Thursday, 27 July 2023

गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिका यांना डिजीटल पद्धतीने जोडणार

 गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी

महारेरा आणि महापालिका यांना डिजीटल पद्धतीने जोडणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 27 : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तरादरम्यान दिली.


            सदस्य संजय पोतनीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही जणांकडून चुकीची अथवा खोटी कागदपत्रे दाखल करुन तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित शासकीय यंत्रणांची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय, बांधकाम क्षेत्रातील काही जणांकडून महारेरा प्रमाणित असे सांगून गृहप्रकल्पाच्या जाहिराती केल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गृहप्रकल्प हा मान्यताप्राप्त असल्याची खात्री करुनच घर खरेदीचा निर्णय घ्यावा, असेही सांगितले.


            महारेरा आणि मुंबई महानगरपालिका सध्या डिजीटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुणे, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथेही अशा प्रकारे डिजीटली जोडले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            दरम्यान, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बनावट बांधकाम परवानगी घेऊन महारेराचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र जोडून सदनिकांची विक्री करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. या महापालिका हद्दीत 655 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले होते.


            गृहविभागाच्या मार्फत हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे दिले असून या एका गुन्ह्यात 42 तर अन्य गुन्ह्यात 66 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. सावे यांनी दिली.


            सदस्य अजय चौधरी, अतुल भातखळकर, डॉ. जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभू, लहू कानडे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. 


0000

भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*

 *भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*


भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेत असताना, त्यात नकळत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता, यावर असलेले हे चिंतन मला आवडले. 

आपल्या साठी पाठवत आहे.


१) *गोमय* (सारवणे): पूर्वीच्या काळी घराच्या भिंती आतून व बाहेरून ह्या गाईच्या शेणाने सारावल्या जायच्या कारण गाईचे शेण हे प्रतिजैविक तसेच खनिजे युक्त असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि आजार पसरवणाऱ्या जिवाणू पासून प्रतिबंध करतो.


२) *गाभारा*: हिंदू मंदिरांची स्थापना वैज्ञानिक दृष्ट्या झाली आहे. मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते त्या भागाला “गाभारा” म्हटले जाते. हा गाभारा अश्या ठिकाणी असतो जिथे पृथ्वीतून येणाऱ्या चुंबकीय किरणांचे प्रमाण जास्त असते आणि ते उपासना करणाऱ्याला लाभदायक असतात.


३) *वेद मंत्र*: हिंदू प्राचीन काळात वेद मंत्रांचे पठण करण्यात येई. वेद मंत्रांचे उच्चार केल्याने शरीराचे आजार बरे करण्यास मदत होते जसे की रक्तदाब.


४) *तोरण*: आंबा, लिंबू तसेच अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या दरवाज्याला बांधून पूर्वी घर सजविण्यात यायचे. हि पाने वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात.


५) *प्राणायाम*: जर तुम्हाला रोजच्या ताणतणावातून आराम हवा असेल तर योगासने आणि प्राणायाम या पेक्षा चांगला उपाय नाही.


६) *बैठका*: पूर्वी वरिष्ट लोक देणारी शिक्षा म्हणजे कान पकडून बैठका काढणे, जे खर तर मन तेज बनविण्यास मदत करते तसेच आत्मकेंद्रित पणाला, ऐकण्यात त्रास असल्यास मदत करते.


७) *हळद*: हळदीत प्रतिजैविक, प्रतिऑक्सिडीकारक, विरोधी दाहक असे गुण असल्यामुळे हळद मिसळलेले पाणी सकाळ संध्याकाळ घर भोवती शिंपडले जाते.


८) *कान टोचणे*: लहान बाळाचे कान टोचणे हे एक आयुर्वेदिक उपचारातील भाग आहे. कानाचा जो भाग टोचला जातो तो दमा सारख्या आजरापासून बचाव करण्यास मदत होते.


९) *हनुमान चाळीसा*: नासा च्या संशोधनानुसार हनुमान चाळीसा म्हणजे सूर्य व पृथ्वी मधील अंतराची अचूक गणना आहे.


१०) *तुळस*: प्रत्येक हिंदूंच्या घराबाहेर तुळशीचं रोप असत. तुळशीचं पाने खाल्याने शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजाराला प्रतिबंध घालते.


११) *केळीचे किंव्हा पळसाचे पान*: हिंदू संस्कृती मधे केळीच्या किंव्हा पळसाच्या पानावर जेवण वाढतात कारण हे एक पर्यावरणपूरक साधन असून ते साफ करण्यासाठी कोणत्याही रासायनिक साबणाची गरज नाही तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता त्यांचा नायनाट करता येतो.


१२) *शंख पुकार*: शंख पुकारातून जी ध्वनी निर्माण होतो त्याने बरेच हानिकारक जीवजंतू चा नाश होतो. डासांची पैदास देखील शंख ध्वनीने प्रभावित होते ज्यामुळे मलेरिया सारख्या आजार पसरण्यात आळा बसतो.


१३) *दिवा*: तेलाचा किंव्हा तुपाचा दिवा घरात तसेच मंदिरात तेवत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


१४) *कडूलिंब व केळ्याचे झाड*: सकाळी कडूलिंब किंव्हा केळीच्या झाडाजवळ बसून उपासना करावी असे सल्ले दिले जातात, कारण ह्या झाडाजवळची हवा शुद्ध मानली जाते जी शरीरासाठी लाभदायी ठरते.


१५) *ॐकार*: ॐ चा सतत उच्चार हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवते. त्याच बरोबर शरीराला आराम देतो.


१६) *वाकून पाय पडणे*: वरिष्ठाच्या वाकून पाय पडल्याने पाठीचा कणा नीट ठेवण्यास मदत होते तसेच मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते.


*आपल्या जवळ अजून खूप काही असेल, तर जरूर सांगा ‌.*


🙏🏻🙏🏻

डोळे येणे,कंजक्टीवायटीस*

 *डोळे येणे,कंजक्टीवायटीस*



सध्या डोळे येण्याची साथ जोरदार सुरू आहे. पुढील उपाययोजना केल्यास तुम्हाला रिलिफ मिळू शकतो.

*कोमट दुधात चांगला मध मिसळा आणि ड्रॉपरच्या मदतीने 2-3 थेंब डोळ्यांमध्ये टाका. 

*ताज्या कोरफडीतील जेल काढा, ते स्वच्छ पाण्यात चांगले मिसळा आणि कापसाच्या मदतीने डोळ्याच्या पापणी वर लावा दिवसातून 3-4 वेळा आणि दोन थेंब प्रत्येक वेळेस डोळ्यात टाका.

*  ​​एक कप स्वच्छ पाण्यात 2 चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळा. कापसाच्या साहाय्याने या पाण्याने डोळे स्वच्छ ठेवा.

*ताजी कोथिंबीर घेऊन पाण्यात उकळा. आता हे पाणी गाळून थंड करा आणि या पाण्याने डोळे धुवा. यामुळे डोळ्यांची लालसरपणा, दुखणे आणि सूज दूर होते. 

*तुरटीचा एक खडा पाण्यात बुडवून त्या पाण्याने डोळे धुवा.   


डोळ्यांना खूप खाज सुटणे, लाल होणे, दुखणे, यामुळे डोळ्यांना खूप त्रास होतो आणि खूप वेदना होतात. त्यामुळे वरीलपैकी कोणतीही लक्षणे डोळ्यांत आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


पर्यटनासह, सिंचन, भूसंपादन या अनुंषगाने विविध कामांचा आढावा


            मुंबई, दि. 26 :- औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यात यावी. विशेषतः पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


            बैठकीस विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री अब्दुल सत्तार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, यांच्यासह आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव एच. के. गोविंदराज, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, ऊर्जा व उद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, ग्रामविकास व जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत आदी उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे हे दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.


            बैठकीत औरंगाबाद शहरात उभारण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक येथील पुतळा व तेथील परिसराच्या उभारणीला गती देण्यात यावी. याठिकाणचे नियोजित सर्व कामे वैशिष्ट्यपूर्ण, दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. औरंगाबाद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांबाबतही निर्देश देण्यात आले.


            पैठण येथील नाथसागर परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यान व संतपीठ उद्यान व तेथील परिसराचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे उद्यान प्रादेशिक पर्यटन आराखड्या अंतर्गत जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. अंजिठा लेणी परिसर बृहत आराखड्यांतर्गत सुमारे २३१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. या ठिकाणी नियोजनानुसार विविध पर्यटनस्थळ साकारण्यात येणार आहेत. या कामाला गती देण्याबाबतरी चर्चा झाली. सिडकोने औरंगाबाद शहर परिसरात जमिनी संपांदित केल्या होत्या. या जमिनी विमानतळासाठी देण्यात आल्या. या जमिनींच्या बदल्यात शेतकऱ्यांनी आता सिडकोच्या निकषाप्रमाणे अतिरिक्त लाभाची मागणी केली आहे. याबाबत विविध विभागांच्या समन्वयाबाबत चर्चा झाली.


            वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची कर्ज एकरकमी परतफेड करून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा कमी करणे, ही योजना जलसंपदा विभागाने ताब्यात घेणे या अनुषंगाने चर्चा झाली. याशिवाय ऊर्जा विभागाशी निगडित विविध विषय, फुलंब्री परिसरातील बायपास रस्ता, या परिसरात आयटीआय उभारणी, एमआयडीसीच्या माध्यमातून मराठवाड्यात पेट्रोल-डिझेलचा डेपो उभारणी याबाबतही संबंधित विभागांना निर्देश देण्याचा निर्णय घेण्यात आला.


            बैठकीत विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने संपादित केलेल्या जमिनीच्या भूसंपादानाच्या अनुषंगानेही चर्चा झाली. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश

 दिले.


0000


कला केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक

 कला केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी

जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक


- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


            मुंबई, दि. 26 :- राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. तसेच कला केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यासाठी मसुदा तयार करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.


            कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुनर्वसन, उपाययोजना आणि अपहरणातील अल्पवयीन मुली व महिलांचा शोध यासंदर्भात आज उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनातून पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, औरंगाबादचे (छत्रपती संभाजीनगर) विभागीय उपायुक्त संजय सक्सेना, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील, औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानदेव चव्हाण, अहमदनगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, परभणीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर, नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, नंदुरबार, बीड, पुणे, सातारा, परभणी, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक उपस्थित होते.


            डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यात कला केंद्रामध्ये अल्पवयीन मुली सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या मुलींची सुटका आणि त्यानंतर त्यांचे शिक्षण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा कला केंद्राना मान्यता देताना आणि ते चालविण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी शासनाला एक मसुदा सादर करण्यात येईल. त्यासाठी पोलीस विभागाने मसुदा तयार करावा. त्यात अशा कला केंद्राचे नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक समिती गठित करण्याच्या सूचना शासनाला देण्यात येईल. या समितीमध्ये तहसीलदार, जिल्हा कामगार अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मानव तस्करीवर काम करणा-या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश करण्यासंदर्भात शासनाला मसुदा देण्यात येईल. तसेच अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व महिला सापडल्यानंतर त्या पुन्हा वाईट मार्गाला लागणार नाहीत यासाठी एक निश्चित कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी निश्चित करुन देण्याची गरजही त्यांनी यावेळी प्रतिपादित केली.


०००००

विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासांत शासन निर्णय. बांबू व्यवस्थपण

 विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासांत शासन निर्णय.

            मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराचा प्रत्यय आला. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन संदर्भात समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत केवळ दोन तासांतच या संदर्भातील शासन आदेश जारी केला.


            वनविभाग गडचिरोली, आलापल्ली व वडसामध्ये सामूहिक वनहक्क व पेसाअंतर्गत शाश्वत बांबू व्यवस्थापनासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यासंदर्भात हा शासन आदेश आहे.


            या समितीत डॉ. होळी हे अध्यक्ष असतील. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक हे सदस्य असतील, तर विभागीय वन अधिकारी दक्षता, गडचिरोली वनवृत्त हे सदस्य सचिव असतील.


            समितीच्या माध्यमातून सामूहिक वन हक्क व पेसाअंतर्गत प्राप्त अधिकारानुसार बांबू संवर्धन करून स्थानिकांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचविणे, सामूहिक वनहक्क बाहेरील वनक्षेत्रात बांबूच्या जास्त कापणीबाबत आलेल्या तक्रारींची तपासणी आणि चौकशी करणे आणि योग्य कारवाईसाठी प्रस्तावित करणे, तसेच भविष्यात अशा कोणत्याही घटना टाळण्यासाठी योग्य धारणांची शिफारस करणे, बांबू रोपवन कार्यक्रमात सुधारणा करणे, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन योजना तयार करणे आणि अंमलबजावणीसाठी आवश्यक साहाय्य वनविभागामार्फत पुरविण्याबाबत शिफारशी करणे या विषयांचा अभ्यास करण्यात येईल. समितीला आपला अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आ

ला आहे. 


धर्म संस्था स्ताय, संभवामी युगे युगे

 

Heavy rain flooded inner Vrindavan ...Yamuna river entered into interior Vrindavan. Devotees instead of feeling what happened....took Lord Sri Krishna on a boat yatra..spiritualising the entire flood scenario.

Featured post

Lakshvedhi