Sunday, 20 August 2023

पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

 पालकमंत्री आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत घाटकोपर येथे आयोजितमहाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ


            मुंबई, दि.१९:- 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमांतर्गत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या मागण्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'महा आरोग्य शिबीर' आयोजित करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज साईनाथ नगर रोड, गणेश मैदानासमोर, मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह(साईनाथ मेटरर्निटी होम), घाटकोपर, पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी आमदार राम कदम उपस्थित होते.

            या शिबिराद्वारे प्राथमिक आरोग्य चाचण्यांसह नागरिकांना मोफत औषधेसुद्धा उपलब्ध करुणदेण्यात आली आहेत. विभागाकडून लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी पाहणी केली व उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला, तसेच या उपक्रमाबद्दल अधिकाऱ्यांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या मोफत तपासणीचा लाभ स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला असल्याबद्दल मंत्री श्री.लोढा यांनी समाधान व्यक्त केले.


                                                ***

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन

 राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन


                                                    -उद्योग मंत्री उदय सामंत


मुंबई, दि.१९: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.


      मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय समितीचे पूर्वेश सरनाईक, गीता झगडे, श्रीकृष्ण पडळकर उपस्थित होते.


      मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा होणार असून गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच देण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील 50 हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील 20 गोविंदा पथकांतील तीन हजार 500 गोविंदांना विम्याचा लाभ होणार आहे.


       अपघात होऊ नये यासाठी दहीहंडी समन्वय समितींना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार समिती नियमावली तयार करणार आहे. नियमावलीनुसार प्रत्येक स्पर्धकाची काळजी घेतली जाणार असून प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर मॅटचा वापर करण्यात येणार असून गोविंदाचा मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास 10 लाख रूपयांची मदत शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.


       गोविंदा खेळाडूंचे कार्यक्रम, स्पर्धा वर्षभर घेण्यावर भर राहणार असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. वरळी भागातील इनडोअर स्टेडियमध्ये 40 फूट उंची असल्याने तिथे स्पर्धा आयोजित केल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली. 


प्रो-गोविंदा स्पर्धेतून दर्जेदार खेळाडू तयार होतील- मंत्री संजय बनसोडे


            दहीहंडी या पारंपरिक स्पर्धा असून याचे रूपांतर उत्सवात झाले आहे. या स्पर्धेतून राज्याचा नावलौकिक वाढविणारे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केला. या स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून याला साहसी खेळ म्हणून क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे. या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यावर भर राहणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.


असे असेल बक्षिस


            प्रो-गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून पहिले बक्षिस 11 लाख रूपये, दुसरे बक्षिस सात लाख रूपये, तिसरे बक्षिस पाच लाख रूपये आणि चौथे बक्षिस तीन लाख रूपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षिस देण्यात येणार आहे.


००००


 

Saturday, 19 August 2023

शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी

 शासकीय भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी


कौशल्य विकास कार्यक्रम आखावेत 


                                         -- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे


 


मुंबई, दि.19 :


             चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेयांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी केली. तिथे तयार करण्यात आलेल्या जेवणाची चवही चाखून तिची गुणवत्ता त्यांनी तपासली. मानखुर्दमधील नवीन तसेच अतिरिक्त बालगृह येथील मुलींनी कोळीनृत्याने मंत्री आदिती तटकरे यांचे स्वागत केले.


            भिक्षेकरी प्रवृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जाव्यात, भिक्षेकरीगृहातील महिला व पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी कमी कालावधीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मंत्री कु. तटकरे यांनी प्रशासनाला दिले. यावेळी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची त्यांनी पाहणी केली.


             तेथील बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण याबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली. बालके आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त तथा दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे मुख्याधिकारी बापूराव भवाणे, मुंबई उपनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.नागरगोजे, मुंबई शहर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टाटा म्हणजेच विश्वास,त्यांच्या सन्मानाने पुरस्काराची उंची वाढलीराज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान

 राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान










            मुंबई, दि. १९ : - उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री. टाटा यांना त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मान्यवरांनी २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरुपात पुरस्कार प्रदान केला.


             याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, टाटा सन्सचे चेअरमन तथा महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते. 


टाटा म्हणजेच विश्वास,त्यांच्या सन्मानाने पुरस्काराची उंची वाढली


                       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समूहाने देशासह, जगभरात उद्योगक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास, हे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान वाढला, उंची वाढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


            तत्पूर्वी श्री. टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी श्री. टाटा यांच्यासमवेत श्री. चंद्रशेखरन आदींशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.


            महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा, उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना तर उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरी किर्लोस्कर यांना, उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.


00000


 



दि. 19 ऑगस्ट 2023


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी

 *ऑस्ट्रेलिया मध्ये एका नर्सला अशा लोकांना सांभाळण्यासाठी ठेवण्यात आले होते की ज्यांच्याकडे जीवनातले शेवटचे १० - १५ दिवस बाकी होते. तिने मरणासन्न सर्व व्यक्तींना एकच प्रश्न विचारला कि तुम्हाला जीवनात कशाचा पश्चाताप वाटतो ?* *तिने लोकांच्या उत्तरावर एक पुस्तक लिहीले. त्या नर्सचे पुस्तक वेड्या सारखे विकले जात आहे, त्या पुस्तकाचे नांव आहे " पश्चाताप ". जर ते पुस्तक तुम्ही वाचले नसेल तर ईथे एक लहान व्हीडीयो दिला आहे. ज्यात मृत्यु झालेल्या लोकांचे पांच पश्चाताप दर्शवले आहेत. आ


शा करतो कि आपल्याला सर्वांना आवडेल.* 👆👆 *Must see 🙏🏽👌🏽*

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीवरील भाषा सहन करणार नाही

 देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीवरील भाषा सहन करणार नाही




आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा, कांदिवली पूर्वला 'सामना' ची केली होळ

मुंबई : मेट्रो पासून एसआरए पर्यंतच्या अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली. त्यांच्या बद्दल बोलण्यासारखे काही नसल्याने 'सामना'त त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही 'सामना' वृत्तपत्राची होळी केली. हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी इशारा समजावा. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत 'सामना' मध्ये खालच्या भाषेचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वखाली सामना वृत्तपत्राची आज होळी करण्यात आली, यावेळी आ. भातखळकर बोलत होते. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला. त्यांच्याबाबत अशा खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर आम्ही सहन करणार नाही. मुंबई महापालिकेच्या २३६ जागांसाठी तेच सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हिंमत असेल तर सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घ्या मग 'दूध का दूध और पाणी का पाणी' होईल, असेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.  


सुयश महिला मंडळ, बांद्रा उपक्रम, सहभागी व्हा.


 

Featured post

Lakshvedhi