Saturday, 12 August 2023

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        नवी दिल्ली, 11 : केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रदान केला जाणारा राष्ट्रीय ‘गोपाल रत्न पुरस्कार’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नॅशनल अवॉर्ड पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.

दूध उत्पादक शेतकरी, दूग्ध सहकारी संस्था, दूध निर्मिती कंपनी (एमपीसी),दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना एफपीओ आणि कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कार केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्यावतीने प्रदान केला जातो. यासाठी इच्छुकांनी https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत.


शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास क्षेत्रात परिणामकारक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशी जातींच्या गायी-म्हशी सशक्त असून त्यांच्यात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता आहे. शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर 2014 मध्ये “राष्ट्रीय गोकूळ अभियान(आरजीएम)” सुरु करण्यात आले. या अंतर्गत देशी गायी- म्हशींवर संशोधन आणि दूध क्षमता वाढविण्यासाठी संशोधन केले जाते.


वर्ष 2023 या वर्षासाठी विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय गोपाल रत्न’ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये देशी गाई अथवा म्हशींचे पालन करणारा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी (नोंदणीकृत जातींची यादी सोबत जोडली आहे), सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक सहकारी संस्था (डीसीएस)/ दूध निर्मिती कंपनी (एमपीसी)/दूध निर्मात्या शेतकऱ्यांची उत्पादक संघटना (एफपीओ), सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) अशी श्रेणी केली आहे.


 राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2023 प्राप्त पहिल्या दोन विभागांसाठी म्हणजेच सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वोत्कृष्ट डीसीएस/ एफपीओ/ एमपीसी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम दिली जाईल. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.5,00,000/- (पाच लाख रुपये) तर द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी रु.3,00,000/-(तीन लाख रुपये) पारितोषिक दिले जाईल.


सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ (एआयटी) विभागासाठी पहिल्या तिन्ही क्रमांकांच्या पुरस्कारामध्ये केवळ गुणवत्ता प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश असेल. राष्ट्रीय दुग्ध दिवसाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर 2023 रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.


            या पुरस्कारांसाठी आवश्यक पात्रता आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींचे तपशील जाणून घेण्यासाठी https://awards.gov.in किंवा https://dahd.nic.in संकेतस्थळांना भेट द्यावी.

गायींच्या नोंदणीकृत जाती (एनजीआरए 2023 साठी)


 


Friday, 11 August 2023

गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*

 *गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे.*


 😡म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते, जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही.


🔴 तर गाईच्या पिल्लाकडे अनोळखी व्यक्ती आल्यास ( वाघ सुद्धा )जीव देईल पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही.

 त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे.

 

 म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल ,

 पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता आवडते.

 

 म्हशीला घरापासून 2 किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही, तिची स्मरणशक्ती शून्य आहे.


 गायीला घरापासून ५ किमी अंतरावर सोडा.

 तिला घरचा रस्ता माहित आहे, ती येईल.गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.

 

 दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा, एकही मूल आईला ओळखू शकत नाही.


 तर गोशाळांमध्ये दिवसभर गाई-वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो तेव्हा सर्व मुले (हजारोच्या संख्येने) आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात, ही गाईच्या दुधाची आठवण आहे.

 

 म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते,


 पण गाय थोडं दूध शिल्लक ठेवतर आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला घेते तेव्हा शिल्लक दूध पाजते.

 हे गुण आईचे आहेत जे म्हशीत नाहीत.

 

 रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलांवर पाय ठेवते.


 पण गाय आली तर ती मुलांवर कधीच पाय ठेवत नाही.

 

 म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही...


 तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते.

 

 म्हशीचे दूध तामसिक असते.गाईचे सात्विक असताना.

 

 म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो, तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते.

 जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक ते उचलतो ...


 पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही.

 

 तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतसारखे आहे.


 *संकलनः रविंद्र प्रभाकरराव घोडके आर्किटेक्चर कन्सल्टंट ओझर* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

मोफत शस्त्रक्रिया शिबिर

 


राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भात जपानी शिष्टमंडळाशी चर्चा

 राज्यातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासंदर्भातजपानी शिष्टमंडळाशी चर्चा


            मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापनकरण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्वकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.


            मंत्री श्री. बनसोडे यांची जपानच्या शिष्टमंडळाने अलीकडेच भेट घेतली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी चीफ ऑफ मिशन कनेक तोशिहिरो, पोलिटिकल सेक्शन रिसर्चर शिमादा मेगुमी तसेच आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील उपस्थित होते.


            महाराष्ट्राचे क्रीडा विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर तेथील ऑलिंपिक वस्तू संग्रहालयाच्या धर्तीवर पुणे येथील होऊ घातलेल्या भव्य अशा ऑलिंपिक भवनात ऑलिंपिक संग्राहलय तयार करता येऊ शकेल, यावरही चर्चा करण्यात आली.


            जपानने तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात भरीव काम केले. त्यामुळे जापान आज क्रीडाक्षेत्रात अग्रेसर देश आहे. तसेच जपान हा शिस्तप्रिय, पर्यावरणपूरक जीवनपद्धती, बुद्धीजम मानणारा देश आहे. त्यामुळे बुद्धीज्म, क्रीडा, बंदरे, युवक कल्याण अशा विषयांवर जापानसोबत काम करता येईल असे मत मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.


            जपानच्या शिष्टमंडळाने सकारत्मक प्रतिदास देत, भारत- जपान संबंध दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत जपानचे कॉन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांनी व्यक्त केले. लवकरच या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी जपान उत्सुक असल्याचे शिष्टमंडळ सदस्यांनी सांगितले.


            मंत्री श्री बनसोडे हे आपल्या शिष्टमंडळासोबत जपान दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे जपानसोबत त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले. श्री. बनसोडे हे मंत्री झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जपानचे शिष्टमंडळ मंत्रालायात त्यांना भेटण्यासाठी आले होते. मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी शिष्टमंडळाच्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून यथोचित सन्मान केला.

नैरोबी येथे बॉयलर वर्ल्ड 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन

 नैरोबी येथे बॉयलर वर्ल्ड 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन

केनियाला भारताकडून स्वस्त दरात बाष्पकांचा पुरवठा शक्य


- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे


 


            मुंबई, दि. 11 :- “बाष्पके क्षेत्रामध्ये भारतातील बाष्पके ही आरबीआय कोडनुसार बनवली जातात. ही बनवताना अनेक अभियंते आणि कुशल कामगार आपले कौशल्य वापरतात. त्यामुळे केनियाने आयबीआर कोड स्वीकारल्यास भारत कमित कमी खर्चात बॉयलर पुरवू शकतो. तसेच केनियातील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भारताप्रमाणे पायाभूत प्रशिक्षण दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन केनियाचा सर्वांगिण आर्थिक व औद्योगिक विकास साधता येईल”, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केनियातील नैरोबी येथे आयोजित ‘बॉयलर वर्ल्ड 2023’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.


            ऑरेंज बिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी द रिपब्लिक ऑफ केनियाचे कामगार व सामाजिक संरक्षण कॅबिनेट सचिव फ्लोरेन्स बोर, केनियाच्या राज्य उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.जुमा मखवाणा, केनियातील भारताचे उच्चायुक्त (हाय कमिशन) नामग्या खांपा, ऑरेंज बिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन, महाराष्ट्र बॉयलर्सचे संचालक धवल अंतापूरकर उपस्थित होते.


            सर्व बॉयलर उत्पादक आणि बॉयलर वापरकर्त्यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी केनियाचे आभार मानले. केनियाचे कौतुक करताना मंत्री डॉ. खाडे म्हणाले, केनिया हा एकमेव विकसनशील देश आहे ज्यामध्ये युनायटेड नेशन संस्थेचे मुख्यालय आहे. भारत व केनियाचे विशिष्ट नाते आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात हजारो भारतीयांनी रेल्वेची पायाभूत सुविधा बांधण्यासाठी केनियामध्ये आपले योगदान दिले. आज लाखो भारतीय केनियाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, कामगार, दळणवळण, आरोग्य, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये केनियाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.


            उद्योग क्षेत्रातील जीवन आणि मालमत्तेचे धोक्यांपासून संरक्षण आणि उचित सुरक्षा उपायांचे पालन म्हणजेच औद्योगिक सुरक्षितता होय. यासाठी औद्योगिक नियमांमध्ये भारत सरकारने अनेक बदल केले आहेत. भारत १५३ वर्षांपासून जागतिक स्तरावर बॉयलर क्षेत्रामध्ये सर्वांना मार्गदर्शन करत आहे. भारतात बॉयलरच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आयबीआर कोड अंतर्गत अतिशय कडक तपासणी प्रणालीद्वारे बॉयलर बनवले जातात. भारतात बनवलेले बॉयलर दर्जेदार असून आंतरराष्ट्रीय मानक व सुरक्षिततेनुसार अधिक कार्यक्षम असल्याचे मी विश्वासाने सांगू शकतो. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रणालीला जागतिक मान्यता मिळाली आहे.


            उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसोबतच जबाबदार अभियांत्रिकी आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट राखले पाहिजे. जगाला हवामान बदलासारख्या जटिल आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बॉयलर तज्ञ म्हणून नवीन उपाय शोधण्यासाठी आपल्याला आपले कार्य करावे लागेल. स्वच्छ ऊर्जा, प्रगत साहित्य आणि उच्च कार्यक्षमता असलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आपली भविष्यातील गरज आहे.


            सुरक्षिततेचे महत्व लक्षात घेता बॉयलरचे सुरक्षित ऑपरेशन आणि योग्य देखभाल जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. उच्च सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आणि बॉयलर फिल्डमध्ये सुरक्षिततेची संस्कृती वाढविण्यात आपण सर्वांनीच नेहमीच आघाडीवर असले पाहिजे असेही मंत्री डॉ. खाडे म्हणाले.


            संपूर्ण जगात भारताच्या कार्य कुशल मनुष्यबळाची मागणी आहे. मानवी भांडवलाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि मुबलक उपलब्धता करण्यासाठी केनिया सरकारने एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे विनंती डॉ. खाडे यांनी केली.


            जागतिक बँकेच्या 'इज ऑफ डुइंग बिझनेस' च्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताने जगात ६३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केनिया इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीनुसार भारत हा केनियातील दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. ६० पेक्षा अधिक मोठ्या भारतीय कंपन्यांनी उत्पादन, रियल इस्टेट (स्थावर मालमत्ता), औषधोत्पादन, दूरसंचार, आयटी, बँकिंग आणि कृषी आधारित उद्योगासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणुकीमुळे केनियन नागरिकांना हजारो थेट नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी याप्रसंगी सांगितले.


००००



मनीषा सावळे/विसंअ/


भारतातील अती* *महत्वाच्या संस्थांची* *घोषवाक्ये संस्कृत मधील* *आहेत*. आवश्य वाचा. अशी माहीती कोठे वाचावयास मिळणार नाही.

 Indian Slogans 

*भारतातील अती* *महत्वाच्या संस्थांची* *घोषवाक्ये संस्कृत मधील* *आहेत*. आवश्य वाचा. अशी माहीती कोठे वाचावयास मिळणार नाही.


●भारत सरकार👉 सत्यमेव जयते

●लोक सभा👉 धर्मचक्र प्रवर्तनाय

●उच्चतम न्यायालय👉 यतो धर्मस्ततो जयः

●आल इंडिया रेडियो👉 सर्वजन हिताय सर्वजनसुखाय 

●दूरदर्शन👉 सत्यं शिवं सुन्दरम्

●गोवा राज्य👉 सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद् दुःखभाग्भवेत्।

●भारतीय जीवन बीमा निगम👉 योगक्षेमं वहाम्यहम्

●डाक तार विभाग👉 अहर्निशं सेवामहे

●श्रम मंत्रालय👉 श्रम एव जयते

●भारतीय सांख्यिकी संस्थान👉 भिन्नेष्वेकस्य दर्शनम्

●थल सेना👉 सेवा अस्माकं धर्मः

●वायु सेना👉 नभःस्पृशं दीप्तम्

●जल सेना👉 शं नो वरुणः

●मुंबई पुलिस👉 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

●हिंदी अकादमी👉 अहं राष्ट्री संगमनी वसूनाम्

●भारतीय राष्ट्रीय विज्ञानं अकादमी👉 हव्याभिर्भगः सवितुर्वरेण्यम्

●भारतीय प्रशासनिक सेवा अकादमी👉 योगः कर्मसु कौशलम्

●विश्वविद्यालय अनुदान आयोग👉 ज्ञान-विज्ञानं विमुक्तये

●नेशनल कौंसिल फॉर टीचर एजुकेशन👉 गुरुर्गुरुतमो धाम

●गुरुकुल काङ्गडी विश्वविद्यालय👉 ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत

●इन्द्रप्रस्थ विश्वविद्यालय👉 ज्योतिर्व्रणीत तमसो विज्ञानन

●काशी हिन्दू विश्वविद्यालय:👉 विद्ययाऽमृतमश्नुते

●आन्ध्र विश्वविद्यालय👉 तेजस्विनावधीतमस्तु

●बंगाल अभियांत्रिकी एवं विज्ञान विश्वविद्यालय,

शिवपुर👉 उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत

●गुजरात राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय👉 आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः

●संपूणानंद संस्कृत विश्वविद्यालय👉 श्रुतं मे गोपाय

●श्री वैंकटेश्वर विश्वविद्यालय👉 ज्ञानं सम्यग् वेक्षणम्

●कालीकट विश्वविद्यालय👉 निर्भय कर्मणा श्री

●दिल्ली विश्वविद्यालय👉 निष्ठा धृति: सत्यम्

●केरल विश्वविद्यालय👉

Sमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 Sमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यापन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

             

            मुंबई‍‍दि. १० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयामार्फत सन २०२३- २४ या आर्थिक वर्षामध्ये ५०% अनुदान योजनाबीज भांडवल योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

             महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल  योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या mpbcdc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.जिल्हा कार्यालयात स्वतः दाखल करावेत. त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीतयाची कृपया नोंद घ्यावी.

                  इच्छुक अर्जदारांचे कर्ज मागणी अर्ज ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.गृहनिर्माण भवनतळमजला रूम नं ३५कलानगरबांद्रा (पूर्व)मुंबई-५१ या ठिकाणी स्वीकारले जातील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

*****

Featured post

Lakshvedhi