Monday, 21 August 2023

नाग पंचमी पर वर्ष में सिर्फ एक बार खुलता है नागचन्द्रेश्वर मंदिर, यहां है नाग देवता की दुर्लभ प्रतिमा

 *🙏🛎️🔱🌿नागचन्द्रेश्वर महादेव 🌿🛎️🙏


नाग पंचमी पर वर्ष में सिर्फ एक बार खुलता है नागचन्द्रेश्वर मंदिर, यहां है नाग देवता की दुर्लभ प्रतिमा*


21 अगस्त 2023 को नाग पंचमी का त्योहार मनाया जाएगा, जानते हैं नाग देवता के उस मंदिर के बारे में जो बर्ष में सिर्फ एक बार खुलता है श्रावण माह के शुक्ल पक्ष की पंचमी तिथि यानी 21 अगस्त 2023 को नाग पंचमी का त्योहार मनाया जाएगा, सनातन धर्म में इस दिन भगवान शिव जी के साथ सर्पों की पूजा का विधान है, हिंदू धर्म में नाग पूजनीय माने गए हैं, जहां भगवान शिव के गले में विराजते हैं तो शेषनाग पर भगवान विष्णु शयन करते हैं, आइए जानते हैं नाग देवता के उस मंदिर के बारे में जो वर्ष में सिर्फ एक बार खुलता है....

*नागचंद्रेश्वर मंदिर की रोचक जानकारी*

*विश्व प्रसिद्ध ज्योतिर्लिंग में से एक है महाकालेश्वर मंदिर, उज्जैन में स्थित महाकाल मंदिर में की तीसरी मंजिल पर मौजूद है नागचंद्रेश्वर मंदिर ये मंदिर भक्तों के लिए बर्ष में सिर्फ नागपंचमी के दिन 24 घंटे के लिए ही खुलता है।*

*नागचंद्रेश्वर मंदिर 11*वीं शताब्दी में बनाया गया था, यहां फन फैलाए नाग की एक अद्भुत प्रतिमा है जिस पर शिवजी और मां पार्वती बैठे हैं,*


जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

 जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना


 


        मुंबई, दि. 21 : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.


Show quoted text

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना

 जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना


        मुंबई, 20 ऑगस्ट -जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.


            जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते या दौऱ्यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे हे राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठकासुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला या दौऱ्यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौऱ्यात वाकायामा या शहरालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.


यापूर्वी केला होता 2015 मध्ये दौरा


            यापूर्वी सप्टेंबर 2015 मध्ये श्री. फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.


            जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर 2017 मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.


00000

Sunday, 20 August 2023

केळिच्या सालिचे फायदे..🍌*

 ❄️❄️- *केळिच्या सालिचे फायदे..🍌*


  १) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरिल सुरकुत्या कमि होतात.


२) पिकलेल्या केळिचि साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात.


३) केळ्याचि साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत 

 होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने

  त्वचेवरचे पिगमेटेशन, वांग, डाग, दूर होतात , जर केळिचि साल नियमितपणे घासलि तर चेहर्यावर..


४) केळिच्या सालितले सफेद धागे काढून त्यात अँलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखालि लावल्यास

 काळे वर्तुळ नाहिसे होतात.


५) एखाद्या मधमाशिने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळिचि साल बारिक करून लावल्यास आराम पडतो.


६) शरिरात एखाद्या ठिकाणि वेदना होत असेल तर. त्याठिकाणि ३० मिनिटांपर्यंत केळिचि साल लावावि, आराम पडतो.


७) चेहर्यावरिल सुरकुत्यांमूळे त्रस्त असाल तर, केळिचि साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. हि पेस्ट ५ मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावि. व नंतर धूवा.


८) त्वचेवर कुठेहि मस किंवा चामखिळ असल्यास केळिचि साल तिथे चोळावि. काहि दिवसातच मस, किंवा चामखिळ निघून जाते.


९) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अश्यावेळि केळिची साल डोळ्यावर ठेवावि, थंडावा मिळतो. व त्यात असलेले

 विटामिनस् , डोळ्यांना मिळतात, डोळे रिलँक्स होतात.

 

१०). एका संशोधनातून सिद्ध झाले कि, केळ्याच्या सालिचा antidepressant म्हणून वापर करता येतो.

  तुम्हि केळिचि साल पाण्यात उकळवून ते पाणि प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant. असतो..

 ❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*

 🏵️ *चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*


✅ सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए सोबतच अनेक मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. 


✅ *कसा बनवाल सोयाबीन मास्क?*

सोयाबीन मास्क तयार करण्यासाठी अर्धी वाटी सोयाबीन रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी सोयाबीन पाण्यातून वेगळे काढा. हे सोयाबीन बारीक करा आणि एका वाटीमध्ये काढा या सोयाबीन पेस्टमध्ये थोडी मलाई आणि अर्धा चमचा हळद घाला. आता यात एक चमचा मध घाला. सर्व गोष्टी चांगल्या एकत्र करा.


✅ *कसा कराल वापर?*

सर्वातआधी चेहरा केवळ पाण्याने किंवा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर आणि मानेवर सोयाबीन मास्क लावा. हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल. 


✅ *सोयाबीन फेस मास्कचे फायदे*

सोयाबीन फेस मास्क चेहरा आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यातील तत्व त्वचेतील पीएच लेव्हल ठिक करतात. याने चेहऱ्याची मालिश केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीनही दूर होते. याचा सतत वापर केल्यास रंग उजळतो आणि त्वचा चमकदार होते. 


✅ *सोयाबीनमध्ये असतं व्हिटॅमिन इ*

सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात आढळतं. याने डेड स्कीन दूर होऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते आणि ग्लो येतो.....

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू

 बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू

 

            मुंबईदि. 20 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार २०२४ करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेत स्थळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. तरी सदरचे अर्ज हे वर दिलेल्या संकेतस्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच.नागरगोजे यांनी केले आहे.

         बाल शक्ती पुरस्कार ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक व १८ वर्षापर्यंतच्या) शिक्षण,कलासांस्कृतिक कार्यखेळ नावीण्यपूर्ण शोधसामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहेत्यांना हा पुरस्कार दिला जातो.

         बाल कल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्कारामध्ये मुलांच्या विकाससंरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार दिला जातो. संस्थास्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातोसंस्था पूर्णतः निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

      पुरस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in संकेत स्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावेत, असे आवाहन मुंबई  उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

0000

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतचीकेलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता

 शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतचीकेलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता


महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती


 


            मुंबई, दि. १९ : शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.


            ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील चार अतिक्रमणे शासनस्तरावर नियमानुकूल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.विखे -पाटील यांनी सांगितले.


            कातकरी समाजाकडून सुरू असलेल्या मागणीवर गेली अनेक वर्षे निर्णय होत नव्हता, अखेर मंत्री श्री.विखे-पाटील यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून याबाबत महत्वाचा आणि कातकरी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे कातकरी समाजाने स्वागत केले आहे.

Featured post

Lakshvedhi