Tuesday, 15 August 2023

आयटीआयमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कुशल, रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय)आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. तसेच कुशल महाराष्ट्र; रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुम/ स्मार्टरुमचे (Virtual Class Room / Smart Class Room) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह ,आयुक्त डॉ रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची उपस्थिती होती. तर राज्यातील विविध आयटीआयमध्ये लोकप्रतिनिधींसह ७५ आयटीआयचे प्रशिक्षणार्थी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. अतिदुर्गम भागातील होतकरू प्रशिक्षणार्थींनाही कमी साधनसामग्रीसह जगातील अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ७५ व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात एकूण ९० क्लासरूम तयार आहेत.व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरअँक्टिव पँनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. आयटीआय मध्ये आता पारंपरिक शिक्षण न देता स्पर्धात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तरुणांना कुशल बनवण्याबरोबरच उद्योग निर्मिती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते आहे. तरुणांसाठी रोजगार निर्मिती पेक्षा रोजगार देणारे हात तयार करण्याकडे शासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने एक वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा संकल्प सुरू केला असून प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम घेतला आहे. अधिसंख्य पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी 600 सामंजस्य करार करण्यात आले. तीन लाख रोजगार देण्यात आले. देशाला विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान असणार आहे असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग आले तरच रोजगार उपलब्ध होणार आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी शासन परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. दावोस औद्योगिक परिषदेत १.३७ हजार सामंजस्य करार करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणण्यात आली. आपण उद्योगांना चांगल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या आहेत. तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.काळाची आवश्यकता पाहून जगातील विकसित कौशल्य प्रशिक्षणार्थींना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर मुख्य सचिव श्री. आशिषकुमार सिंह यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया सावंत यांनी तर आभार संचालक दिगांबर दळवी यांनी मानले. 000

 आयटीआयमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुमचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

कुशल, रोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

 

            मुंबईदि.१५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल इंडिया व डिजिटल या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय)आता व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहे. तसेच कुशल महाराष्ट्ररोजगार युक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तयार करण्यात आलेल्या ७५ व्हर्च्युअल क्लासरुम/ स्मार्टरुमचे (Virtual Class Room / Smart Class Room)  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाअपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह ,आयुक्त डॉ रामास्वामी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची उपस्थिती होती. तर राज्यातील विविध आयटीआयमध्ये लोकप्रतिनिधींसह ७५ आयटीआयचे प्रशिक्षणार्थी  दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. अतिदुर्गम भागातील होतकरू प्रशिक्षणार्थींनाही कमी साधनसामग्रीसह जगातील अत्याधुनिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग प्रयत्नशील आहे.

            पहिल्या टप्प्यात राज्यात ७५ व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यात एकूण ९० क्लासरूम तयार  आहेत.व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरअँक्टिव पँनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

            आयटीआय मध्ये आता पारंपरिक शिक्षण न देता स्पर्धात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तरुणांना कुशल बनवण्याबरोबरच उद्योग निर्मिती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येते आहे.  तरुणांसाठी रोजगार निर्मिती पेक्षा रोजगार देणारे हात तयार करण्याकडे शासन प्रयत्नशील आहे.

            राज्य शासनाने एक वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा संकल्प सुरू केला असून प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम घेतला आहे. अधिसंख्य पदाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्योग आणण्यासाठी 600 सामंजस्य करार करण्यात आले. तीन लाख रोजगार  देण्यात आले. देशाला विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान असणार आहे असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

            राज्य उद्योग क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग आले तरच रोजगार उपलब्ध होणार आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. यासाठी शासन परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. दावोस औद्योगिक परिषदेत १.३७ हजार सामंजस्य करार करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात आणण्यात आली. आपण उद्योगांना चांगल्या सोयीसुविधा निर्माण करून दिल्या आहेत. तसेच कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे.काळाची आवश्यकता पाहून जगातील विकसित कौशल्य प्रशिक्षणार्थींना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

            मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर मुख्य सचिव श्री. आशिषकुमार सिंह यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया सावंत यांनी तर आभार संचालक दिगांबर दळवी यांनी मानले.

000


स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त fवधान भवन येथे ध्वजारोहण

 स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त fवधान भवन येथे ध्वजारोहण

 





 

          मुंबईदि. 15 : स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवनमुंबई येथे विधानसभेचे अध्यक्षॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्तेविधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

       या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव (2) (कार्यभार) विलास आठवलेसहसचिव शिवदर्शन साठ्येउपसचिव ऋतुराज कुडतरकरउपसचिव (विधी) सायली कांबळीअवर सचिव विजय कोमटवारअध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणीउप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकरसंचालकवि.स.पागेसंसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारीनिलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. विधानमंडळाच्या वैशिष्टयपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.

0000


आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर

 आपला महाराष्ट्र सर्व







च क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास


स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण

            मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


            ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.


            मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले.


            समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे.आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करून या अभियानात आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.


            गेल्या पाच वर्षात देशातील साडे तेरा कोटी जनतेला दारिद्रय रेषेबाहेर काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांना जगण्याचे नवे बळ दिले. जनधन खात्यांच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला. आता डीबीटीमुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय.त्यामुळे योजनाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढली आहे असे त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले.


शासनाने वर्षभरात घेतलेले महत्त्वाचे निर्णय


            'शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत सव्वा कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्याना करोडो रुपयांचे लाभ आपण दिले. या योजनेचा लाभार्थी माझ्यासमोर येतो, तेंव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो.त्यात मला स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो असेही त्यांनी यावेळी सांगितले


शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर


            शेतकऱ्यांसाठी आम्ही केवळ एक रुपयात पीक विमा योजना जाहीर करून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला. यामुळे दीड कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ झाला.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदत केली आहे.आजवर साडे बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे 6 हजार रुपये भर टाकली असून दरवर्षी 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देत आहोत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. रखडलेल्या 35 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला.जवळपास आठ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचे पाणी वळविण्यासाठी नदीजोड प्रकल्प घेण्यात येत आहे.


            मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू


असल्याचे सांगितले .


       शासनाने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला असून महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत दिली. याचा करोडो नागरिकांना याचा लाभ झाला.


            18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीस एक लाख रुपये अर्थसहाय देणारी 'लेक लाडकी' सारखी योजना सुरू केली.


            दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12 हजारांहून अधिक रुग्णांना आम्ही 100 कोटी रुपये मदत केली.


            महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवलं. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा व राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली.


            वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे, यांची नवीन धोरणे आम्ही आणली आहेत. राज्यात रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे.


            सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याच्या निर्णय घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ स्थापन केलं आहे.


            दुर्लक्षित हजारो सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्याचा निर्वाह भत्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आम्ही मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने वाढ केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


            प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दिलेली आश्वासने म्हणजेआमच्या कामाची दिशा आहे. आमचे ते लक्ष्य आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. याच भावनेने महाराष्ट्राचीही वाटचाल सुरू आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

 विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

            मुंबई, दि.१४ : देशाच्या फाळणीचा इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या आठवणींचे आणि इतिहासाचे चित्रण एका छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन केले. काळा घोडा येथील इंडियन बँकच्या हेरिटेज इमारतीमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


            "आपल्या देशाच्या विभाजनाचा इतिहास हा किती वेदनादायक होता, त्याचा आपल्या लोकांवर काय परिणाम झाला, देशासाठी किती लोक शहीद झाले या सर्व गोष्टींची माहिती नवीन पिढीला व्हावी. म्हणून हे प्रदर्शन महत्वाचे आहे. विभाजनानंतर दहशतवादी हल्ले या सारख्या अनेक समस्यांशी आपण झुंजतो आहोत.” असे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईकरांसाठी हे प्रदर्शन १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट पर्यंत खुले राहील.       


            इतिहासाच्या माहितीप्रमाणेच तरुणांचा कौशल्य विकास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, त्या उद्देशाने युवा पिढीसाठी स्वातंत्र्य दिनाची भेट म्हणून शासकीय औद्येगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७५ व्हर्चुअल क्लासरूमचे उद्घाटन होणार असल्याचे मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले. येत्या ३ महिन्यांत राज्यातील सर्वच आयटीआय व्हर्चुअल क्लासरूम बनवू आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करू, असे देखील त्यांनी सांगितले.


            इंडियन बँकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी एसएसपी रॉय, फील्ड जनरल मॅनेजर, मुंबई, स्वातंत्र्यसैनिक गुणवंती जोशी उपस्थित होत्या.


००००

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

 वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी यांची

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 17 ऑगस्ट रोजी मुलाखत

            मुंबई, दि. ११ : राज्यात वैद्यकशास्त्रात समतोल विकास साधणे आणि वैद्यक शाखेतील विविध अभ्यासक्रमात एकरूपता आणण्यासाठी विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.


            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमार्फत शैक्षणिक सेवा तसेच रुग्ण सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाश्वत उपाययोजना तसेच विविध उपक्रम शासनस्तरावर राबविण्यात येत आहेत. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी राज्यभरात विविध शिबीरे आयोजित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर नव्याने वैद्यकीय महाविद्यालय आणि बी.एस्सी. नर्सिग हा अभ्यासक्रम सुरू करून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करूण देणे, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्तपदांबाबत भरतीचा निर्णय घेणे असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिव डॉ. जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ ' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 17 ऑगस्ट, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  


ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


०००

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 14 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


            गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.


            निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


०००


श्रद्धा मेश्रा

म, स.सं



 


सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठीघरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार

 सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठीघरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत


            मुंबई, दि.१४ :- मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.


            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मंगेश कुडाळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष संजय जयस्वाल, समितीचे अध्यक्ष जॉनी जोसेफ उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आता एका घरासाठी ३० अर्ज आहेत. ते प्रमाण एकास ५ पर्यंत आणण्यासाठी ‘म्हाडा’ सारख्या शासनाच्या संस्थांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांचे स्वप्न, हक्काचा निवारा साकार होण्यास मदत होईल.


            ‘म्हाडा’वरील लोकांचा विश्वास वाढतोय. यामुळेच या सोडतीसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले.हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी पारदर्शकपणे काढण्यात येत आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला आहे.


            ‘म्हाडा’च्या या सोडतीमुळे मुंबईकर पुन्हा मुंबईत येवू शकणार आहेत. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास ते करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. धारावी सारखा प्रकल्प सुरू होत आहे. देशातील सर्वात मोठा ट्रान्स-हार्बर समुद्रावरील रस्ता एक वर्षात सुरू होत आहे. प्रवाशी मुंबईतून २० मिनिटांत रायगड जिल्ह्यात जावू शकणार आहे. कोस्टल रोड, मेट्रो यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे १.५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पंढरपूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ‘म्हाडा’ला मोफत जमीन मिळते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासनाचेही हेच स्वप्न आहे, की सर्व सामान्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन ‘म्हाडा ’च्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील आणि पुढील सोडतीमधील घरांच्या किमती इतर घरांपेक्षा कमी असतील.


            ‘म्हाडा’ने अधिकाधिक घरे निर्माण करावीत. मुंबईतील नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करावीत. नवी मुंबईत अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत.


            सर्वसामान्य जनतेला त्यांच्या उमेदीच्या काळात घराचे स्वप्न साकार झाले. तर त्याचा मोठा आनंद संबंधितांच्या परिवारास होतो. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. म्हाडा पारदर्शकपणे सोडत काढून जनतेचा विश्वास जिंकत आहे. म्हाडा पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवनवीन योजना राबवीत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले की, घरांची मागणी वाढत आहे. लवकरच पुढील सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांना पुढच्या लॉटरीत कागदपत्रांची पडताळणीची आवश्यकता असणार नाही. गृहनिर्माण प्रकल्पांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


मुंबई ‘म्हाडा’च्या सोडतीविषयी अधिक माहिती


            म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४,०८२ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त १,२०,२४४ पात्र अर्जाची संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काढण्यात आली..


            सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तत्काळ कळविली जाणार आहे.


         ही सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.         


          सोडतीत जाहीर ४०८२ सदनिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पातील घरे पहाडी गोरेगाव येथे असून या घरांकरिता २२,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटातील ८४३ सदनिकांसाठी २८,८६२ अर्ज प्राप्त झाले आहेत आणि या उत्पन्न गटातील सर्वाधिक अर्ज कन्नमवारनगर विक्रोळी (४१५) या योजनेकरिता प्राप्त झाले आहेत. तसेच अल्प उत्पन्न गटातील १०३४ सदनिकांसाठी ६०,५२२ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज पहाडी गोरेगांव (४१६) या योजनेकरिता आहेत तर मध्यम उत्पन्न गटातील १३८ सदनिकांसाठी ८३९५ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज उन्नतनगर गोरेगांव येथील गृहनिर्माण योजनेकरिता आले आहेत. उच्च उत्पन्न गटातील १२० सदनिकांसाठी २०६८ अर्ज प्राप्त झाले असून सर्वाधिक अर्ज शिंपोली कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरिता आहेत.  


0000



 


Featured post

Lakshvedhi