Friday, 25 August 2023

महिला बचतगटांच्या राखी विक्री स्टॉलचेमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 



महिला बचतगटांच्या राखी विक्री स्टॉलचेमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

        मुंबई, दि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांनी राख्या तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलची मांडणी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात केली आहे. या स्टॉलचे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बचतगटांच्या महिला सदस्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदू जाखड यावेळी उपस्थित होत्या.


        महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, घाटकोपर, मुंबई व अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तनिष्का लोकसंचलित साधन केंद्र, धारावी यांनी राख्या, पर्स, बॅग आणि बांबू संशोधन केंद्र व प्रशिक्षण केंद्र स्थित चिचपल्ली, तालुका पोंभुर्णा, जिल्हा चंद्रपूर यांनी तयार केलेल्या राख्यांचे दोन स्टॉल मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन मंगळवार दि. 29 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.

भवताल

 तर ‘व्वा, क्या कहने...’ इतका व्हायब्रंट लोगो उतरवणं ही कमालच! हा लोगो पाहायला आकर्षक आहेच, पण नीट वाचला तर तो किती अर्थपूर्ण आहे याची कल्पना येते.


विशेषत: ‘भ’ आयकॉन. मूळ अक्षराचा रंग काळा आणि या अक्षराच्या दोन गाठींमध्ये दोन हलकीशी पानांची जागा, त्याला प्रभाकरने दिलेला पोपटी-शेवाळी रंग. रंगांची संगती उत्तम बनतेच, त्याच्या जेडीने लोगो कोणत्या विषयाच्या मंचाचा आहे, हेही नकळत समजून जाते. त्यासाठी फार काही मुद्दाम किंवा भडक करावे लागत नाही.


आणखी एक बाब आवर्जून सांगावी लागेल. हा लोगो करताना ‘भ’ आयक़ॉनचा शेवटचा भाग किंवा शेपटी... मला वाटत होते- ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला चिकटलेली असावी. त्यामुळे लोगोला अधिक गोलाई येईल, ह माझी कल्पना. पण प्रभाकरने ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला न चिकटवता खुली ठेवली. त्यामागचे त्याचे तत्त्व असे की, ती मुक्त असल्याने खुलेपणा दर्शवते. त्याचबरोबर रचना म्हणूनही आयकॉनला अधिक खुलवते.


‘ल’ या अक्षराबाबतही असेच. या अक्षराला दोन कळ्या. त्याची मोठी कळी उजवीकडे असावी, असे मल वाटत होते. पण कलाकाराची नजर आणि सौंदर्यदृष्टी वेगळी. प्रभाकरने ती तशी ठेवली. आता त्याकडे पाहताना तो कसा नजरेत भरतो, याची प्रचिती येते. ‘ल’ च्या कळीला असलेली लय तर लाजवाब! एखादी उत्तम कलाकृती कलाकाराच्या हातून कशी घडते, याचा अनुभव या लोगोच्या वेळी घेतला.


हा लोगो ‘भवताल’ ला अधिक अर्थपूर्ण बनवणारा आहे. त्याचे मोल करता येणार नाही. त्यामुळेच असेल कदाचित, प्रभाकरने या लोगोसाठी पैसेही घेतले नाहीत. भवताल लाही अशा कलाकाराच्या आणि त्याच्या कलाकृतीच्या ऋणात राहणे पसंत आहे.


- अभिजित घोरपडे

संस्थापक - संपादक, भवताल


भवताल दिवाळी अंकाच्या गोष्टी

(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


क्रमश:


Bhavatal logo (s).jpg


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9

545350862 / bhavatal@gmail.com

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठीकालमर्यादेत कामे पूर्ण करावी

 हर्णे येथे मरीन कल्चर पार्क उभारण्यासाठीकालमर्यादेत कामे पूर्ण करावी


- उद्योगमंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. २४ : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.


            रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथील मरीन कल्चर पार्क संदर्भात मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार योगेश कदम, उद्योग विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर, उद्योग सहसंचालक संजय कोरबू, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र काकुस्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            हर्णे येथे ॲक्वा कल्चर पार्क उभारण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या सल्लागार संस्थेने सादरीकरण केले. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी या ठिकाणी किती गुंतवणूक, उलाढाल व रोजगार उपलब्ध होईल याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी. या प्रकल्पाला मेरीटाईम बोर्डाची मान्यता घ्यावी तसेच यासाठी लागणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी.


            अँकर युनिटसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील ६० उद्योजकांमधून उत्तम उद्योजकाची निवड करण्यात यावी. येथे उद्योग स्थापित करण्यास इच्छुक उद्योगांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य योजनेसोबतच राज्य शासनाच्या मत्स्य विकास धोरणाचा अभ्यास करून त्यातील लाभाची माहिती उद्योगांना द्यावी. राज्य शासनाने मत्स्य विकास धोरणात रत्नागिरीसाठी विशेष श्रेणी तयार केली आहे. यामध्ये वीज, भांडवल, मुद्रांक शुल्क, वस्तू व सेवाकर याबाबत उद्योगांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या धोरणाची माहिती उद्योजकांना देण्यात यावी.


            या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेत अंतर्गत रस्ते, वीज, पाणी इत्यादी पायाभूत सुविधांची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्यासही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.


००००

एचएसएनसी शैक्षणिक संस्थेचे ७५ व्या वर्षात पदार्पण

 एचएसएनसी शैक्षणिक संस्थेचे ७५ व्या वर्षात पदार्पण


मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. २४ : स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. सिंधी समाजातील लोकांनी स्थापन केलेल्या एचएसएनसी शिक्षण संस्थेने पुढील २५ वर्षांसाठी आपल्या विकासाचा रोडमॅप तयार करून देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.


            मुंबईतील ३० महाविद्यालये व शाळांचे संचलन करणाऱ्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) बोर्ड या सिंधी अल्पसंख्यांक संस्थेच्या स्थापनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 


            सिंधी समाजाने फाळणीनंतर विस्थापित झाल्यानंतर मुंबईत येऊन निर्धार, मेहनत व प्रामाणिकपणाने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवले. एचएसएनसी शिक्षण मंडळ या दृढ निर्धाराचे जिवंत उदाहरण आहे, असे राज्यपालांनी सांगितले.


            एचएसएनसी संस्थेचे संस्थापक एच.जी. अडवाणी व 'विद्यासागर' के एम कुंदनानी यांना श्रद्धांजली अर्पण करुन त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे मुंबईतील महाविद्यालये देशातील सर्वोत्तम महाविद्यालयांच्या यादीमध्ये गणली जातात, असे राज्यपालांनी सांगितले.


            आगामी काळात शिक्षण क्षेत्रात कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अभूतपूर्व बदल येऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांनी कृत्रिम प्रज्ञेच्या अनुरुप अभ्यासक्रम आखावेत, असे राज्यपालांनी सांगितले.


            राज्यात सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पुणे येथे शिक्षणासाठी येतात याकडे लक्ष वेधून एचएसएनसी समूहातील महाविद्यालयांनी उत्कृष्ट अध्यापक नेमून, चांगले अभ्यासक्रम राबवावे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुरूप अभ्यासक्रमात बदल करून मुंबईला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पसंतीचे केंद्र बनवावे असे आवाहन राज्यपालांनी केले.


            सन १९४९ मध्ये वांद्रे येथील नॅशनल कॉलेजपासून सुरुवात करून आज एचएसएनसी ही संस्था ३० महाविद्यालयांचे संचालन करीत असून संस्थेत ५०,००० विद्यार्थी शिकत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल हरीश यांनी यावेळी दिली. संस्था अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे निवासी शैक्षणिक संकुल विकसित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


            यावेळी राज्यपालांच्या हस्ते बोर्डाच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे माजी अध्यक्ष किशू मनसुखानी व विश्वस्त माया सहानी तसेच ओएसडी पदमा शहा यांचा संस्थेतील गौरवपूर्ण सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


            यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी व सचिव दिनेश पंजवानी यांची देखील समयोचित भाषणे झाली. एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. हेमलता बागला यांनी आभार प्रदर्शन केले. 


            कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजन वेळूकर, माजी प्र. कुलगुरु डॉ. नरेश चंद्र, ‘इग्नू’चे माजी कुलगुरु डॉ. राजशेखरन पिल्लई, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच निमंत्रित उपस्थित होते.


००००


Maharashtra Governor launches 75th year celebrations of HSNC Board


            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the inaugural ceremony of the 75th year Celebrations of the Hyderabad (Sind) National Collegiate (HSNC) Board at Raj Bhavan, Mumbai on Thursday (24 Aug). A vision document '75th Year Aspirations' was released on the occasion. The Governor felicitated former President of the Board Kishu Mansukhani, trustee Maya Shahani and OSD Padma Shah on the occasion.


            Vice Chancellor of University of Mumbai Dr Ravindra Kulkarni, former VC Rajan Welukar, President of HSNC Board Anil Harish, Provost of HSNC University Dr Niranjan Hiranandani, Secretary of the Board Dinesh Panjwani, former Pro VC Dr Naresh Chandra, Vice Chancellor of HSNC University Dr. Hemlata Bagla, teachers and invitees were present.


0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन


 


            मुंबई, दि. २४ : राष्ट्रीयस्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये स्थान पटकावणाऱ्या चित्रपटांशी निगडीत सर्वच निर्माते-दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ज्ञांचे कौतुक करून, त्यांचे अभिनंदन केले आहे.


            सन २०२१ करिताच्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी (दि होली वॉटर)’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाकरिता निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार, ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला उत्कृष्ट मराठी चित्रपट, तर दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांच्या ‘रेखा’ चित्रपटाला परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.


            या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, मराठी चित्रपटसृष्टीला गौरवशाली परंपरा आहे. कला क्षेत्रातील आधुनिक प्रवाह, तंत्रज्ञानाचे बदल आत्मसात करून मराठी चित्रपटांनी नेहमीच विषयांच्या हाताळणीत वैविध्य राखले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत मराठी चित्रपटांनी नेहमीच चमकदार कामगिरी नोंदवली आहे. हीच परंपरा यंदाही पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ज्ञ यांनी आपल्या सांघिक प्रयत्नातून कायम राखली आहे, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. ही परंपरा कला क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही नमूद केले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या श्री. महाजन यांचे देखील मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन 

केले आहे.


एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी,तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

 एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी,तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर


69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा


            नवी दिल्ली, 24 : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार ‘रेखा’या मराठी चित्रपटाला, तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी ‘थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला.    


            येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 करिताच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, चित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतिंद्र मिश्रा, नॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साई, चित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची घोषणा केली.


            फिचर फिल्ममध्ये विविध 32 श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.


‘एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट


            वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी, तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.


            ‘गोदावरी (द होली वॉटर)’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ, 2 लाख 50 हजार रोख असे आहे.


            नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘थ्री टू वन’ या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार संयुक्तरीत्या ‘मिठू’ सोबत मिळालेला आहे. ‘थ्री टू वन’ या चित्रपटाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरुप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.


             ‘रेखा’ या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.


            हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘सरदार उधम’ हा ठरला. 2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िणेतील चित्रपट अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार ‘पुष्पा’ या तेलगु चित्रपटासाठी अल्लू अर्जूनला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी आलिया भट तर ‘मिमी’ या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार ‘मिमी’ या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.


            सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारित असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील पुरस्कार ‘आर आर आर’ या तेलुग चित्रपटाला जाहीर झालेला आहे. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार ‘द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाला जाहीर झालेला आहे.


            चित्रसृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकिर्दीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके’ राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Thursday, 24 August 2023

बाहेर खाताना काळजी घ्या!😋*

 *😋बाहेर खाताना काळजी घ्या!😋*


*_(मी मात्र स्वतः छोट्या गर्दी असलेल्या दुकानात गरम पोळ्या आणि भाजी खातो. परंतु भारतातील परिस्थिती वाईट आहे,हे नक्की!)_*


कायप्पावर वाचलेल्या मूळ हिंदी पोस्टचा भागवत कृत स्वैर मराठी अनुवाद.*


■■ आम्ही कधीच उष्ट आणि शिळं अन्न खात नाही !!!

पुढल्या वेळेस हे लोकांना सांगण्या अगोदर जरा विचार करून बोला ■■


काही दिवसांपूर्वी आमचे एक परिचित आम्हाला एका अतिशय प्रसिद्ध अशा रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेले होते.


मी बहुधा नेहमीच बाहेर कुठे हॉटेलमध्ये जेवायला जाणं टाळते. परंतु सामाजिक दबावाखाली कधी कधी जावं लागतं.


आजकाल जेवणात पनीरचे पदार्थ खाणं हे श्रीमंतीचे लक्षण समजलं जातं. म्हणून त्यांनी सुरुवातीला पनीरच्या काही डिशेस मागवल्या.


प्लेट मध्ये ठेवलेले पनीरचे वेगवेगळ्या आकारांचे तुकडे बघून मला थोडसं विचित्रच वाटलं. असं वाटलं की त्या तुकड्यांना मुद्दाम कापून शिजवलेलं आहे.


मी वेटरला बोलावून त्या हाॅटेलच्या कुकला बोलावून आणण्यास सांगितलं. कुक आल्यावर त्याला मी विचारलं, "पनीरचे तुकडे वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे का बरं आहेत?" तेव्हा तो बोलला, "ही आमची स्पेशल डिश आहे."


त्यावर मी त्याला म्हटलं की मी आणखीन एक डिश माझ्याकरता पॅक करून घरी घेऊन जायचा विचार करतेय. पण मला ही तुमची स्पेशल डिश माझ्यासमोर बनवून दाखवा.


आख्ख रेस्टोरंट माझ्या वाढलेल्या आवाजानं जणू हादरून गेलं होतं...

हॉटेलमधील अनेक लोक आपलं जेवण थांबवून माझ्याकडे बघू लागले...


हाॅटेलचा स्टाफ वेगवेगळ्या सबबी सांगू लागला. शेवटी पोलीसच्या भीतीने वेटरनं कबूल केलं की जेवणारे लोक अनेकदा प्लेटांमध्ये अन्न, भाज्या कोशिंबीरी आणि पोळ्या वगैरे टाकून निघून जातात. हॉटेलमधल्या स्वयंपाक घरातून हे सारं फेकून दिल्या जात नाही. पनीर व भाज्यांमधील मोठे तुकडे एकत्र करून व पुन्हा त्यांची भाजी बनवून ग्राहकांना डिश दिली जाते.

 

बशांमध्ये शिल्लक राहिलेली कोशिंबीर नवीन ऑर्डर साठी वापरली जाते. बश्यांमध्ये टाकून दिलेले सुक्या चिकन व मांसांचे तुकडे पुन्हा कापून ते करीमध्ये नव्यानं टाकले व शिजवले जातात. शिळ्या आणि सडक्या भाज्या सुद्धा करीच्या रूपाने पुन्हा वाढल्या जातात...


*हे मोठमोठ्या हॉटेलमधलं वास्तव आहे. यापुढे जेव्हा केव्हा हॉटेलमध्ये खायला अथवा जेवण करायला जाल तेव्हा उरलेलं अन्न एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये टाकून सोबत घेऊन जा आणि बाहेर जाऊन एखाद्या जनावराला तरी खाऊ घाला किंवा मग ती पिशवी कचऱ्याच्या डब्यामध्ये तुम्हीच स्वतः फेकून मगच पुढे जा*


अन्यथा कदाचित तुमचं उष्ट अन्न दुसरा कुणी खाईल किंवा तुमच्या प्लेट मधील अन्न कदाचित दुसऱ्या कुणी प्लेटमध्ये टाकून दिलेलं उष्ट अन्न असू शकेल.


दूसरा किस्सा भगवान कृष्णाची जन्मभूमि वृंदावन येथील आहे. वृंदावनवा पोहोचल्यावर, मी मंत्रमुग्ध होऊन तिथल्या पवित्र भूमीकडे पाहात होते. दिल्लीहून लांबचा प्रवास करून आल्यावर आम्हा सर्वांनाच कमालीची भूक लागली होती. म्हणून एका स्वच्छ दिसणाऱ्या उपहारगृहामध्ये आम्ही प्रवेशलो. उगीच ऑर्डरला वेळ लागू नये म्हणून आम्ही डिश ऐवजी जेवणाच्या थाळ्या मागवल्या.


एका स्वच्छशा ट्रे मधून वरण, भाजी,भात, रायतं व सोबतच एक टोपलीतून चपात्या आणल्या गेल्या.


सुरुवातीचे काही घास घेताना लक्षात आलं नाही, पण मग नंतर मला काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. मग लक्षात आलं की पोळी थोडी आंबूस लागते आहे, मग भाजीकडे माझं लक्ष गेलं तेव्हा लक्षात आलं की भाजीतील प्रत्येक तुकड्याचा रंग वेगळा आहे. मग भाताची चव घेऊन बघितली. तिथेही काहीतरी गडबड वाटली. सगळं जेवण तसेच टाकून आम्ही उठलो आणि मग काउंटर वर मी जेवणाचं बिल किती झालं म्हणून विचारलं तर हाती साडेसहाशे रुपयांचे बिल ठेवल्या गेलं.


मी म्हटलं, "भाऊ! पैसे तर मी देईन, पण एकदा मला तुमचा भटारखाना दाखवा." तो एकदम गडबडून गेला आणि मला विचारू लागला, "कां? काय झालं?"


मी म्हटलं, "जो पैसे देतो त्याला जेवण साफ बनतंय की नाही हे पाहण्याचाही हक्क आहे."


तो काही बोलण्या आधीच मी हॉटेलच्या भटारखान्यात शिरले.


आत शिरल्यावर स्वयंपाक घरात कसलाही पदार्थ शिजत नाहीये हे पाहून माझ्या आश्चर्याला काही पारावार उरला नाही. एका टोपलीत कांही पोळ्या ठेवल्या होत्या. फ्रिज उघडून बघितला तर आंत उघड्या भांड्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या शिजलेल्या भाज्या ठेवलेल्या दिसत होत्या. कांही भाज्यांना तर चक्क बुरशी लागली होती.


फ्रिजमधून सडका वास बाहेर पडत होता. आचाऱ्याला दरडावून विचारल्यावर ह्या साऱ्या भाज्या एक आठवड्याइतक्या शिळ्या असल्याचं त्यानं कबूल केलं. वाढताना याच शिळ्या भाज्यात तेल टाकून व कढईत गरम करून आपण त्यात कोथिंबीर व टमाटू टाकून डिशमध्ये ग्राहकांना सर्व्ह करीत असतो हेही त्यानं मान्य केलं.


कणिक आपण केवळ एक दिवसाआडच मळतो.


किती किती तास वीज जाते तेव्हा खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. ते लपविण्यासाठी त्यांत तिखट आणि भरपूर मसाले टाकून डिशेस सर्व्ह केल्या जातात. तिंबलेली शिळी कणिक खराब झाली असेल तर तीच नान साठी सर्रास वापरली जाते.


मी रेस्टॉरंटच्या मालकास बोलले "तुम्हीही कधीतरी यात्रा करीत असालच, ईश्वर करो, जेव्हा पुढील यात्रेच्या वेळेस तुम्ही भुकेनं अगदी व्याकुळ झाला असाल तेव्हा तुम्हाला बिलकूल असंच जेवण मिळावं जसं तुम्ही तुमच्या ग्राहकांना खाऊ घालता." माझं हे बोलणं ऐकून त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला....


आज आपल्याला संकटं, धोके व फसवणूकीपासून केवळ आपली जागरूकताच वाचवू शकते. कारण आता देवालाही दुष्टांनी घेरलेलं आहे.


भारतातून योग्य आणि अयोग्य यांतील फरक संपत चालला आहे....


प्रत्येक दुकानात वा प्रतिष्ठानात एका कोनाड्यात देवाचं मोठं वा लहान मंदिर पहायला मिळेल, व्यापारी सकाळी येताच देवाच्या मूर्ती समोर धूप, दीप लावतो, गल्ल्याला नमस्कार करतो आणि मग दुकानातील सामानासोबतच स्वतःचा आत्मा विकण्याचा धंदा सुरू होऊन जातो!!!


देवाजवळ मागणं मागताना दुकानदार हा विचार करीत नाहीत की ते स्वतः जगाला काय देतायत!!


जागरूक व्हा!!

दुसरा कुठलाच उपाय नाही.


*कमीत कमी पाच समूहांना नक्की अग्रेषित करा.*


*कांही लोक नाही पाठवणार.*


*पण मला विश्वास आहे की तुम्ही तरी नक्कीच पुढे पाठवाल.*


🙏🙏

Featured post

Lakshvedhi