Tuesday, 25 July 2023

सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्यारंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक

 सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्यारंगभूमी उपसमितीची औरंगाबादला बैठक


            मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचे पुनर्विलोकन सुरू असून त्यासाठी एक समिती आणि विषयवार दहा उपसमित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यातील रंगभूमी उपसमिती दि.27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शहराच्या दौऱ्यावर येत असून रंगकर्मींनी या उपसमितीसमोर सांस्कृतिक धोरणासंदर्भातील आपली निवेदने व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


            राज्याच्या सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीच्या रंगभूमी उपसमितीची बैठक गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे होणार आहे. रेल्वे स्थानकाच्या विरुद्ध बाजूला राजनगरमधील हॉटेल द स्काय कोर्टच्या मारी गोल्ड हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.


            या बैठकीमध्ये काळाच्या ओघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप, नाट्य क्षेत्रातील बदल नाट्यकर्मींच्या अडचणी, त्यांच्या सूचना इत्यादी विचारात घेतल्या जातील.


000

शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा

 शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याने विचार करावा


- राज्यपालांची आरोग्य विभागाला सूचना


            मुंबई, दि. २४ : रुग्ण दगावला आणि शव नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसली, तर ग्रामीण भागात रुग्णाच्या नातलगांना नाईलाजाने शव उचलून न्यावे लागते. त्यामुळे राज्याने मृत व्यक्तींना नेण्यासाठी शववाहिका सेवा उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. 


            राज्यपाल श्री. बैस यांनी राजभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत उपस्थित होते.


            घटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार राज्यातील अनुसूचित भागांच्या विकासाकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपणाकडे आहे असे नमूद करून आरोग्य योजनांचा लाभ अनुसूचित भागांमध्ये किती प्रभावीपणे होत आहे याची माहिती देण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली. ‘सिकलसेल’ आजाराकडे लक्ष देण्यासाठी राज्याचा स्वतंत्र उपविभाग असावा, असे राज्यपालांनी सांगितले. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड व इतर आरोग्य विमा कार्ड वितरणात गती आणावी, अशीही सूचना राज्यपालांनी केली. 


            ग्रामीण आणि दुर्गम भागात विशेषज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टर्स ग्रामीण भागात काम करण्यास तयार होत नाहीत, याचा विचार करून त्यांना अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आपण प्रस्तावित केले असल्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.


            सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व आरोग्य आयुक्त धीरज कुमार यांनी यावेळी राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा, आरोग्य सेवेतील मनुष्यबळाची सद्य:स्थिती व रिक्त पदे, विभागाचे यशस्वी उपक्रम, आरोग्य विषयक महत्वाचे निर्णय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान, महाराष्ट्र आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्प आदी बाबींची राज्यपालांना माहिती दिली.   


००००


Governor Bais reviews progress of Public Health schemes in Maharashtra


      Maharashtra Governor Ramesh Bais reviewed the progress of implementation of various projects and programmes of the Public Health Department in Maharashtra at Raj Bhavan Mumbai on Mon (24 July). Minister of Public Health and Family Welfare Dr Tanaji Sawant was present.


      Additional Chief Secretary Public Health Milind Mhaiskar and Commissioner Health Services Dheeraj Kumar gave an elaborate presentation on Health Infrastructure and Indicators in Maharashtra, Achievements of Health Department, Major decisions taken by the Department, Special Initiatives to reduce child and maternal mortality in Melghat, National Health Mission, Ayushman Bharat, Rashtriya Bal Swasthya Programme, Pradhan Mantri TB Mukta Bharat Abhiyan, Maharashtra Emergency Medical Services project, etc.


*****



 

बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापनएसआयटी’ चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार

 बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापनएसआयटी’ चे काम तीन महिन्यांत पूर्ण करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या वतीने विकासक व वास्तूविशारद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून गृह विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे. येत्या तीन महिन्यात एसआयटीचे काम पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            सदस्य निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर अवैध बांधकामांवर आळा बसला असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नुकतीच ‘रेरा’च्या देशभरातील रेग्यूलेटरची बैठक झाली असून त्यात प्राधिकरणासमोरील अडचणी आणि कार्यपद्धतीमधील बदलांबाबत चर्चा झाली आहे. याअनुषंगाने ज्या सूचना येतील त्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सुधारणा शासन करेल, तसेच ज्या सूचना केंद्राकडे पाठवायच्या असतील त्या केंद्र सरकारकडे पाठविल्या जातील. प्राधिकरणावरील रिक्त पदांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


            कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रकरणी मानपाडा येथील दाखल गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना, तर रामनगर येथे 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.सावे यांनी दिली. संबंधित दुय्यम निबंधकावर कारवाई सुरू असल्याचे सांगून यापुढे ऑनलाईन परवानगीशिवाय नोंदणी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार

 त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्यात आली असून त्याचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्रद्धा अथवा परंपरा यामुळे समाज एकत्र येणार असेल, तर त्यास कुणाची हरकत असणार नाही. तथापि, खोडसाळपणा अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन झाल्यास त्यावर कारवाई होईल. त्र्यंबकेश्वर प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. याप्रकरणी ज्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून याबाबतचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, नरेंद्र दराडे, अब्दुल्ला खान दुर्राणी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.


00000

हे एकाच वेळी सुखद आणि दुःखद बाजू आहेत.




 A shark is chasing a small boat, carrying a turtle in its mouth, which, it seems, is trying to save, not eat! The video shows how the animal is trying to drag the turtle onto the boat. And when the crew members realize what the shark really wants to do to get on the boat and save the turtle's life, they help. It turned out the turtle was suffocating from a plastic rope attached to its neck. And the shark wanted to help And managed to help! 👌🏻 It's very beautiful and sad at the same time.. beautiful as the animal understands the pain and tries to help .. on the other hand humans are just self centred.. thinking that they own the world.. human's are polluting everything around them causing the other living organisms die and deteriorating the entire ecosystem..😰

*हे काही नियम पाळा निरोगी रहा.*

 *हे काही नियम पाळा निरोगी रहा.*


१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो

वैद्य.गजानन



Monday, 24 July 2023

१६४ वा आयकर दिवस मुंबईत उत्साहाने साजरा

 १६४ वा आयकर दिवस मुंबईत उत्साहाने साजरा


प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद  


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 24 : “संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे”, असे नमूद करून आगामी काळात देशात करसंस्कृती विकसित करण्यासाठी आयकर विभागाने नागरिकांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये कर साक्षरता निर्माण करावी असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  


            राज्यपाल श्री.बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत १६४ वा आयकर दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंबईच्या आयकर विभागातर्फे करण्यात आले होते. 


            गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने आयकर भरणे तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुलभ केले असून आयकरदाते वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत आयकरापासून मिळणारे उत्पन्न १६७ टक्क्यांनी वाढले आहे, तर आयकर परताव्याची संख्या २.९६ कोटींहून ७.६३ कोटी इतकी वाढली असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 


            आंतरराष्ट्रीयस्तरावर भारताचा दबदबा वाढत आहे. भारताला व्यापारस्नेही देश बनवणे आपले उद्दिष्ट आहे. या दृष्टीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर प्रशासकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे राज्यपालांनी सांगितले. देशाला ५ ट्रिलियन डॉलर व राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी तसेच 'ब्रँड इंडिया' बनविण्यासाठी प्रत्येकाला प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा, पारदर्शकता व देशाप्रती बांधिलकी जपावी लागेल, असे राज्यपालांनी सांगितले.   


कृत्रिम प्रज्ञेमुळे आयकर निर्धारण अधिक जलद व अचूक होईल : एन चंद्रशेखरन


            देशाच्या विकासात आयकर विभागाच्या योगदानाचे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी भरभरून कौतुक केले. आगामी काळात कृत्रिम प्रज्ञा सर्व क्षेत्रात येणार असून योग्य वापर केल्यास देशातील करदात्यांच्या संख्येत वाढ होईल, करनिर्धारण अचूक होईल, कार्यक्षमता वाढेल व कर परतावा देखील योग्य इतका व वेळेत मिळेल, असे त्यांनी सांगितले.


            भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असून अनेक वर्षांपर्यंत भारत सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था असेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारतातील दरडोई उत्पन्न वाढेल, देशात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील, एकूणच संपन्नता वाढेल व भारताच्या प्रगतीमुळे इतर देशांच्या प्रगतीवरदेखील सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.   


            करामुळे पायाभूत सुविधा विकसित करणे, सार्वजनिक सेवा, आरोग्य व शिक्षण देणे शक्य होते, असे सांगून करोना काळात जनसामान्यांना मोफत अन्नधान्य देणे व लसीकरण मोहीम राबवणे करामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. चांगल्या कर प्रणालीमुळे देशात प्रामाणिकपणा व उत्तरदायित्वासारखी मूल्ये रुजतात, असे त्यांनी सांगितले.


            स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षानंतर आजदेखील आपण काही बाबतीत आदर्श म्हणून इंग्लंड, अमेरिकेकडे पाहतो. परंतु भारताने ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहारांसाठी सर्वसमावेशक डिजिटल व्यासपीठ निर्माण करून अंगीकारले आहे त्यामुळे वास्तविक इतर देशांनी भारताकडून शिकावे, असे काम आपण केले असल्याचे त्यांनी सांगितले.  


            मुंबईच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त गीता रविचन्द्रन यांनी प्रास्ताविक केले,तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँक ऑफ बडोदाचे मुख्याधिकारी देबदत्त चांद, आयकर आयुक्त विनय सिन्हा, अतिरिक्त आयुक्त सौरभ देशपांडे, व्यापार संघटनांचे प्रतिनिधी तसेच आयकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


००००


Maha Governor, Tata Chairman attend Income Tax Day Celebrations in Mumbai


      Maharashtra Governor Ramesh Bais presided over 164th Income Tax Day celebrations in Mumbai. The Income Tax Day celebrations was organised by the Income Tax Department at Y B Chavan Auditorium in Mumbai.


      Chairman of Tata Sons N. Chandrasekharan, Principal Chief Commissioner of Income Tax Mumbai Geetha Ravichandran, MD & CEO of National Stock Exchange Ashish Kumar Chauhan, Executive Director of Bank of Baroda Debadatt Chand, representatives of Trade organisations, officers and staff of Income Tax were present.


      Congratulating the Income Tax Department for its transformational contribution in the progress and development of the nation, the Governor expressed happiness that Mumbai's share in the total income tax collection was one third. He said during the last 9 years, tax collection had increased 167 per cent while tax returns had increased from 2.96 crore to 7.63 crore. The Governor called for promoting honesty, integrity, transparency and commitment to build 'Brand India' and to achieve the goal of a 5 trillion dollar economy.


      Complimenting the Income Tax department, Chairman of Tata Sons N Chandrasekharan said with proper usage, Artificial Intelligence will increase the number of taxpayers, improve efficiency and facilitate precise estimation of tax and refund.


      He said India is poised to become the third largest economy in the world. In this connection he said India will remain the fastest growing economy for many years, improve per capita income, create jobs and prosperity and also impact the progress of other nations.


0000



 

Featured post

Lakshvedhi