Wednesday, 13 September 2023

मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा

 मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल

तत्काळ सादर करावा

- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

            मुंबईदि. 12 विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

            हैदराबाद रोख इनामे रद्द करणे अधिनियम 1954 चे कलम 2 अ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सुरेश धसमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरासहसचिव श्रीराम यादवदूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडेऔरंगाबाद विभागीय अपर आयुक्त बी. जे. बेलदारबीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. पाठक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            इनाम जमिनीसंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल करीत असताना यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांनी तेथील तज्ज्ञांना समितीमध्ये घ्यावे आणि त्यानंतर समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करावा. बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या निराकरणाबाबत शासनाने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना एक सदस्यीय समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समितीने दिलेला अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालाचा सुद्धा अभ्यास विभागामार्फत करण्यात यावा असे श्री. विखे-पाटील म्हणाले.

            हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने नष्ट करण्याबाबत अधिनियम 1954 च्या कलम 2 (अ) (3) मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला सादर करण्यात आला आहे. या विभागाकडून अभिप्राय आल्यानंतर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही श्री. विखे-पाटील म्हणाले.

उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतींच्या

 उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सात शासकीय इमारतींच्या

बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीची मंजुरी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

            मुंबईदि. १२ : उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत सात शासकीय इमारतीच्या बांधकामांना उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            मंत्रालयात मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक झाली. यावेळी वित्तनियोजनविधी व न्यायवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागउच्च व तंत्र शिक्षणमहसूल  आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, मुंबईविज्ञान संस्थेतील आण्विक व विकिरण प्रयोगशाळा इमारत बांधकामासाठी रु.२४.२५ कोटीसावित्रीबाई फुले महिला छात्रालयमुंबई वसतिगृह बांधकामासाठी रु. ८९.५२ कोटीवांद्रे (मुंबई) येथील सर ज. जी. कला संस्थेच्या कला वसतिगृह व वास्तुशास्त्र वसतिगृह इमारत बांधकामासाठी रु.१९९.७३ कोटीशासकीय तंत्रनिकेतनमुंबई महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी रु.५९.२६ कोटी रुपयेएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील महर्षि कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास रु.५४७.२७ कोटीनवीन अभियांत्रिकी महाविद्यालयकोल्हापूर या संस्थेसाठी आवश्यक विविध बांधकामासाठी १७४.७४ कोटी रुपये,तंत्रनिकेतन वांद्रे येथील मुला - मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम अशा एकूण सात प्रकल्प बांधकामांस मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे ११०० कोटी रुपये पेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

असे जगणे सुरेख बाई

 *नाते मनाचे मनाशी*😌


आमचं फार पटतं, 

WE ARE VERY CL0SE.....!


जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत !


माणसाचं दुःख कमी होण्यासाठी 

हल्लीच्या तकलादू RELATI0NS चा काहीही उपयोग नाही..


उपयोग का नाही ?

कारण मित्र किंवा नातेवाईक कितीही CL0SE असोत,,,


हल्ली फक्त GET T0GETHER करतात,

शेक हॅन्ड करतात,

आपलं यश सांगतात,

त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात, 

पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही,

त्यात मात्र कमीपणा मानतात, 

स्वत:चं अपयश समजतात..!


खाणे-पिणे, हसणे-खिदळणे 

किंवा एखाद्या रेकॉर्डेड गाण्यावर 

सर्वांनी मिळून डान्स करणे

हे सुख नाही, हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे..


याचा अर्थ या गोष्टी करू नयेत असा नाही.


परंतु..

जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत,  मनमोकळं रडणार नाहीत, 

तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..!


आजूबाजूला काय दिसतंय.?

चेहरे चिंताग्रस्त आहेत 

मुखवटे मात्र हसत असतात.


म्हणून आजकाल माणसं 

खूप दुःखी दिसतात. 

मग यावर उपाय.. ?

उपाय नक्कीच आहे !


आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास आपल्याला निर्माण करावा लागेल.


तरंच आपल्या भेटण्याला काही तरी अर्थ असेल !


हसणे आणि रडणे या क्रिया जोपर्यंत खळखळून होणार नाहीत तोपर्यंत आनंदी किंवा FRESH चेहरे कधीही दिसणार नाहीत ! 


मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात,

आणि दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.


*एक लक्षात घ्या -*

*ब्युटी पार्लरमधे गेल्यामुळे चेहरे तेजस्वी होत नसतात..*


*मसाज केल्यामुळे वेदनाही कमी होत नसतात ..*


*चार फोटो काढल्याने सौंदर्य वाढत नाही..*


*इतरांविषयी पाठीमागे वाईट बोलण्याने आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिध्द होत नाही, उलट आपलं खरं रुप बाहेर पडतं...*


पूर्वी आपण एकाद्याकडे पाहुणे होऊन जायचो, जे देतील ते आनंदाने खायचो.. 

ओसरीवर, बैठकीत, एकत्र झोपायचो..

खळखळून हसायचो..

एकमेकाला दुःख सांगून 

गळा काढून मग मन मोकळे रडायचोही..

हुंदक्यांमागे हुंदके यायचे 

आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..


कुणीतरी जवळ घ्यायचं,

पाठीवरून हात फिरवायचं,

रडू नको म्हणत म्हणत 

घट्ट कवटाळून धरायचं..

खूप मोठा आधार वाटायचा..

हत्तीचं बळ यायचं.

माझ्याबरोबर सगळे आहेत 

असं मनापासून वाटायचं..


काळवंडलेले चेहरे 

एकदम खुलून जायचे. 

चेहरे एकदम FRESH आनंदी 

दिसायचे..


मित्रहो

आपल्यालाही तेच करावं लागेल 

दुसरं काहीही नाही,

नाहीतर नुसते खोटारडे सुखी चेहरे घेऊन केलेल्या दिखाऊ 

Good morning

G00D DAY

ना काहीही अर्थ नाही.


✨व पु काळे.✨

औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विषयाच्या नि:शुल्क पुनर्गुणमूल्यांकनामध्ये ७१ विद्यार्थी उत्तीर्ण

 औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण विषयाच्या

नि:शुल्क पुनर्गुणमूल्यांकनामध्ये ७१ विद्यार्थी उत्तीर्ण

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

            मुंबईदि. १२ : यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण (Industrial Engineering & Quality Control) या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे नि:शुल्कपणे पुनर्गुणमूल्यांकन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाला देण्यात आले होते. त्यानुसार मंडळांनी राबविलेल्या पुनर्गुणमूल्यांकन प्रक्रियेत  ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा-२०२३ चा निकाल २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. अंतिम वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झाली होती. या विद्यार्थ्यांच्या प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन नि:शुल्कपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ७ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत ७१ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मंडळाकडून नव्याने निर्गमित करण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला

 मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला

चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा

- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई, दि. १२ : मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावाअसे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारमहामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

            यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या 2022-23 या वित्तीय वर्षाच्या लेख्यांना मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सोयाबीन, सीताफळ तसेच इतर कृषी व फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराची क्षमता मोठी आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ होण्याच्या दृष्टीने महामंडळाने व्यापक आराखडा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला

राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

 

            नवी दिल्ली12 : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कारानेराष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

            नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ Global Symposium on Farmers' Rights' (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.

            12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.

            केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्राकृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक (DARE)  आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

            यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ‘प्लांट अथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालयआणि ऑनलाइन वनस्पती विविधता नोंदणी पोर्टलचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीची माहिती

              धडगाव तालुक्यात ‘बाएफ’ संस्थेमार्फत २०१० पासून  सुरु असलेल्या स्थानिक जैवविविधता  संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धनउत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मकाज्वारीभरड धान्य पिकेकडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणांचे संवर्धनअभ्यास आणि लागवड केली जाते. धडगावअक्कलकुवा तालुक्यातील 15 गावांमध्ये मकाज्वारीकडधान्येतेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरीचोंदवडे गावात दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मकाज्वारी आदी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे. तसेच ज्वारीच्या जवळ - जवळ 19 जाती  शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुध्दीकरणाचे काम केले असून यापैकी पाच जाती पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरणशेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करुन घेण्यात आल्या आहेत. 

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 170दि.12.09.2023

श्रावण आला ग, चला उद्योजिनी


 

Featured post

Lakshvedhi