Tuesday, 25 July 2023

त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार

 त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणीएसआयटी’चा अहवाल महिनाभरात मागविणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. २४ : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्यात आली असून त्याचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्रद्धा अथवा परंपरा यामुळे समाज एकत्र येणार असेल, तर त्यास कुणाची हरकत असणार नाही. तथापि, खोडसाळपणा अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन झाल्यास त्यावर कारवाई होईल. त्र्यंबकेश्वर प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. याप्रकरणी ज्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून याबाबतचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, नरेंद्र दराडे, अब्दुल्ला खान दुर्राणी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.


00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi