडिंग-डिकोडिंगचे प्रशिक्षणशेती विषयाचा अभ्यासक्रमात समावेशकौशल्य शिक्षणपरसबाग उपक्रमरिड महाराष्ट्र अभियान आदींचा त्यांनी उल्लेख केला.

            विद्यार्थ्यांच्या आनंदाचा निर्देशांक (हॅपिनेस इंडेक्स) चांगला असेल, तर ते अधिक चांगले ज्ञानार्जन करू शकतील. सेंट कोलंबा ही शाळा सुमारे 190 वर्षे ही दोन्ही कार्ये उत्तमरित्या करीत असल्याबद्दल शाळेचे कौतुक करून मंत्री श्री.केसरकर यांनी शाळेच्या मैदानासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईलअसे सांगितले. मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार दिवस घालवता यावा यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

            उपसंचालक श्री.संगवे यांनी प्रास्ताविकाद्वारे आजी - आजोबा दिवसाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे भावविश्व जोपासले जावे यासाठी शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या संकल्पनेतून हा दिवस राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आजी - आजोबांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यासोबत खेळ खेळण्यात आले. दीपिका उगरणकर आणि मीना गोखले या आजींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी मल्लखांबतलवारबाजीनृत्य आदींचे प्रात्यक्षिक सादर केले.

Featured post

Lakshvedhi