Sunday, 20 August 2023

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*

 🏵️ *चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*


✅ सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए सोबतच अनेक मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. 


✅ *कसा बनवाल सोयाबीन मास्क?*

सोयाबीन मास्क तयार करण्यासाठी अर्धी वाटी सोयाबीन रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी सोयाबीन पाण्यातून वेगळे काढा. हे सोयाबीन बारीक करा आणि एका वाटीमध्ये काढा या सोयाबीन पेस्टमध्ये थोडी मलाई आणि अर्धा चमचा हळद घाला. आता यात एक चमचा मध घाला. सर्व गोष्टी चांगल्या एकत्र करा.


✅ *कसा कराल वापर?*

सर्वातआधी चेहरा केवळ पाण्याने किंवा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर आणि मानेवर सोयाबीन मास्क लावा. हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल. 


✅ *सोयाबीन फेस मास्कचे फायदे*

सोयाबीन फेस मास्क चेहरा आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यातील तत्व त्वचेतील पीएच लेव्हल ठिक करतात. याने चेहऱ्याची मालिश केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीनही दूर होते. याचा सतत वापर केल्यास रंग उजळतो आणि त्वचा चमकदार होते. 


✅ *सोयाबीनमध्ये असतं व्हिटॅमिन इ*

सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात आढळतं. याने डेड स्कीन दूर होऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते आणि ग्लो येतो.....

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi