Sunday, 20 August 2023

डॉ. गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 डॉ. गजानन शेपाळ यांच्या 'रंगसभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन


ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी


केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन


 


            मुंबई, दि. 20 : नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.


            राज्यपाल श्री.बैस म्हणाले, सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे व या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू, असेही राज्यपालांनी सांगितले.


            आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. 


            प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संतोष क्षीरसागर तसेच कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


००००


 


 


Maharashtra Governor releases Gajanan Shepal's book 'Ranga Sabha’


 


      Mumbai 20 : Maharashtra Governor Ramesh Bais released the book 'Rang Sabha' authored by Prof Ganajan Shepal at Sir J J School of Applied Art in Mumbai on Sat (19 Aug).


          Speaking on the occasion, the Governor said he will put his best efforts to establish the Sub Centre of Lalit Kala Academy in Maharashtra. The Governor said the Creative and Culture Industry is among the fastest growing industries in the world having immense potential for job creation. In this connection, he called for efforts to strengthen art institutions in the State.


          Former Chairman of Lalit Kala Academy Dr Uttam Pacharne, author Dr Gajanan Shepal, President of Marathi Vruttapatra Lekhak Sangh Mumbai Ravindra Malusare, senior journalist Vivek Sabnis and invitees were present.


The book 'Rang Sabha' is a compilation of the published articles of Dr Shepal, covering the life and work of 100 visual arti

sts and art institutions.


000


इस चार पायी (खाट) बनाने वाले को 21 तोपों की सलामी

 इस चार पायी (खाट) बनाने वाले को 21 तोपों की सलामी. गांवो में आज भी एक से बढ़कर एक प्रतिभा छुपी हुई है केवल इनको खोजने की जरुरत है.*

*इस पर लिखा गया हे *5/8/19 को धारा 370 और 35A को हटाया गया* *देखो यह कला.* 🙏🇮🇳🙏


जागतिक रक्त शोशक दिं न



 

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठीकौशल्य विकास कार्यक्रम आखावेत

 शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठीकौशल्य विकास कार्यक्रम आखावेत 


                                         -- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


मुंबई, दि.19 : चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली. मानखुर्दमधील नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील मुलींनी कोळीनृत्याने मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले.


            भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली.


             तेथील बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ

 महिला बचतगटांना व्यापाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे संपूर्ण पाठबळ  

                                                     पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
            मुंबईदि.19   महिला बचतगटांना  त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची जागा आणि प्रसिद्धी यासाठी संसाधने उपलब्ध नसल्याची तक्रार पालकमंत्री लोढा यांच्यासमोर मे २०२३ मध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली गेली होती. त्या अनुषंगाने सर्व महिला बचतगटांना आठवडी बाजाराच्या माध्यमातून हक्काची जागा देण्याचे आणि त्यांच्या उत्पादनां ची प्रसिद्धी करण्याचे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले होते. मुंबई महापालिकेतील २४ प्रभागांमध्ये १९ ऑगस्टपासून  आठवडीबाजार सुरू करण्यात आला आहे.

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते  घाटकोपरमध्ये शुभारंभ

       महापालिकेच्या एन विभागातर्फे सुचित्रा बिझनेस पार्कबी. एम. सी. पार्किंगपटेल चौकघाटकोपर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रथम आठवडी बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार राम कदम याप्रसंगी उपस्थित होते.
            "महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार तत्पर असूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आयोजन नेहमीच होत राहील. जनता दरबाराच्या माध्यमातून समोर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे हे आमचे ध्येय आहे. त्या अनुषंगाने हा आठवडी बाजार सुरू करण्यात आलेला असून ही तात्पुरती राबवली जाणारी संकल्पना नाही. या योजेनेचा कायमस्वरुपी लाभ महिला बचतगटांना मिळणार आहे. यापुढे देखील महिलांच्या आर्थिक विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध बदल करण्यात येतील"असे पालकमंत्री लोढा यांनी सांगितले.
            "आठवडी बाजारामध्ये सहभागी होण्यासाठी महिला बचतगटांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या 50 बचतगटांना महापालिकेतर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. आठवडी बाजारात महिला बचतगटांकडून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे माहितीपत्रक ग्राहकांना देण्यात येईलज्यामुळे ग्राहक त्या वस्तू 
 थेट महिला बचतगटाला संपर्क करुन मागवू शकतात व त्यांचा व्यवसाय निरंतर सुरू  राहील. महापालिकेच्या माध्यमातून वस्ती-वस्तीत फलक  व स्पीकरच्या माध्यमातून आठवडी बाजाराचा प्रचार करण्यात येत आहे. सोबतच सर्व महिला बचतगटसुद्धा घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. स्थानिक व्यापारी वर्गालादेखील या उपक्रमात सहभागी करून घेऊन त्यांना महिला बचतगटांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे"असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.
या आठवडी बाजारांच्या माध्यमातून
 महिला बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होऊन त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

***

 

 


पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

 पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ


            मुंबई, दि.१९:- 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या मागण्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'महा आरोग्य शिबीर' आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज साईनाथ नगर रोड, गणेश मैदानासमोर, मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह(साईनाथ मेटरर्निटी होम), घाटकोपर, पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी आमदार राम कदम उपस्थित होते.

            या शिबिराद्वारे प्राथमिक आरोग्य चाचण्यांसह नागरिकांना मोफत औषधेसुद्धा उपलब्ध करुणदेण्यात आली आहेत. विभागाकडून लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या मोफत तपासणीचा लाभ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला असल्याबद्दल मंत्री श्री.लोढा यांनी समाधान व्यक्त केले.


                                                ***

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

 राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन


                                                    -उद्योग मंत्री उदय सामंत


मुंबई, दि.१९: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.


      मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे पूर्वेश सरनाईक, गीता झगडे, श्रीकृष्ण पडळकर उपस्थित होते.


      मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असून गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील 50 हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील 20 गोविंदा पथकांतील तीन हजार 500 गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे.


       अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास 10 लाख रूपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


       गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. वरळी भागातील इनडोअर स्टेडियमध्ये 40 फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली. 


प्रो-गोविंदा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होतील- मंत्री संजय बनसोडे


            दहीहंडी या पारंपरिक स्पर्धा असून याचे रूपांतर उत्सवात झाले आहे. या स्पर्धेतून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केला. या स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून याला साहसी खेळ म्हणून क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.


असे असेल बक्षिस


            प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस 11 लाख रूपये, दुसरे बक्षिस सात लाख रूपये, तिसरे बक्षिस पाच लाख रूपये आणि चौथे बक्षिस तीन लाख रूपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.


००००


 

Featured post

Lakshvedhi