Friday, 28 July 2023

सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार

 सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्याअनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 27 : नक्षलग्रस्त भागातील उर्वरित महिला महाविद्यालय तसेच अल्पसंख्यांक, भूकंपग्रस्त, आदिवासी, डोंगराळ, सीमावर्ती भागातील महाविद्यालयांना सन २००१ पूर्वी कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आलेल्या कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, विद्या शाखा यांना अनुदान मंजूर करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य राजेश टोपे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालयाबाबत सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला होता. त्यात काही त्रुटी आहेत असे वित्त विभागाने कळविले आहे. या त्रुटींची विभागाकडून तातडीने पूर्तता करून वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून या महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


            नक्षलग्रस्त भागातील पात्र 14 महिला महाविद्यालयांना विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अकृषी विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयातील ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालय अथवा विद्या शाखा नाही, अशा प्रत्येक तालुक्यामध्ये एका महाविद्यालयास किंवा विद्याशाखेस 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


००००


काशीबाई थोरात/विसंअ/

जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*

 *जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*


जिऱ्यामध्ये अँटी 🛡️ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील🧍🏻‍♂️ विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.


*त्वचेसाठी*

जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी 💧 रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॕक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं 🫳🏻 कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा उपयोग हा सोरायसिस 🦠 आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.


*केसांसाठी* 

त्वचेला सुंदर 👌🏻 करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत 💪 होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट ♨️ तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.


*ताप*

तापामुळे जेव्हा शरीर दूखू 😣 लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ 🍮 मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा ❄️ अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.


*सर्दी*

थंडीच्या दिवसात नाक 👃🏻बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून 🔥 घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका 🤧 येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल.


*पोटदुखी*

पोटात कधीही दुखू 😖 शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात 🥄मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.       



*सांधेदुखी*

मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा 🥄 रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची 💨 समस्येवरही याचा फायदा होतो.


*कॉलेस्ट्रॉल*

आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा 📈 त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खाण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याचं सेवन 🤌🏻 केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.


( *संकलन:* आर्या देव) 

🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.*)


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देश' अभीयान राबविण्यात येणार

 09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देशअभीयान राबविण्यात येणार

 

            नवी दिल्ली दि. 27 : 'आझादी का अमृत महोत्सव' 'मेरी माटी मेरा देशचा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदनशिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

            ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

            युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत करण्यात येणार असून देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. वसुधा वंदन’ कार्यक्रमाची दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत.

            ग्रामविकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी 'वसुधा वंदनआणि 'शिलाफलकम'चे महत्त्व सांगतप्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वीमातेचे संवर्धन करतील. तसेच 'वसुधा वंदनकार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळाग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल.

            देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

0000

पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

 पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 27 : समुद्रकिनार पट्टीजवळील शहरांच्या विद्युत वाहिन्यांबाबत जागतिक बँकेच्या मदतीने एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात 'ओव्हरहेड वायर्स' भूमीगत करण्यात येणार आहेत यामध्ये पनवेल शहराचाही समावेश करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


             सदस्य प्रशांत ठाकूर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पनवेल शहर विभागाअंतर्गत पनवेल शहराच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्च व लघुदाब वाहिन्यांपैकी संयुक्तिक वाहिन्यांचा एकूण लांबी 7.55 किलोमीटर असून त्यापैकी 0.5 कि. मी. चे विलगीकरण करण्यात आले असून उर्वरित 7.05 किलोमीटरचे विलगीकरण क्षेत्र (RDSS) योजनेअंतर्गत समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. या शहराचे झपाट्याने वाढणारे नागरिकरण लक्षात घेऊन कालबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मित्र असावा तर असा


 

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी

 राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी


सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन


            मुंबई, दि. 27 : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.


             रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.


             आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 


            आभा कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्ड मुळे उपचार करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदे आभा कार्डचे आहे.


असे काढाल आभा आरोग्य कार्ड


            तुम्ही भारतात कुठेही राहत असाल, तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number' असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.


             जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल.


            पुढील पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.


             त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा तपासून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे. आता आपला मोबाइल क्रमांक टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा क्रमांक ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार क्रमांक असतो तसा. हा 14 अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.


            आता आपल्याला आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA क्रमांक, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.


            त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA क्रमांक किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढे OTP साठी कोणत्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठवावा ते विचारले जाईल आधार लिंक मोबाइल नंबर किंवा ABHA नंबर लिंक मोबाइल क्रमांक. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.


             जर कार्डमध्ये काही माहिती चुकलेली असेल, तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑप्शनवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.


            या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 


०००



 


Thursday, 27 July 2023

वन्यप्राण्यांमुळे शेतपीकांच्या होणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढीची कार्यवाही सुरु

 वन्यप्राण्यांमुळे शेतपीकांच्या होणाऱ्या

नुकसानभरपाईच्या रकमेत वाढीची कार्यवाही सुरु

– वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

            मुंबईदि. 26 : वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचे आणि फळबागांचे होणारे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाची बाब समाविष्ट केली असून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहेतसेच शेत पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत दिली.  

            सदस्य डॉ. विनय कोरे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.

            ते म्हणाले कीविधानसभेत कालच वन्यप्राण्यांमुळे झालेली हानीइजा किंवा नुकसान याकरिता नुकसानभरपाई प्रदान करणेबाबत विधेयक मंजूर करण्यात आले असून विधानपरिषदेत ते मांडण्यात आले आहे. यानुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यासगंभीर जखमी अथवा जखमी झाल्यास त्याला नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आली आहे. याशिवायवन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव पशू मृत्युमुखी पडल्यास त्यातही नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये 30 दिवसांच्या आत संबंधितांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक करण्यात आले असून उशीर झाल्यास त्यावर व्याज द्यावे लागणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

            ते म्हणाले कीकोल्हापूर वनवृत्तामध्ये कोल्हापूरसातारासावंतवाडीसांगली व चिपळूण या पाच वनविभागांचा समावेश होतो. या वनक्षेत्रामध्ये मुख्यतः बिबटहत्तीरानगवारानडुक्करमाकडवानरमगरसांबर इत्यादी वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. वन्य प्राण्यांमुळे होणारे शेत पिकांचे व फळबागांचे जसे की नारळसुपारीकलमी आंबाकेळी व इतर फळझाडे यांचे नुकसानीकरीता अदा करावयाच्या अर्थसहाय्यासाठी सर्वप्रथम 2015 मध्ये रक्कम निश्चित करण्यात आली. त्यानंतर सन 2016 मध्ये ऊस व इतर शेत पिकांकरीता नुकसान भरपाईची कमाल मर्यादा 25 हजार रुपये इतकी निर्धारित करण्यात आली. या नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कार्यवाही शासनस्तरावर करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

            पन्हाळाशाहूवाडी या तालुक्यातील पन्हाळामलकापूर व पेंडाखळे या वनपरिक्षेत्रात मागील ३ वर्षामध्ये वन्यप्राण्यांमुळे मनुष्यहानीच्या 2 घटनामनुष्य जखमीच्या 11 घटनापीक नुकसानीच्या 3 हजार 63 तसेच पशुधन हानी व जखमीच्या 126 घटनांमध्ये एकूण 276 लाख 33 हजार रुपये नुकसान भरपाई संबंधितांना अदा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

             वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात वन्यप्राण्यांना जंगल क्षेत्रातून खाद्य मिळावे यासाठी कोल्हापूर वनविभागाअंतर्गत असलेल्या एकूण 11 वनपरिक्षेत्रात एकूण 329 हेक्टर क्षेत्रावर वन्यप्राण्याचे खाद्य म्हणून हत्ती गवताची लागवड करण्यात आलेली आहे. कुरण विकास करण्यात येत आहे. केंद्र शासनाने त्यास निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. वन्यप्राणी जंगल क्षेत्रामधून मालकी क्षेत्रात येऊ नये यासाठी जंगल क्षेत्र व मालकी क्षेत्रांच्या हद्दीवर वन्यप्राणी प्रतिबंधक चर (खंदक) खोदण्यात आलेले आहेत. वन्य प्राणी वनक्षेत्रातून मालकी क्षेत्रात आल्यास त्यास हुसकावून लावण्यासाठी त्या वन्य प्राण्याला इजा न होता परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरुपपणे सोडण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील 5 वर्षात वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी वनक्षेत्रात वनतळीमाती बंधारेसिमेंट बंधारेगॅबियन बंधारे बांधण्यात आलेले आहेत व त्याच बरोबर जंगल क्षेत्रात असलेले नैसर्गिक पाणवठे पुनर्जीवित करण्यात आलेले असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

            सदस्य नाना पटोले, आशिष जयस्वाल, प्रताप अडसड आणि अतुल भातखळकर यांनी उपप्रश्न विचारले. 

000

Featured post

Lakshvedhi