तर ‘व्वा, क्या कहने...’ इतका व्हायब्रंट लोगो उतरवणं ही कमालच! हा लोगो पाहायला आकर्षक आहेच, पण नीट वाचला तर तो किती अर्थपूर्ण आहे याची कल्पना येते.
विशेषत: ‘भ’ आयकॉन. मूळ अक्षराचा रंग काळा आणि या अक्षराच्या दोन गाठींमध्ये दोन हलकीशी पानांची जागा, त्याला प्रभाकरने दिलेला पोपटी-शेवाळी रंग. रंगांची संगती उत्तम बनतेच, त्याच्या जेडीने लोगो कोणत्या विषयाच्या मंचाचा आहे, हेही नकळत समजून जाते. त्यासाठी फार काही मुद्दाम किंवा भडक करावे लागत नाही.
आणखी एक बाब आवर्जून सांगावी लागेल. हा लोगो करताना ‘भ’ आयक़ॉनचा शेवटचा भाग किंवा शेपटी... मला वाटत होते- ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला चिकटलेली असावी. त्यामुळे लोगोला अधिक गोलाई येईल, ह माझी कल्पना. पण प्रभाकरने ती ‘भ’ च्या उभ्या रेषेला न चिकटवता खुली ठेवली. त्यामागचे त्याचे तत्त्व असे की, ती मुक्त असल्याने खुलेपणा दर्शवते. त्याचबरोबर रचना म्हणूनही आयकॉनला अधिक खुलवते.
‘ल’ या अक्षराबाबतही असेच. या अक्षराला दोन कळ्या. त्याची मोठी कळी उजवीकडे असावी, असे मल वाटत होते. पण कलाकाराची नजर आणि सौंदर्यदृष्टी वेगळी. प्रभाकरने ती तशी ठेवली. आता त्याकडे पाहताना तो कसा नजरेत भरतो, याची प्रचिती येते. ‘ल’ च्या कळीला असलेली लय तर लाजवाब! एखादी उत्तम कलाकृती कलाकाराच्या हातून कशी घडते, याचा अनुभव या लोगोच्या वेळी घेतला.
हा लोगो ‘भवताल’ ला अधिक अर्थपूर्ण बनवणारा आहे. त्याचे मोल करता येणार नाही. त्यामुळेच असेल कदाचित, प्रभाकरने या लोगोसाठी पैसेही घेतले नाहीत. भवताल लाही अशा कलाकाराच्या आणि त्याच्या कलाकृतीच्या ऋणात राहणे पसंत आहे.
- अभिजित घोरपडे
संस्थापक - संपादक, भवताल
भवताल दिवाळी अंकाच्या गोष्टी
(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)
क्रमश:
Bhavatal logo (s).jpg
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9
545350862 / bhavatal@gmail.com
No comments:
Post a Comment