Friday, 8 September 2023

दिलखुलास’ कार्यक्रमातपर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमातपर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

            मुंबई, दि. 8: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.


            राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पर्यटनस्थळांची माहिती जास्तीजास्त पर्यटकांपर्यंत पोहचावी यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहे, पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण याबाबत डॉ. बी.एन. पाटील यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 11, मंगळवार दि. 12, आणि बुधवार दि.13 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi