Saturday, 9 September 2023

पुंगुनुर गाय पाळा

 


बाहेर खाताना काळजी घ्या!😋 (मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खाते. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_

 😋बाहेर खाताना काळजी घ्या!😋 (मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खाते. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_


कायप्पावर वाचलेल्या मूळ हिंदी पोस्टचा  भागवत कृत स्वैर मराठी अनुवाद.


■■ आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही !!!

पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला ■■


काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते.


मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं.


आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या.


प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे.


मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे."


त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश  माझ्यासमोर बनवून दाखवा.


आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं...

हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले...


हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते.

 

बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात...


*हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा.


अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.


दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.


एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या.


सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे, मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.


मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन, पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"


मी म्हटलं, "जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे."


तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले.


आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती.


फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं.  वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून  व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं.


कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो.


किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.


मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला....


आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे.


भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे....


प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो!!!


देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत!!


जागरूक व्हा!!

दुसरा कुठलाच उपाय नाही.


*कमीत कमी पाच समूहांना नक्की अग्रेषित करा.


Forwarded...


🙏🙏

*!! कुंडली !!*

 *!! कुंडली !!*


*एकदा नागपंचमीला डॉ. श्री. अशोक भट यांना आम्ही भेटायला  गेलो होतो. १९९९ साली! त्यावेळी गारुडी नाग टोपलीत घेऊन फिरत असत.आम्ही बोलत होतो, तेव्हा खिडकीतून  सहज खाली पाहिलं तर, एका  गारुड्याने  टोपलीतून नाग काढला व बाहेर ठेवला. वेटोळे मारलेला नाग फणा काढून बसला होता. डॉ. मला म्हणाले या बसण्याला कुंडली मारून बसणं म्हणतात.*

  

*मी विचारलं यात काय वेगळं आहे?आणि कुंडली का म्हणतात? कुंडली म्हणजे कुंड असलेली! कुंड म्हणजे अग्नीचा स्रोत जिथं निर्मित असतो, ती जागा म्हणजे कुंड! आणि अशा अग्नीचे जी शीर वहन करते ती वाहिनी म्हणजे कुंडलिनी.*

*कुंड(अग्नी)+असलेली+वाहिनी म्हणजेच जिच्यातून अग्नी वहातो ती असलेली जागा म्हणजे कुंडलिनी.*

 

*आपण पहातो, सध्या कुंडलिनी जागृत कशी करायची यावर चर्चा होताना दिसते. कुठं असते याचं द्वार? मला म्हणाले विचार करा  व  सांगा. पण मला काही सांगता आलं नाही. तसं मला डॉक्टरांनी शुभं करोती म्हणा अस म्हणाले. ज्या ठिकाणी "कानी कुंडल "आलं तिथं थांबा म्हणाले.*

 

*कुंडल म्हणजेच जिथं ती घातली जातात. ती कानातील जागा! म्हणजे त्या कुंडाची नियंत्रित करणारी वाहिनी जिथं येते, तिथं कुंडल घालतात. म्हणजेच घरातील गॅस चे  बंद करायचं बटण म्हणजे कुंडल. बघा गॅसचा बर्नर म्हणजे कुंड झालं त्यात गॅस वाहून कोण नेतं तर वाहिनी आणि त्या नळीतील गॅसला म्हणजेच बर्नरमधली ज्योत कमीजास्त कोण करतं तर, ते बटण म्हणजेच कुंडल. म्हणजे मनुष्याच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या पाळीतून होत जिथं कुंडलं अडकवली जातात.आता हे कसं होत हे पाहू.* 

 

*मूलं जन्माला येतं पण त्या देहातील अग्नी नियंत्रित करण्यासाठी पहिले कान टोचतात. शरीरातील दुसरा कुठला अवयव टोचतात का? तर नाही कारण प्रत्येकाच्या शरीरातील अग्नी नियंत्रण हे कानातील त्या ठिकाणाहून होते जिथं कुंडल घालतात म्हणजे पाळी!*  


*शाळेत शिक्षा करताना शिक्षक कान पकडतात. नाक, हात, डोकं पकडतात का? जसा कान पिळला, मुलगा लगेच आई गं करतो म्हणजे काय होतं तर शरीरातील ऊर्जा कान पिळल्यामुळे ढवळली जाते व वेदना होतात. जसा इकडे कान पिळला  की  गुदद्वाराशी वेदना होतात. तिथंच का होतात तर मूलाधार चक्राच तोंड तिथं येतं.  जेव्हा लहान बाळाचे कान टोचतात तेव्हाच त्याचे  मूलाधार जागृत होत व अग्नीची पहिली वेदना ती बाळाला जाणवते. थोडक्यात शरीरातील अग्निकुंड तेव्हा प्रज्वलित  होतं म्हणून पूर्वीचे पुरुषसुद्धा कानात कुंडल घालायचे.  लग्नात सुध्दा कान पिळतात. आवाज कुठं काढतात तर कानाखाली,पहिली कुठलीही कम्पनं कोण खेचतं तर कान. कानामागून आली आणि तिखट झाली."सर्व गोष्टींमध्ये कान हे संयुक्त आहे कारण एकच मनुष्याच्या शरीराची ऊर्जा ही कान नियंत्रित करते.माणसास चक्कर येते तर ती का? कानाशी संबंध येऊन ठेपतो. बायका पहा हातातल्या बांगड्या जेव्हढ्या प्रेमानं दाखवत नाहीत तेव्हढं कानातील दाखवतात कारण पूर्ण देहाचा कुंडलिनीचा नियंत्रण हा कान करत असतो सांगायला लागत नाही आपोआप कानाची स्तुती होतेच.* 

 

*आपण जुनी मंदिरं पहातो! बाहेर कुंड असतं!  का? हातपाय धुण्यासाठी नाही, तर त्या मंदिरातील ऊर्जेचा स्रोत त्या कुंडातून नियंत्रित होत असतो. हा स्रोत किती आहे हे त्या कुंडात मध्ये उभारलेल्या खांबावरून कळत  म्हणजेच तो खांब त्या कुंडात कुंडली मारून बसलेला असतो आणि त्याकरवी त्या मंदिरातील ऊर्जा नियंत्रित होत असते.कधी कोकणात गेलात तर हमखास पहा जे कुंड स्वच्छ ते मंदिर पण आतून स्वच्छच  असतं. मुद्दाम पहा. कर्णाची कवचकुंडल काढून घेतली तेव्हा त्याची ऊर्जा संपली.  कुंडलीत दोष आहे म्हणजे काय? तर पत्रिकेतील ग्रहांची ऊर्जा तेव्हढी चांगली नाही म्हणून दोष. अस्थीविसर्जन कुंडात, गणपती विसर्जन कुंडात, गौरी विसर्जन कुंडात, म्हणजेच ऊर्जेच्या स्रोताशी एकरूप होणं!* 

  

*माणसाच्या शरीरातील या कुंडास कुंडलिनी म्हणतात व  ती जागृत ठेवायची असेल तर कानावर लक्ष द्या.मला डॉ. म्हणाले आता नागाची कुंडल कुठं आहेत  पहा. नागाचे जे वेटोळे असते  ही त्याची ऊर्जेचा स्रोत असतात, पण हीच वेटोळी दुसर्याच्या घरात किंवा अंगावर बसलं तर त्या घराची किंवा माणसाची सर्व ऊर्जा संपवून टाकते आणि विष ओकते. पत्रिकेतील कालसर्प योग हे त्याचंच उदाहरण आहे. जिथे वेटोळे घातलेला नाग असतो तिथंच त्याच पूजन होते. वास्तविक पूजन नागाचे नाही तर त्यांच्यातील ऊर्जास्रोत म्हणजेच कुंडलीचे  होते. जे कालसर्प पूजन करून आले असतील त्यांनी पाहिलं असेल नाग हा वेटोळे मारलेला असतो.तो गारुडी  जेव्हा त्या वेटोळ्यावर हात मारतो तसा नाग फणा काढतो म्हणून शेपटावर पाय देऊ नये.* 

 

*प्रत्येक माणसांत कुंडलिनी जागृत असते म्हणून तो जिवंत आहे. फक्त ती जेव्हा नियंत्रणात येते तेव्हा मूलाधार जागृत होतो, पण या वर  सहजासहजी   नियंत्रण मिळत नाही.* 


*आपले कान दोन्ही हाताने झाका व डोळे बंद करा! स्वत:तील ऊर्जा कशी वाहाते हे तुमचे तुम्हीच अनुभवा. माणूस चुकतो देवासमोर जातो कान धरतो म्हणजेच स्वत:तील ऊर्जा नियंत्रित करतो.* 

*प्रत्येक कृतीला शास्त्रीय अर्थ आहे त्याची अंधश्रद्धा होऊ नये...*


*🙏🏼रामकृष्ण हरी!🚩*

Friday, 8 September 2023

दिलखुलास’ कार्यक्रमातपर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमातपर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

            मुंबई, दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पर्यटनस्थळांची माहिती जास्तीजास्त पर्यटकांपर्यंत पोहचावी यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहे, पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण याबाबत डॉ. बी.एन. पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 11, मंगळवार दि. 12, आणि बुधवार दि.13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


००००

जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र’ व दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या

 मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 8 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्याचे परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या खेड्याकडे चला या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय असून त्यासाठी मंडळामार्फत विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच मंडळामार्फत यशवंतराव चव्हाण सभागृहमुंबई येथे दि. 12 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावीअसे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी जय महाराष्ट्र’ ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.9 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवारदि. 9 सप्टेंबर, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.25 टक्के दराने परतफेड

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 ची9.25 टक्के दराने परतफेड

 

            मुंबईदि. 8 :  महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2023 च्या अदत्त शिल्लक रकमेची 9.25 टक्के दराने 9 ऑक्टोबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहेअसे वित्त विभागाने कळविले आहे.

            शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नेांदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतीतल प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            विकास कर्जाच्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली असे यथोचितरित्या नमूद करुन रोखे परतफेडीसाठी सादर करावेत. रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत. रोखेधारकांनी रोखे मुखांकित ठिकाणी अथवा नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात पाठवावीत. असे वित्तीय सुधारणाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे सूचित केले आहे.

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री

 राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसाठी

चार हजार कोटींच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबईदि. 8 : राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमांसंबधित खर्चासाठी 10 वर्षे मुदतीच्या तसेच 11 वर्षे मुदतीच्या प्रत्येकी दोन हजार कोटींच्या रोख्यांच्या विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकासकामांना अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहेअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

            या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँकफोर्टमुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.

            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लीलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्रएका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                  

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 12 सप्टेंबर2023 रोजी त्यांच्या फोर्टमुंबई येथील कार्यालयात हा लीलाव आयोजित करण्यात येईल. लीलावाचे बिडस् दिनांक 12 सप्टेंबर2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकमुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 13 सप्टेंबर2023 रोजी करण्यात येईल.       

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 13 सप्टेंबर2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाफोर्टमुंबई यांच्या कार्यालयात रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी अनुक्रमे 10 व 11 वर्षांचा असेल.

            रोख्यांचा कालावधी 13 सप्टेंबर2023 पासून सुरु होईल. 10 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्याची परतफेड दिनांक 13 सप्टेंबर 2033 रोजी तर 11 वर्षे मुदतीच्या कर्जरोख्यांची परतफेड दि. 13 सप्टेंबर 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 13 मार्च व 13 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील.

००००

Featured post

Lakshvedhi