Friday, 8 September 2023

मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते 11 सप्टेंबर रोजी प्रकाशन

 मतदार जागृतीसंबंधी पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते11 सप्टेंबर रोजी प्रकाशन

 

            मुंबईदि. 8 :   मतदार जागृतीचा उपक्रम म्हणून आगम’ या सामाजिक संस्थेने किशोर आणि युवा पिढीला भारतातील निवडणूक यंत्रणामतदानाचे महत्त्व  याची माहिती देण्यासाठी मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen!)’ हे पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दि.11 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वा. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे होणार आहे.    मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित करत असते. त्यासाठी विविध सामाजिक संस्थाशाळा-महाविद्यालयेखाजगी व शासकीय आस्थापने यांचे सहकार्य घेतले जाते. मतदार जागृतीचे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून त्यांतील भाषा तरुण पिढीला सहज समजणारी आहे. हे एक कॉमिक बुक’ असून साध्या सोप्या उदाहरणांतून निवडणूक यंत्रणामतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्वनिवडणूक प्रक्रियासुजाण नागरिकाच्या जबाबदाऱ्या इ. समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयेविद्यार्थी आणि पालक यांनी हे आवर्जून वाचावेअसे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. 

            पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेसहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकरउपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवीआगम संस्थेच्या सहसंचालक भारती दासगुप्ता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठीहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा

 अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठीहा लाखापर्यंत कर्ज योजनेचा प्रस्ताव तयार करावा


- मंत्री अब्दुल सत्तार


 


            मुंबई, ‍‍दि. ८ : अल्पसंख्याक समाजातील समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची अभ्यास समिती गठित करण्यात येणार आहे. समाजातील नागरिकांना घर बांधणीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


        अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली.


            मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये चर्चासत्राचे आयोजन करून त्या माध्यमातून समस्या जाणून घ्याव्यात व त्यानुसार नवीन योजनाबाबतचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. या समाजातील नागरिकांसाठी नवीन विविध योजना तयार करुन त्या माध्यमातून समाजाचा विकास करण्याचा मानस आहे. मंत्री श्री. सत्तार यांनी या बैठकीत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेवून समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी विविध मुद्दयांवर चर्चा केली.


          या बैठकीस मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमियाँ शेख, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


००००


शैलजा पाटील/विसंअ



 

ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

 ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या

 नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

- मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील

 

     मुंबई, दि. ८ :- मौजे चौक मानवली, तालुका खालापूर या महसूली गावाच्या हद्दीतील ईरशाळवाडी येथे भूस्खलन होवून दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत ५७ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध न लागल्याने स्थानिक चौकशीच्या आधारे सदर बेपत्ता व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये व राज्य आपत्ती सहायता निधीतून 4 लाख रुपये असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

             मंत्री श्री.पाटील म्हणाले कीसंबधित प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य पार पडल्यानंतर प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी 228 व्यक्ती वास्तव्यास होत्या. त्यापैकी 144 व्यक्ती हयात असून दुर्घटनेमध्ये 84 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 27 मृतदेह सापडले. तर 57 व्यक्ती बेपत्ता आहेत. प्रत्यक्ष दुर्घटनाग्रस्त ठिकाणची परिस्थिती विचारात घेऊन 23 जुलै 2023 रोजी सायंकाळी बचाव व शोधकार्य थांबविण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता.

            दुर्घटनेतील मृतदेह आढळून आलेल्या 27 व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तसेच 20 व्यक्तींच्या वारसांना 1 लाख रुपये इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून वाटप करण्यात आलेले आहे. यामधील 7 मयत व्यक्ती आणि 57 बेपत्ता व्यक्तींना प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अनुदान वाटप करण्याची मागणी मंजूर झाली असून या दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या वारसांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. हा निधी तत्काळ वितरित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ

 एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

            मुंबई, दि. 8 : गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.


            सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 212 टक्के महागाई भत्ता देण्यात येईल.


-----

०-----


कृषी महाविद्यालयात शासकीय रोपवाटिका व्यवस्थापनाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 कृषी महाविद्यालयात शासकीय रोपवाटिका व्यवस्थापनाच्या

राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

 

            मुंबई दि. 8 : कृषी महाविद्यालय, पुणे येथील शिरनामे सभागृहात ‘शासकीय रोपवाटिका व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कृषी आयुक्त श्री. सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

             या वेळी फलोत्पादनचे संचालक डॉ.कैलाश मोतेसहसंचालक अशोक किरनळीबाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे प्राध्यापक डॉ.पराग हळदणकरकृषी अभियांत्रिकीचे  प्राध्यापक डॉ.रवींद्र बनसोडे उपस्थित होते.

            शासकीय रोपवाटिकेमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारीसर्व संबंधित उपविभागीय कृषी अधिकारीजिल्हा अधिक्षक कृषी



अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;

 बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू;

सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा

 

            मुंबईदि. ८ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी विभागाने सुरू केली असूनत्या अंतर्गत अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुंबई शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागाआवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीतत्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासप्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज होती. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार असूनत्याचा लाभ या शाळेत शिकणाऱ्या सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना होणार असल्याचे, मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथम रात्र अभ्यासिका सुरू झाली असूनयापुढे प्रत्येक वार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

            महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने, पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असेल अशा इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी पालकांकडून संमती पत्रत्याचबरोबर विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे.  

            या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार पराग आळवणीमाजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

 जागतिक कराटे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

            मुंबई, दि.8 :- जागतिक कराटे चॅम्पियनशिपध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.


            ऑक्टोबर, २०२३ मध्ये जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या जागतिक कराटे चॅम्पियनशिपमध्ये मुंबईतील कराटेनोमिची वर्ल्ड फेडरेशन इंडिया संस्थेतील खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या संघातील या संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह ७ खेळाडू, २ पंच अधिकारी अशा ९ जणांच्या चमूला मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Featured post

Lakshvedhi